Thursday, 2 May 2019


शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना होणार्‍या विषबाधा, धार्मिक ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या चेंगराचेंगरीच्या घटना तसेच निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित हेणार्‍या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत .....

महाराष्ट्र शासन
महसुल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक : सीएलएस-२०१८/प्र.क्र.९८/म-३
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई -४०००३२
दिनांक : १९ जुलै, २०१८

वाचा :-
१-    शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्रमांक : आरएलएफ - ११.०३ / प्र.क्र.३१० / म-३, दिनांक २४/०८/२००४.
२-    शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्रमांक : आरएलएफ -२०१४/ प्र.क्र.३२९ / म-३, दिनांक ०५/०१/२०१६

प्रस्तावना :-
      संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये दहशतवादग्रस्त व दंगलग्रस्त आपदग्रस्तांना मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतची योजना अंमलात आणण्यात आली आहे. या घटनांमध्ये बाधित होणार्‍या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीचे दर संदर्भाधीन क्रमांक २ येथील निर्णयान्वये सुधारित करण्यात आले असून यामध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये बाधित होणार्‍या आपदग्रस्तांचा समावेश करण्यात आलेला आहे. या घटनांव्यतिरिक्त इतर अनेक मानव निर्मित आपत्तीच्या घटना घडतात जेथे अशा घटनांमधील आपदग्रस्तांन सहानुभुतीच्या दृष्टीकोनातून तातडीने मदत देणे आवश्यक असते. तथापि अशा प्रकरणी मदत देण्याबाबत शासनाचे कायमस्वरूपी धोरण नसल्यामुळे अशा आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी जनहित याचिका क्रमांक ११३/२०१७ मध्ये दिनांक २२/०२/२०१८ रोजी दिलेले आदेश विचारात घेवून वर नमूद घटनेव्यतिरिक्त इतर मानव निर्मित घटनांमध्ये बाधित होणार्‍या व्यक्तींना मदत देण्यासाठी स्वतंत्र योजना अंमलात आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
      खालील नमूद केलेल्या मानव निर्मित घटना / आपत्तीमध्ये बाधित होणार्‍या व्यक्तींना या शासन निर्णयात नमुद केलेल्या दराने विहित केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
२.    मदतीसाठी पात्र असलेल्या मानव निर्मित घटना / आपत्ती :-
१.    शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना होणार्‍या विषबाधांच्या घटना.
२.    धार्मिक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या चेंगराचेंगरीच्या घटना.
३.    मोडकळीस आलेल्या / जीर्ण झालेल्या ज्या निवासी इमारती खाली करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाने रहिवाशांना नोटीस दिलेली नाही अशा अधिकृत निवासी इमारत कोसळण्याच्या घटना
वरील घटना / आपत्तीमधील बाधित व्यक्तींना द्यावयाचे मदतीचे दर
३.    उपरोक्त मदत अनुज्ञेय होण्यासाठी लागू असलेल्या अटी व शर्ती :
१.    मृत्यूचे कारण प्राधिकृत वैद्यकीय अधिकार्‍यांकडून प्राप्त होणे आवश्यक राहील.
२.    अपंगत्वाचे प्रमाण व त्याच्या कारणाबाबत शासकीय रूग्णालयातील प्राधिकृत वैद्यकिय अधिकार्‍याने प्रमाणित करणे आवश्यक राहील. अपंगत्व हे त्याच घटनेमुळे निर्माण झाले असले पाहिजे.
३.    रूग्णालयात दाखल असलेल्या प्रकरणी संबंधित  रूग्णालयाच्या प्राधिकृत वैद्यकीय अधिकार्‍याचे प्रमाणपत्र
४.    संबंधित जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांचेमार्फत मदतीचे वाटप करण्यात यावे.
५.    अशा घटनांसंदर्भात पोलीसांकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्हयामध्ये संबंधित आपदग्रस्त व्यक्तीचा आरोपी म्हणून समावेश नसावा.

५.    उपरोक्त प्रयोजनावर होणारा खर्च मागणी क्रमांक सी-५, प्रधान लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२, समाज कल्याण, १०४, वृध्द, विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण, (००)(०१) अपघातग्रस्तांना आर्थिक मदत (अनिवार्य)(२२३५ ०३११) ३१, सहाय्यक अनुदाने या लेखा शिर्षाखाली दाखविण्यात याव व त्याखालील अनुदानातून भागविण्यात यावा.
६.    हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २६५ / २०१८ / व्यय-९, दिनांक ३०/०६/२०१८ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमीत करणेत येत आहेत.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०७१९१६३०५२३११९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
   (सु. ह. उमराणीकर)
उपसचिव, महाराष्ट्र शासन

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi