Saturday, 28 October 2023

दहावीच्या परीक्षेसाठी प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाइन पद्धतीने भरावेत

 दहावीच्या परीक्षेसाठी प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज

 शाळांनी ऑनलाइन पद्धतीने भरावेत

- मुंबई विभागीय मंडळ सचिव डॉ.सुभाष बोरसे

            मुंबईदि. 27 : सन 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित शुल्कासह सरल डाटाबेसवरून सोमवार 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरावेतअसे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी कळविले आहे.

            दहावीसाठी प्रवीष्ट होणारे नियमित विद्यार्थीपुनर्परीक्षार्थीयापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रवीष्ट होणाऱ्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

            कोणताही विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाहीयाची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावीअसे आवाहन मंडळाचे सचिव डॉ.बोरसे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi