Sunday, 31 December 2023

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 

 

            मुंबईदि. 31 : प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरआमदार सदा सरवणकरमाजी आमदार राज पुरोहितउद्योगपती नादीर गोदरेजमुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहलअतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेडॉ. सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

महास्वच्छता अभियान राज्यभर

 

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले. या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्य प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे.

 

स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली

 

            मुंबई शहरात सुरू केलेल्या या अभियानात शाळामहाविद्यालय विद्यार्थीस्वयंसेवी संस्थाज्येष्ठ नागरिक संघविविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झाले आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज येथे सांगितले.

 

मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविणार

 

            विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्यासाठी विचार सुरू आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहेअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

 

स्वच्छता कर्मचारी मुंबईचा खरा हिरो

 

            मुंबई शहरातील स्वच्छता कर्मचारी खरा हिरो आहे. कारण ते सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. मुंबई स्वच्छ ठेवतात. या कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सफाई कर्मचारी यांना विमा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहेअसे त्यांनी सांगितले.

 

 

स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवालोकप्रतिनिधींना सूचना

 

            मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र नेले जाणार आहे. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवाअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध लोकप्रतिनिधींना केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे आमदार विद्या ठाकूरआशिष शेलारयामिनी जाधवभारती लव्हेकरप्रकाश सुर्वेमंगेश कुडाळकरदिलीप लांडेकालिदास कोळंबकर यांच्याशी संवाद साधला.

 

            तत्पूर्वी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मुंबई शहरात राबवल्या जात असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हबाबत माहिती दिली. यावेळी स्वच्छता कर्मचारी संदीप पवारशीला जाधवमच्छिंद्र सावंतस्वप्नील शिरवाळेअर्चना मोरे यांचा सत्कार करण्यात आला.   अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आभार मानले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. स्वच्छता कामात उपयोगी ठरणाऱ्या वाहनांच्या संचलनास हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, सदानंद धवन उद्यान, भोईवाडा येथे भेट देऊन सफाई कर्मचारी व मुलांशी संवाद साधला.

000


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi