जळगाव विमानसेवेसाठी नवीन विमान कंपनीला जबाबदारी दिली जाईल - ज्योतिरादित्य सिंधीया
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांना आश्वासन
मुंबई ः जळगाव विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी नवीन विमान कंपनीला जबाबदारी देऊन लवकरात लवकर विमानसेवा सुरू केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री नाम. ज्योतिरादित्य सिंधीया यांनी ललित गांधी यांना दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाम. ज्योतिरादित्य सिंधीया यांची त्यांच्या कोल्हापूर दौर्यात भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या प्रश्नांसंबंधी निवेदन देऊन चर्चा केली त्या प्रसंगी ते बोलत होते.
विशेषतः जळगाव विमानसेवा सुरू करणे, नाशिक येथुन नवीन मार्गावर विमानसेवा सुरू करणे, औरंगाबाद पूणे हवाई सेवा, कोल्हापूर येथुन नवीन विमानसेवा मार्ग, अकोला, रत्नागिरी, चिपी विमानतळाबाबतही चर्चा करण्यात आली.
सोलापूर विमानतळावरून नियमित प्रवासी सेवा सुरू करण्यासंबंधी असलेल्या अडचणी दुर करण्याची मागणीही ललित गांधी यांनी केली.
केंद्रीय मंत्री नाम. ज्योतिरादित्य सिंधीया या संदर्भात नवी दिल्ली येथे चेंबरच्या पदाधिकार्यांसमवेत लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे सांगितले.
यावेळी खासदार धनंजय महाडीक, समरजित घाटगे, सतीश माने,
No comments:
Post a Comment