🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹
🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻
*मधुमक्षिका प्रेमाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*जागतिक मधमाशी दिन*
⚜️⚜️🐝⚜️⚜️
🌹🥀🌸🔆🐝🔆🌸🥀🌹
*पीत्वा रसं तु कटुकं मधुरं*
*समान माधुर्यमेव*
*जनयेन्मधुमक्षिकासौ*
*सन्तस्तथैव*
*समसज्जनदुर्जनानां श्रुत्वा*
*वचः मधुरसूक्तरसं सृजन्ति*
*जीवनात हा आदर्श ठेवलाय तो मधुमक्षिकेने. अर्थात ज्याप्रमाणे मधमाशी कडू आणि गोड रस सेवन करुनही केवळ मधुर रसच प्रदान करते तसेच संतही त्यांच्याविषयी दुर्जन कितीही वाईट बोलले, ते ऐकूनही सज्जन दुर्जनांना मधुर.. चांगलाच उपदेश करतात.*
*मधुमक्षिका किं जनयति.. याचे उत्तर अर्थातच माधुर्यमेव.. मधुमक्षिका.*
*मधमाशीला प्रत्यक्ष श्री दत्तगुरुंनीही गुरु मानलेय. संत गजानन महाराजांनीही मधमाश्यांनी त्यांना डंख केल्यानंतरही त्यांच्यावर प्रेमच करायला शिकवलेय. साहित्यातही वारंवार मधमाश्यांचे उल्लेख आहेत.*
*आज जागतिक मधुमक्षिका दिन. युरोपातील स्लोव्हनिया देशातील अँतोन जोंसा हे जगातील पहिले मधुमक्षिका पालन तज्ञ. त्यांनी १७७१ मध्ये यावरील पुस्तक लिहले. त्याच्या कार्याची दखल घेत २०१८ पासून २० मे हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने 'जागतिक मधमाशी दिन' घोषित केला. मधुमक्षिकेचे जीवनातील महत्त्व याबद्दल जनजागृतीसाठी या दिवसाचे महत्त्व.*
*जागतिक मधमाशी दिन २०२५ ची थीम "मधमाशी आणि पर्यावरणाची सुरक्षा" आहे. यावर्षी मधमाशी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी काय करायला हवे, यावर अधिक भर दिला जाईल.*
*मधमाशी जिचे अस्तित्व पुरातन काळापासून आहे. मधमाश्या आहेत तोवरच हे चराचर आहे. मधमाशी हा ६ पाय आणि दोन पंख असणारा किटक. ७ जाती ४४ उपजाती असलेला. त्यांच्या एका पोळ्यात.. वसाहतीत २० ते ८० हजार मधमाश्या असतात. सामुदायिक एकात्मतेने जीवन कसे जगावे हे सांगणारे हे पोळे. यामध्ये असते एक राणी माशी.. ड्रोन म्हणून फिरणारे नर आणि इतर हजारो कामकरी मधमाश्या. अत्यंत निष्ठेने कधीच आळस न करता काम करणाऱ्या या प्रामाणिक मधमाश्या.*
*'थेंबे थेंबे तळे साचे' चे उदाहरण म्हणजे मधमाश्यांचे पोळे. एक एक लहानसा जीव. एकदिलाने.. एकनिष्ठेने.. समर्पणाने सामुहीक कार्य कसे करावे.. अमृत संचय कसा करावा याचा मानवासाठी आदर्श ठेवतो. संचयाचे महत्त्व मोठे. जीवनात धन संचयासाठीही हा आदर्श.*
*मधमाश्यां परागीभवन होते ज्या मुळे नैसर्गिकरित्या २५ ते ३०% वनस्पती.. शेती उत्पादनात वाढ होते. मधमाश्यांचे शुद्ध मध आणि मेण प्राप्त होते. मेणाचे अनेक उपयोग होतात. मध हे अत्यंत गुणकारी आयुर्वेदीय औषध. मधाला गोडवा आहेच पण अनेक रोगावर मधप्राशन उपकारक. रक्तदाब.. लठ्ठपणा दूर करणारे.*
*मधाची जगभरातील मागणी लक्षात घेता मधमाश्या पालन हा शेतीसाठी पूरक व्यवसाय झाला आहे. यासाठी मधुमक्षिका पालन वर्ग.. प्रशिक्षण वर्ग देशभर कार्यरत आहे. अत्यल्प खर्चात सुरू होणारा हा पोटव्यवसाय शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देत आहे. शेतीलगत पेट्या ठेवून मधमाश्या पालन केले जातेय. या मधमाश्यामुळे इतर कोणत्याही किटकनाशके.. खताशिवाय शेती उत्पन्न वाढतेय.*
*महाराष्ट्रात सर्व कृषी विद्यापीठे खादी ग्रामोद्योगसह मधमाश्यांचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण आणि मधपेटीसह व्यवस्था करुन पीक वाढीसह रोजगार.. व्यवसायासाठी प्रोत्साहन देत आहेत.*
*महाराष्ट्रात मांघर, पाटगाव या गावांची मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. डहाणू, भंडारवाडी, बोरझर, काककडधाबा, चाकोरे, उडदावणे, महाबळेश्वर आमझरी यांची मधाचे गाव म्हणून निवड झाली असून लवकरच २१ गावेही समाविष्ट होत मधु पर्यटन वाढ होत मोठ्या प्रमाणात व्यवसाय.. रोजगार वाढ होणार आहे.*
*लोकांना आणि मधमाश्यांना इजा न होवू देता मधाचे पोळे सुरक्षितपणे काढून देणाऱ्या समाजसेवकांची नावे ग्रामपंचायत ते मनपा लोकांना भविष्यात उपलब्ध करुन देत या मधुर कार्यात हातभार लावतील.*
*आम्हांला शुद्ध.. भरपूर अन्नधान्य, फळे देण्यासाठी मदत करणाऱ्या या अमृतमय मधमाश्या पालनाकडे आज जगाचे लक्ष वेधले जाते. आपणही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मधुमक्षिकेवर प्रेम करायला शिकू या. मधमाशीचे सर्वोत्तम गुण सांगणारे हे बालगीत.*
🌹⚜️🌸🥀🐝🥀🌸⚜️🌹
*उठुनि सकाळी ती मधमाशी*
*जाते की मध मिळवायासी*
*थेंबे थेंबे साठवी त्यासी*
*उद्योगी मोठी मधमाशी*
*आळस तिजला ठाऊक नाही*
*सर्व दिवस ती खपते पाहीं*
*थंडी ऊन म्हणेना कांहीं*
*उद्योगी मोठी मधमाशी*
*गोड गोड मध निपटुनि घेते*
*थोडा म्हणुनी मुळीं न रुसते*
*साठवुनी तो जपुनि ठेविते*
*उद्योगी मोठी मधमाशी*
*थोडाही गुण मिळता घ्यावा*
*साठा त्याचा नित्य करावा*
*कोणालाही तो शिकवावा*
*ठेवा हे चित्ती*
🌹🎼🌹🔆🐝🔆🌹🎼🌹
*गीत : पारंपारिक* ✍️
*संगीत : नंदू घोलप*
*स्वर : कविता पौडवाल*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*२०.०५.२०२५*
🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻