*👉माका (भुंगराज)*
भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का! हा माका आहे माका.
औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो.
*आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात :*
जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो..
केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.
जरा न येता पुष्कळ दिवस जगण्यासाठी व केस काळे राहण्यासाठी पुष्य नक्षत्री माक्याची झाडे उपटून आणून स्वच्छ धुऊन मुळे वेगळी करावी व झाड वेगळे करावं. यांना सावलीत दोन दिवस व उन्हात दोन दिवस वाळवून वेगवेगळे खलबत्यात कुटून वस्त्रगाळ चूर्ण करावे.
पुष्य नक्षत्री मुळीचे चूर्ण १ तोळा भाताच्या पेजेतून घ्यावे व दररोज फांद्याचे चूर्ण १ तोळा तिळ तेल २० मिली यातून घ्यावे. असे १ वर्ष घ्यावे किंवा ३ महिने घ्यावे.
माक्याचा रस चाई, टक्कल किंवा केस काळे करायचे आहे यासाठी आगोदर डोक्याचे सर्व केस काढून नंतर माक्याचा रस चोळावा व पोटात पण पंचवीस मिली घ्यावा किंवा माका चुर्ण एक चमचा व काळे तिळ एक चमचा असे खाऊ शकतो फक्त अट एवढीच आहे की २१ ते ४१ दिवस दुध भात हेच अन्न खाऊन राहायचे.
महिलांनी एक लीटर भृंगराज रस व एक लीटर खोबरेल तेलात शिजवून थंड करून गाळून घ्यावे व दररोज डोक्यास लावावे. केस गळणे, पिकणे, टक्कल पडणे ह्या समस्या जातात.
माका रस व दुध भात यावर ४१ दिवस काढले तर शरीर रोगमुक्त होऊन तारुण्य मिळते, कायापालट होतो.
दाढ दुखत आहे तिच्या विरुद्ध कानात माका रस थोडा गरम करून चार थेंब टाकावा दाढ दुखी राहते.
भंगदरावर माक्याची चटणी बांधत जावी भंगदर बरा होतो. कानातील नाद, गोम, गोमाशी, किडा, मुंगी जाणे यावर माका रस कानात घालावा किंवा साधे मिठाचे पाणी घालावे. कावीळात दोन्ही वेळा दोन चमचा माका रस दररोज ७दिवस पाजावा, तेलकट वर्ज..
अर्ध डोके दुखीमध्ये माका रसात मिरे पावडर घालून मस्तकी लेप द्यावा.
उच्च रक्तदाब याच्या रसाने सामान्य होतो दोन चमचा रस दररोज साठ ते नव्वद दिवस घ्यावा.
मुले, महिला माती खात असतील तर स.-दु- सं. एक- एक चमचा माका रस द्यावा माती खाणे विसरून जातात.
पुरुषांनी डोक्यासाठी माकारस तीळ तेलात सिद्ध करून वापरणे व दररोज रात्री झोपतांना हे तेल लावावे.
संकलन-
डॉ. प्रमोद ढेरे,
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा lakshvedhimm.blogspot.com ⬇️⬇️⭕️*
_
No comments:
Post a Comment