Friday, 28 July 2023

पनवेलमधील वीज वाहिन्या भूमिगतकरण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ

 पनवेलमधील वीज वाहिन्या भूमिगतकरण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 27 : समुद्रकिनार पट्टीजवळील शहरांच्या विद्युत वाहिन्यांबाबत जागतिक बँकेच्या मदतीने एक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यात 'ओव्हरहेड वायर्स' भूमीगत करण्यात येणार आहेत यामध्ये पनवेल शहराचाही समावेश करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


             सदस्य प्रशांत ठाकूर यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पनवेल शहर विभागाअंतर्गत पनवेल शहराच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या उच्च व लघुदाब वाहिन्यांपैकी संयुक्तिक वाहिन्यांचा एकूण लांबी 7.55 किलोमीटर असून त्यापैकी 0.5 कि. मी. चे विलगीकरण करण्यात आले असून उर्वरित 7.05 किलोमीटरचे विलगीकरण क्षेत्र (RDSS) योजनेअंतर्गत समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. या शहराचे झपाट्याने वाढणारे नागरिकरण लक्षात घेऊन कालबद्ध पद्धतीने हे काम पूर्ण करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi