Sunday, 26 June 2022

राम कृष्ण हरी

 प्रेरक वृत्त :


देहु गावाचे माजी सरपंच तुकाराम काळोखे सांगत होते ,


"देहु गावात वारी असेपर्यन्त गावातील लोक बाहेरगावीच रहात असत ''

"गावामधून वारी गेल्यानंतर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असे, आम्ही 15 दिवस गावात जात नसू, परंतु

 या वेळी वारी गेल्यानंतर सकाळी गावात पोहोचलो तर संपूर्ण  गाव स्वच्छ होतं."


"संघाचे 800 स्वयंसेवक अहोरात्र 3 दिवस 'निर्मल वारी अभियान' राबवत होते त्याचाच हा परिणाम होता."


पुढे वारीच्या प्रत्येक मुक्कामात साधरण 500 स्वयंसेवक हे 'निर्मल  वारी अभियान' राबवत आहेत.


संघावाचून कोण स्विकारील काळाचे आव्हान 


या वेळची आषाढ़ी वारी निर्मल वारी म्हणून साजरी करायची असे संघाने ठरवले . आणि काय अाश्चर्य हजारो स्वयंसेवकांची फौज तयार झाली . दिंड्या मुक्कामाच्या गावातून पुढे गेल्या की मागे उरायचे ते शौचाचे व घाणीचे साम्राज्य पण माऊलींवरील श्रद्धेपोटी व हिंदू धर्मावरील प्रेमापोटी वारी रस्त्यावरील सर्व गावे ही घाण मुकाट्याने सहन करीत . पण राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाच्या कार्यकर्त्यांनी गावांची होणारी ही अडचण ओळखली आणि निर्मल वारीचे नियोजन सुरू झाले. अडचणींचे डोंगर उभे राहिले पण हार मानील तो स्वयंसेवक कसला ? दिंड्यांबरोबर निघाले हे स्वच्छतेचे वारकरी फिरती शौचालये घेऊन . ज्या गावात दिंडीचा मुक्काम त्या गावात अगोदरच ही शौचालये तयार . परिणाम वारी आता निर्मल झालीय . संघाच्या निरपेक्ष वृत्तीने काम करणार्या स्वयंसेवकांना आशिर्वाद देत दिंड्या पुढे सरकताहेत अशक्य ते शक्य करतो तोच स्वयंसेवक आणि त्याला असा कणखर बनवतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची नियमित होणारी शाखा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi