Salutes to chandrashekhar Azad
'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'
गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.!
"नाही, हो.! माझ्या चंदू ने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाव म्हणून हौतात्म्य पत्करल.!" त्या वयोवृद्ध स्त्री ने मोठ्या अभिमानाने सांगितलं.!
त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, जगरानीदेवी.!
आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा थोड्या दिवसांपूर्वीच हुतात्मा झाला होता.! आणि ही आई त्याला प्रेमाने चंदू म्हणायची आणि बाकी सगळं जग त्याला आझाद हो, चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखायचं.!
भारत स्वतंत्र झाला होता.! आझाद चे मित्र, सदाशिवराव एक दिवस आझाद च्या आईवडिलांचा शोध घेत त्यांच्या गावात आले.!
स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण खूप काही संपून गेलं होतं.! चंद्रशेखर आझाद ह्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता
निर्धनावस्थेत पतीच्या मृत्यू नंतर ही निर्धन, निराश्रित, वृद्ध आई त्या वृद्धावस्थेत कोणासमोर हात पसरण्यापेक्षा जंगलात जाऊन लाकडं,
शेण्या गोळा करून आणि त्या विकून स्वतःची गुजराण करत होती.!
शरमेची गोष्ट अशी होती की देश स्वतंत्र झाल्यावर सुद्धा त्यांची ही अशी अवस्था दोन वर्षे सुरू होती.! १९४९ पर्यन्त.!
चंद्रशेखर आझाद ह्यांना दिलेल्या एक वचनाची आठवण देऊन सदाशिवराव हे जगरानी देवींना आपल्यासोबत झाशीला घेऊन आले.! पण त्यांची स्वतः ची आर्थिक परिस्थिती ही अतिशय खराब असल्याकारणाने त्यांनी आझादांचे अजून एक मित्र भगवान दास माहोर ह्यांच्या घरी त्या आईंच्या राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची मनापासून सेवा केली.!
आनंद कुलकर्णी
मार्च १९५१ मध्ये जेंव्हा श्रीमती जगरानीदेवी ह्यांचा स्वर्गवास झाला तेंव्हा सदाशिवराव ह्यांनी स्वतःच्या आईप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार केले.!
त्यांच्या निधनानंतर झाशी च्या जनतेने त्यांच्या स्मृतीमध्ये सार्वजनिक जागेवर त्यांच्या नावाने एका स्मृतिकेंद्राची स्थापना केली.!
त्यावेळच्या राज्यसरकारने (त्यावेळी सरकार काँग्रेस चे होते, आणि मुख्यमंत्री होते गोविंद वल्लभ पंत.!).! त्यांनी ह्या स्मृतिकेंद्राला त्यावेळच्या पंतप्रधानांच्या म्हणजे नेहरूंच्या सांगण्यावरून बेकायदा घोषित केलं.!
तरीपण ह्या शासनाच्या आदेशाला न जुमानता झाशीच्या नागरिकांनी चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मातोश्रींचा पुतळा त्या जागेवर बसवण्याचा निर्णय घेतला.!
तो पुतळा आझादांचे निकटवर्तीय सहकारी श्री रुद्र नारायण सिंह ह्यांनी तयार केली होता.!
जेंव्हा सरकारला हे समजलं की ही क्रांतिकारी मंडळी काहीही झालं तरी ह्या पुतळ्याची स्थापना झाशीच्या जनतेच्या मदतीने करणार आहेत, तेंव्हा सरकारने हा समारंभ देश, समाज, आणि न्यायव्यवस्था ह्यासाठी धोका उत्पन्न करेल म्हणून ह्या कार्यक्रमाला प्रतिबंध करून सगळ्या झाशीत कर्फ्यू जाहीर केला.!
जनतेला आणि ह्या मंडळींना आझादांच्या मातोश्रींचा पुतळा स्थापन करता येऊ नये म्हणून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त होता.!.
पण ह्या सरकारी आदेशाला, कर्फ्यूला आणि पोलीस बंदोबस्ताला धाब्यावर बसवून सदाशिवराव, भगवानदास माहोर आणि इतर सर्व जनता पुतळा घेऊन स्थापन करण्यासाठी उत्साहाने निघाली.!
आपल्या आदेशाच्या चिंधड्या उडवून जनता निघालेली बघून सरकार खवळले आणि सरकारने पोलिसांना पुतळा हातात घेतलेल्या श्री सदाशिवराव ह्यांना गोळी घालायचा आदेश दिला.!
पण मूर्ती हातात घेतलेल्या सदाशिवराव ह्यांना जनतेनी सर्व बाजूने वेढून घेतलं, आणि पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोचू नाही दिलं.!
मग खवळलेल्या पोलिसांनी अंदाधुंद लाठीचार्ज केला.! शेकडो लोक जखमी झाले.! बरेच जन्मभराचे अपंग झाले त्या लाठीमारात.! तीन जणांचा मृत्यू झाला.!
देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण ओवाळून टाकणाऱ्या हुतात्मा चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मातोश्रींचा पुतळा स्थापित नाही होऊ शकला.!
कोणत्या तोंडाने आपण आझादांना श्रद्धांजली द्यायची ? कोणत्या तोंडाने आपण त्यांना एक हुतात्मा म्हणून आठवायचं ?
आझादजी, आम्ही तुमच्या मातोश्रींच्या तीन फुटाच्या पुतळ्याला ह्या देशात पाच फूट जागा पण नाही देऊ शकलो.!
ज्या देशासाठी तुम्ही तुमच्या प्राणाचे बलिदान केले, त्याच देशाच्या काँग्रेसी पंतप्रधानाने तुम्ही ज्या बागेत शेवटी लपला होता त्या बागेचा पत्ता ब्रिटिश सरकारला सांगितलाच, पण तुम्ही हुतात्मा झाल्यावर सुद्धा त्या काँग्रेसी सरकारने तुमच्या मातोश्रींच्या पुतळ्याला सुद्धा जागा नाही मिळू दिली.!
आणि फक्त तुमचाच नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अश्या अनेक वीरांचा ह्या काँग्रेसी सरकारने अपमान केलाय.! त्यांना देशाच्या जनतेच्या स्मृती मधून ओरबाडून फेकून दिलंय.!.
तरीपण आज वीर हुतात्मा चंद्रशेखर आझाद ह्यांना मी झुकल्या मानेने नतमस्तक होऊन नमन करतो, त्यांच्या जयंतीनिमित्य.!
🙏🙏🙏🙏🙏
वंदे मातरम.!
©️ आनंद कुलकर्णी
संदर्भ : Indian Revolutionaries : A comprehensive Study 1757 - 1961
No comments:
Post a Comment