मुलीच्या वडिलांचे मनोगत... बायकोला उद्देशून..
आज मुलीला सासरी पाठवले...
नकळत तुझे बाबा आठवले....
तिला सासरी पाठवताना....,
आपल्या संसाराचे....
चित्र डोळ्यासमोर सरकले....!
तू घरी आलीस, तेव्हा वाटले...,
तुला सगळेच यायला हवे...
तू सगळेच करायला हवे...
आज वाटते सासरच्यांनी...
आपल्या मुलीला संभाळून घ्यायला हवे...
तिला जपायला हवे...
तुझे बाबा आले गेले तरी....
नाही वाटलं विचारावं...,
अाणि अाज वाटतं, जावयाने प्रेमाने बोलावं...
हक्काने काही सांगावं...
तुझे कष्ट तुझी मेहनत...
सगळं कसं गृहीतच धरलं....
आता वाटतं लेकीचं कौतुक...
सगळ्यानी करावं....
तिने मानाने जगावं....
बघता बघता वर्ष सरले. ...
लेकीला दिवस गेले...
देवा कडे एकच मागणे....
तिला एक गोड परी दयावी....
म्हातारपणी का होईना....,
पण नवर्याला तिची किंमत कळावी...!
( व्हाॅट्सअॅपवर
अालेला सुंदर मेसेज शेअर केला)
No comments:
Post a Comment