मुंबई गोवा अजून बाकी पण टोल ऑफिस बांधून तयार !
कोकणी माणसा जागा हो!
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात
ReplyDeleteराज्याने गाठला चार कोटी लस मात्रांचा टप्पा
मुंबई, दि. 20 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 डोसे देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सांगितले.
देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेची संख्या चार कोटींवर गेली. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या तीन कोटी सहा लाख 99 हजार 339 तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 93 लाख 25 हजार 362 एवढी आहे. आज दुपारपर्यंत राज्यात एक लाख 20 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेल, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.
००००
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात
ReplyDeleteराज्याने गाठला चार कोटी लस मात्रांचा टप्पा
मुंबई, दि. 20 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 डोसे देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सांगितले.
देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेची संख्या चार कोटींवर गेली. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या तीन कोटी सहा लाख 99 हजार 339 तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 93 लाख 25 हजार 362 एवढी आहे. आज दुपारपर्यंत राज्यात एक लाख 20 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेल, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.
००००
कृषीमालाची मूल्यसाखळी विकसित करणाऱ्या
ReplyDelete'स्मार्ट' प्रकल्पाचा कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 22 : लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचा आढावा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला.
यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, उपसचिव सुशील खोडवेकर, संचालक श्री. तांभाळे आदी उपस्थित होते.
प्रकल्पांतर्गत यावर्षी सुमारे 150 उपप्रकल्पांना मान्यता देण्याचे उद्दिष्ट ठेऊन एका उपप्रकल्पामध्ये तीनपेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडण्यात यावे. स्मार्ट प्रकल्पामध्ये कृषी मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देतांना मुल्यसाखळी निर्माण करण्यावर भर देण्याचे कृषी मंत्री श्री .भुसे यांनी सांगितले.
त्याचबरोबर उपप्रकल्प तयार करतांना ज्या भागात जे पीक प्रामुख्याने घेतले जाते त्या विभागातील क्रॉपींग पॅटर्ननुसार प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.
या प्रकल्पांमध्ये एकूण 525 उपप्रकल्प प्रस्तावित असून त्याला सुमारे 1100 पेक्षा अधिक शेतकरी संस्था जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या 30 पथदर्शी प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. कापूस पिकविणाऱ्या प्रमुख 12 जिल्ह्यातील 60 तालुके आणि त्यातील शेतकऱ्यांचा सहभागासाठी कापूस मुल्यसाखळी विकास प्रकल्प (स्मार्ट कॉटन) राबविण्यात येणार आहे
किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी
ReplyDelete- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई, दि. 23 : मुंबईसह महाराष्ट्रात अनेक किल्ले आणि सागरी किल्ले आहे. या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व असून या किल्ल्याचे जतन, संवर्धन काळानुरुप होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मुंबईतील किल्ले, सागरी किल्ले, राज्य संग्रहालय आणि पुराभिलेख विभागाच्या योजनासंदर्भात मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव जाधव, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालक तेजस गर्गे, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित उगले उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील किल्ल्यांचे वैभव जपत असताना, गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करताना गड किल्ल्यांच्या ठिकाणी आवश्यक त्या पर्यटन सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याने यासाठी सुध्दा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राचे असे राज्य संग्रहालय उभारण्यात येणार असून हे संग्रहालय नेमके कुठे असावे, या संग्रहालयात काय काय असावे याबाबींचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्व संचालनालयाने यापूर्वीच एक समिती गठीत केली आहे. या समितीने कोविडच्या काळात दोन बैठका यापूर्वीच केल्या आहेत. राज्य संग्रहालयासंदर्भात पुढील बाबी ठरविण्यासाठी लवकरच सहयाद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात यावी असे निर्देश श्री. देशमुख यांनी यावेळी दिले.
कर्नाटक राज्यात शहाजी राजे यांची समाधी असून तेथे महाराष्ट्र शासनामार्फत त्यांचा पुतळा उभारता येईल हे पाहण्यासाठी पुरातत्व संचालकांनी स्वत: तेथे जाऊन त्या जागेची पाहणी करावी.आज पुराभिलेख संचालनालयाकडे ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा जतन करीत असताना डिजिटल स्वरुपात हा वारसा जतन करण्याच्या कामाला गती देण्यात यावी असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
0000
महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष
ReplyDeleteएनडीआरएफच्या 26 चमू, हवाईदलाचे 4 हेलिकॉप्टर्स, लष्करही दाखल
देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
मुंबई, 23 जुलै
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा केंद्र सरकारशी संपर्कात आहेत. सकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. चिपळूणमध्ये लष्कराची तुकडी सुद्धा मदतकार्यात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी संपर्क केला, तेव्हा केंद्र सरकारतर्फे कोकण आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात पुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने केल्या जात असलेल्या मदतीची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने राज्य सरकारसोबत संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीआरएफला तत्काळ निर्देश देत अतिरिक्त चमू महाराष्ट्रात पाठविल्या आहेत. रायगडमधील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या आप्तांना 2 लाख रूपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत तातडीने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केली आहे. चिपळूण येथे लष्कराची तुकडी दाखल होऊन मदतकार्य करीत आहे. एनडीआरएफच्या 26 चमू, भारतीय हवाईदलाचे एक सी-17, दोन सी-130 तसेच एक एमआय-17 हेलिकॉप्टर मदतकार्यात तैनात करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या सर्वाधिक 4 चमू रत्नागिरीत, कोल्हापुरात 3, मुंबई, रायगड, ठाण्यात प्रत्येकी 2, तर सातारा, नागपूर, पालघर, सांगली आणि पुण्यात प्रत्येकी 1 चमू तैनात आहे. कोलकाता आणि बडोदा येथून प्रत्येक 4 चमू येत आहेत. एनडीआरएफच्या वतीने तळिये या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले जात आहे, अशी माहिती नित्यानंद राय यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.
दरम्यान, आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि पिण्याचे पाणी तसेच अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या भागात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, निरंजन डावखरे हे सुद्धा सातत्याने प्रवासात आहेत. त्यांच्याकडून प्रत्यक्ष स्थितीची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली जात आहे. या पाऊस आणि पुरात तसेच भूस्खलनाच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखत प्रशासनाने अधिक गांभीर्याने स्थितीकडे लक्ष द्यावे, अशी विनंती सुद्धा त्यांनी केली. तळिये गावांत मृतदेह बाहेर काढण्याचे काम गावकर्यांना करावे लागले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
*******
सातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित, 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर
ReplyDelete18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता तर 3 हजार 24 पशुधनाचा मृत्यू
सातारा, दि.24 (जिमाका): गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आलेले असून एनडीआरएफ एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
जिल्ह्यातील एकूण 167 गावे पुर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झाली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पुर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण 30 गावे अंशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील 10 गावे पुर्णत: व 60 गावे अंशत: अशी एकूण 70 गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावे पुर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील 13 गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील 102 गावे अंशत: बाधित झाली आहेत.
जिल्ह्यात एकूण 18 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण बेपत्ता आहेत तर 3 हजार 24 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाई तालुक्यात 3 मृत्यू, 2 जण बेपत्ता व 20 पशुधन मृत्यू, कराड तालुक्यात 3 हजार पशुधन मृत्यू (कोंबडी), पाटण तालुक्यात 12 मृत्यू व 20 जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात 1 मृत्यू व 2 पशुधन मृत्यू, सातारा तालुक्यात 2 पशुधन मृत्यू, जावली तालुक्यात 2 मृत्यू व 2 जण बेपत्ता झाले आहेत.
जिल्ह्यातील 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जण स्थलांतरित
जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील 72 कुटुंबातील 390 जण, कराड तालुक्यातील 876 कुटुंबातील 3 हजार 836 जण, पाटण तालुक्यातील 325 कुटुंबातील 1 हजार 300 जण, महाबळेश्वर तालुक्यातील 51 कुटुंबातील 130 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
कार्यरत टीम
जिल्ह्यात एकूण 3 एनडीआरएफच्या टीम कार्यरत असून एका टिमची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण;
ReplyDeleteआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ
- अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. २४ : महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार असल्याची माहीती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर या आपत्तीग्रस्त भागात मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. याबाबत आज तातडीने आदेश काढण्यात येणार असून आदेशाची वाट न बघता तातडीने मदत कार्य सुरु करण्यात यावे असे यावेळी छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी लढताना राज्य सरकार हे खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभे आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये शिवभोजन थाळीचा इष्टांक दुप्पट करण्यात आला आहे. म्हणजेच या आपत्तीग्रस्त भागातील शिवभोजन केंद्रावर आत्ता दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळीचे वितरण केले जाणार आहे.
पुर परिस्थीतीमुळे अनेक जिल्ह्यांत लाईट नाही अशा ठिकाणी मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून शिवभोजनाचे पाकिटे वितरीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे लाईट नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन अँपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
या सहा आपत्तीग्रस्त जिल्ह्यात प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार ही मदत दिली जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गहू नको असेल त्यांना गव्हा ऐवजी तांदूळ दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला ५ किलो डाळ देण्याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी बोलताना मंत्री भुजबळ यांनी राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे दुर्दैवाने काही नागरिकांना दुर्घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. त्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याची भावना व्यक्त करतानाच मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
000
पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे
ReplyDeleteसातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले प्रशासनाला आदेश
सातारा दि. 24 (जिमाका) : तारळी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला. या पुराची पाणी गावात शिरल्याने दुकानांची तसेच घरांची मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा. पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
पाली ता. कराड येथील पूर परिस्थितीची पाहणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. यावेळी ते बोलत होते. यापाहणी प्रसंगी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पूरामुळे पाली येथील पूलाचे नुकसान झाले आहे. या पुलाची तात्काळ दुरुस्ती करुन पूल वाहतुकीसाठी खुला करावा. गेल्या तीस ते पस्तीस वर्षात पाली येथे झालेला मोठा पाऊस आहे. पाटण तालुक्यातील विरगाव येथे भूस्खलन झालेल्या गावात बचावकार्य कोयनेच्या बॅकवॉटरमधुन सुरु करण्यात आले आहे. तसेच आंबेघर येथे एनडीआरएफची टीम आज सकाळी पोहोचली असून मदतकार्य सुरु केले आहे. कोयनाधरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. त्या गावामध्ये प्रशासनाबरोबर स्वयंसेवी संस्थाही काम करीत असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
00000