महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
असाधारण क्रमांक ६८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिध्द् केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त)
नियम व आदेश
विधी व न्याय विभाग
मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक : २३ फेब्रुवारी, २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था
अधिनियम क्रमांक बीपीटी-१११७/प्र.क्र. ३४/का-१५-महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था
अधिनियम (१९५० चा २९) याच्या कलम ४१ अअ च्या पोट-कलम (४) च्या खंड (ब) द्वारे प्रदान
करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, आणि याबाबतीत काढलेल्या मागील सर्व अधिसूचनांचे
अधिक्रमण करुन, महाराष्ट्र शासन, उक्त अधिनियमांच्या कलम ४२अअ प्रयोजनार्थ, ज्या व्यक्तीचे
एकूण वार्षिक उत्पन्न हे ८५,०००/- (अक्षरी रु. पंच्याऐंशी हजार मात्र) रुपयांपेक्षा
अधिक नसेल, अशी व्यक्ती “निर्धन व्यक्ती” असेल अशी मर्यादा याद्वारे विनिर्दिष्ट करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व
नावाने,
नि.ज. जमादार
शासनाचे प्रधान
सचिव व विधी परामर्शी
No comments:
Post a Comment