Tuesday, 14 May 2019

महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार

महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास  सर्व ग्राहकांचा बहिष्कार

महाराष्ट्रात युनिट रेट आहेत 
०-१०० - रु २.९८
१०१- ३०० - रु ६.७३ 
३०१ - ५०० - रु ९.६९ 
.
तेच दिल्लीमधे 
०- २०० - रु २
२०० च्या वर - रु २.९७५ / ३
वरुन ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५०% माफ
.
म्हणजेच
महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला भरावे लागतात रु २९००/-
आणी दिल्लीवाले भरतात रु ११००/-

.
या महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात या महिन्यापासून नवीन एका आकाराची भर टाकली आहे. त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U .
      म्हणजेच मगील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. विज वितरण कंपनीने अचानक एक आकार वाढवून सामान्य विज ग्राहकांना नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे. या विरोधात कोणी आवाज उठवेल काय ?
        विज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवीन आकारात भरच पडणार आहे.
       कृपया हा मेसेज पुढे पाठवा  सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे.

अखिल भारतिय उपभोक्ता ( ग्राहक ) प्रतिबंद न्यायमंच
   🌸 सौ. कादम्बरी  प्रल्हाद भोन्डे
        महिला डायरेक्टर
         ( महाराष्ट्र राज्य )
          ९७७३१७६६६५🌸
      🔍 जागो ग्राहक जागो

39 comments:

  1. बिल्डरधार्जिण्या ठाकरे सरकारचा भाडेकरूंच्या आडून बिल्डरांच्या फायद्यासाठीचा निर्णय- आ. अतुल भातखळकर

    बिल्डरधार्जिण्या ठाकरे सरकारने मुंबईतील निवडक विकासकांच्या फायद्यासाठी 8 जुलै रोजी काढलेल्या अधिसूचनेमुळे सेझ इमारती, म्हाडा पुनर्विकासाच्या इमारती व उपनगरांतील इमारती मध्ये राहणाऱ्या भाडेकरूंच्या हिताचा बट्ट्याबोळ होणार आहे, पुन्हा एकदा ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात सुध्दा भाडेकरूंच्या आडून बिल्डरांना आपण कशी मदत करू शकतो हे दाखवून दिले आहे, मात्र सर्वसामान्य मुंबईकरांच्या हितावर पाणी फेरण्याचे काम त्यांनी पुन्हा एकदा केले आहे अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

    मुंबईतील पुनर्विकासाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यात सुलभता यावी असे कारण पुढे करत नगरविकास विभागाने 8 जुलै रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यात सुधारणा करणारी अधिसूचना काढत पुनर्विकास प्रकल्पातील विक्रीच्या सदनिका बांधण्यासाठी विकासकांना वाढीव चटईक्षेत्र देत 75 ते 100 टक्के वाढीव प्रोत्साहन क्षेत्र देण्याचा निर्णय घेतला. परंतु या ठिकाणी राहणाऱ्या भाडेकरूंच्या क्षेत्रात मात्र केवळ 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर 750 चौरस फुटापेक्षा अधिकचे क्षेत्रफळ असलेल्या रहिवासांना वाढीव क्षेत्रफळावर हक्क सुद्धा सांगता येणार नाही. हा निर्णय पूर्णतः बिल्डरांच्या फायद्याकरिता घेण्यात आल्याचे स्पष्ट होते. या निर्णयाला मुंबई भारतीय जनता पार्टी तीव्र विरोध करणार असून, भाडेकरू व रहिवाश्यांना अधिक लाभ मिळावा यासाठी जनआंदोलन उभारू असा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

    ReplyDelete
  2. केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रस्ताव त्रुटी दूर करून तात्काळ सादर करावेत

    केंद्र पुरस्कृत दिनदयाळ दिव्यांग पुनवर्सन योजना(DDRS),दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी सेवासुविधा पुरविणे(SIPDA) या तिन्ही योजनांची २०१८ -१९,२०१९-२० व २०२०-२१ या आर्थिक वर्षातील संपूर्ण कार्यवाही विहीत वेळेत करावी. तसेच कोविड-१९ मुळे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे यांनी दिल्या. मंत्रालयातील दालनात केंद्र पुरस्कृत योजनांबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, दिव्यांग कल्याण विभागाचे सहसचिव अ.प्रा.अहिरे उपस्थित होते.

    अनुदानित वसतीगृहांच्या कर्मचा-यांच्या प्रश्नाबाबत सामाजिक न्याय विभाग निर्णय घेईल

    अनुदानित वसतीगृहातील कर्मचारी सामाजिक न्याय विभागाचेच कर्मचारी आहेत त्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढू व सामाजिक न्याय विभागामार्फत त्यांच्या वेतनासंदर्भाबाबत उच्चस्तरीय समितीकडेही पाठपुरावा करणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत मंत्रालयातील दालनात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अनुदानित वसतीगृहाचे कर्मचारी यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

    वैदू समाजाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी सामाजिक न्याय विभागाने कार्यवाही करावी

    वैदू समाज हा एकाच ठिकाणी स्थायिक नसल्यामुळे या लोकांकडे १९६१ पूर्वीचे पुरावे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे त्यांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्रे मिळत नाहीत त्यामुळे अशा समस्या ज्या ठिकाणी आहेत तिथे सामाजिक न्याय विभागाने वैयक्त‍िकरित्या संबधित अधिका-यांना पाठवून या समस्यांचे निराकरण करावे. भविष्यात जातीचे दाखले देताना सामाजिक न्याय विभाग अनेक सुधारणा करणार असल्याचेही यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला वैदू समाज नवचेतना संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद शिंदे, खजिनदार विनोद पवार, बाबासाहेब लोखंडे तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सदस्य उपस्थित होते.

    *****

    ReplyDelete
  3. गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार

    - परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

    · १६ जुलैपासून आरक्षण सुरु



    मुंबई, दि. 14 : कोकणातील चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

    मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून दि.४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. दि.१६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत.

    दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे श्री. परब यांनी सांगितले.

    गणेशोत्सवासाठी दि. ४ ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर १४ ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील म्हणजेच एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

    गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मार्गावर तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, असेही श्री. परब यांनी सांगितले.

    ००००

    ReplyDelete
  4. रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येण्याचे

    अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन



    मुंबई, दि. 15 : राज्यातील रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

    स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतील सर्व घटक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसिलदार, सिव्हील सर्जन यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेवून नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

    अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, वाढदिवस तसेच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलेसेमिया, कॅन्सर रुग्णांसाठी रक्ताची नियमित गरज भासते. यासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे. असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

    राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धतेसाठी कार्यआराखडा तयार करावेत, असे निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले. रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन श्री.शिंगणे यांनी रक्तपेढयांना केले आहे.

    ***

    ReplyDelete
  5. रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येण्याचे

    अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन



    मुंबई, दि. 15 : राज्यातील रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

    स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतील सर्व घटक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसिलदार, सिव्हील सर्जन यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेवून नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

    अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, वाढदिवस तसेच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलेसेमिया, कॅन्सर रुग्णांसाठी रक्ताची नियमित गरज भासते. यासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे. असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

    राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धतेसाठी कार्यआराखडा तयार करावेत, असे निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले. रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन श्री.शिंगणे यांनी रक्तपेढयांना केले आहे.

    ***

    ReplyDelete
  6. भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित

    सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार

    - इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार



    मुंबई, दि. १५ : राज्यातील भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण लवकरच करून या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

    मंत्रालयातील परिषद सभागृह येथे भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यातील सदस्यांची बैठक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय सुपेकर, मदत व पुनर्वसनचे उपसचिव धनंजय नायक, ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेरकर, अंबरनाथचे तहसिलदार जयराज देशमुख, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, भटके विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे, पुरूषोत्तम काळे, मातृसंस्थेच्या दीपा पवार, प्रा.सखाराम धुमाळ, प्रतिक गोसावी, अरूण खरमाटे, बाळासाहेब सानप यासह राज्यातील विविध प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

    इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, भटके विमुक्त जाती- जमातीचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये या समाजाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण घरोघरी जावून होणे गरजेचे आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देशित केलेल्या सूचनांनुसार घरोघरी जावून सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण होण्याबाबत राज्यांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर मागासवर्ग विभागाने कार्यवाही करून घ्यावी. देशात राजस्थान व हरियाणा या राज्यांनी लोकसंख्येवर आधारित असे सर्वेक्षण केले आहे. याची माहिती विभागाने घेवून या सर्वेक्षणासाठी लागणा-या बाबींचा अंदाजपत्रकात समावेश करून तसा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवून या विभागाने निधी उपलब्ध करून घ्यावा, अशा सूचनाही श्री. वडेट्टीवार यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाला दिल्या.

    श्री.वडेट्टीवार म्हणाले, या समाजातील लोकांना जातीचे दाखले मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लोक एका ठिकाणी स्थायिक नसल्यामुळे जातीचा दाखला मिळत नाही त्यामुळे यापुर्वी सामाजिक न्याय विभागाकडून काढण्यात आलेला २००८ चा शासन निर्णय हा अत्यंत योग्य होता या शासन निर्णयाबाबत सकारात्मक निर्णय घेवून हा शासन निर्णय पुनर्जिवीत करणार असल्याची ग्वाही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

    इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, भटके विमुक्त समाजातून होणाऱ्या शासकीय नोकरभरतीमध्ये अ, ब, क व ड या प्रवर्गाची भरती न्याय्य पद्धतीने होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. लोककलावंताबाबतही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार या समाजातील कलावतांसाठी एक संमेलन घेण्यात येईल. भटके-विमुक्त हक्क परिषदेमार्फत याबाबत प्रस्ताव सादर करावा. हे संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही मंत्री.श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

    श्री. वडेट्टीवार म्हणाले, वि.जा.भ.ज. व इ.मा.वि.मा.प्र. कल्याण विभागामध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारण्यात येत असून त्याबाबत आवश्यक असणारी पदे मंजूर आहेत.

    कोणत्याही कुटुंबाचे पुनर्वसन होत असताना त्यांच्यावर अन्याय होवू नये याची खबरदारी स्थानिक प्रशासनाने घेतली पाहिजे. अंबरनाथ सर्कस मैदान येथे भटक्या विमुक्तांची ५३० कुटुंबाची वसाहत आहे.अंबरनाथ स्थानिक प्रशासनाने भटक्या-विमुक्त कुटुंबाना पुनर्वसनासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून येथे कार्यवाही करावी. या नागरिकांचे योग्य पुनर्वसन झाल्यानंतरच त्या जागा रिकाम्या कराव्यात, अशा सूचनाही श्री.वडेट्टीवार यांनी दिल्या.

    यावेळी भटके-विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे व इतर सदस्य यांनी भटके-विमुक्त समाजाची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक सद्य:स्थिती जाणून घेवून शासकीय स्तरावर योजना आखल्या जाव्यात व त्या प्रभावीपणे राबवाव्यात, लोकसंख्येच्या आधारावर या समाजाच्या विकास योजनांसाठी निधीची तरतूद करणे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाला निधी वाढवून देण्यात यावा व भटके-विमुक्तांतील नाका कामगारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशा सूचना मांडल्या.

    ReplyDelete
  7. आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु
    966 आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध
    - कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
     
                मुंबई, दि. 15 : प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) आज प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार तर खाजगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकूण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
                व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने राज्यातील आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
                प्रवेश प्रक्रिया सुरु होताच अवघ्या काही वेळातच १५ इच्छूक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले. संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. एकुण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असुन 80 अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण तर 11 अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य प्रशिक्षण मिळून त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांना ११ अभ्यासक्रमांमध्ये संधी देण्यात येत आहे. सर्व शिक्षण मंडळांचा इयत्ता दहावीचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. दहावीचे निकाल घोषित झाल्यानंतर सविस्तर प्रवेश वेळापत्रक संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात येईल. तोपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेणे तसेच प्रवेश अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज आजपासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले.
                प्रवेश प्रक्रिया, नियमावली, पद्धती, आवश्यक कागदपत्रे, संबंधीत शासन निर्णय, विविध योजना, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता, इत्यादींबाबत इत्यंभूत माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हरकती नोंदविणे, विकल्प अर्ज भरणे, ऑनलाईन स्वरुपात प्रवेश अर्ज शुल्क भरणे इत्यादी सुविधा अर्जदारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच प्रवेश अर्ज  "MahaITI App"  या मोबाईल ॲपच्या आधारे भरण्याची सुविधा देखिल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यातील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले.

    ReplyDelete
  8. Continue.राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 01 शासकीय आयटीआय सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी 04 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र 02 संस्था व 43 शासकीय आयटीआमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात एकूण 549 खाजगी आयटीआय आहेत.
                सन २०१३ मध्ये शासकीय आयटीआय संस्थेतील प्रवेशप्रक्रिया व सन २०१५ मध्ये खाजगी आयटीआय संस्थेतील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे मंडळाकडुन सर्व परीक्षार्थ्यांची माहिती संचालनालयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आयटीआय संस्थेत प्रवेश अर्ज भरतांना उमेदवारांनी त्यांचा इयत्ता दहावी परिक्षेचा बैठक क्रमांक (Seat Number) नमुद केल्यास त्यांची वैयक्तिक व इयत्ता दहावीच्या परिक्षेतील गुण याबाबत सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप नमुद होईल (Auto Populate).             तसेच ज्या उमेदवारांनी इतर मंडळांमार्फत इयत्ता दहावी परीक्षा दिली असेल त्यांना त्यांची सर्व माहिती प्रवेश अर्जात नमुद करावी लागेल. प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर सर्व ऑनलाईन पेमेंट माध्यमे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही आयटीआय संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.
                आयटीआय प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा न घेता संबंधीत मंडळांनी निर्गमित केलेल्या दहावीच्या गुणपत्रिकेतील गुण व प्रवेश नियमावलीनुसार निर्धारित गुणाधिक्य याआधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
    शिकाऊ उमेदवारी योजनेतून विद्यावेतन
                युवकास आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आली.  शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण 11 हजार औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 1 लक्ष जागा स्थित करण्यात आलेल्या आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा शिकाऊ उमेदवारीसाठी उपलब्ध जागा अधिक असल्याने प्रत्येक उत्तीर्ण उमेदवारास संधी उपलब्ध आहे.
                इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीचा व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येणार आहे. आयटीआय संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो

    ReplyDelete
  9. आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका'

    लोणकर कुटुंबियाना दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर

    स्वप्नीलच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश



    मुंबई, दि. 16 : ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका,’अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला.

    स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

    यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आई सौ. छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर श्री.ठाकरे यांनी दिला.

    ReplyDelete
  10. हरेला’ निमित्त राज्यपालांचे राजभवन येथे तुळशीरोपण



    मुंबई, दि. 16 : उत्तराखंडचा लोकोत्सव असलेल्या ‘हरेला पर्व’ निमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आपल्या निवासस्थानाबाहेर तुळशीचे रोप लावले.

    भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण निसर्ग व ऋतुचक्राशी जोडलेला आहे. केवळ आपल्या देशात वड, पिंपळ, आवळा आदी विविध वृक्षांची व पशुपक्षांची पूजा केली जाते, असे सांगून निसर्गरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले पाहिजे, असा संदेश राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी दिला.

    यावेळी मुळच्या उत्तराखंड येथील लोकांच्या मुंबईतील संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांच्या डोक्यावर नवतृणांकुर अर्पण करून परस्परांना हरेला पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.

    कार्यक्रमाला भारत विकास परिषदेच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष महेश शर्मा, हिमालय पर्वतीय संघाचे अध्यक्ष चामूसिंह राणा, उद्योजक के एस पंवर, तुलसी फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर फुलोरीया, गढवाल भ्रातृ संघाचे उपाध्यक्ष दयाराम शाती, महेंद्र सिंह गोसाई, अमरजित मिश्र, अजय बोहरा, आदी उपस्थित होते.

    ००००





    Harela Parv celebrated at Raj Bhavan Mumbai

    Governor Koshyari plants Tulsi sapling on Harela Parv



    Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari planted a Tulsi sapling on the occasion of Harela Parv at Raj Bhavan, Mumbai on Friday (16th July). Representatives of various organisations of Uttarakhand people based in Mumbai were present.



    The Governor said India is the only country where trees such as Peepal, Wad, Amla and even animals and birds are worshipped. Stating that the festival of Harela gives the message of interdependence of man and nature, he called for planting and conserving more trees to protect environment.

    Mahesh Sharma, President of Konkan Prant of Bharat Vikas Parishad, Chamu Singh Rana of Himalaya Parvatiya Sangh, K S Panwar, Industrialist, Chandrashekhar Fuloria, President, Tulsi Foundation, Dayaram Shati, Vice President, Garhwal Bhratru Sangh, Mahendra Singh Gosain, Amarjeet Mishra and others were present.

    ००००

    ReplyDelete
  11. तुंगा व्हिलेज येथील मुंबई पब्लिक स्कुलचे

    पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण



    मुंबई, दि. 16 : मुंबईतील तुंगा व्हिलेज, कुर्ला पश्चिम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई पब्लिक स्कुलचे लोकार्पण पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

    यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार दिलीप लांडे, स्थानिक नगरसेवक अश्विनी माटेकर आदी उपस्थित होते.

    यावेळी श्री.ठाकरे म्हणाले, मुंबईत सीबीएसई अभ्यासक्रमाच्या २४ शाळा सुरू होत आहेत. या शाळांमधून दर्जेदार आणि मोफत शिक्षण दिले जाणार असल्याने याचा सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना लाभ होईल याचा आनंद आहे. अजूनही कोविड ची परिस्थिती पूर्ण आटोक्यात आली नसल्याने सर्वांनी त्याबाबतचे नियम पाळावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    या कार्यक्रमानंतर श्री.ठाकरे आणि महापौर श्रीमती पेडणेकर यांनी या परिसरातील मिठी नदीचा भाग व सांडपाणी व्यवस्थापनाची पाहणी केली.

    0000




    दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

    · आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा



    मुंबई, दि. 16 :- राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हावे, आनंदी जीवन जगावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षाहून अधिक काळ तणावाखाली वावरावे लागले. तरीही शाळांतर्गत मुल्यांकनात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. कोकण विभागाचा निकाल शंभर टक्के तर अन्य विभागांचा निकाल 99 टक्क्यांहून अधिक लागला आहे. राज्यातील 99.95 टक्के विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. हे यश कौतुकास्पद असून त्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे अभिनंदन. जीवनात येणाऱ्या आव्हानांवर मात करुन हे विद्यार्थी प्रत्येक टप्प्यावर असेच यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त करुन उपमुख्यमंत्र्यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

    ReplyDelete
  12. भूजल संपत्तीच्या जतन व संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

    - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    · भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन



    मुंबई दि.16 : भूजल संपत्ती ही अतिशय महत्त्वाची असून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने गेल्या 50 वर्षात अतिशय महत्त्वाचे काम केलेले आहे .यापुढेही हे काम अधिक जोमाने करण्यासाठी या कार्यात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रम मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झाला .त्यावेळी ते बोलत होते.

    मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, जमिनीवरचे पाणी हे दृश्य स्वरूपात दिसते . त्यामुळे त्याचे नियोजन करणे त्यामानाने सोपे जाते. परंतु भूगर्भात असलेल्या भूजलाचे संशोधन करून नियोजन करण्याचे काम ही यंत्रणा करीत आहे. म्हणून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

    भूजल पुनर्भरण महत्त्वाचे

    भूजल संपत्ती वाढवण्यासाठी भूजलाचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे आणि या पुनर्भरणाचे विविध तंत्रज्ञान आणि उपाययोजना या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहेत व विकसित केल्या आहेत. त्यामध्ये लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला जे जे सहकार्य लागेल ते शासनातर्फे करण्यात येईल. यंत्रणेतील जो कर्मचारी वर्ग अत्यावश्यक आहे, त्या पदांची प्राधान्यक्रमानुसार भरती करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.

    भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तांत्रिक मार्गदर्शन व भुजलाचे विविध पैलू समजण्यासाठी ज्या विविध पुस्तिका तयार केल्या आहेत त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले व त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, राज्यातील जनतेला गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत राज्यात १८३ प्रयोगशाळा पाणी तपासणी प्रयोगशाळा मंजूर आहेत. त्यामधून पाण्याचे नमुने तपासले जातात, गुणवत्तेबाबत काळजी घेण्यात येत आहे.

    बाटलीबंद पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रणा हवी

    बाटलीबंद पिण्याचे पाणी तपासणे गरजेचे असून ते योग्य आहे की नाही याची शहानिशा करणे आवश्यक आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    पुण्यातील नांदेड सिटी भागात पिण्याचे पाणी आणि वापराचे पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहेत. त्याद्वारे नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो.अशा प्रकारच्या योजना राबविण्याची गरज आहे असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.

    सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे

    शहरांमधील सांडपाणी हे प्रक्रिया न करता लगतच्या नदी नाल्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे नदी नाल्यांचे पाणी प्रदूषित होते. हे पाणी पुढे धरणात जाते आणि त्यानंतर पाणी शेतीला वापरले जाते आणि भाजीपाल्याच्या माध्यमातून हे प्रदूषण आपल्या घरापर्यंत पोहोचते. हे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.जलपुनर्भरण,पाणी गुणवत्ता या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.

    पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९२ टक्के क्षेत्र हे भूजल साठवण्याच्या दृष्टीने अत्यंत कठीण असलेल्या खडकांनी व्यापलेले आहे. त्यामुळे भूजलाच्या दृष्टीने आपल्याला इतर राज्यांच्या तुलनेत अनेक मर्यादा आहेत. परंतु असे असतानाही या यंत्रणेतील भूवैज्ञानिक, अभियंते, भूभौतिक तज्ञ, रसायनी यांनी गेल्या ५० वर्षामध्ये आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा कस लावून राज्यातील गोरगरीब व दुर्गम भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यात व हे कार्य आजतागायत निरंतर सुरु आहे. यातच या यंत्रणेचे यश आहे.नंदूरबार जिल्हयामधील सातपुडा डोंगर रांगामध्ये वसलेला दुर्गम आदिवासी समाज असो, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातील जनता असो, ज्या ठिकाणी आजही पोहचणे अवघड जाते अशा ठिकाणी या यंत्रणेनी त्या काळात भूजलाचे संशोधन करुन हातपंप उभारले. हे खरंच कौतुकास्पद आहे

    ReplyDelete
  13. भूजल संपत्तीच्या जतन व संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

    - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    · भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन



    मुंबई दि.16 : भूजल संपत्ती ही अतिशय महत्त्वाची असून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने गेल्या 50 वर्षात अतिशय महत्त्वाचे काम केलेले आहे .यापुढेही हे काम अधिक जोमाने करण्यासाठी या कार्यात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रम मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झाला .त्यावेळी ते बोलत होते.

    मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, जमिनीवरचे पाणी हे दृश्य स्वरूपात दिसते . त्यामुळे त्याचे नियोजन करणे त्यामानाने सोपे जाते. परंतु भूगर्भात असलेल्या भूजलाचे संशोधन करून नियोजन करण्याचे काम ही यंत्रणा करीत आहे. म्हणून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

    भूजल पुनर्भरण महत्त्वाचे

    भूजल संपत्ती वाढवण्यासाठी भूजलाचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे आणि या पुनर्भरणाचे विविध तंत्रज्ञान आणि उपाययोजना या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहेत व विकसित केल्या आहेत. त्यामध्ये लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला जे जे सहकार्य लागेल ते शासनातर्फे करण्यात येईल. यंत्रणेतील जो कर्मचारी वर्ग अत्यावश्यक आहे, त्या पदांची प्राधान्यक्रमानुसार भरती करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.

    भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तांत्रिक मार्गदर्शन व भुजलाचे विविध पैलू समजण्यासाठी ज्या विविध पुस्तिका तयार केल्या आहेत त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले व त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, राज्यातील जनतेला गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत राज्यात १८३ प्रयोगशाळा पाणी तपासणी प्रयोगशाळा मंजूर आहेत. त्यामधून पाण्याचे नमुने तपासले जातात, गुणवत्तेबाबत काळजी घेण्यात येत आहे.

    बाटलीबंद पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रणा हवी

    बाटलीबंद पिण्याचे पाणी तपासणे गरजेचे असून ते योग्य आहे की नाही याची शहानिशा करणे आवश्यक आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    पुण्यातील नांदेड सिटी भागात पिण्याचे पाणी आणि वापराचे पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहेत. त्याद्वारे नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो.अशा प्रकारच्या योजना राबविण्याची गरज आहे असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.

    सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे

    शहरांमधील सांडपाणी हे प्रक्रिया न करता लगतच्या नदी नाल्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे नदी नाल्यांचे पाणी प्रदूषित होते. हे पाणी पुढे धरणात जाते आणि त्यानंतर पाणी शेतीला वापरले जाते आणि भाजीपाल्याच्या माध्यमातून हे प्रदूषण आपल्या घरापर्यंत पोहोचते. हे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.जलपुनर्भरण,पाणी गुणवत्ता या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.

    पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९२ टक्के क्षेत्र हे भूजल साठवण्याच्या दृष्टीने अत्यंत कठीण असलेल्या खडकांनी व्यापलेले आहे. त्यामुळे भूजलाच्या दृष्टीने आपल्याला इतर राज्यांच्या तुलनेत अनेक मर्यादा आहेत. परंतु असे असतानाही या यंत्रणेतील भूवैज्ञानिक, अभियंते, भूभौतिक तज्ञ, रसायनी यांनी गेल्या ५० वर्षामध्ये आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा कस लावून राज्यातील गोरगरीब व दुर्गम भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यात व हे कार्य आजतागायत निरंतर सुरु आहे. यातच या यंत्रणेचे यश आहे.नंदूरबार जिल्हयामधील सातपुडा डोंगर रांगामध्ये वसलेला दुर्गम आदिवासी समाज असो, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातील जनता असो, ज्या ठिकाणी आजही पोहचणे अवघड जाते अशा ठिकाणी या यंत्रणेनी त्या काळात भूजलाचे संशोधन करुन हातपंप उभारले. हे खरंच कौतुकास्पद आहेcontinue

    ReplyDelete
  14. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राबविलेल्या भूजल पुनर्भरणाच्या योजना असो वा भूजल व्यवस्थापनातील पथदर्शी प्रकल्प असो त्याच्या यशस्वीतेची दखल देशपातळीवर घेण्यात आली आणि त्यातूनच केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन,अटल भूजल योजना यासारख्या योजनांची पायाभरणी झाली असे सांगून मंत्री श्री.पाटील म्हणाले, एकीकडे हवामान बदलाचा फटका, दुसरीकडे वाढती लोकसंख्या, वाढते सिंचन आणि त्याकरिता वाढत जाणारी पाण्याची मागणी याचा प्रचंड ताण भूजल व्यवस्थेवर पडतांना दिसत आहे. महाराष्ट्रात भूजलाच्या एकूण वापरापैकी ९२% भूजलाचा वापर सिंचनाकरिता केला जातो व पिण्याच्या पाण्याकरिता साधारणत: ५ ते ६ % केला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत शाश्वतता आणावयाच्या दृष्टीने भूजलाचा समग्र विचार करून लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

    आज राज्यात तीन मुख्य केंद्र पुरस्कृत योजना सुरु आहेत. त्या म्हणजे जलजीवन मिशन, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प आणि अटल भूजल योजना. या तीनही योजनांच्या माध्यमातून राज्यातील पेयजल व्यवस्था व भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सक्षम करायचे आहे. त्याकरिता जलसंधारण, भूजल पुनर्भरण, पाणी बचतीच्या (ठिबक/तुषार) उपाययोजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. तेव्हाच राज्यातील ग्रामीण जनतेला ५५ लि. प्रति माणशी पाणी उपलब्ध होऊ शकेल.या तीनही योजनेच्या अंमलबजावणोमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा मोठा वाटा आहे. किंबहुना राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प व अटल भूजल योजनाकरिता प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून राज्यात १७८ पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळांचे जाळे विस्तारले आहे. याद्वारे शुद्ध जल जनतेस मिळण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत असेही पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

    राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले,दुर्गम व ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची एक सक्षम व शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यात भूजल सर्वेक्षण अणि विकास यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.

    आज राज्याच्या भूजलाच्या दृष्टीने अनेक आव्हाने आहेत. त्यास समर्थपणे तोंड देण्याकरीता या क्षेत्रात यंत्रणेस सबळ करुन दुरगामी धोरण आखणे व त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

    आपण लातूर शहराची सन २०१६ मधील पाणी टंचाईची परिस्थिती अगदी जवळून बघितली आहे. अनावश्यक पाणी उपसा केल्याने ही परिस्थिती ओढवून घेतली होती याकडेही राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी लक्ष वेधले.

    अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यावेळी म्हणाले ,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही तांत्रिक दृष्ट्या अत्यंत सक्षम यंत्रणा आहे.या यंत्रणेचा देश पातळीवर सुद्धा नावलौकिक आहे. या यंत्रणेची ग्रामीण पाणीपुरवठ्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपयोजन केंद्राच्या सहकार्याने भूजलाच्या सर्व स्त्रोतांचे मॅपिंग करण्यात आले असून त्याद्वारे भूजलाचा अंदाज काढणे आणि त्याचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    ReplyDelete
  15. प्रोड्युसर गिल्डने नियमांचे पालन करण्याची दिली ग्वाही

    आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रीतीने चित्रीकरण करावे

    परवानगीसाठी मुंबई पोलिसही करणार समन्वय

    - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश



    मुंबई दि 17: चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे,यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे अशा सूचना दिल्या.

    चित्रपट निर्मात्यांच्या सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल अशी ग्वाही दिली.

    या बैठकीस हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या प्रमुख संस्था असलेल्या प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांनीही बैठकीत सहभागी होऊन सूचना केल्या. आदेश बांदेकर यांनी बैठकीचे सूत्रसंचलन केले.

    बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे देखील सहभागी होते.

    गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी चित्रपट आणि मालिकांचे निर्माते कोरोना काळात नियमांचे पालन करून चित्रीकरण करीत आहेत परंतु चित्रीकरणाच्या वेळेत वाढ करणे गरजेचे आहे, सायंकाळी 4 नंतर देखील चित्रीकरण करण्यास परवानगी मिळाल्यास सर्वतोपरी काळजी घेऊन व नियमांचे पालन करून चित्रीकरण करता येणे शक्य आहे असे प्रोड्युसर गिल्डचे म्हणणे होते.

    पथकाचे लसीकरण व कोरोना तपासणी आवश्यक

    मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, निर्बंध टाकून तुम्हाला अडविणे आम्हालाही आवडत नाही पण महारष्ट्र आणि केरळसह देशातील इतर काही राज्यांमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे. संरक्षित अशा बायो बबलची व्यवस्था करूनही काही क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमादरम्यान संसर्ग झालेला दिसतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देखील आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नसून जगातील इतर देशांत परत तिसरी लाट उसळल्याचे दिसते, त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेत राहणे आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनी कोविड संदर्भात आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर कोरोना चाचणी करीत राहणे, पथकातील कुणाला ताप जरी आला असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील तर त्वरित दखल घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचे दोन्ही डोसेससह लसीकरण असणे गरजेचे आहे.

    निर्बंध कायम न ठेवता कोरोना परिस्थितीची पाहणी करून टप्प्याटप्प्याने, सावधपणे, आणि सुरक्षितरित्या ते उठविण्याबाबत राज्य शासन पाउले टाकत आहे. पण यासाठी सर्वांचे मोठे सहकार्य लागणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    .....तरच परवानगी

    मुंबई पोलिसांनी देखील प्रत्येक निर्मात्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक, चित्रीकरण ठिकाण व वेळा याबाबतची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी आणि एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी टाकून व्यवस्थित व नियमांची काळजी घेत असल्याची खात्री करून परवानगी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

    यावेळी टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ.प्रदीप व्यास यांनी देखील कोरोना सद्य परिस्थितीबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील यावेळी पोलिसांतर्फे नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याचे सांगितले.

    0000

    ReplyDelete
  16. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस साजरा न करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय

    वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कुणीही प्रत्यक्ष येऊ नका

    पुष्पगुच्छ पाठवू नका, गर्दी जमवू नका, कोरोना नियम पाळा

    - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

    · वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनी व डिजिटल स्वरुपात देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांना आवाहन

    · कोरोना प्रतिबंधक नियम पाळून कोरोनामुक्तीच्या लढ्यात योगदान द्या - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन



    मुंबई, दि. 19 : राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा येत्या गुरुवारी, दि. 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिकांची होणारी गर्दी व त्यामुळे वाढणारा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते व हितचिंतकांनीही गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या कोविडविरोधी लढ्यासाठी द्यावा. मान्यताप्राप्त यंत्रणांच्या सहकार्याने, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरांसारखे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आ

    ReplyDelete
  17. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकारिता

    पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण



    मुंबई, दि.१९ : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन २०२० च्या जीवनगौरव आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण उद्या मंगळवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राजभवन येथे होणार आहे.

    मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा जीवनगौरव तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मान केला जातो. २०२० सालचा कृ.पां.सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश बाळ जोशी यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम) श्री. सिद्धार्थ गोदाम- न्यूज १८ लोकमत
    ( औरंगाबाद), राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) श्री. किरण तारे - इंडिया टुडे तर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सदस्यांकरिताचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री. चंदन शिरवाळे - दै.पुढारी यांना जाहीर झाला आहे. यंदाच्या या पुरस्कारांचे वितरण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्या दिनांक २० जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता राजभवन येथे होणार आहे.

    या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कु. आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री, (माहिती व जनसंपर्क, पर्यटन, राजशिष्टाचार), तर विशेष अतिथी म्हणून श्री.भारतकुमार राऊत, माजी खासदार (राज्यसभा), श्री. दिलीप पांढरपट्टे (महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय) हे उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार निवड समितीचे प्रमुख म्हणून प्रकाश सावंत, सदस्य इंद्रकुमार जैन व सदस्य सचिव म्हणून सचिन गडहिरे यांनी काम पाहिले असल्याची माहिती मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघांचे अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी दिली आहे.

    000




    ReplyDelete
  18. श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र

    प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक

    - मुंबई शहर जिल्हाधिकारी



    मुंबई, दि. 20 : मुंबईतील श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. यापुढे कोणतेही पाळीव प्राणी दुकाने, श्वान प्रजनन व विपणन केंद्र महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरु ठेवता येणार नसल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा मुंबई शहर प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीचे अध्यक्ष यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

    सर्व पाळीव प्राणी दुकान व श्वान प्रजनन व विपणन केंद्र चालवू इच्छिणा-या व्यक्तीस आवाहन करण्यात येत की, प्राण्यांना कृपरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम २०१८ व पाळीव प्राणी दुकानांची व श्वान प्रजनन व विपणन नियम २०१७ अन्वये श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. आपण आपल्या दुकान केंद्राची नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज Maharashtra state Animal Welfare Board यांच्या नावे रुपये ५०००/- (अक्षरी-पाच हजार रुपये मात्र ) च्या धनाकर्षासह ( Demand Draft) महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण मंडळ, पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर औध, पुणे. 67 या पत्यावर दाखल करावा. हा अर्ज पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या खालील संकेतस्थळावर उपलब्ध असून जिल्हाधिकारी, मुंबई शहर तथा अध्यक्ष, प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी मुंबई शहर यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

    https://ahd.maharashtra.gov.in/content/resources-pet-shops

    https://ahd.maharashtra.gov.in/content/resources-breeders

    0000

    ReplyDelete
  19. मुंबईतील सर्व न्यायालयात 1 ऑगस्ट रोजी लोक अदालत

    ई-लोक अदालतीचीही सुविधा



    मुंबई, दि. 20 : न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी रविवारी दि.1 ऑगस्ट रोजी मुंबई येथील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पक्षकारांनी लवकर न्यायालयात विनंती अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबईचे सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे.

    राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार ही लोक अदालत होणार असून यात विशेष म्हणजे यावेळेस ई-लोक अदालतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे व त्याद्वारे दुरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे.

    ReplyDelete
  20. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ अंतर्गत रत्नागिरी येथे

    सुरू होणाऱ्या उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करावे

    - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचना



    मुंबई, दि. 20 : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर अंतर्गत रत्नागिरी येथे उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या.

    आज मंत्रालयात याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    श्री.सामंत म्हणाले, उपकेंद्रासाठी लागणारी जमीन उपलब्ध करून देण्यात येईल.या उपकेंद्राचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. रत्नागिरी उपकेंद्र स्वयंपूर्ण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ यांच्याशी समन्वय करून बीएस्सी.हॉस्पिटँलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केल्यास रत्नागिरी परिसरातील पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना लाभ होईल. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन प्रशिक्षीत मनुष्यबळाची निर्मिती होईल.

    या उपकेंद्रामध्ये सन 2021-22 करिता एम.ए.(संस्कृत,योगशास्त्र,ज्योतिषशास्त्र), बी.ए.(योगशास्त्र), बीसीसीए.पदविका (संस्कृत,योग, वास्तुशास्त्र)

    सन2022-23पासून सुरू होणार अभ्यासक्रम

    बी. एससी.(हॉपिटँलिटी स्टडीज),बी.बी.ए,बी.ए,(सव्हील सर्व्हिसेस, कौशल्य विकासोन्मुख अभ्यासक्रम.सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

    000

    ReplyDelete
  21. निसर्ग कोपलेला; माणूस अजूनही झोपलेला!..
    --------------------------------------------------------------------------
    मागच्या तीन दिवसांपासून जर्मनीमध्ये जलतांडव सुरु आहे. जर्मनीच्या ह्राईनलॅंड-पॅलॅटिनेट प्रांतामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. हा जलप्रपात इतका भयंकर आहे की गेल्या अनेक दशकांमध्ये युरोपने इतका मोठा भीषण महापूर कधीही अनुभवला नव्हता. जर्मेनीसोबतच नेदरलॅंड, स्वित्झर्लॅंड आणि बेल्जिअम या इतर युरोपियन देशांना देखील या महापूराने चांगलाच तडाखा दिला आहे. अनपेक्षित झालेल्या या प्रचंड मोठ्या वाताहतीमूळे विकसित मानल्या जाणाऱ्या या देशांमधील प्रशासन कोलमडून गेल्याचे जगाने पाहिले. वेधशाळा चक्रावून गेल्या आणि हवामानतज्ञही गोंधळून गेले. हे कसे आणि का झाले हे कोडे कोणालाही उलगडत नाहीये.

    या सगळ्याची सुरुवात आठवड्याभरापुर्वी झाली. पश्चिम युरोपमध्ये अभुतपुर्व अशा मुसळधार पावसाची नोंद झाली आणि तिथून या संकटाच्या मालिकेची सुरुवात झाली. या सतत कोसळणाऱ्या जलधारांनी जर्मनीतील जलाशय काठोकाठ भरुन गेले आणि जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली तेव्हा या जलधारांनी रौद्र रुप धारण केले आणि बघता बघता अहर नदीच्या काठावर महापूराने धुडगूस घातला. अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये आणि रहिवाशी परिसरामध्ये या महापुराचे लोंढे घुसले. हा जलप्रपात इतका भीषण होता की नागरिकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.
    या संकटांचा संबंध हवामानबदलाशी आहे. गेल्या दहा वर्षात पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामध्ये ढगफूटी, सौरवादळे, हिमवादळे, जंगलांमध्ये वणवे पेटणे, अशा सर्वच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या घटनांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

    काही आठवड्यांपुर्वीच पश्चिम अमेरीकेतील आणि कॅनडामधील काही भुभागावर प्रचंड मोठ्या उष्णता लहरी आल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. कुठे एकोणपन्नास, तर कुठे पंचावन्न अंश एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. या उष्णलहरींचा आणि युरोपमधील जलतांडवाचा प्रत्यक्ष संबंध आहे का याची चाचपणी केली जात आहे. जागतिक हवामान विशेषज्ञ संघटनेमधील हवामानशास्त्रज्ञांनी दावा केला की हे संकट नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. गेल्या नऊ वर्षात ब्राझीलमध्ये इतकी प्रचंड जंगलतोड झाली आहे की ही जगाची फुफ्फुसे आता निकामी होण्याच्या मार्गावर आहेत. ब्राझीलमधील घनदाट एमेझॉन पर्जन्यवने एकेकाळी विषारी आणि घातक अशा कार्बनडायऑक्साईडला शोषून घेण्यात अग्रेसर होती. आर्थिक विकासाचे गोंडस नाव देऊन मागच्या दहा वर्षात संपुर्ण जगामधून तब्बल चार लाख सत्तर हजार वनक्षेत्र नष्ट करण्यात आले. हे क्षेत्रफळ स्वित्झर्लॅंड देशाच्या आकाराहून जास्त आहे.

    विडंबना म्हणजे मागच्या आठवड्यात एका बाजूला ज्यावेळी युरोपियन युनियनमधील सर्व देशांचे प्रतिनिधी जागतिक हवामानबदलांवर चर्चा करण्यासाठी एकत्र जमले होते त्याच दरम्यान दुसरीकडे पश्चिम युरोपमध्ये हे जलतांडव सुरु होते. ही प्रगत देशातील सर्वच नेतेमंडळी हवामानबदल रोखण्यासाठी इतरांना उपदेश करतात पण ठोस उपाययोजना कोणीही करत नाही. वेळ आली की प्रत्येक जण आपल्या आर्थिक हितांना जास्त प्राधान्य देतो.

    सत्य हेच आहे की आपल्या अमाप संपत्तीच्या बळावर युरोप अमेरीकेने मोठ्या हुशारीने आशिया आणि अफ्रिकेतील गरीब देशांना त्यांची कचराकूंडी बनवले आहे. उर्वरीत जगातील नैसर्गिक साधनसंपत्तीला ओरबाडूनच त्यांनी आपली चंगळवादी संस्कृती जोपासली आहे. गावातील धनाढ्य व्यक्तीने आपला बंगला कितीही भक्कम आणि सुरक्षित बांधला तरी गावावर एखादे मोठे नैसर्गिक संकट आले तर त्यातून तो ही वाचत नाही. अशीच काहीशी अवस्था आज युरोप-अमेरीकेची झाली आहे. चंगळवादी जीवनशैली असलेल्यांनी पर्यावरणवादी असल्याचा कितीही दिखावा केला तरी जगाची तापमानवाढ झाल्याचे परिणाम पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला कशाच्या ना कशाच्या रुपात भोगावेच लागत आहेत.

    अफ्रिका खंडातील मोजांबिक देशाच्या किनाऱ्यावर समुद्राने गेल्या काही वर्षात इतका हैदोस घातला की तिथल्या सरकारने स्थानिक मच्छिमारांना समुद्रात जाऊन मासेमारी करण्यास कायमची मनाई केली. आता त्यांना शेतीचे धडे दिले जात आहेत. प्रत्येक देशाला काही ना काही फटका बसतोय पण तरीही कोणीही धडा घेण्यास तयार नाही. निसर्ग कोपला तरीही माणूस झोपला अशीच काहीशी आपली अवस्था आहे.

    © पंकज कोटलवार
    (संपर्क – 7038693724)
    From - FB

    ReplyDelete
  22. काश्मीर पुनश्च भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाईल

    - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    मुंबई दि. २१ - काश्मीरची वाटचाल स्थैर्य व शांतीकडे सुरू झाली असून सर्वसामान्य लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये काश्मीरचे योगदान अनन्यसाधारण असून काश्मीर प्रदेश लवकरच आपले गतवैभव प्राप्त करील व पुनश्च देशाचे नंदनवन होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    साहित्य, संस्कृती, भाषा संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘हिंदी काश्मीर संगम’ या संस्थेच्या वतीने बुधवारी (दि. 21) राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व साहित्यिक व समाजसेवक यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

    हिंदी काश्मीर संगम- काश्मिर अनुष्ठानच्या अध्यक्षा तसेच लेखिका व समाजसेविका डॉ. बिना बुदकी यांच्या "केसर की क्यारी में आग की लपटे आखिर कब तक" पुस्तकाचे तसेच 'कश्मीर संदेश' या नियतकालिकाचे राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.

    राज्यपाल म्हणाले, काश्मीर 700 ते 800 वर्षापूर्वी भारताचे गौरव समजले जात होते. आता पुन्हा काश्मीरला गतवैभव मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेथील सामान्य नागरिकही शांती निर्माण होण्यासाठी सकारात्मक आहेत. नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तेथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

    काश्मीर ही अभिमन्यू गुप्त, भरतमुनी, कल्हण प्रभृतींची तसेच काश्मीरी शैव तत्वज्ञानाची भूमी असून काश्मीरमध्ये भारतीय नाट्य शास्त्र, काव्य आणि साहित्याला महत्वपूर्ण स्थान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षानंतर काश्मीरमध्ये शांततेसाठी प्रयत्न सुरू असून ते लवकरच यशस्वी होतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. काश्मीरमध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार होणे ही गौरवास्पद बाब आहे. मात्र, संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    काश्मीरमध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या डॉ. बिना बुदकी यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौरवार्थींनीही भविष्यात साहित्य - शिक्षा आणि लोकसेवेचे कार्य अवरित सुरू ठेवावे, अशी अशा राज्यपालांनी व्यक्त केली.

    यावेळी व्यासपीठावर महेश आचार्य, हिंदी काश्मीरी संगमचे सदस्य दिनेश बारोट उपस्थित होते.

    ०००

    ReplyDelete
  23. काश्मीर पुनश्च भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाईल

    - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    मुंबई दि. २१ - काश्मीरची वाटचाल स्थैर्य व शांतीकडे सुरू झाली असून सर्वसामान्य लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये काश्मीरचे योगदान अनन्यसाधारण असून काश्मीर प्रदेश लवकरच आपले गतवैभव प्राप्त करील व पुनश्च देशाचे नंदनवन होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    साहित्य, संस्कृती, भाषा संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘हिंदी काश्मीर संगम’ या संस्थेच्या वतीने बुधवारी (दि. 21) राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व साहित्यिक व समाजसेवक यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

    हिंदी काश्मीर संगम- काश्मिर अनुष्ठानच्या अध्यक्षा तसेच लेखिका व समाजसेविका डॉ. बिना बुदकी यांच्या "केसर की क्यारी में आग की लपटे आखिर कब तक" पुस्तकाचे तसेच 'कश्मीर संदेश' या नियतकालिकाचे राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.

    राज्यपाल म्हणाले, काश्मीर 700 ते 800 वर्षापूर्वी भारताचे गौरव समजले जात होते. आता पुन्हा काश्मीरला गतवैभव मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेथील सामान्य नागरिकही शांती निर्माण होण्यासाठी सकारात्मक आहेत. नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तेथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

    काश्मीर ही अभिमन्यू गुप्त, भरतमुनी, कल्हण प्रभृतींची तसेच काश्मीरी शैव तत्वज्ञानाची भूमी असून काश्मीरमध्ये भारतीय नाट्य शास्त्र, काव्य आणि साहित्याला महत्वपूर्ण स्थान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षानंतर काश्मीरमध्ये शांततेसाठी प्रयत्न सुरू असून ते लवकरच यशस्वी होतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. काश्मीरमध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार होणे ही गौरवास्पद बाब आहे. मात्र, संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    काश्मीरमध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या डॉ. बिना बुदकी यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौरवार्थींनीही भविष्यात साहित्य - शिक्षा आणि लोकसेवेचे कार्य अवरित सुरू ठेवावे, अशी अशा राज्यपालांनी व्यक्त केली.

    यावेळी व्यासपीठावर महेश आचार्य, हिंदी काश्मीरी संगमचे सदस्य दिनेश बारोट उपस्थित होते.

    ०००

    ReplyDelete
  24. स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची परतफेड

    देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द लोणकर कुटुंबीयांना मोठा दिलासा



    मुंबई, 22 जुलै

    एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.

    देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना हा 19 लाख 96 हजार 965 रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबीयांवर कर्ज होते. आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते. अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबीयांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.

    *******

    ReplyDelete
  25. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा

    मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा



    · पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचावकार्य करावे

    · नागरिकांनीही खबरदारी बाळगावी



    मुंबई दि २२: गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा दिला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे.

    या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता श्री तिरमणवार आदींची उपस्थिती होती.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पावसासंबंधीचा इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.

    यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली.

    यावेळी बैठकीत नद्यांच्या वाढलेल्या पातळीबाबत माहिती देण्यात आली.

    रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.74 मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.

    रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी धोका पातळी वरून वाहत असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी , उल्हास या नद्या देखील इशारा पातळीवर वाहायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत ४८० मिमी पाऊस झाल्याने सावित्री व इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात देखील जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे





    धरण परिसरात देखील जोरदार पाऊस

    भातसा धरण परिसरात गेल्या २४ तासांत ३३६ मिमी पाऊस झाला असून धरण ६३ टक्के तर सूर्या धरण परिसरात १५६ मिमी पाऊस झाला असून ते देखील ६३ टक्के भरले आहे.

    बारावी परिसरात देखील २५६ मिमी पाऊस झाला त्यामुळे धरण ६२ टक्के तर मोरबे धरणही २६० मिमी पाऊस झाल्याने ७१ टक्के भरले आहे. या धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणांना देखील तसे सांगण्यात आले आहे

    0000

    ReplyDelete
  26. *Some Personal Finance Rules we all should better know*

    - Rule of 72 (Double Your Money)
    - Rule of 70 (Inflation)
    - 4% Withdrawal Rule
    - 100 Minus Age Rule
    - 10, 5, 3 Rule
    - 50-30-20 Rule
    - 3X Emergency Rule
    - 40℅ EMI Rule
    - Life Insurance Rule

    *Rule of 72*

    No. of yrs required to double your money at a given rate, U just divide 72 by interest rate
    Eg, if you want to know how long it will take to double your money at 8% interest, divide 72 by 8 and get 9 yrs

    At 6% rate, it will take 12 yrs
    At 9% rate, it will take 8 yrs


    *Rule of 70*

    Divide 70 by current inflation rate to know how fast the value of your investment will get reduced to half its present value.

    Inflation rate of 7% will reduce the value of your money to half in 10 years.

    *4% Rule for Financial Freedom*

    Corpus Reqd = 25 times of your estimated Annual Expenses.

    Eg- if your annual expense after 50 years of age is 500,000 and you wish to take VRS then corpus with you required is 1.25 cr.

    Put 50% of this into fixed income & 50% into equity.

    Withdraw 4% every yr, i.e.5 lac.

    This rule works for 96% of time in 30 yr period

    *100 minus your age rule*

    This rule is used for asset allocation. Subtract your age from 100 to find out, how much of your portfolio should be allocated to equities

    Suppose your Age is 30 so (100 - 30 = 70)

    Equity : 70%
    Debt : 30%

    But if your Age is 60 so (100 - 60 = 40)

    Equity : 40%
    Debt : 60%

    *10-5-3 Rule*

    One should have reasonable returns expectations

    10℅ Rate of return - Equity / Mutual Funds
    5℅ - Debts ( Fixed Deposits or Other Debt instruments)
    3℅ - Savings Account

    *50-30-20 Rule - about allocation of income to expense*

    Divide your income into
    50℅ - Needs (Groceries, rent, emi, etc)
    30℅ - Wants (Entertainment, vacations, etc)
    20℅ - Savings (Equity, MFs, Debt, FD, etc)

    Atleast try to save 20℅ of your income.
    You can definitely save more

    *6X Emergency Rule*

    Always put atleast 6 times your monthly expenses in Emergency funds for emergencies such as Loss of employment, medical emergency, etc.

    *40℅ EMI Rule*

    Never go beyond 40℅ of your income into EMIs.

    Say you earn, 50,000 per month. So you should not have EMIs more than 20,000 .

    This Rule is generally used by Finance companies to provide loans. You can use it to manage your finances.

    *Life Insurance Rule*

    Always have Sum Assured as 15 times of your Annual Income

    15 X Annual Income

    Say you earn 5 Lacs annually, u shud atleast have 75 lac life insurance by following this Rule

    *These rules are equally useful during youth and old age. Hope you will find them simple, useful and handy.*

    ReplyDelete
  27. रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली;

    लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले

    - परिवहनमंत्री अनिल परब



    मुंबई, दि.२२ : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या तसेच कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने आज पहाटे ४ वाजता तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५ हजार ८०० प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

    परिवहन मंत्री ॲड. परब म्हणाले,मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरिता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस उपलब्ध करून देवून पहाटे ४ वाजल्यापासून बस सेवा सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५ हजार ८०० हून अधिक प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले.

    पुणे-मुंबई मार्गावर ७४ जादा गाड्या सोडल्या

    पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरिता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा बस सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती श्री. परब यांनी दिली.

    ReplyDelete
  28. लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त

    विधान भवनात अभिवादन



    मुंबई, दि. 23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी अनिल महाजन, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रविंद्र जगदाळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, महाराष्ट्र विधानमंडळाचे उप मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्रशेखर सावंत यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

    ००००

    ReplyDelete
  29. महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

    हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्यांची सुटका करणे सुरु

    पूरग्रस्तांनी घराच्या छतावर, उंचावर थांबल्यास लगेच मदत करणे शक्य

    स्वयंसेवी संस्थांना अन्नाची पाकिटे, कपडे याविषयी आवाहन



    मुंबई २३: महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

    बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी ओसरलं आहे पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    माणगाव पाचाड मार्गे महाड रस्ता, माणगाव महाड महामार्ग, गोरेगाव दापोली रस्ता सुरु झाला आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी दिली.

    कोंझर पासून पुढे तेटघर पर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला आहे. तेटघर पासून पुढे मोहोप्रेमार्गे आचळोली कडून नातेखिंडला पोहोचता येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

    स्वयंसेवी संस्थांना आवाहन

    माणगाव येथे सुमारे 2000 फुड पॉकेट्स तयार आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत अजून 2000 अन्नाची पाकिटे तयार होतील. याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत. माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे. स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी, असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

    आरोग्य यंत्रणा सज्ज

    महाड मधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाटू लोणेरे येथे एक वैद्यकीय पथक सज्ज असून त्यांच्याकडे रुग्णवाहिका व इतर सामुग्री आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. एमआयडीसी चे अग्निशामक दल देखील मदत कार्यात उतरले आहे.

    ००००

    ReplyDelete
  30. पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली

    · नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात

    · मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने संपर्कात



    मुंबई, दि.22 : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत.

    भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्यदलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

    तसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे.

    एनडीआरएफच्या 2 तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

    कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी 25 जवानांची 2 पथके सज्ज झाली आहेत.

    00000

    ReplyDelete
  31. राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील

    मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत

    - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    जखमींवर शासकीय खर्चाने उपचार



    मुंबई, दि. 23 : राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.

    रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

    ReplyDelete
  32. राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील

    मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत

    - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    जखमींवर शासकीय खर्चाने उपचार



    मुंबई, दि. 23 : राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.

    रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

    ReplyDelete
  33. हुंडाबंदी अधिनियम अंतर्गत गुन्ह्याप्रकरणी त्वरित कारवाई करावी

    उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश



    मुंबई, 23 :- पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत दि. 30 जून, 2021 रोजी दाखल FIR 0293 बाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन पत्र देऊन चौकशी केली व या प्रकरणी त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. या पत्राची एक प्रत पोलीस विशेष महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा ( महिला विरोधी अत्याचार प्रतिबंध ) यांना देखील देण्यात आली आहे.

    यातील आरोपींविरुध्द भादंवि 498,323, 325, 406, 420,506,34 व हुंडाबंदी अधिनियमाच्या कलम 3 अंतर्गत FIR क्रमांक 0293/2021 गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात मुख्य आरोपी व अन्य सात आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने यामध्ये कार्यवाही करणे आवश्यक आहे. या प्रकरणी कनिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपीला अटक करण्यबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे. आरोपींना जामीन मिळणार नाही याबाबत आवश्यक पुरावे गोळा करावेत आणि पुराव्यासहित प्रकरण न्यायालयात मांडले जाईल या दृष्टीने पाहावे, तसेच या प्रकरणात पोलीस अभियोक्ता यांनीही आरोपींच्या विरोधात आवश्यक पुरावे सादर करुन खंबीर भूमिका मांडावी. महिला विरोधी अत्याचार विभागामार्फत सुध्दा या प्रकरणांचे पर्यवेक्षण करावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

    ReplyDelete
  34. राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची

    संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा

    · अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव व मदतकार्यासाठी सैन्यदलांच्या मदतीचे आश्वासन

    · संरक्षण मंत्रालयाशी समन्वयासाठी नोडल ऑफिसर म्हणून मदत व पुनर्वसन सचिव असिम गुप्ता यांच्यावर जबाबदारी

    · मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवांकडून सातत्याने आपत्कालिन स्थितीचा आढावा



    · बचाव व मदतकार्याला गती देण्यासाठी राज्य व जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न



    · स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या पालकमंत्री, लोकप्रतिनिधींना सूचना





    मुंबई, दि. 23 : रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

    राज्यात सर्वदूर होत असलेल्या अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार जातीने लक्ष ठेवून आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.अदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे तसेच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत.

    कोयना धरण परिसरातील अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी वाढत असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

    अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने व दरड कोसळल्याने ज्या गावांचा संपर्क तुटला आहे तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनीही आपत्कालिन परिस्थितीत आपापल्या भागातल्या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचाव व मदतकार्यात सहकार्य करावे. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

    ००००

    ReplyDelete
  35. *"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती" ..!!*

    *कोथरूड पुणे येथे घडलेली ही एक सत्यघटना ..!! नांव उघड न करण्याच्या अटीवर शेअर करायला परवानगी दिली ..!!*

    *ज्या पांढर पेशा वर्गाला नावे ठेवली जातात त्या वर्गामधील व्यक्तिची ही सत्य कथा .. (आणि सदर व्यक्ति संघ स्वयंसेवक आहे )..!!*

    *कोथरूडच्या रोटरी क्लब मध्ये 'ब्लड डोनर्स' ची लिस्ट तयार केलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन येतो ..!!*

    *"एका मुलाचा Accident झालाय. खूप Bleeding झालंय. O-VE Blood Group असलेले कुणी डोनर असतील तर त्यांचे नांव आणि पत्ता मिळेल का ..??"*

    *लिस्ट चेक केली जाते आणि त्या व्यक्तिचे नांव आणि पत्ता त्या फोन करणा-या व्यक्तिला दिला जातो. ते कार्यकर्ते गाडी घेऊन त्या पत्त्यावर जायला निघतात. घराच्या जवळ गाडी येते. बघतात तर काय, एक ग्रुहस्थ रस्त्यावर येऊन कुणाची तरी वाट बघत असल्यासारखे उभे असतात ..!! ते गाडीला हात करून थांबवतात ..!!"*

    *हाँस्पिटल मधून आलात ना ..?? मीच आहे डोनर ..!! हे माझे कार्ड ..!!"*

    *कार्यकर्ते झटकन गाडीचे दार उघडून त्यांना गाडीत घेतात. त्यांच्या चेहर्यावर अजूनही प्रश्नचिन्ह असतं .. काका खुलासा करतात .. "अहो मलाही फोन आला होता, काही कार्यकर्ते तुम्हाला न्यायला येतील म्हणून .. तुम्हाला घर शोधायला अडचण येऊ नये म्हणून बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो ..!!"*

    *हाँस्पिटल येते. काका ब्लड डोनेट करतात. त्या जखमी मुलाला ते रक्त दिले जाते. त्याचा जीव वाचतो. कार्यकर्ते परत काकांना घरी सोडायला निघतात. त्यांच्या घराच्या गल्लीत गाडी वळते. लांबूनच काका म्हणतात .. "इथेच सोडा मला. जातो मी पुढे माझा माझा". ती मुले गाडीतून बघत असतात काकांच्या घराकडे. ती म्हणतात ..*

    *"काका, तुमच्या घरापुढे एव्हढी गर्दी कसली दिसतीये ..?? काय झालंय ..?? Anything Serious ..?? आम्ही येऊ का आत ..??"*

    *काका शांत होते. मग उत्तरले ..*

    *"आता सांगायला हरकत नाही. सकाळी तुम्ही आलात तेंव्हा माझ्या एकुलत्या एक मुलाचे निधन झालेले होते. त्याचे पार्थिव घरात आणलेले होते. इतक्यात क्लब मधून रक्ताची गरज असल्याचा फोन आला. माझा रेअर ब्लड ग्रूप आहे. मी एक क्षण विचार केला .. माझा मुलगा आता काही केले तरी परत येणार नाही. पण कुणाच्या तरी मुलाचे प्राण मी वाचवू शकतो. मी निर्णय घेतला. पहिले ब्लड डोनेशन करून यायचे. मग अंत्यसंस्कार ..!! पण तुम्हाला हे समजलं असतं तर तुम्ही मला घेऊन गेला नसता. म्हणून मी घरापर्यंत तुम्हाला येऊच दिलं नाही आणि मीच बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो. पण आता शेवटी ते तुम्हाला समजलंच ..!!"*

    *कार्यकर्ते सुन्न झाले. डोळे फाडून ते काकांच्या पाठमोर्या आक्रुती कडे बघत राहिले. गाडी वळवायचे भान ही त्यांना राहिले नाही. नकळत त्यांचे हात जोडले गेले ..!!*

    🙏🙏 🙏 🙏🙏

    *लेखक माहीत नाही आवडले म्हणून शेअर केले ..!!*

    *राष्ट्रहित सर्वोपरी*

    🚩 🚩 🚩pl salute 1,and shares for inspiration to society

    ReplyDelete
  36. महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष

    एनडीआरएफच्या 26 चमू, हवाईदलाचे 4 हेलिकॉप्टर्स, लष्करही दाखल

    देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा



    मुंबई, 23 जुलै

    कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा केंद्र सरकारशी संपर्कात आहेत. सकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. चिपळूणमध्ये लष्कराची तुकडी सुद्धा मदतकार्यात आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी संपर्क केला, तेव्हा केंद्र सरकारतर्फे कोकण आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात पुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने केल्या जात असलेल्या मदतीची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने राज्य सरकारसोबत संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीआरएफला तत्काळ निर्देश देत अतिरिक्त चमू महाराष्ट्रात पाठविल्या आहेत. रायगडमधील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या आप्तांना 2 लाख रूपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत तातडीने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केली आहे. चिपळूण येथे लष्कराची तुकडी दाखल होऊन मदतकार्य करीत आहे. एनडीआरएफच्या 26 चमू, भारतीय हवाईदलाचे एक सी-17, दोन सी-130 तसेच एक एमआय-17 हेलिकॉप्टर मदतकार्यात तैनात करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या सर्वाधिक 4 चमू रत्नागिरीत, कोल्हापुरात 3, मुंबई, रायगड, ठाण्यात प्रत्येकी 2, तर सातारा, नागपूर, पालघर, सांगली आणि पुण्यात प्रत्येकी 1 चमू तैनात आहे. कोलकाता आणि बडोदा येथून प्रत्येक 4 चमू येत आहेत. एनडीआरएफच्या वतीने तळिये या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले जात आहे, अशी माहिती नित्यानंद राय यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.

    दरम्यान, आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि पिण्याचे पाणी तसेच अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या भागात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, निरंजन डावखरे हे सुद्धा सातत्याने प्रवासात आहेत. त्यांच्याकडून प्रत्यक्ष स्थितीची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली जात आहे. या पाऊस आणि पुरात तसेच भूस्खलनाच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखत प्रशासनाने अधिक गांभीर्याने स्थितीकडे लक्ष द्यावे, अशी विनंती सुद्धा त्यांनी केली. तळिये गावांत मृतदेह बाहेर काढण्याचे काम गावकर्‍यांना करावे लागले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    *******

    ReplyDelete
  37. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील ९ जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित

    ७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

    एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने बचाव कार्यास वेग

    ------

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात दुर्घटनाग्रस्त तळीये गावी

    मुंबई, दि २४: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत असून दुपारी दीडच्या दरम्यान ते दुर्घटनाग्रस्त तळीये गावी पोहचून पाहणी करतील. आज सकाळी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती व मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली.

    बाधित जिल्हे : एकूण ९

    कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे

    एकूण बाधित गावे : ८९०

    एकूण मृत्यू : ७६

    हरविलेल्या व्यक्ती : ५९

    जखमी व्यक्ती : ३८

    पूर्ण नुकसान झालेली घरे: १६

    अंशतः: नुकसान झालेली घरे: ६

    प्राण्यांचे मृत्यू : ७५

    सुरक्षित स्थळी हलविलेल्या व्यक्ती: ९० हजार

    मदत छावण्या : ४

    निवारा केंद्रे : रत्नागिरी ६ ( २ हजार लोक)

    सुविधांचे नुकसान : चिपळूण येथे वशिष्टी नदीवरील पूल खचला





    लष्कर, एनडीआरएफ सहाय्य

    · एनडीआरएफच्या एकूण २५ तुकड्या ;

    (मुंबई २, पालघर १, ठाणे २, रायगड १, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग २, सांगली २, सातारा ३. कोल्हापूर ४, पुणे २ )

    · भुवनेश्वरहून मागविल्या ८ तुकड्या -

    या कोल्हापूर २, सातारा १, सांगली २ इथे तैनात केल्या जातील, तसेच २ तुकड्या पुणे येथे राखीव असतील.

    · तटरक्षक दलाच्या ३ , नौदलाच्या ७, लष्कराच्या ३ तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे

    · एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या

    · बोटी : ५९ ( ४८ एनडीआरएफ आणि ११ एसडीआरएफ)

    ...

    ReplyDelete
  38. आयुष्य - एक प्रवास


    आयुष्य : एक प्रवास

    खरंच आहे ना? आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवासच तर असतो. हा प्रवास सुरु होतो आईच्या गर्भात. एका कोवळया अंकुराप्रमाणे फुलत जातो एक इवलासा जीव, ज्याला सुरवातीला कसलीच जाणीव, संवेदना नसते.
    काही आठवडयांनी या इवल्याश्या जीवाला एक हृदय मिळते आणि मग सुरु होते एक अखंड धडधड.. आईचा श्वास, तिचे विचार, तिच्या शरीराचाच एक अविभाज्य भाग असते हा जीव. त्याला तिच्या गर्भात असतानाच सगळं काही कळत असते, ऐकू येत असते. म्हणूनच तर गर्भसंस्काराला इतकं महत्व आहे. एका नाळेने जोडलेले हे दोन जीव नऊ महिन्यांनी जेव्हा वेगळे होतात तेव्हा सुरु होतो या जीवाचा एक स्वतंत्र प्रवास.

    लहान निरागस बाळ, त्यानंतर शाळेत जाणारे आणि थोडेसे द्वाड झालेले मूल, नंतर कॉलेजला जाणारे बंडखोर टीनएजर , त्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहिलेले तरुण - तरुणी, पस्तिशीच्या उंबरठ्यावर असलेले आणि बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेला तरुणवर्ग , विचारांमध्ये आणि वागणुकीमध्ये आता परिपक्वता आलेल्या व्यक्ती आणि फायनली वृध्दापकाळाकडे झुकलेल्या व्यक्ती असा काहीसा हा प्रवास असतो. या प्रवासात आपल्याला असंख्य व्यक्ती भेटतात. काहींशी आपले अगदी लगेचच ऋणानुबंध जुळतात तर काहींशी वर्षानुवर्षे ओळख असूनही बंध काही जुळून येत नाहीत. आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक सहप्रवाशाबरोबर आपले नीट जमलेच पाहिजे हे तर शक्यच नाही तरी देखील ज्या लोकांबरोबर आपले पटते म्हणजेच wavelength जुळते अशा लोकांच्या सहवासात हा प्रवास सुखाचा होतो.

    हा प्रवास कंटाळवाणा करायचा की प्रत्येक दिवस हसत खेळत व्यतीत करायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. आपला जन्म गरीब, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत कुटुंबात झाला असला तरी आपण त्यापुढील आयुष्यात स्वतःचा कसा सर्वांगीण विकास करतो यावर आपले भविष्य अवलंबून असते.

    काही लोक असतात जे अगदी गरीब घरी जन्म घेऊनही स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने खूप यशस्वी होतात आणि या अगदी विरुद्ध असेही काही असतात जे आपल्या गरिबीला दोष देत बसतात आणि प्रयत्न न करता आधीच हार मानतात. यापैकी कोणाचा जीवन प्रवास ऐकायला आवडेल आपल्याला?

    आई-वडील, बहीण-भाऊ, आयुष्याचा जोडीदार, मित्र-मैत्रिणी, समाज यातली काही नाती आपण जोडलेली तर बरीचशी आपल्याला जन्मत:च देणगी लाभलेली असतात. या नात्यांमध्ये दुरावा येणं, गैरसमज होणं, मतभेद होणं हे अगदीच स्वाभाविक असतं. पण त्यापलीकडे जाऊन काही गोष्टी Let Go करून ते बंध जोपासणे योग्य की मी या अमुक तमुक व्यक्तीचं तोंड उभ्या आयुष्यात बघणार नाही असं ठरवून खरंच तसं करणं योग्य? यापैकी कोण जास्त आनंदी असेल असं वाटते?

    प्रत्येकाला त्यांच्या जीवन प्रवासात विविध व्यक्ती भेटतात. व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणे काही लोकांबरोबर बोलताक्षणीच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो. माझी एक खूप चांगली मैत्रीण पण तिच्या तोंडून फक्त आणि फक्त नकारात्मक गोष्टी मला ऐकायला मिळत. कधी प्रोजेक्ट मध्ये कसा प्रॉब्लेम चालू आहे, मॅनेजर किती खडूस आहे, नवरा कसा निष्काळजी आहे, टीम मेंबर्स कसे politics खेळतात आणि अजूनही बरेच काही. मी विचार केला हिच्या आयुष्यात कधीच काही चांगले का बरं घडत नाहीए??बरं अशा लोकांना जास्त समजावून पण फायदा नसतो कारण त्यांना फक्त त्यांचे कोणीतरी ऐकणारे हवे असते. आपल्याशी मन मोकळे करून जर त्यांना बरे वाटत असेल तर ठीक पण खरं सांगू तर अशा लोकांपासून चार हात लांबच राहावे कारण आपल्यालाच कळत नाही की आपण कसे नकळत त्यांच्या सारखाच विचार करू लागतो. या अगदी विरुद्ध म्हणजे काहींच्या प्रत्येक वाक्यात फक्त आणि फक्त Positive Words असतात. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर Monday morning ला देखील ही लोक कधी उदास आढळणार नाहीत. तुम्ही कसे आहात विचारल्यावर, ' आमच काय चाललंय, As usual' असं न बोलता आपल्याला, ' मी अगदी मजेत, मस्त' अशी उत्तरे मिळतात. आयुष्यात कितीही मोठा प्रॉब्लेम असले तरी देखील यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कधी मावळत नाही. कारण त्यांची विचारशक्ती त्यांना तसं करू देत नाही. यापैकी कोणत्या व्यक्तींबरोबर तुम्हाला प्रवास करायला आवडेल?

    शेवटी असा हा प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास सोबत असलेल्या प्रवाशांबरोबर एक तर कंटाळवाणा होऊ शकतो किंवा खूप इंटरेस्टिंग होऊ शकतो. माझं एक आवडतं गाणं आहे जे मी माझ्या लहानपणी रेडिओ वर नेहमी ऐकायचे. 'जीवन गाणे, गातच जावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे '. या अनमोल आयुष्याची सांगता होताना शेवटच्या क्षणी काहीतरी करायचे राहून गेले, काही लोकांना माफ करायचे राहून गेले, काही बोलायचं राहून गेले, काही स्वप्न अपूर्ण राहिली अजून बरेच काही राहून गेले अशी हुरहूर दाटून न येणे म्हणजेच हा प्रवास सुखकर झाला असं मला वाटते.
    ...... कविता संकेत नाईक

    ReplyDelete
  39. पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे

    सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले प्रशासनाला आदेश



    सातारा दि. 24 (जिमाका) : तारळी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला. या पुराची पाणी गावात शिरल्याने दुकानांची तसेच घरांची मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा. पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

    पाली ता. कराड येथील पूर परिस्थितीची पाहणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. यावेळी ते बोलत होते. यापाहणी प्रसंगी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    पूरामुळे पाली येथील पूलाचे नुकसान झाले आहे. या पुलाची तात्काळ दुरुस्ती करुन पूल वाहतुकीसाठी खुला करावा. गेल्या तीस ते पस्तीस वर्षात पाली येथे झालेला मोठा पाऊस आहे. पाटण तालुक्यातील विरगाव येथे भूस्खलन झालेल्या गावात बचावकार्य कोयनेच्या बॅकवॉटरमधुन सुरु करण्यात आले आहे. तसेच आंबेघर येथे एनडीआरएफची टीम आज सकाळी पोहोचली असून मदतकार्य सुरु केले आहे. कोयनाधरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. त्या गावामध्ये प्रशासनाबरोबर स्वयंसेवी संस्थाही काम करीत असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

    00000

    ReplyDelete

Featured post

Lakshvedhi