ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी गावकरी घेणार पुढाकार
चंद्रपूरच्या इको-प्रोची महाराष्ट्र परिक्रमा पारोळ्यात
जळगाव : पारोळा किल्ला म्हणजे झाशीच्या राणीचे माहेऱ पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे किल्ला सुस्थितीत असलातरी या भुईकोटला बाहेरच्या बाजूने अतिक्रमणाचा विळखा आहे़ येथील एका भव्य बुरुजाच्या आतील भाग झाडामुळे ढासळला आहे. सध्या या तलावाच्या काठावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही. आतील भागात बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसतात़ ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी गावक-यांनी पुढाकार घेण्याची ग्वाही इको-प्रोला दिली. ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रभर परिक्रमा करीत असलेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि़ ७) जळगाव जिल्ह्यातील पारोळा भेट दिली. गावाच्या प्रारंभी झाशीची राणी लक्ष्मीबाई व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. येथून जवळच विचखेडे नावाचे छोटेसे शहर आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. हा किल्ला १७२७ मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. किल्ल्याभोवती चारही बाजूला खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव बांधला आहे. पावणेतीन शतके उलटूनही या तलावाची स्थिती चांगली आहे. सपाट मैदानावर बांधलेल्या या भुईकोट किल्ल्याची लांबी ५२५ फूट; तर रुंदी ४३५ फूट आहे. वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. पारोळा शहरालाही चारही बाजूंनी तटबंदी आहे. एकूण सात दरवाजे असून, दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, अमळनेर दरवाजा, पीर दरवाजा अशी अन्य प्रवेशद्वारांची नावे आहेत. जवळपास तीनशे वर्षांपूर्वी किल्ल्याची उभारणी करताना पारोळा गावाची निर्मिती झाल्याची नोंद इतिहासात आहे. या परिसरात त्या काळात पेंढाºयांची जवळपास ५० घरे होती. त्यांची ओळख म्हणून आजही या गावातील एका भागाची ओळख 'पेंढारपुरा' म्हणून आहे. सध्या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे खंदकावरून जाणाºया मार्गावरील मुख्य दरवाजा नवीन बसविण्यात आला आहे. किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा मजबूत भाग आहे. त्याला बालेकिल्ला असे म्हणतात बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे.
किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून आठ किलोमीटर दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगितले जाते. हे भुयार घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे आहे. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते; परंतु त्याबद्दल अधिकृत अशी माहिती मिळत नाही. राणीच्या माहेरचे वंशच म्हणजेच तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात. स्थानिकांनी केलेल्या अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले आहे. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमातून किल्ल्याची जपणूक व सौंदर्यात भर टाकण्यासाठी निधी मिळविण्यात आला आहे. त्या माध्यमातून या परिसरात जॉगिंग ट्रॅक, बगिचा आणि नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान विदर्भातून मराठवाडा मार्गे खान्देशात आलेल्या इको-प्रोच्या टीमने जळगाव भेटीनंतर मंगळवारी सकाळी पारोळा गावाला भेट दिली. अध्यक्ष बंडू धोतरे यांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेऊन किल्ल्याची पाहणी केली. लोकसहभागातून अधिक चांगल्या पध्दतीने स्वच्छता कशी करता येईल, यावर मार्गदर्शन केले. चंद्रपूर येथील गोंडकालीन किल्ला सफाईच्या सलग ७०० दिवसांच्या उपक्रमाची माहिती दिली. ध्वनीचित्रफित बघून प्रेरीत झालेल्या स्थानिक नागरिकांनी या ऐतिहासिक किल्ल्याची निगा राखण्यासाठी सहभाग देण्यासाठी होकार दिला.
जळगाव : पारोळा किल्ला म्हणजे झाशीच्या राणीचे माहेऱ पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे किल्ला सुस्थितीत असलातरी या भुईकोटला बाहेरच्या बाजूने अतिक्रमणाचा विळखा आहे़ येथील एका भव्य बुरुजाच्या आतील भाग झाडामुळे ढासळला आहे. सध्या या तलावाच्या काठावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही. आतील भागात बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसतात़ ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी गावक-यांनी पुढाकार घेण्याची ग्वाही इको-प्रोला दिली. ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रभर परिक्रमा करीत असलेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि़ ७) जळगाव जिल्ह्यातील पारोळा भेट दिली. गावाच्या प्रारंभी झाशीची राणी लक्ष्मीबाई व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. येथून जवळच विचखेडे नावाचे छोटेसे शहर आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. हा किल्ला १७२७ मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. किल्ल्याभोवती चारही बाजूला खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव बांधला आहे. पावणेतीन शतके उलटूनही या तलावाची स्थिती चांगली आहे. सपाट मैदानावर बांधलेल्या या भुईकोट किल्ल्याची लांबी ५२५ फूट; तर रुंदी ४३५ फूट आहे. वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. पारोळा शहरालाही चारही बाजूंनी तटबंदी आहे. एकूण सात दरवाजे असून, दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, अमळनेर दरवाजा, पीर दरवाजा अशी अन्य प्रवेशद्वारांची नावे आहेत. जवळपास तीनशे वर्षांपूर्वी किल्ल्याची उभारणी करताना पारोळा गावाची निर्मिती झाल्याची नोंद इतिहासात आहे. या परिसरात त्या काळात पेंढाºयांची जवळपास ५० घरे होती. त्यांची ओळख म्हणून आजही या गावातील एका भागाची ओळख 'पेंढारपुरा' म्हणून आहे. सध्या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे खंदकावरून जाणाºया मार्गावरील मुख्य दरवाजा नवीन बसविण्यात आला आहे. किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा मजबूत भाग आहे. त्याला बालेकिल्ला असे म्हणतात बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे.
किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून आठ किलोमीटर दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगितले जाते. हे भुयार घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे आहे. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते; परंतु त्याबद्दल अधिकृत अशी माहिती मिळत नाही. राणीच्या माहेरचे वंशच म्हणजेच तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात. स्थानिकांनी केलेल्या अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले आहे. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमातून किल्ल्याची जपणूक व सौंदर्यात भर टाकण्यासाठी निधी मिळविण्यात आला आहे. त्या माध्यमातून या परिसरात जॉगिंग ट्रॅक, बगिचा आणि नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान विदर्भातून मराठवाडा मार्गे खान्देशात आलेल्या इको-प्रोच्या टीमने जळगाव भेटीनंतर मंगळवारी सकाळी पारोळा गावाला भेट दिली. अध्यक्ष बंडू धोतरे यांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेऊन किल्ल्याची पाहणी केली. लोकसहभागातून अधिक चांगल्या पध्दतीने स्वच्छता कशी करता येईल, यावर मार्गदर्शन केले. चंद्रपूर येथील गोंडकालीन किल्ला सफाईच्या सलग ७०० दिवसांच्या उपक्रमाची माहिती दिली. ध्वनीचित्रफित बघून प्रेरीत झालेल्या स्थानिक नागरिकांनी या ऐतिहासिक किल्ल्याची निगा राखण्यासाठी सहभाग देण्यासाठी होकार दिला.
------------------------------------------
ReplyDelete*श्री गजानन महाराजांचे शेगाव*
----------------------------------------
*जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच एक. शेगाव येथे त्यांचे समाधी मंदिर आहे.*
श्री गजानन महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची नित्याचीच दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचेच नामस्मरण, भजन असायचे.
भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत.
*महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात.*
*कसे पोहचाल?*
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे.
स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे 172 बस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बस चालतात.
*महाराजांचे मंदिर*
श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध स्थित आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री 9.30 पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात.
*प्रमुख उत्सव*
श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस (फेब्रुवारी महिन्यात) तसेच त्यांची पुण्यतिथी (ऋषी पंचमीला) हे येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळी येथे रोषणाई केली जाते. श्रींची हत्ती, घोडा, रथ पालकी, दिंडी इत्यादींसोबत मिरवणूक निघते.
*राहण्यासाठी व्यवस्था*
भाविकांच्या सुविधेसाठी भव्य 'भक्त निवास' मंदिर परिसरातच बांधले आहे. त्याठिकाणी अगदी स्वस्तात खोल्या मिळतात. भाविक पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस या खोल्यांमध्ये राहू शकत नाहीत. त्या ठिकाणी भोजन कक्षेचीही व्यवस्था आहे. सकाळी अकरा ते एक पर्यंत महाराजांचा प्रसाद दिला जातो. रोज येथे जवळपास पाच हजारांवर लोक जेवण करतात. या मंदिरात दररोज वीस हजार भाविक दर्शनासाठी येतात.
*अन्य आकर्षण*
शहराच्या झगमगाटापासून लांब असलेल्या शेगावात साधे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाच्या सहजतेची झलक पाहावयास मिळते. आध्यात्मिक शांतीच्या शोधात असणार्या भाविकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. मंदिराच्या परिसरातच धार्मिक वाचनालय असून भाविकांसाठी सतत खुले असते. जवळच 'गजानन वाटिका' नावाचे सुंदर उद्यान आणि एक प्राणी संग्रहालय देखील आहे.
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
-----------------------------------------------
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबोली क्षेत्रात
ReplyDeleteशिस्टुरा हिरण्यकेशी जैविक विविधता स्थळ घोषित
मुंबई, दि 1 : सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये "शिस्टुरा हिरण्यकेशी" (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसुचना महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली.
यापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. आता शिस्टुरा हिरण्यकेशीची यात भर पडली आहे.
शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते.
या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे या क्षेत्रात गवे, हरीण, बिबट, अस्वल, शेकरू, माकड, वानर, मुंगूस, साळींदर, खवले मांजर, भेकर आदी वन्यजीव आढळून येतात. तसेच साग, आंबा, किंजळ, ऐन, जांभा, उंबर, जांभूळ, अंजन, फणस अशा वृक्षप्रजाती, झाडे, झुडपे आणि वेलींचेही याभागात अस्तित्त्व आहे.
शिस्टुरा हिरण्यकेशी ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन होण्याच्यादृष्टीने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे
वन्यजीव संशोधकांनी ॲक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेषकरून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशाप्रकारे हेरिटेजचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी केला. या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावे अशी ग्रामस्थांचीही मागणी होती.
केदारनाथ मंदिर*
ReplyDelete*एक न उलगडलेल कोडं !*
*(जरा विचार करा)*
केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.
केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.
ह्या क्षेत्रात फक्त *मंदाकिनी नदीच* राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल.
*केदारनाथ मंदिर* ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं ? त्याशिवाय १००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहील असेल ? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या *Ice Age* कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची शहानिशा करण्यासाठी *वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलोजी डेहराडून* ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर *लिग्नोम्याटीक डेटिंग* हि टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे *दगडांच आयुष्य* ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये अस स्पष्ट दिसून आलं कि साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होत. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही.
Continue. सन २०१३ मध्ये केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे *सरासरी पेक्षा ३७५% जास्त* पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल *५७४८ लोकांचा जीव गेला* (सरकारी आकडे). *४२०० गावाचं नुकसान* झालं. तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायूसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष.
ReplyDelete*अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया* यांच्या मते ह्या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडीट मध्ये १०० पेकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. *IIT मद्रास* ने मंदिरावर *NDT टेस्टिंग* करुन बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे. दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय *शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक* पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही तर *सर्वोत्तम* असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात ? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळं वाहून जाते, एकही वास्तू उभी रहात नाही. तिकडे हे मंदिर दिमाखात उभ आहे आणि नुसतं उभं नाही तर अगदी मजबुत आहे. ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधल गेलं आहे. ज्या जागेची निवड केली गेली आहे. ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं असं आजच विज्ञान सांगतं आहे.
हे मंदिर उभारताना *उत्तर–दक्षिण* असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिर ही *पूर्व–पश्चिम* अशी असताना केदारनाथ *दक्षिणोत्तर* बांधलं गेलं आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर *पूर्व-पश्चिम* असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालचं असतं. पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. अन् विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही मग फक्त कल्पना करा की ते दगड तीथंपर्यंत वाहून नेलाच कसा असेल ? एवढे मोठे दगड वाहून न्यायला (ट्रांसपोर्ट करायला) त्याकाळी एवढी साधनंसुद्धा उपलब्ध नव्हती. या दगडाची विशेषता अशी आहे कि वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या *प्रोपर्टीजमध्ये* फरक झालेला नाही. त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता *एशलर* पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड विटा घळई मधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सर्व काही आपल्यासोबत वाहून नेलं पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले. ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने एअरलिफ्ट केलं होतं.
श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणार मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही. *Titanic जहाज* बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना *NDT टेस्टिंग* आणि *तपमान* कसं सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याच ज्वलंत उदाहरणं नाही का ? काही महिने पावसात, काही महिने बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस ह्यांना पुरुन उरत समुद्रसपाटी पासून ३९६९ फूट वर *८५ फूट उंच, १८७ फूट लांब, ८० फूट रुंद* मंदिर उभारताना त्याला तब्बल *१२ फूटाची जाड भिंत आणि ६ फूटाच्या उंच प्लॅटफोर्मची मजबूती* देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तिमित होतोय.
आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने *१२ ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचीवरच* असा मान मिळवणार केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण *नतमस्तक* 🙏 होतो.
प्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज
ReplyDeleteकर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि कोरोना प्रतिबंधात्मक
उपाययोजनांचे ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई, दि. 30 : सध्याच्या साथीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर आता सध्याच्या प्रतिबंधात्मक कालावधीत एमटीडीसीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या संकल्पनेतून आणि उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या नियोजनानुसार ही प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली आहेत. महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी ही माहिती दिली.
एमटीडीसी आणि पुणे येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणे होत आहेत. या कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत फ्रंट ऑफीस मॅनेजमेंट ( Front Office Management,) हाऊस किपींग (House Keeping) आणि फुड ॲण्ड बेवरेजेस (Food and Beverages) याबाबतचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाअंतर्गत ॲटीट्युड बेस ट्रेनिंग (Attitude based Training) आणि पँडामिक बेस्ड ट्रेनिंग (Pandamic Based Training) सह प्रात्यक्षिकही घेण्यात येत आहे.
पर्यटकांना आनंदी ठेवणे, उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणे, स्वत:ची स्वच्छता आणि परिसराची साफसफाई, खोल्यांचे निर्जंतुकीकरण, पर्यटकांच्या आरोग्याची सर्वोच्च काळजी घेणे याचा समावेश प्रशिक्षणामध्ये करण्यात आला आहे. प्रशिक्षण दोन आठवड्याचे असून विषयातील तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. 500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
दरम्यान, सध्या पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिसॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पर्यटक निवासात पर्यटकांना आयुर्वेदीक काढा, व्हिटॅमिन सी आणि डी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी मुखपट्टी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाविरोधातील लढाईचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.
'वर्क फ्रॉम नेचर'अंतर्गत सुविधा उपलब्ध
“वर्क फ्रॉम नेचर” संकल्पनेंतर्गत एमटीडीसीने आता राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखाद्या पर्यटकाने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येत आहे. “वर्क फ्रॉम नेचर” बरोबरच योगा आणि मेडीटेशन अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे सुरु करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा सुरु होईल. अधिक माहीतीसाठी महामंडळाच्या www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
गौरवशाली ऐतिहासिक अशा शिराळा तालुक्यातील भूईकोट किल्ल्याच्या
ReplyDeleteविकासाचा संकल्प
- मंत्री जयंत पाटील
मुंबई, दि.3:- स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भूईकोट किल्ल्याच्या विकासाचा संकल्प केला असून त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सांगितले.
शिराळा तालुक्यातील भूईकोट किल्ल्याच्या विकासासंदर्भात आज मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली खा. अमोल कोल्हे समवेत बैठक संपन्न झाली.
या वेळी मंत्री जयंत पाटील म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर, महाराजांची सुटका करण्यासाठी याच किल्ल्यावर प्रयत्न झाला होता. हे या किल्ल्याचे महत्त्व आहे. शंभूराजांच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी व्हावी. या करिता किल्ल्याचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे.
किल्ल्याबाबत खा. अमोल कोल्हे यांनीही महत्त्वपूर्ण सुचना केल्या.
या वेळी जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे, महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती देणारे, शिवसंस्कार सृष्टी स्मारक बनवण्याची खा. डॉ. अमोल कोल्हे व आ. अतुल बेनके यांची संकल्पना आहे. याबाबतीतही यावेळी चर्चा करण्यात आली.
या वेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, आ. मानसिंगराव नाईक, आ. अतुल बेनके आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ताडोबा राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांच्या संवर्धनाबाबत
ReplyDeleteपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई, दि. 7 : ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्य प्राण्यांकरीता कोअर क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी संबंधित चंद्रपूर आणि शिंदेवाही तालुक्यातील नऊ गावांच्या पुनर्वसनासाठीच्या उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आज मंत्रालयात ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील कोअर क्षेत्र वाढविण्यासंदर्भातील आणि आरे वन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (कांदळवन) वीरेंद्र तिवारी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे वन संरक्षक मल्लिकार्जुन, कांदळवनचे उपवनसंरक्षक निनु सोमराज आदी उपस्थित होते. तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक श्री जितेंद्र रामगावकर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, वन्यप्राण्यांच्या संचारासाठी ताडोबा वनक्षेत्रात कोअर क्षेत्र वाढविणे गरजेचे असून, त्यासाठी चंद्रपुर तसेच सिंदेवाही तालुक्यातील नऊ गावांची जमीन संपादित करणे गरजेचे आहे. संबंधित गावातील निवासीयांचे पुनर्वसन आणि सर्व मुलभुत सुविधा यांचा आढावा घेऊन याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, आरे वनक्षेत्र संदर्भात कलम (4) घोषीत करण्यात आलेले क्षेत्र दुग्ध विकास विभाग यांच्याकडून ताब्यात घेण्यात यावे. याचबरोबर भुमी अभिलेख विभागाकडून या क्षेत्राचे पुढील दीड महिन्यात सिमांकन करण्यात यावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
०००
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांनी
ReplyDeleteमुख्यमंत्री संकल्प कक्षास सूचना पाठविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
· किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून टप्प्याटप्प्याने संवर्धन
मुंबई दि 13: राज्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज राज्यातील 250 दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचना ऐकल्या. या बैठकीचे संचालन आदेश बांदेकर, मिलिंद गुणाजी यांनी केले तर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीश टकले या प्रसिद्ध गिर्यारोहक व दूर्गप्रेमींनी आपले विचार सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मांडले.
ईमेलवर सूचना पाठवा
दूर्गप्रेमीना दूर्ग संवर्धनाच्या दृष्टीने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी त्या cmsankalpkaksha@maharashtra.gov.in या मुख्यमंत्री सचिवालयाच्या संकल्प कक्षाला पाठविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ते म्हणाले की, दूर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडीअडचणींचा पाढा वाचत होतो पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ते या क्षेत्रातील तज्ञ मंडळीनी एकत्र बसून ठरवावे व किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा, राज्य शासन यामध्ये पूर्ण सहकार्य करेल.
गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपा
गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी परत एकदा स्पष्ट केले.गड किल्याचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचा आपला विचार असून हळूहळू यात इतर किल्ल्यांचाही समावेश करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड या किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन असून दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वांच्या सूचनांचा विचाराने आराखडा तयार करायला लागा असेही मुख्यमंत्री म्हणाले. गडकिल्ल्यांचे संवर्धन करणार म्हणजे नक्की काय करणार आणि त्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून ते कसे करायचे त्याचा पहिले सविस्तर विचार करा. जगभरात शिवरायांच्या या गडकिल्ल्यांची महती पोहचेल यासाठी उत्तमोत्तम आणि दर्जेदार छायाचित्रे, ड्रोनसारख्या साधनांचा उपयोग करून केलेल्या व्हिडीओ क्लिप्स विविध माध्यमांतून जगभर पोहचेल असे पाहिले पाहिजे. गड किल्यांच्या पायथ्याशी परिसरात त्या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती देणारे केंद्र किंवा संग्रहालय उभारणे, केंद्र व राज्याकडील किल्ल्यांची वर्गवारीनुसार संवर्धनाचे नियोजन करणे, किल्ल्यांच्या परिसरातील जैवविविधता, निसर्ग, प्राणी- पक्षी यांची देखील जपणूक तितकीच महत्वाची असून त्याविषयीही पर्यटक आणि संशोधक यांना आकर्षक स्वरूपात उपयुक्त माहिती मिळणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.
यावेळी दूर्गप्रेमींनी आपल्या सूचना मांडतांना दुर्गांचे राज्य सरकारने अधिग्रहण करावे, पर्यटन, पुरातत्व, वन विभाग यांच्यात अधिक समन्वय असावा, दुर्ग संवर्धन विभाग सुरु करावे, दुर्गांसाठी सहाय्यता निधी सुरु करावा अशा अनेक सूचना केल्या
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींचीहि उपस्थिती होती.
अवर्गीकृत किल्ल्यांच्या पर्यटन योजनेबाबत
ReplyDeleteसूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. २४ : राज्यातील अवर्गीकृत किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच पर्यटकांना अनुभवजन्य पर्यटन करुन देण्यासाठी किल्ले पर्यटन योजना आखण्यात आली आहे. या योजनेबाबत लोकांनी सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.
योजनेचा मसुदा पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासंदर्भातील सूचना व हरकती diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर ८ जुलै २०२१ पर्यंत पाठविण्यात याव्यात.
राज्यात ४०० पेक्षा अधिक किल्ले आहेत. यापैकी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत ४७ तर राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत ५१ किल्ले असून हे वर्गीकृत किल्ले आहेत. याशिवाय ३३७ अवर्गीकृत किल्ले आहेत. हे अवर्गीकृत किल्ले महसुल व वन विभागाच्या अखत्यारीत किंवा खाजगी मालकीचे आहेत. यापैकी खाजगी मालकीचे किल्ले वगळून उर्वरित अवर्गीकृत (महसुल व वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या) किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच पर्यटकांना अनुभवजन्य पर्यटन उपलब्ध करुन देण्यासाठी किल्ले पर्यटन योजना आखण्यात आली आहे. या योजनेत किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाची कामे प्रस्तावित नाहीत.
या योजनेतून किल्ल्यावर तसेच परिसरात देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, अनुभवजन्य पर्यटन, किल्ले पर्यटन योजनेची अंमलबजावणी यंत्रणा, योजनेचे प्रचलन, प्रचलनासाठी निवड होणाऱ्या संस्थेची कामे, निधी उपलब्धता, प्रचलनासाठी आर्थिक स्त्रोत, योजना राबविण्यासाठी किल्ल्यांची निवड करण्याकरीता समित्या, समित्यांच्या कार्यकक्षा आदी इत्यंभूत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात लोकांनी, या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आदींनी सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन संचालक डॉ.सावळकर यांनी केले आहे.
००००
भारताचे प्रगत नौकानयन शास्त्र*
ReplyDelete- प्रशांत पोळ
जगप्रसिध्द पर्यटन स्थळ असलेल्या बँकॉक च्या प्रशस्त विमानतळाचे नाव आहे – सुवर्णभूमि विमानतळ. या विमानतळात प्रवेश केल्यावर सर्व प्रवाश्यांचे लक्ष आकृष्ट करते ती एक भली मोठी कलाकृती – आपल्या पुराणात वर्णन केलेल्या समुद्रमंथनाची..! या कलाकृती भोवती फोटो आणि सेल्फी घेणाऱ्यांची एकाच झुंबड उडालेली असते.
याच सुवर्णभूमि विमानतळावर, थोडं पुढं गेलं की एक भला मोठा नकाशा लावलेला आहे. साधारण हजार, दीड हजार वर्षांपूर्वीचा हा नकाशा आहे. ‘पेशावर’ पासून तर ‘पापुआ न्यू गिनी’ पर्यंत पसरलेल्या ह्या नकाशाच्या मध्यभागी ठसठशीत अक्षरात लिहिलंय – इंडिया ! आणि याचं नकाशात सयाम (थायलंड) ला ठळक स्वरूपात दाखवलंय. अर्थात हा नकाशा उच्च स्वरात सांगतोय – *‘अरे, कोणे एके काळी ह्या विशाल पसरलेल्या भारतीय संस्कृतीचा सयाम (थायलंड) हा एक हिस्सा होता आणि आम्हाला त्याचा प्रचंड अभिमान आहे !!’*
जवळ जवळ साऱ्याच दक्षिण पूर्व आशिया मधे ही भावना आढळते. आपल्या राष्ट्रध्वजात हिंदू मंदिराचे चिन्ह अभिमानाने बाळगणारा कंबोडिया तर आहेच. पण गंमत म्हणजे या भागातला एकमात्र इस्लामी देश आहे – ब्रुनेइ दारुस्सलाम. ह्या देशाच्या राजधानीचं नाव आहे – बंदर सेरी भगवान. हे नाव ‘बंदर श्री भगवान’ ह्या संस्कृत नावाचा अपभ्रंश आहे. पण इस्लामी राष्ट्राच्या राजधानीच्या नावात ‘श्री भगवान’ येणं हे त्यांना खटकत तर नाहीच, उलट त्याचा अभिमान वाटतो.
जावा, सुमात्रा, मलय, सिंहपुर, सयाम, यव व्दिप इत्यादी सर्व भाग, जे आज इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापुर, थायलंड, कंबोडिया, विएतनाम वगैरे म्हणवले जातात, त्या सर्व देशांवर हिंदू संस्कृती ची जबरदस्त छाप आज ही दिसते. दोन, अडीच हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतातले हिंदू राजे ह्या प्रदेशात गेले. त्यांनी फारसे कुठे युध्द केल्याचे पुरावे सापडत नाहीत. उलट शांततापूर्ण मार्गांनी, पण समृध्द अश्या संस्कृती च्या जोरावर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया हा हिंदू विचारांना मानू लागला.
आता इतक्या मोठ्या प्रमाणावर जर हिंदू राजे, त्यांचे सैनिक, सामान्य नागरिक दक्षिण-पूर्व आशियात गेले असतील तर ते कसे गेले असतील..? अर्थातच समुद्री मार्गाने. म्हणजेच त्या काळात भारतामधे नौकानयन शास्त्र अत्यंत प्रगत अवस्थेत असेल. त्या काळातील भारतीय नौकांची आणि नावाड्यांची अनेक चित्र शिल्प कंबोडिया, जावा, सुमात्रा, बाली मधे मिळतात. पाचशे पेक्षा जास्त लोकांना घेऊन जाणाऱ्या नौका त्या काळात भारतात तयार व्हायच्या.
एकूण समुद्र प्रवासाची स्थिती बघता, त्या काळात भारतीयांजवळ बऱ्यापैकी चांगले दिशाज्ञान आणि समुद्री वातावरणाचा अंदाज असला पाहिजे. अन्यथा त्या खवळलेल्या समुद्रातून, आजच्या सारखा हवामानाचा अंदाज आणि दळणवळणाची साधनं नसतानाही इतका दूरचा पल्ला गाठायचा, त्या देशांशी संबंध ठेवायचे, व्यापार करायचा, भारताचे ‘एक्स्टेन्शन’ असल्यासारखा संपर्क ठेवायचा.... म्हणजेच भारतीयांचं नौकानयन शास्त्र अत्यंत प्रगत असलंच पाहिजे.
१९५५ आणि १९६१ मधे गुजराथ च्या ‘लोथल’ मधे पुरातत्व खात्याव्दारे उत्खनन करण्यात आले. लोथल अगदी समुद्र किनाऱ्यावर वसलेलं नाही. तर समुद्राची एक चिंचोळी पट्टी लोथल पर्यंत आलेली आहे. मात्र उत्खननात हे दिसले की सुमारे साडे तीन हजार वर्षांपूर्वी लोथल हे अत्यंत वैभवशाली बंदर होते. तेथे अत्यंत प्रगत आणि नीट-नेटकी नगर रचना वसलेली आढळली. पण सर्वात महत्वाचे म्हणजे लोथल मधे जहाज बांधणीचा कारखाना होता, असे अवशेष सापडले. लोथल हून अरब देशांमधे, इजिप्त मधे मोठ्या प्रमाणावर व्यापार चालायचा याचे पुरावे मिळाले.
ReplyDeleteसाधारण १९५५ पर्यंत लोथल किंवा पश्चिम भारतातील नौकानयन शास्त्राबद्दल फारसे पुरावे आपल्याजवळ नव्हते. लोथल च्या उत्खननाने या ज्ञानाची कवाडं उघडल्या गेली. पण यावरून असं जाणवलं की अगदी समुद्र किनाऱ्यावर नसणारं लोथल जर इतकं समृध्द असेल आणि तिथे नौकानयना च्या बाबतीत इतक्या गोष्टी घडत असतील तर गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील बंदरांमधे या ही पेक्षा सरस आणि समृध्द संरचना असेल.
आज ज्याला आपण नालासोपारा म्हणतो, तिथे हजार / दीड हजार वर्षांपूर्वी पर्यंत ‘शुर्पारक’ नावाचे वैभवशाली बंदर होते. तिथे भारताच्या जहाजांबरोबर अनेक देशांची जहाजं व्यापारासाठी यायची. तसंच दाभोळ, तसंच सुरत.
पुढे विजयनगर साम्राज्य स्थापन झाल्यावर त्या राज्याने दक्षिणेतील अनेक बंदरं परत वैभवशाली अवस्थेत उभी केली आणि पूर्व व पश्चिम अश्या दोन्ही दिशांमध्ये व्यापार सुरु केला.
मेक्सिको च्या उत्तर पश्चिम टोकाला, म्हणजेच ‘दक्षिण अमेरिकेच्या’ उत्तर टोकाला जिथे समुद्र मिळतो, तिथे मेक्सिको चा युकाटान प्रांत आहे. या प्रांतात त्यांच्या पुरातन ‘माया’ संस्कृतीचे अनेक अवशेष आजही मोठ्या प्रमाणावर जपून ठेवलेले आहेत. याच युकाटान प्रांतात जवाकेतू नावाच्या जागी एक अति प्राचीन सूर्य मंदिर अवशेषांच्या रुपात आजही उभे आहे. *या सूर्य मंदिरात एक संस्कृत चा शिलालेख सापडला, ज्यात शक संवत ८८५ मधे ‘भारतीय महानाविक’ वूसुलीन येऊन गेल्याची नोंद आहे..!*
रॉबर्ट बेरोन वोन हेन गेल्डर्न (१८८५ – १९६८) या लांबलचक नावाचा नामांकित ऑस्ट्रियन एंथ्रोपोलोजिस्ट होऊन गेला. हा विएन्ना विद्यापीठात शिकला. पुढे १९१० मधे भारत आणि ब्रम्ह्देशाच्या दौऱ्यावर आला. भारतीयांच्या प्रगत ज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल वाटले म्हणून त्याने अभ्यास सुरु केला. त्याने दक्षिण-पूर्व देशांबद्दल प्रचंड संशोधन केले. आणि त्याच्या पूर्ण अभ्यासाअंती त्याने ठामपणे असे मांडले की भारतीय जहाजे, कोलंबस च्या कितीतरी आधी मेक्सिको आणि पेरू मधे जात होती!
भारतीय नौकांचा प्रवास विश्वव्यापी होत होता, याचा यापेक्षा दुसरा कुठला स्पष्ट पुरावा हवा आहे..? आणि तरीही आम्ही म्हणत राहणार की अमेरिकेला कोलंबस ने शोधलं आणि भारताचा ‘शोध’ (!) वास्को-डी-गामा ने लावला !!
मुळात वास्को-डी-गामा हाच भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सह-सरकार्यवाह श्री सुरेश सोनी यांनी डॉ. वाकणकरांचा संदर्भ देत याचं फार छान वर्णन केलं आहे. डॉ. हरिभाऊ (विष्णु श्रीधर) वाकणकर हे उज्जैन चे प्रसिध्द पुरातत्ववेत्ता. भारतातील सर्वात प्राचीन वसाहतीचा पुरावा म्हणून ज्या ‘भीमबेटका’ गुहांचा उल्लेख होतो, त्या डॉ. वाकणकरांनीच शोधून काढलेल्या आहेत. डॉ. वाकणकर त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात इंग्लंड ला गेले होते. तिथे एका संग्रहालयात त्यांना वास्को-डी-गामा ची दैनंदिनी ठेवलेली दिसली. ती त्यांनी बघितली आणि त्याचा अनुवाद वाचला. त्यात वास्को-डी-गामा ने तो भारतात कसा पोहोचला याचे वर्णन केले आहे.
Continue.See समजल्या जातो. इटलीच्या ह्या व्यापाऱ्याने भारत मार्गे चीन पर्यंत प्रवास केला होता. हा तेराव्या शतकात भारतात आला. मार्को पोलो ने त्याच्या प्रवासातील अनुभवांवर एक पुस्तक लिहिलंय – ‘मार्व्हल्स ऑफ द वर्ल्ड’. याचा अनुवाद इंग्रजी मधे ही उपलब्ध आहे. या पुस्तकात त्याने भारतीय जहाजांचं सुरेख वर्णन केलेलं आहे. *त्यानं लिहिलंय की भारतात विशाल जहाजं तयार होतात. लाकडांचे दोन थर जोडून त्याला लोखंडी खिळ्यांनी पक्के केले जाते. आणि नंतर त्या सर्व लहान मोठ्या छिद्रांमधून विशेष पध्दतीचा डिंक टाकला जातो, ज्यामुळे पाण्याचा प्रवेश पूर्णपणे निषिध्द होतो.*
ReplyDeleteमार्को पोलो ने भारतात तीनशे नावाड्यांची जहाजं बघितली होती. त्यानं लिहिलंय, एका एका जहाजात तीन ते चार हजार पोती सामान मावतं आणि त्याच्या वर राहण्याच्या खोल्या असतात. खालच्या लाकडाचा तळ खराब होऊ लागला की त्याच्यावर दुसऱ्या लाकडाचा थर लावल्या जातो. जहाजांचा वेग चांगला असतो. इराण पासून कोचीन पर्यंत चा प्रवास भारतीय जहाजांमधून आठ दिवसात होतो.
पुढे निकोली कांटी हा दर्यावर्दी पंधराव्या शतकात भारतात आला. याने भारतीय जहाजांच्या भव्यतेबद्द्ल बरंच लिहिलंय. डॉ. राधा कुमुद मुखर्जी यांनी आपल्या ‘इंडियन शिपिंग’ या पुस्तकात भारतीय जहाजांचं सप्रमाण सविस्तर वर्णन केलंय.
पण हे झालं खूप नंतरचं. म्हणजे भारतावर इस्लामी आक्रमण सुरु झाल्या नंतरचं. याच काळात युरोपातही साहसी दर्यावर्दींचं पेव फुटलं होतं. युरोपियन खलाशी आणि व्यापारी जग जिंकायला निघालेले होते. अजून अमेरिकेची वसाहत व्हायची होती. हाच कालखंड युरोपातील रेनेसॉं चा आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या इतिहास लेखनामधे, विकीपेडिया सारख्या माध्यमांमध्ये युरोपियन नौकानयन शास्त्राबद्दलंच भरभरून लिहिलं जातं. पण त्याच्या ही दीड, दोन हजार वर्षांपुर्वीचे भारतीय नौकानयनाच्या प्रगतीचे पुरावे मिळाले आहेत.
आपल्याकडे उत्तरेत इस्लामी आक्रमण सुरु होण्याच्या काळात, म्हणजे अकराव्या शतकात, माळव्याचा राजा भोज याने ज्ञान-विज्ञाना संबंधी अनेक ग्रंथ लिहिली किंवा लिहून घेतली. त्यातील एक महत्वाचा ग्रंथ आहे – ‘युक्ती कल्पतरू’. हा ग्रंथ जहाज बांधणीच्या संदर्भातला आहे. जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी लहान – मोठी, वेगवेगळ्या क्षमतेची जहाजं कशी बनवली जावीत याचं सविस्तर वर्णन ह्या ग्रंथात आहे. जहाज बांधणीच्या बाबतीत हा ग्रंथ प्रमाण मानल्या जातो. वेगवेगळ्या जहाजांसाठी वेगवेगळे लाकूड कसं निवडावं या पासून तर विशिष्ट क्षमतेचं जहाज, त्याची डोलकाठी यांचं निर्माण कसं करावं ह्याचं गणितही ह्या ग्रंथात मिळतं.
पण ह्या ग्रंथाच्या पूर्वीही, हजार – दोन हजार वर्ष तरी, भारतीय जहाजं जगभर संचार करीत होतीच. म्हणजे हा ‘युक्ती कल्पतरू’ ग्रंथ, नवीन कांही शोधून काढत नाही, तर आधीच्या ज्ञानाला ‘लेखबध्द’ करतोय. *कारण भारतीयांजवळ नौका शास्त्राचं ज्ञान फार पुरातन काळापासून होतं.*
चंद्रगुप्त मौर्य च्या काळात भारताची जहाजं जगप्रसिध्द होती. ह्या जहाजांद्वारे जगभर भारताचा व्यापार चालायचा. या संबंधी ची ताम्रपत्र आणि शिलालेख मिळालेले आहेत. बौध्द प्रभावाच्या काळात, बंगाल मधे सिंहबाहू राजाच्या शासन काळात सातशे यात्रेकरू श्रीलंकेला एकाच जहाजाने गेल्याचा उल्लेख आढळतो. कुशाण काळ आणि हर्षवर्धन च्या काळातही समृध्द सागरी व्यापाराचे उल्लेख सापडतात. इस्लामी आक्रमकांना भारतीय नाविक तंत्रज्ञान काही विशेष मेहनत न घेता मिळून गेले. त्यामुळे अकबराच्या काळात नौकानयन विभाग इतका समृध्द झाला होता की जहाजांच्या डागडुजी साठी आणि कर वसुली साठी त्याला वेगळा विभाग बनवावा लागला.
पण अकराव्या शतकापर्यंत चरम सीमेवर असणारं भारतीय नौकानयन शास्त्र पुढे उतरंडीला लागलं. मोगलांनी आयत्या मिळालेल्या जहाजांना नीट ठेवलं इतकंच. पण त्यात वाढ केली नाही. दोनशे वर्षांचं विजयनगर साम्राज्य तेवढं अपवाद. त्यांनी जहाज बांधणीचे कारखाने पूर्व आणि पश्चिम अश्या दोन्ही तटांवर सुरु केले आणि ८० पेक्षा जास्त बंदरांना ऊर्जितावस्थेत आणलं. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं आरमार उभारलं आणि नंतर आंग्र्यांनी त्याला बळकट केलं.
*पण अकराव्या शतकाच्या आधीचे वैभव भारताच्या जहाज बांधणी उद्योगाला पुढे आलेच नाही.* त्याच काळात स्पेन आणि पोर्तुगाल यांनी जहाज बांधणीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली अन भारत मागे पडला.
पण तरीही, इंग्रज येई पर्यंत भारतात जहाजं बांधण्याची प्राचीन विद्या जिवंत होती.
Continue.सतराव्या शतका पर्यंत युरोपियन राष्ट्रांची क्षमता अधिकतम सहाशे टनाचं जहाज बांधण्याची होती. पण त्याच सुमारास त्यांनी भारताचे ‘गोधा’ (कदाचित ‘गोदा’ असावे. स्पेनिश अपभ्रंशाने गोधा झाले असावे) नावाचे जहाज बघितले, जे १,५०० टनां पेक्षाही मोठे होते. भारतात आपल्या वखारी उघडलेल्या युरोपियन कंपन्या, म्हणजे डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच इत्यादी भारतीय जहाजं वापरू लागली आणि भारतीय खलाश्यांना नोकरीवर ठेऊ लागली. सन १८११ मधे ब्रिटीश अधिकारी कर्नल वॉकर लिहितो की ‘ब्रिटीश जहाजांची दर दहा / बारा वर्षांनी मोठी डागडुजी करावी लागते. पण सागवानी लाकडापासून बनलेली भारतीय जहाजं गेल्या पन्नास वर्षांपासून डागडुजी शिवाय उत्तम काम करताहेत.’
ReplyDelete*भारतीय जहाजांची ही गुणवत्ता बघून ‘इस्ट इंडिया कंपनी’ ने ‘दरिया दौलत’ नावाचे एक भारतीय जहाज विकत घेतले होते, जे ८७ वर्ष, डागडुजी न करता व्यवस्थित काम करत राहिले.*
ब्रिटिशांनी मराठ्यांकडून भारतावरील राज्य हिसकावून घेण्याच्या काही वर्ष आधीच, म्हणजे १८११ मधे एक फ्रांसीसी यात्री वाल्तजर साल्विन्स ने ‘ले हिंदू’ नावाचे एक पुस्तक लिहिले. त्यात तो लिहितो, “प्राचीन काळात नौकानयनाच्या क्षेत्रात हिंदू सर्वात अघाडीवर होते आणि आजही (१८११) ते या क्षेत्रात आमच्या युरोपियन देशांना शिकवू शकतात.”
इंग्रजांनीच दिलेल्या आकड्यांप्रमाणे १७३३ ते १८६३ मधे एकट्या मुंबईतल्या कारखान्यात ३०० भारतीय जहाजं तयार झाली, ज्यातील अधिकांश जहाजं ब्रिटेन च्या राणी च्या ‘शाही नौदलात’ शामिल करण्यात आली. यातील ‘एशिया’ नावाचे जहाज २,२८९ टनांचे होते आणि त्यावर ८४ तोफा बसविलेल्या होत्या. बंगाल मधे चितगाव, हुगळी (कोलकाता), सिलहट आणि ढाका मधे जहाजं बनविण्याचे कारखाने होते. १७८१ ते १८८१ ह्या शंभर वर्षात एकट्या हुगळी च्या कारखान्यात २७२ लहान मोठी जहाजं तयार झाली. यावरून अकराव्या शतकापूर्वी भारताच्या जहाज बांधणी उद्योगाची स्थिती किती समृध्दशाली असेल, याचा अंदाज येऊ शकतो.
मात्र अश्या दर्जेदार गुणवत्तेची जहाजं बघून इंग्लंडमधील इंग्रज, इस्ट इंडिया कंपनी ला, ही जहाजं न घेण्यासाठी दबाव टाकू लागले. सन १८११ मधे कर्नल वॉकर ने आकडे देऊन हे सिध्द केले की ‘भारतीय जहाजांना फारशी डागडुजी लागत नाही. आणि त्यांच्या ‘मेंटेनन्स’ ला अत्यल्प खर्च येतो. तरीही ते जबरदस्त मजबूत असतात.’ (ही सर्व कागदपत्रं ब्रिटीश संग्रहालयात, इस्ट इंडिया कंपनी च्या अभिलेखागारात (आर्काईव्हल मधे) सुरक्षित आहेत).
मात्र इंग्लंड च्या जहाज बनविणाऱ्या व्यापाऱ्यांना हे फार झोंबलं. इंग्लंड चे डॉ. टेलर लिहितात की भारतीय मालाने लादलेलं भारतीय जहाज जेंव्हा इंग्लंड च्या किनाऱ्याला लागलं, तेंव्हा इंग्रजी व्यापाऱ्यांमध्ये अशी गडबड उडाली की जणू शत्रुनेच आक्रमण केले आहे. लंडन च्या गोदीतील (बंदरातील) जहाज बांधणाऱ्या कारागिरांनी इस्ट इंडिया कंपनी च्या डायरेक्टर बोर्डाला लिहिलं की जर भारतीय बांधणीची जहाजं तुम्ही वापरायला लागाल तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, आमची अन्नान्न दशा होईल..!
इस्ट इंडिया कंपनी ने त्यावेळी हे फार मनावर घेतलं नाही. कारण भारतीय जहाजं वापरण्यात त्यांचा व्यापारिक फायदा होता. मात्र १८५७ च्या क्रांतीयुध्दानंतर भारतातले शासन सरळ इंग्लंड च्या राणी च्या हातात आले. आणि राणीने विशेष अध्यादेश काढून भारतीय जहाजांच्या निर्मितीवर बंदी घातली. १८६३ पासून ही बंदी अंमलात आली आणि एका वैभवशाली, समृध्द आणि तात्रिक दृष्ट्या पुढारलेल्या भारतीय नौकानयन शास्त्राचा मृत्यू झाला !
सर विलियम डिग्वी ने या संदर्भात लिहिलेय की “पाश्चिमात्य जगाच्या सामर्थ्यशाली राणीने, प्राच्य सागराच्या वैभवशाली राणीचा खून केला..!”
आणि जगाला ‘नेव्हिगेशन’ हा शब्द देण्यापासून तर प्रगत नौकानयन शास्त्र शिकवणाऱ्या भारतीय नाविक शास्त्राचा, प्रगत जहाज बांधणी उद्योगाचा अंत झाला..!!
राज्यात पर्यटनविकासासाठी 250 कोटींचा निधी वितरणाचे
ReplyDeleteउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
· राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पर्यटनविकासासाठी प्रायोगिक तत्वावर दहा ‘जिल्हा पर्यटन अधिकारी’
· पर्यटनविकासासाठी खासगी संस्थांच्या सहभागासाठी जिल्ह्यात पर्यटन सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय
मुंबई, दि. 15 : राज्यातील महाबळेश्वर, एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. राज्यातील पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासही त्यांनी मान्यता दिली. जिल्ह्यातील पर्यटनविकासात खाजगी संस्थांना सहभागी करुन घेण्यासाठी जिल्ह्यांमध्ये पर्यटन सोसायटी स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील पर्यटनविकासाच्या प्रकल्पांचा आढावा आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाने कालच राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पर्यटनविकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पीय तरतूदीच्या 25 टक्के निधी टप्प्याटप्याने वितरीत करण्याबरोबरच पर्यटनविकासाची शंभर टक्के पूर्ण झालेल्या कामांची 72 कोटींची देयके अदा करण्यात यावीत. जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची प्रायोगिक तत्वावर आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करताना ॲग्रो टुरीझमच्या क्षेत्रात कार्यरत तज्ञांचा विचार व्हावा, असेही ठरविण्यात आले.
असोला मेंढा तलाव परिसर पर्यटन क्षेत्र विकासाद्वारे
ReplyDeleteचंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देऊ
- पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
· साहसी पर्यटन व अन्य सुविधांद्वारे रोजगारात होईल वाढ – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई, दि. 15 : चंद्रपूर जिल्ह्यातील असोला मेंढा तलाव क्षेत्रातील पर्यटन क्षेत्र विकासाबाबत विभागामार्फत निश्चित निर्णय घेऊन त्यामाध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील असोला मेंढा तलाव हा इंग्रजकालीन तलाव असून 114 वर्ष जुना आहे. या परिसरात देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असल्याने या परिसराच्या विकासासाठी किमान 20 कोटी रु. निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दालनात चंद्रपूर जिल्ह्यातील असोला मेंढा येथील परिसराचे सौंदर्यीकरणाबाबत बैठक झाली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर, आर्किटेक्ट श्री.भिवागडे यांच्यासह या विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी असोला मेंढा तलाव परिसरातील सौदर्यीकरण करण्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, असोला मेंढा तलाव हा जंगलव्याप्त परिसर असून तलाव आणि परिसर हे जलसंपदा विभागाकडे आहेत. परिसरातील जागा जलसंपदा विभागाची आहे या परिसराला देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. पर्यटकांच्या दृष्टीने या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. या परिसराचे सुशोभिकरण करून साहसी पर्यटन सुविधा दिल्या तर पर्यटनात वाढ होईल. त्याचबरोबर स्थानिक रोजगारात वाढ होईल. याकरिता किमान 20 कोटी रु. निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी केली.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, असोला मेंढा तलाव परिसरातील सौंदर्यीकरण महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत करावयाचे झाल्यास ही जागा जलसंपदा विभागामार्फत एमटीडीसीकडे हस्तांतरित करावी लागेल, या माध्यमातून या ठिकाणी पर्यटन विकास करता येईल. त्याचबरोबर आदरातिथ्य क्षेत्र विकासासाठी खाजगी-सार्वजनिक सहभागातून पंचतारांकित हॉटेल उभारण्यासंदर्भात इच्छुक व्यवसायिकांना संधी देण्याबाबत पाहणी करण्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.
******