Thursday, 30 November 2023

 वर्षाच्या अखेरीस 'भवताल' सोबत... चला निसर्गात !

- नाताळच्या सुट्टीत मुलं काय करताहेत?

नाताळच्या सुट्टीत मुलांना आणि वर्षाच्या अखेरीस मोठ्यांना निसर्गाची अद्भुत रूपे दाखवण्यासाठी, त्यांचा अनोखा अनुभव देण्यासाठी "भवताल टीम" सज्ज झाली आहे. त्यासाठी २३ ते २५ डिसेंबर आणि २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत नियोजन करण्यात आले आहे.

पालकांच्या आग्रहाखातर १० वर्षांपुढील मुला-मुलींसाठी "एक्साइटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा" हा कॅम्प २३ ते २५ डिसेंबर या काळात होणार आहे. कळसुबाई शिखर, सांदण दरी, प्राचीन अमृतेश्वर मंदिर, कोकणकडा यासह निर्भेळ निसर्गात रमण्याचा आनंद मिळणार आहे. शिवाय तज्ज्ञांसोबत निसर्गाची अनेक रहस्यं समजून घेता येणार आहेत.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:

मोठ्यांसाठी २९ ते ३१ डिसेंबर या काळात "वंडर्स ऑफ जिऑलॉजी" या इकोटूरचे नियोजन आहे. त्याद्वारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या आपल्या खडकात दडलेल्या अद्भुत गोष्टी, त्यांची गुपितं, त्यांचा आपल्याशी असलेला संबंध समजून घेता येणार आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या काळात नेणाऱ्या लाव्हा टनेलमध्ये प्रवेश, हजारो किलोमीटरवरून आलेल्या ज्वालामुखीच्या राखेचा शोध, नदीतील प्रचंड आकाराचे रांजणखळगे, अलीकडच्या काळातील जीवाश्मांचा शोध, भन्नाट नैसर्गिक पूल... अशा अनोख्या गोष्टींचे एक्सप्लोरेशन करण्याची संधी मिळणार आहे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:

संपर्कासाठी:
9545350862
9922063621



- भवताल टीम
--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi