Saturday, 4 May 2019

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
शासनशुध्दीपत्रक क्रमांक : उमाशि-२०१५/प्र.क्र.२६२/एस.डी.२
मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २५ जानेवारी, २०१९

संदर्भ :-शासन निर्णय क्र. उमाशि -२०१५/प्र.क्र.२६२/एस.डी.२, दि. २० डिसेंबर, २०१८
शुध्दीपत्रक :-
संदर्भाधीन शासन निर्णयान्वये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भातील सुधारीत नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर नियमावलीतील परिशिष्ट ६ व ७ अन्वये सवलतीच्या गुणांबाबत नमूद करण्यात आले आहे. या गुणांकनाबाबत शासनाकडे काही निवदने प्राप्त झाली आहेत. सदर निवेदने विचाराता घेऊन संदर्भाधीन शासन निर्णयामधील परिशिष्ट ६ व ७ येथील सवलतीच्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
२-   संदर्भाधीन शासन निर्णय दि. २० डिसेंबर, २०१८ मधील परिशिष्ट ६ व परिशिष्ट ७ वगळून याद्वारे,
सुधारित गुणांबाबतचे सोबतचे परिशिष्ट ६ व परिशिष्ट ७ समाविष्ट करण्यात येत आहे.
३-   सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०१७०६०६१६१४१३१७२९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल
स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(डॉ. सुवर्णा सि.खरात)
   सहसचिव, महाराष्ट्र शासन

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi