जैन समाजाचा ‘कॅन्सर मुक्त भारत’ प्रकल्प गौरवास्पद
- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी 600 व्या शिबिराचे उद्घाटन केले
‘अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाचे’ वतीने अत्याधुनिक मोबाईल बस च्या माध्यमातून चालवला जाणारा कॅन्सर मुक्त भारत हा प्रकल्प गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती प्रसारण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.
जैन महासंघाचे वतीने चालवल्या जाणार्या ‘कॅन्सर मुक्त भारत’ अभियानांतर्गत 600 व्या मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन हिमाचल प्रदेशातील उना येथे महामहिम राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, अनुराग ठाकूर व ललित गांधी यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी जैन समाजाने गेल्या 7 वर्षात 600 मोफत शिबिरांचे आयोजन करून दीड लाखाहून अधिक लोकांची कॅन्सर तपासणी केली हे कार्य हिमालयासारखे मोठे असल्याचे सांगून 600 वे शिबीर हिमालयातील दुर्गम भागात आयोजित केल्याबद्दल ललित गांधी यांचा यासाठी विशेष गौरव करत असल्याचे सांगितले.
महामहिम राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी कॅन्सर तपासणीच्या पुरेशा सुविधा नसलेल्या हिमाचल सार‘या राज्यापर्यंत पोहोचणे अभिनंदनीय असल्याचे सांगितले.
जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी जैन समाजातर्फे भारत भर राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
शनिवार 16 एप्रिल 2022 रोजी हिमाचल मध्ये सुरू केलेल्या अभियानांतर्गत 22 एप्रिल पर्यंत 7 गावांत शिबिरांचे आयोजन होणार असून या माध्यमातून 2000 महिलांच्या कॅन्सर तपासणी केल्या जाणार असल्याचे ललित गांधी यानी सांगितले.
No comments:
Post a Comment