Thursday, 24 February 2022

 24 फेब्रुवारीपासून मुंबईत कला प्रदर्शनाचे आयोजन

            मुंबई, दि. 23 :- कला संचालनालयामार्फत 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) २०२१-२२ आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन मुंबईतील सर ज.जी.कला महाविद्यालय, येथे दि. २४ फेब्रुवारी ते ०२ मार्च, २०२२ या कालावधीत होणार आहे, असे प्र. कला संचालक राजीव मिश्रा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दि. २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सर ज.जी. कला महाविद्यालय, मुंबई येथे होणार आहे. यावेळी कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे उपस्थित राहणार आहेत.

            ज्येष्ठ कलाकार वसंत सोनवणी यांचा व 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा शासनाच्यावतीने सत्कार समारंभ होणार असल्याची माहिती श्री. मिश्रा यांनी दिली. 

            पारितोषिक प्राप्त कलाकार :गौरी अमर भिसे (उपयोजित कला-महिला आरोग्य समस्या), प्रसाद चंद्रकांत गवळी (उपयोजित कला- वन्यजीव संवर्धन), प्रितीश विजय ताजणे (उपयोजित कला-स्वच्छ भारत), राहुल मच्छिंद्र गोडसे (उपयोजित कला- वस्तुस्थिती), अंजली सुधीर पवार (उपयोजिक कला-दि टॅबू), आनंद शत्रुघ्न प्रताप (रेखा व रंगकला-अनागमी), संघपाल उत्तम म्हस्के, (रेखा व रंगकला-फॉर्मसी लॅब), मदन किसनराव पवार (रेखा व रंगकला-लॉकडाऊन सिटी-1), सुभाष बाभूळकर (रेखा व रंगकला-अनटायटल्ड-2), स्वाती विश्वनाथ साबळे (रेखा व रंगकला- अनटायटल्ड), हर्षवर्धन प्रकाश देवतळे (रेखा व रंगकला- प्रकाशाच्या विभिन्न दिशा), श्रीनिवास गोविंदराव म्हेत्रे (मुद्राचित्रण-स्टे अफ्लोड टूगेदर), वैभव मारुती मोरे (शिल्पकला- इटर्नल इमेज), नंदकुमार यशवंत कुलये, (शिल्पकला- इंटॅंजिबल इन टँजिबल), दिव्यांग विभागात सचिन भाऊसाहेब निंबाळकर (मुद्राचित्रण- कलयुग) या कलांवतांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi