Tuesday, 29 March 2022

 दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

            मुंबई, दि. 28 :- शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

             दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना http://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर सन 2021-22 मधील नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

            तसेच सन 2020-21 या वर्षासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज (Re- Apply) करण्यासाठी देखील दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या शिष्यवृत्तीकरिता जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर समाधान इंगळे यांनी केले आहे.

0000



 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi