Wednesday, 28 July 2021

 जगविख्यात बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना

क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 

            मुंबई, दि. 28 : बॅडमिंटनला राजमान्यता-लोकमान्यता मिळवून देणारे आणि बॅडमिंटनमध्ये 1956 मध्ये भारताला पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणारेपदकांची शंभरी गाठलेल्या नंदू नाटेकर यांची खेळाप्रतीची निष्ठा-सर्वस्व भावना नेहमी स्मरणात राहील अशा शब्दात क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी जगविख्यात बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

            महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बॅडमिंटन क्षेत्रात भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे भारतीय क्रीडाविश्वात वेगळे स्थान असूनत्यांचे यश कित्येक खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे.

            माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

            बहारदार खेळाबद्दल त्यांना सहा राष्ट्रीय पदके देखील मिळाली होती. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजेच 1953 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.

            त्यांनी आपल्या बहारदार खेळाने बॅटमिंनट रसिकांना आनंद दिला. 1980 आणि 1981 मध्ये दुहेरी पदक जिंकले. 1651 ते 1963 दरम्यान झालेल्या 16 एकेरी सामन्यांपैकी 12 आणि डबल्समध्ये 16 पैकी 8 त्यांनी जिंकले. थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचे सदस्य होते. नंदू नाटेकरांचे भारतीय क्रीडाविश्वात वेगळे स्थान असून त्यांचे यश कित्येक खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे, अशा शब्दांत श्री.केदार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

*****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi