Sunday, 26 September 2021

 रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

 

            मुंबई, दि.26:- राज्यातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे . स्वयंसेवी संस्थाशासकीय यंत्रणेतील सर्व घटकजिल्हाधिकारीमुख्याधिकारीतहसीलदारसिव्हील सर्जन यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेवून नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत असेही श्री.शिंगणे यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

             डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणालेराजकीय पदधिकारी यांनी राजकीय नेत्यांचे वाढदिवस तसेच थोर व्यक्तींच्या जयंतीपुण्यतिथी आणि इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलसेमियाकॅन्सर रुग्णांसाठी नियमित रक्ताची गरज भासते. यास्तव या रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले आहे.

             राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धततेसाठी कार्य आराखडा तयार करुन सर्व प्रयत्न करावेत असे डॉ. शिंगणे यांनी निर्देश दिले आहेत.  रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावेत असे रक्तपेढयांना आवाहन केले आहे.

000

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi