Monday, 29 April 2019

आनंदी आनंद गडे ,इकडे तिकडे चोहिकडे


आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
बालकवींची ही कविता मला कळत असल्यापासून ते आजपर्यंत दिवसभरात केव्हाही मी म्हणत असते, हया कवितेतूनच इतका आनंद मिळतो कि दु:ख काय असते ते आजतागायत मला कळलेच नाही, इतकेच नव्हे तर कोणी मला विचारले की, कशा आहात? तर माझे एकच वाक्य असते आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे त्यामुळे समोरची व्यक्ती ही प्रफुल्लीत होते व म्हणते हयाला जीवन एैसे नांव, वा छान. मला मग अजून प्रसन्न वाटते.
       प्रसंग कोणताही असो, कौटुंबिक असो,सामाजिक असो वा राजकीय असो,मी मात्र कधीही गांधीजींच्या ३ माकडांसारखी भुमिका पार पाडत असते. कधी डोळ्यावर हात ठेवून अंधाची भूमिका करते, तर कधी कानावर हात ठेवून कर्णबधिर होते, तर कधी तोंडावर हात ठेवत मुक्याची भुमिका करत असते.
होते असे की समोरची व्यक्ती खुप आनंदी होते.जसे दिव्यांग्य आपल्या विश्वात रमलेला असतो तशीच मीपण माझ्या विश्वात समोरच्या व्यक्तीला आनंदी बघून रमते. भांडणे, कटकटी, वैताग हया अशा मानसिक त्रासदायक घटनांपासून होणा-या ताणतणावा पासून मुक्ती हवी असेल तर ही बालकवींची कविता निश्चीतच आपल्याला आनंद देईल व म्हणाल जिवनात ही घडी अशीच राहू दे.

1 comment:

Featured post

Lakshvedhi