Wednesday, 20 April 2022

 अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा, शेकदरी निसर्ग वन पर्यटन

केंद्र विकसीत करावे

                                                     - दत्तात्रय भरणे.

            मुंबई, दि. 20 : अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथील निसर्ग वन पर्यटन विकसित करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्याबाबत आयोजित बैठकीत वने राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, उपसचिव वने बा.ना.पिंगळे, नागपूरचे उपवनसंरक्षक बाला यावेळी बैठकीला उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले,अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिंभोरा सिंचन प्रकल्प (नल-दमयंती सरोवर) हा प्रकल्प प्रसिध्द असून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या ठिकाणी पर्यटन सुविधा वाढल्यास स्थानिक ठिकाणी पर्यटन वाढीस चालना मिळून रोजगार निर्मिती होईल तसेच शेकदरी सिंचन प्रकल्प येथेही पर्यटन वाढीस चालना देण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. वन विभागाने यादृष्टीने कार्यवाही करावी. सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प या दोन्ही भागात निसर्ग वन पर्यटन विकसीत करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना राज्यमंत्री श्री.भरणे यांनी बैठकीत दिल्या.

            आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथील निसर्ग वन पर्यटन विकसित करण्याबाबत सविस्तर मुद्दे बैठकीत मांडले.


*****

ठाणे वन विभागातील टोकावडे दक्षिण वनपरिक्षेत्रात

बोगस मजुरांच्या तक्रारीची चौकशी करा

- दत्तात्रय भरने.

            मुंबई, दि. 20 : ठाणे वन विभागातील टोकावडे दक्षिण वनपरीक्षेत्रात बोगस मजुरांची यादी बाबत तक्रार प्राप्त झाल्या असून याबाबत योग्य ती चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात ठाणे वन विभागातील टोकावडे वनपरिक्षेत्रात बोगस मजुरांची यादी तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी उपसचिव वने बा.ना.पिंगळे, तक्रारदार अनिल गावंडे बैठकीला उपस्थित होते.

*******




No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi