Monday, 3 June 2019

दुष्काळ हटवायचा असेल तर प्रत्येकानं दोन रोपं लावली पाहिजेत…


रिक्षा चालक प्रकाश माने झाले वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत




मुंबई, दि. 1 : दुष्काळ हटवायचा असेल नातर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे  दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली रिक्षा अगदी अनोख्या पद्धतीने सजवली आहे. त्यांनी आपल्या रिक्षाला जिथे शक्य आहे तिथे रोपं लावून ती हिरवाईने नटवली आहे.
आपल्या या आगळ्यावेगळ्या रिक्षाबद्दल सांगताना श्री. माने म्हणालेवेगवेगळ्या रोपांनी सजवलेली माझी रिक्षा जेव्हा रस्त्यावरून धावते तेव्हा ती लोकांना खूपच आवडते. रिक्षात बसणारे लोक म्हणतातआम्हाला रिक्षात नाही तर उद्यानात बसल्यासारखं वाटतं. मनाला खूप प्रसन्नता आणि आनंद मिळतो.  लोकांच्या या प्रतिक्रिया मला खूप प्रोत्साहित करतात.
आपल्या सगळ्यांनाच झाडांची आणि निसर्गाची खूप ओढ असते. दररोजच्या धकाधकीच्या प्रवासात लोक माझ्या रिक्षात कधी पंधरा मिनिटेकधी अर्धा तास तर कधी एक तास बसतात.. मग मी त्यांना  कुठल्या प्रकारे आनंद देऊ शकतो याचा मी विचार केला आणि मग प्लास्टिकचे फुलंरंगीबेरंगी पताका लावण्यापेक्षा ती अधिक सजीवपणे उठून दिसण्यासाठी माझ्या रिक्षाला वेगवेगळ्या ठिकाणी मध्यम आणि लहान ऊंचीची १० रोपं बांधून घेतली. यात पांढरं तगर आहेजास्वंद आहेतुळस आहेमनी प्लांट आहे, कडिपत्त्याचं रोपं आहे आणि इतर ही रोपं आहेत.
माझ्या घरात आईसह माझी पत्नी आणि तीन मुलं आहेत श्री. माने सांगत होतेत्यांना सगळ्यांना झाडं लावण्याची खूप आवड आहे. आम्ही केतकीपाडा,दहिसर येथील आदिवासी पाड्यात राहातो. निसर्गाच्या सान्निध्यात राहात असल्याने झाडांची आवड होतीच.. त्यातून ही कल्पना सूचली.


लोकांना माझी रिक्षा खूप वेगळी वाटते. सिग्नल ला थांबलं तर लोक रिक्षा जवळ येऊन "सेल्फी" काढतातगाडीत बसलेले लोक गाडीतून हाताने "खूप सुंदर" असं सांगतात.  एवढच कशाला रिक्षात बसणारे लोक झाडासाठी म्हणजे रोपासाठी पैसे देतात.. म्हणतातआमच्या नावानं रिक्षात एक रोप लावा… कालच एका प्रवाशाने ५० रुपये काढून दिले म्हणालेआणखी एखादं चांगलं रोप विकत घ्या आणि रिक्षाला लावा…  अशी ही माझी रिक्षा सबसे निराली हैमाझी  वृ(रि)क्षा  राणी आहेजी वृक्ष लागवडीचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देतेलोकांना आनंद होतो आणि त्यांच्या आनंदात मी आनंदी होतो

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi