उष्माघातासंदर्भात ‘दिलखुलास’ कार्यक्रमात
डॉ. मधुकर गायकवाड यांच्या मुलाखतीचे पुन:प्रसारण
मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबईतील जे. जे. रूग्णालयाचे औषध वैद्यक विभाग प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांच्या विशेष मुलाखतीचे पुन:प्रसारण होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 19 व बुधवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान कमालीचं वाढू लागलं आहे. विशेषतः विदर्भ, खानदेशाबरोबरच मराठवाड्यातील तापमानही वाढत आहे. वातावरणीय बदलामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत असताना या काळात आपली काळजी कशी घ्यावी, उष्माघातापासून स्वत:चे रक्षण कसे करावे, याविषयीची सविस्तर माहिती डॉ. गायकवाड यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment