Friday, 30 July 2021

 आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी

महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्टपासून राज्यभर

 महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 

·        रियल टाइम नोंदणीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अचूक नुकसान भरपाई आणि मदत देणे शक्य होणार

·        टाटा ट्रस्टच्या साहाय्याने अप्लिकेशनची निर्मिती

 

            मुंबई, दि. 30 : शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनशेत जमिनीची प्रतवारीदुष्काळअतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होताआता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र ॲप्लिकेशन निर्मिती केली असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

            टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲप्लिकेशनचीनिर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतीलतलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील.

            यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे.पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईलअसेही श्री. थोरात यांनी सांगितले.

            ई पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहेत्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे.ई पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर वीस तालुक्यात राबवण्यात आला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर हा राज्यभर राबविण्याचा निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. त्यासंदर्भाने राज्य सरकारने शासन आदेश जारी केला आहे.

            शिवाय ई पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय जिल्हा स्तरीय आणि तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

याशिवाय पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेखपुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे.

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi