Friday, 12 August 2022

अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा"

 राज्यभरात "अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा" मोहिमेचे आयोजन

             मुंबई, दि. 11 : स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे राज्यशासनातर्फे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 12 ऑगस्ट 2022 रोजी राज्यभरात अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या सर्व विभागांनी आपल्या स्तरावर "अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा" घ्यावी, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

        “ प्रिय मित्रानो., तरुणाई ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते आणि तरुणांच्या शक्तीचे समाज आणि देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी नशामुक्त भारत अभियानात सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. देशासमोरील हे आव्हान स्वीकारून आज आपण नशामुक्त भारत अभियानांतर्गत एकजूट होऊ आणि केवळ समाज, कुटुंब, मित्रच नव्हे तर आपण स्वतः ही नशामुक्त होऊया कारण बदलाची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे.” अशी प्रतिज्ञा घेवून आपला जिल्हा / राज्य (नाव) नशामुक्त करण्याचा दृढ संकल्प करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi