Tuesday, 1 July 2025

लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी

 लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी

 

            महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून उद्यापासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

      उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे.  अधिवेशनात सादर होणाऱ्या  प्रत्येक विधेयकावर सखोल चर्चा व्हावी, कोणतेही विधेयक चर्चेशिवाय मंजूर होऊ नये, अशी शासनाची भूमिका राहील. विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघांतील प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल आणि सभागृहाचा एकही मिनिट वाया जाणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल. उद्यापासून तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणाऱ्या पुरवणी मागण्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून उद्या त्या सभागृहात सादर केल्या जातीलअशी माहिती त्यांनी दिली.

      उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, यंदा प्रथमच जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने राज्यातील धरणाच्या पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे. तर राज्यात काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश  देण्यात आले असून राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचा भर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचा भर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            राज्य शासन जनभावनेचा आदर करणारे असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र राज्य हे स्टार्टअपजीडीपीविदेशी गुंतवणूक आदी बाबींमध्ये अग्रेसर आहे. आतापर्यंत डावोस मध्ये 20 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून त्यापैकी 70 ते 80 टक्क्यांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली असल्याचे ते म्हणाले. विकसित भारताच्या उद्देश पूर्तीमध्ये महाराष्ट्र पुढे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

      राज्यात पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची असल्याचे सांगून हिंदी भाषेची सक्ती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती विद्यार्थी हित लक्षात घेऊन निर्णय घेईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला शासनाने मान्यता दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती

 त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी

डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द

·         पावसाळी अधिवेशनात 12 विधेयके

·         अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार

·         लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी मंजूर

 

 

            मुंबई, दि. 29 - राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास करुन तसेच भविष्यात महत्वाच्या ठरणाऱ्या अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटचे महत्त्व विचारात घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातील काढण्यात आलेले राज्य सरकारचे 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 रोजीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

      विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास उद्या दिनांक 30 जून पासून मुंबई येथे सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

       मुख्यमंत्री म्हणालेराज्याला विकासाकडे नेण्याच्या दिशेने राज्य सरकार काम करीत आहे. या अधिवेशनामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सविस्तर चर्चा करण्याच्या उद्देशाने शासनाने तीन आठवड्यांचे अधिवेशन प्रस्तावित केले आहे. या अधिवेशनात एकूण 12 विधेयके सादर होणार असून प्रलंबित असलेले एक विधेयक आणि संयुक्त समितीकडील एक विधेयकावर देखील चर्चा होईल. त्याचबरोबर सहा अध्यादेश पटलावर ठेवले जातील. राज्यात जून महिन्यातील पावसाची स्थिती समाधानकारक असून पेरण्या देखील चांगल्या झाल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी मुबलक प्रमाणात बियाणे आणि खतांच्या उपलब्धतेसाठी यंत्रणा काम करीत असून काही ठिकाणी असलेल्या तक्रारी दूर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Appointment of a Panel of Presiding Officers for the Assembly

 Appointment of a Panel of Presiding Officers for the Assembly

 

Mumbai, Date:- June 30: For the Monsoon Session of the Legislature, Assembly Speaker Adv. Rahul Narwekar has announced the appointment of a panel of presiding officers for the Assembly.

MLAs Shri Amit Satam, Shri Kishore Appa Patil, Shrimati Sulabha Khodke, Shri Chetan Tupe, Shri Nitin Deshmukh, Shri Sanjay Meshram, Shri Abhijeet Patil, Shri Sameer Kunawar, and Shri Samadhan Avtade have been appointed to the panel of presiding officers.

-

दिलखुलास' कार्यक्रमात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुलाखत

 

मुंबईदि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात 'आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधाया विषयासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 2 आणि गुरूवार दि. 3 जुलै 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक कृपा कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाची अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला आणि सोयी-सुविधांना प्राधान्य देत राज्य शासनाने संपूर्ण नियोजन केले आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवापाणीपुरवठावाहतूक व्यवस्थापनआपत्कालीन यंत्रणास्वच्छता आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला असूनस्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यंदा वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री निवारा सुविधाही नवी संकल्पना राबवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने 'दिलखुलासकार्यक्रमात वारी मार्गावरील वैद्यकीय पथके, ॲम्ब्युलन्स सेवाआपत्कालीन प्रतिसाद पथकेस्वच्छतागृहेजल व्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी दिली आहे.

०००

विधान परिषदेमध्ये दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली : सभापती प्रा.राम शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

 विधान परिषदेमध्ये दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली :

सभापती प्रा.राम शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

 

मुंबईदि. 30 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरविधान परिषद सदस्य अरुण काका भिमराव जगताप आणि डॉ.रामदास भगवानजी आंबटकर यांच्या निधनाबाबत सभापती प्रा.राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला.

सभापती प्रा.शिंदे यांनी शोकप्रस्तावात डॉ. जयंत नारळीकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. कोल्हापूर येथे जन्मलेले नारळीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विभागप्रमुख म्हणून 16 वर्षे कार्य करत संस्थेला जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नंतर पुण्यात इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर स्ट्रोनॉमी अँड स्ट्रोफिजिक्सची स्थापना करून संशोधन क्षेत्रात मोलाची भर घातली. पद्मभूषणपद्मविभूषणमहाराष्ट्र भूषण यांसारखे अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. विज्ञानाचा सामान्यांशी संबंध जोडण्याचा त्यांचा प्रयत्न विशेषत्वाने उल्लेखनीय होता. त्यांच्या विज्ञानकथांच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचे कार्य केले.

सभापती प्रा.शिंदे यांनी अरुणकाका जगताप यांचे सामाजिक योगदानही अधोरेखित केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील भेंडी गावचे रहिवासी असलेले जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधान परिषदेमध्ये दोन वेळा निवडून येईपर्यंतचा राजकीय प्रवास केला. समाजकार्यशिक्षण संस्थाक्रीडा संघटना यामधून त्यांचा जनतेशी घनिष्ठ संबंध राहिला. त्यांच्या निधनामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आप्तस्वकीय हरपल्याची भावना आहेअसे सभापती म्हणाले.

डॉ. रामदास आंबटकर यांचा जीवनप्रवास आणि कार्यकर्तृत्वाचा आढावाही सभागृहात मांडण्यात आला. वर्धा जिल्ह्यात जन्मलेले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कार्यरत असलेले आंबटकर यांचा सहकारी संस्थांमध्ये मोठा सहभाग होता. ते 2018 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले. विद्यार्थी चळवळीतील त्यांचा 20 वर्षांचा अनुभव आणि कार्यकर्तावृत्तीने केलेले काम आजच्या काळासाठी प्रेरणादायी आहेअसे सभापतींनी नमूद केले.

या तिन्ही व्यक्तिमत्त्वांचे योगदान स्मरणीय असून त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेलअसा विश्वास सभापतींनी यावेळी व्यक्त केला.


रस्ते, मेट्रो, सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती, कुंभमेळ्याचे नियोजन मागास घटक विकासासाठी 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 रस्तेमेट्रोसिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मितीकुंभमेळ्याचे नियोजन

मागास घटक विकासासाठी

57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 

मुंबईदि. 30 :- विधीमंडळाच्या जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्तेमेट्रोसिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठीसिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणीमहात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनासंजय गांधी निराधार अनुदान योजनामागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच दुर्बलवंचित समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांपैकी 19 हजार 183 कोटी 85 लाख रुपये अनिवार्य तर 34 हजार 661 कोटी 34 लाख रुपये कार्यक्रमांतर्गत आणि 3 हजार 664 कोटी 52 लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत. स्थूल पुरवणी मागण्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 40 हजार  644 कोटी 69 लाख रुपयांचा आहे.

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक 11 हजार 42 कोटी 76 लाख रुपये हे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहेत. 3 हजार 228 कोटी 38 लाख रुपये हे मेट्रो प्रकल्पमहापालिकानगरपालिकानगरपरिषदाजिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोनसाठी 2 हजार 182 कोटी 69 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

Featured post

Lakshvedhi