बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत
28 फेब्रुवारीपर्यंत 144 कलमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी
मुंबई, दि. 10 : कोविड-19च्या ओमायक्रॉन या नवीन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 28 फेब्रुवारीपर्यंत कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.
कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हा आदेश जारी केला आहे.
आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
000
No comments:
Post a Comment