Friday, 1 July 2022

मुख्यमंत्री

 एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

 

            मुंबईदि. 30 :- महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून श्री.एकनाथ शिंदे यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

            राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर श्री. शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाचा उल्लेख करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

            या सोहळ्यास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेकेंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटीलकेंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह सर्वश्री प्रवीण दरेकरचंद्रकांत पाटीलआशिष शेलारसुधीर मुनगंटीवारगिरीश महाजनमंगलप्रभात लोढाचंद्रशेखर बावनकुळेप्रसाद लाडराधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर तसेच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवअपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहनितीन गद्रेप्रधान सचिव दीपक कपूर, मनीषा म्हैसकरविकास खारगेमुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहलएमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासपोलिस महासंचालक रजनीश सेठमुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

            पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

पदभार स्वीकारला

            त्यानंतर मंत्रालयात श्री.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.         

00000






No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi