🚩 नमो आदेश 🚩
*वीर
आपण बऱ्याच जणांनी , क्षेत्रपाल ,भैरव , योगीनि ह्या बद्दल ऐकले आहे याचं प्रकारें वीर सुद्धा हा एक उग्र देवतेचा प्रकार आहे ह्या वरील देवता सर्व उग्र आहेत मुस्लिमसुफी मार्गात यांना जीन, जिन्नत, इरफित म्हणतात तर ख्रिस्ती धर्मात मायकल म्हणतात , वीर म्हणजे हे एक प्रकारे रक्षण करणारेच देव आहेत, हे उग्र प्रकारात येतात ५२ वीर ६४ वीर असे ही प्रकार आहेत हे शंकराचेच अवतार , तत्व आहे ह्या वीरा व्यतिरिक्त अजून एक वीर आहे.
परशुराम ज्याचा जन्म हा शक्ती च्या गर्भातून झाला म्हणून त्या शक्तीच नाव एकविरा आहे एक विराची माता आहे अशी ही एकविरा माता , ह्या वीरांचा अधिपती किंवा प्रमुख हा वीरभद्र आहे ह्या सर्वांवर त्याचेच वर्चस्व आहे.
बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात काही लोक ह्या वीरांनि सजलेले किंवा ह्या वीरांनी विराजमान असलेले एक कड धारण करतात व त्याशक्तीवरून ज्योतिष , भूतप्रेत बाधा, वगैरे ह्यावर उपाय करतात त्यालाच वीर कंगण म्हणतात हे कंगण अघोर, औघड, नाथपंथीय वीरमंत्राद्वारे सिद्ध करतात सिद्ध करण्यासाठी तितक्याच ताकतीचा गुरू , साधक हा त्या विषयात परिपूर्ण ज्ञान असलेलीच व्यक्ती आवश्यक असते.
तसेच हे कंगण बनवण्यासाठीच्या पद्धती सुद्धा वेगळ्या असतात (गावो गावी फिरणारे नंदीबैल वाले ह्यांचाकडे हमखास हे कंगण असत)कंगण प्रमाणेच वीरमुद्रिका सुद्धा असते.
५२ वीर साधना, म्हणजे कालिकेचे ५२ भैरवरुपी दुत आहे अशी ही काही भागात मानता आहेउदा वीर , वेताळ यांना प्रसन्न करून आपली मनोकामना पुर्ण करणे.
यांनाच ५२ वीर म्हणतात.
यांना भैरव गण, क्षेत्रपाल किंवा धर्म रक्षक असे ही म्हणतात.
ही साधना एक तांत्रिक साधना आहे.
ही साधना एकांतवासात , बंद खोली, अरण्यात एकांतवासात, नदी तटावर , शिव मंदिर किंवा स्मशानभूमीत करतात.
ही साधना रात्र - दिवस निरंतर चालु ठेवावी लागते.
या साधनेचा कालावधी ६१ दिवस असतो.
साधना सतत चालु ठेवावी लागते . मध्ये व्यत्यय आल्यास ती निष्फल ठरते.
*कुठल्याही सिद्ध गुरू शिवाय अशी साधना करू नये.*
साधना सफलता म्हणजे भैरवगण प्रत्येक्ष दर्शन देत नाही.
पण त्यांचा उपस्थितीची जाणीव ते कोणत्या न कोणत्या रुपात करून देतात हे मात्र नक्कीच.
... आणि संकटकाळी ते कायम सोबत असतात या मध्ये ५२ वेगवेगळ्या शक्ती आहेत.
त्यांची नावे ही वेगळे आहेत ५२ वीरांच्या शक्ती कार्य फल सुद्धा विभिन्न आहेत.
प्रत्येक शक्तीची वेगळी अनुभूती आहे.
२- वीर साधना-
ज्या काही तांत्रिक साधना असतात ज्या स्मशान , नदी , डोंगर अशा ठिकाणी कराव्याच्या आहेत .
पण ते करण्यासाठी हिंमत होत नाही भीती वाटते किंवा त्या साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून स्वसंरक्षण साठी केलेली साधना किंवा साधनाआवश्यक असणारे धैर्य, हिंमत मिळावी या साठी प्रार्थमिक स्वरूपात करण्यात येणारे संरक्षण कवच मन्त्र साधना म्हणजे सुद्धा वीर साधना आहे.
३-वीर बद्दल अजून एक माहिती
।।पाबु हरभु रामदे मांगलिया मेहा
पाच वीर पधारज्यो गोगाजी जेहा।।
राजस्थानी लोकगीतातील हा एक दोहा आहे
पितर पूजा करताना म्हणजेच श्राद्ध पक्ष करताना "वीरं मे दत्त पितर:" हे पीतरदेवांनो आम्हाला असा एक वीरपुत्र द्या की ज्याचा कर्तृत्वाचा झेंडा तिन्ही लोकात फडकत राहावा.
अशा वीरांची पूजा अनेक प्रकारात होत असते पण हे त्या गावापुरते प्रांता पुरते मर्यादित असते.
यांची स्मारके म्हणून कुठे घडीव दगड(मूर्ती) उभा केलेला असतो.
एखाद्या वेळी त्या वीराचे नावही त्यावर कोरलेले असते.
क्वचित कोठे दगडांची रास त्याच्या नावाने रचलेली असते आणि ग्रामीण जनता त्याला नमस्कार करते.
काही वेळा समाधी स्वरूपाचा चौथरा सुद्धा असतो.
महाराष्ट्रात अशी स्मारके उभारलेली आहेत त्यांना "विरगळ" अथवा "वीर"असे म्हणतात अनेक ठिकाणी यांची गणना ग्रामदेवता मध्ये केलेले आढळते.
अमुक एकाच अलौकिक कृत्यासाठी त्याला हे पद प्राप्त होते असे नसून अनेक कृती , कार्य त्या मागे असू शकतात .
एखाद्या अबला स्त्रीची अब्रू वाचवली ,गावावर आलेले अरिष्ट आपल्या छातीवर झेलले , हिंस्त्र श्वापदापासून मुलाबाळांचे रक्षण केले ,अग्निच्या ज्वालातून जीव धोक्यात घालून जीविताचे रक्षण केले पर्जन्याच्या प्रलय काळी एखाद्या बुडत्या चे प्राण संरक्षण केले स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी परी धर्मीयांचे उग्र क्रौर्य सोसले इत्यादी अनेक वीर कृत्ये त्यामागे असू शकतात.
आज ही बऱ्याच प्रांतात आशा पितर स्वरूपी वीरांचे पूजन केले जाते.
खास करून संक्रात ची कर, व होळीची कर ह्या दिवशी वीरांची वाजत गाजत मिरवणूक काढतात तसेच मंगलकार्य प्रसंगी या वीरांची वेशभूषा धारण केली जाते.
त्यांचा हातात शस्त्र अस्त्र दिले जातात त्याना वीर समजून नमस्कार करून त्यांचा यथोचित मान सन्मान दिला जातो व नन्तर वीरांची स्थापना जिथे केली असते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कडून आशीर्वाद मागितला जातो की येणाऱ्या भावी पिढीत तुमचा सारखे वीर जन्माला येऊ द्या अशी प्रार्थना केली जाते.
आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक वीरजन्माला आले व त्यांचे स्मारक, मंदिर ,समाधी आपण अनेक ठिकाणी बघतो अशा सर्व वीरांना साष्टांग नमस्कार आणि नमन
नमो आदेश
अलख आदेश
No comments:
Post a Comment