Thursday, 11 August 2022

 जय महाराष्ट्र' कार्यक्रमात बिभीषण चवरे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        गुरुवार, दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी सायं 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

            स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे, राज्यात या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हर घर तिरंगा, स्वराज्य महोत्सव यांसारख्या कार्यक्रमांची तयारी, नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी कसे करून घेतले जाणार आहे, यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या अन्य उपक्रमांविषयी माहिती श्री. चवरे यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.

000000



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi