आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत
विशेष बाबीच्या प्रस्तावासंदर्भात मार्गदर्शक सूचना.
महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग
शासन परिपत्रक कमांक : स्थाविका-०६१६/प्र.क्र. ९६/का. १४८२.
मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मादामा कामा मार्ग, मुंबई - ४००
०३२.
दिनांक : १ जानेवारी, २०१८
वाचा :
१) नियोजन विभाग, शासन निर्णय
क्रमांक : क्र. स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का. १४८२, दि. १२.७.२०१६
२) नियोजन विभाग, शासन निर्णय
क्रमांक : क्र. स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का. १४८२, दि. ३१.८.२०१७
शासन परिपत्रक :
आमदार
स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विधानसभा/विधानपरिषद सदस्यांनी सुचविलेल्या कामास जिल्हाधिकारी
यांचेकडून प्रशासकीय मान्यता देवून निधी संबंधीत जिल्हास्तरीय यंत्रणेकडे सुपूर्द करण्यांत
येतो. तथापि, काम विहित कालावधीत पूर्ण न झाल्याने निधी शासनास समर्पित केला जातो.
दरम्यानच्या काळात विधानसभा/विधानपरिषद सदस्याचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने समर्पित
निधीची मागणी जिल्हाधिकारी, यांच्याकडून शासनाकडे केली जात नाही. परिणामी अशी कामे
दिर्घकाळ अपूर्ण राहतात किंवा काम पूर्ण झाल्यानंतर निधीची मागणी शासनाकडे केली जाते.
२. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दरवर्षी आवश्यक तेवढाच निधी अर्थसंकल्पीत
केला जात असल्याने जादा निधी मंजूर करणे शासनास शक्य होत नाही. तथापिक काम पूर्ण झाले
असल्याने संबंधीत जिल्हास्तरीय यंत्रणेस देयक अदा करणे आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत
प्रथम अशी कामे वेळेत पूर्ण न होण्यास/निधी खर्च न होण्यास तसेच निधीची मागणी शासनाकडे
वेळीच न करण्यास जबाबदार असणाया अधिकायांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. तसेच कार्यकाल संपुष्टात आलेल्या
विधानसभा/विधानपरिषद सदस्याने प्रस्तावित केलेले काम हे बांधकामाशी संबंधीत असेल व
त्यातून शासकीय मालमत्ता निर्माण होणार असेल आणि अशा अपुर्ण राहिलेल्या किंवा पूर्ण
कामांकरिता संबंधीत जिल्ह्यातील विद्यमान विधानसभा/विधान परिषद सदस्य उर्वरित निधी
देण्यास इच्छूक असतील तर त्यांच्या चालू आर्थिक वर्षाच्या निधीमधून विशेष बाब म्हणून
उपलब्ध करुन देता येईल. संबंधित जिल्हाधिकारी यांनी शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाचे स्थायी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उचित कार्यवाही
करावी.
३. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत “विशेष बाब” म्हणून मंजूरी
देण्या संदर्भातील परिच्छेद क्र. ३.३९ नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. स्थाविका-०६१६/प्र.क्र.
९६/का. १४८२, दि. ३१.८.२०१७ अन्वये मार्गदर्शक सूचनामध्ये काही सुधारणा करण्यांत आल्या
आहेत. या शासन निर्णयातील ब(II) नुसार सांस्कृतिक/साहित्यिक /शैक्षणिक/क्रीडाविषयक/पर्यावरण/आरोग्य
इ. विषयक बाबींना “विशेष बाब” म्हणून मंजूरी देण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार विशिष्ट कालावधीत
आयोजित होणारे साहित्य संमेलने/क्रीडा स्पर्धा/आरोग्य शिबीरे/महोत्सव इ. कार्यक्रमांसाठी
निधी देण्यास “विशेष बाब” म्हणून मंजूरी देण्याचे प्रस्ताव शासनास प्राप्त होत असतात. अशा
प्रस्तावांची छाननी करुन त्यावर उचित निर्णय घेण्यास शासनास पुरेसा कालवधी मिळणे आवश्यक
आहे. यास्तव जिल्हाधिकारी यांनी खबरदारी घ्यावी. उशिरा प्राप्त होणारे प्रस्तावांचा
विचार केला जाणार नाही, याची जिल्हाधिकारी यांनी कृपया नोंद घ्यावी.
सदर शासन
निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यांत आला असून त्याचा संकेतांक २०१८०१०११७३३३४७३१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यांत
येत आहे.
महाराष्ट्राचे
राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(अ.द. जोशी)
उप सचिव, महाराष्ट्र
शासन
No comments:
Post a Comment