काही महिन्यांपूर्वी इस्रोची एक टीम आमच्या कंपनीत अधिकृत दौऱ्यावर आली होती. अधिकृत काम संपल्यावर आम्ही त्यांचा सत्कार आणि एक छोटासा संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यांच्या टीम लीडरचं भाषण संपल्यावर मी एक प्रश्न विचारला,
"इस्रोच्या यशाचं रहस्य काय?"
त्यांनी उत्तर दिलं, "आमचं टीमवर्क..! समजा, एक प्यून टेबल शिफ्ट करतोय आणि वाटेत तो अडखळला. त्याच वेळेस इस्रोचे चेअरमन जवळून जात आहेत. तर ते लगेच त्याच्या मदतीसाठी धावून येतात . ते असा विचार करत नाहीत की मी चेअरमन आहे, शिपायाला मदत कशी करू?
समजा झाडूवाला फरशी साफ करतोय. आणि GM साहेब समोरून येतायत. तर ते फरशी सुकेपर्यंत थांबतात. ओल्या फरशीवर पाय ठेवत नाहीत.
आम्ही एकमेकांच्या कामाचा आदर करतो."
भव्य दिव्य यश असं एका रात्रीत मिळत नाही. कठोर परिश्रमांच्या जोडीने आपल्या सहकाऱ्यांमध्ये प्रेम आणि विश्वासाची भावना रूजवावी लागते. अहंकाराची शिरस्त्राणे दूर उतरून ठेवावी लागतात. मग चंद्र सहजपणे जवळ येतो.
🌹🎊✨🌈🌙🌔🌟
-
No comments:
Post a Comment