Tuesday, 20 May 2025

विधिमंडळ समित्या लोकशाहीच्या आत्म्याचे प्रतिबिंब

 विधिमंडळ समित्या लोकशाहीच्या आत्म्याचे प्रतिबिंब

— उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजपासून समित्यांच्या कामकाजाला सुरुवात होत आहे. या केवळ समित्या नसून त्या लघुविधानमंडळआहेत. या समित्या लोकशाहीच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहेत. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर समित्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. समित्यांना संविधानाने विशेष अधिकार दिले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल सभा कशा आयोजित करता येतीलसमित्यांचे निष्कर्ष जनतेपर्यंत कसे पोहोचवता येतीलतसेच समित्यांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता कशी आणता येईलयाकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहेसमित्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल, वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारावर या समित्या वेळोवेळी शासनाला सूचना करतील. संसदीय लोकशाहीत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी समित्यांद्वारे एकत्र येऊन जनतेसाठी कार्य करणे आवश्यक आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

0000

समितीच्या माध्यमातून थेट मत मांडण्याची संधी – अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

 समितीच्या माध्यमातून थेट मत मांडण्याची संधी – अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

विधिमंडळ समितीमार्फत विधिमंडळाचे काम करण्याची संधी लोक प्रतिनिधींना  मिळते. आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याची आणि एखाद्या विषयाला न्याय देण्याची संधी उपलब्ध होते.तसेच शासनाला यासंदर्भात जाब विचारण्याची ताकत सुध्दा समितीच्या कामकाजात आहे, असे मत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. एम

शासन आणि प्रशासनात विधिमंडळ समित्यांचे कामकाज महत्वाच

 शासन आणि प्रशासनात विधिमंडळ समित्यांचे कामकाज महत्वाच

- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

"विधानमंडळ समित्यांचे कामकाज सुरळीत व योग्य पद्धतीने चालले पाहिजे. समित्यांची भूमिका आणि त्यांचे योगदान हे अधिवेशन कालावधीतील कामकाजा इतकेच शासन आणि प्रशासनात महत्त्वाचे आहे. भारताने संसदीय लोकशाहीची मूल्ये अंगिकारली असूनगुणवत्तेच्या कसोटीवर आपली लोकशाही अजूनही अबाधित आहे. विधिमंडळ समित्या विशिष्ट विषयांचा तपशीलवार अभ्यास करतात आणि सूचना व शिफारशी देतात. या शिफारशी अधिवेशनात मांडल्या जातात व त्यावर आधारित निर्णय घेतले जातात. त्यामुळे समित्यांचा उपयोग प्रशासन आणि शासन निर्णय प्रक्रियेत प्रभावीपणे होत असतो. या वर्षी २९ समित्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे सर्व सदस्यांनी समित्यांचे कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडावेअशी अपेक्षा व्यक्त करून सदस्यांना उत्तम कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत विधानमंडळ समित्यांचे स्थान मोलाचे

 योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत

विधानमंडळ समित्यांचे स्थान मोलाचे


— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


विधानमंडळ समित्या प्रशासन समजून घेण्यासाठी उत्तम व्यवस्था

विधानमंडळ विविध समित्यांचे उद्घाटन

 


मुंबई, दि. १९ : विधानसभा आणि विधानपरिषद कामकाजात तसेच शासनाच्य विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत विधानमंडळ समित्यांचे स्थान मोलाचे आहे. विधिमंडळ समित्या संसदीय लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे. या समित्यांना कार्य करताना विशेष अधिकार प्राप्त असतात. प्रशासन समजून घेण्यासाठी आणि कामकाजाचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी विधिमंडळ समित्या ही एक उत्तम व्यवस्था आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


सन २०२४-२५ या वर्षासाठी गठीत करण्यात आलेल्या विधिमंडळ समित्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री ॲड.आशीष जयस्वाल, विविध समित्यांचे प्रमुख, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानमंडळाचे कामकाज केवळ सभागृहातच चालत नाही, तर समित्यांच्या माध्यमातूनही चालत असते. सभागृहामध्ये वेळेचे बंधन असल्यामुळे अनेकदा एखाद्या विषयावर सखोल चर्चा करता येत नाही. अशा वेळी समित्या त्या विषयाचा सखोल अभ्यास करून संबंधित विषयाला न्याय देतात. ज्यावेळी कॅगचा अहवाल विधानमंडळासमोर मांडला जातो. त्यामध्ये लेखापरीक्षण व निरीक्षणे नोंदवलेली असतात. अशावेळी संबंधित विभागांच्या सचिवांकडून माहिती मागवली जाते, सत्यता तपासली जाते आणि त्यानंतर अंतिम अहवाल सभागृहात सादर केला जातो.


विनंती अर्ज समितीचे महत्त्व अधोरेखित करताना, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूर्वी या


समितीला काम नाही असे समजलं जायचे मात्र, मी स्वतः पहिला विनंती अर्ज नागपूरमध्ये पोलिसांचे शासकीय निवास, झोपडपट्टीतील लोकांना मालकी हक्काचे पट्टे, व ‘नॉन-क्रिमी लेयर’ची मर्यादा वाढविण्यासंदर्भात केला. या अर्जाच्या अहवालावर आधारित शासनाने पहिल्यांदा शासन निर्णय (जीआर) काढला आणि झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले. समित्यांमधील सदस्यांचा सहभाग शासन आणि विधिमंडळ यांना समृद्ध करतो. असे सांगून सर्वांना शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सर्व समित्यांचे प्रमुख व सदस्य यांचे अभिनंदन केले.

गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा

 गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा 

मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 मुंबईदि. १९ : गृहनिर्माण धोरणाच्या  माध्यमातून सर्वांसाठी घरे या संकल्पनेला प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. हे धोरण सर्वसमावेशक असणार असूनज्येष्ठ नागरिकनोकरदार महिलाविद्यार्थी आणि औद्योगिक कामगार यांसारख्या विविध समाजघटकांचा समावेश यात करण्यात आला आहे. प्रस्तावित गृहनिर्माण धोरणाचा  सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेगृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरमुख्य सचिव सुजाता सौनिकअपर मुख्य सचिव विकास खारगेगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहनगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता उपस्थित होते.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेराज्यातील वाढते शहरीकरण आणि घरांची वाढती मागणी लक्षात घेतासर्व समाजघटकांसाठी सुरक्षित व परवडणारी घरे या धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध होतील.

या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी गृहनिर्माण धोरणाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Monday, 19 May 2025

आपल्या आजारानुसार भाज्यांचे सेवन करा

 *श्री स्वामी समर्थ*🌹🙏


*✨ आपल्या आजारानुसार भाज्यांचे सेवन करा ✨*


आपल्या आजारानुसार भाज्यांचे सेवन करण्याचे महत्व अधिक जाणून घेऊया. 


*1. थायरॉईडचा शत्रू – मेथी*

मेथी हे थायरॉईडच्या समस्यांवर अत्यंत प्रभावी आहे. थायरॉईड हॉर्मोनच्या उत्पादनात असंतुलन निर्माण होणारे कारणे कमी करण्यासाठी मेथीच्या पिठाचा वापर केला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरात होणारे असंतुलन दूर करतात आणि थायरॉईड ग्रंथीच्या कार्यक्षमतेला मदत करतात.


*2. कब्जेचा नाश करणारी – भेंडी*

भेंडीमध्ये फायबर्सची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते, ज्यामुळे पचन क्रिया सुधारते आणि कब्जाचे निवारण होते. यातील लॅटेक्स आणि लहान तंतू पचन संस्थेवर चांगले परिणाम दाखवतात. त्यामुळे, भेंडीचे नियमित सेवन पोट साफ ठेवते.


*3. श्वसनाच्या तक्रारींचा बंदोबस्त – हळद टाकलेली फुलकोबी*

फुलकोबी आणि हळद यांचं संयोजन श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे. हळदमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे श्वसन संस्था साफ ठेवून श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी कमी करतात. फुलकोबी देखील फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते आणि श्वसन समस्यांवर उपचार करते.


*4. पचन सुधारणारी – कोथिंबीर*

कोथिंबीर पचन क्रियेतील अडचणी दूर करणारी एक महत्त्वाची जडी आहे. ती अँटीऑक्सिडंट्स आणि एंजाइम्सने भरपूर असते, जे पचन शक्तीला उत्तेजन देतात. याचे सेवन केल्याने गॅस, अपचन किंवा ऍसिडिटी सारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.


*5. सांधेदुखीवर रामबाण – आलं* टाकलेला परवल

आलं आणि परवल यांचं संयोजन सांधेदुखीसाठी अत्यंत लाभकारी आहे. आलंतील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण सांधेदुखीवर आराम देतात आणि परवल पचनतंत्रासाठी चांगला आहे. हे दोन्ही मिळून सांधेदुखीवर प्रभावी उपचार म्हणून कार्य करतात.


*6. डोळ्यांचा रक्षक – कोबी*

कोबीमध्ये व्हिटॅमिन A आणि C यांचे मोठे प्रमाण असते, जे डोळ्यांची आरोग्यवर्धक भूमिका निभावतात. या भाजीत असलेले अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांना हानीकारक अंशांपासून वाचवतात आणि दृष्टिदोष कमी करण्यास मदत करतात.


*7. मूत्रविकारांवर उपयुक्त – गिलकी (निंबोळी तुरई)*

गिलकी मूत्रपिंडाच्या कार्यावर उत्तम परिणाम करते. ती मूत्रविकार, अश्रुपात आणि मूत्र मार्गातील संसर्ग कमी करण्यास मदत करते. यामध्ये असलेल्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे मूत्रपिंड स्वच्छ राहतात.


*8. चरबी कमी करणारी – टोमॅटोचा रस*

टोमॅटोचा रस शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करतो. यामध्ये लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलला कमी करण्यास मदत करतात. यामुळे शरीरात चरबी घटते आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारते.


*9. रक्तदाब संतुलित ठेवणारी – तोंडली*

तोंडलीमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. यातील फायबर्स आणि पोषणतत्त्वे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याची असतात. रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी तोंडली नियमितपणे खावी.


*10. रक्तशुद्धी करणारी – लाल भोपळा*

लाल भोपळा रक्तशुद्धी करण्यासाठी उत्तम आहे. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्ध करतात. याचा नियमित वापर केल्याने त्वचा, हृदय आणि पचनसंस्था देखील फायदेशीर ठरतात.


हे भाज्यांचे सेवन आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने त्यांचा वापर आपली आरोग्य स्थिती सुधारू शकतो. 

🌱🌿☘️🌱🌿☘️🌱🌿


*माहिती आवडली तर ईतर ग्रुपवर शेअर करा 📲

मुलींसाठी अहिल्या नगरला उभारणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 मुलींसाठी अहिल्या नगरला उभारणार 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 

अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणारे आवश्यक २७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची १२ अशा एकूण ३९ पदांना मान्यता देण्यात आली. या पदासाठी आवश्यक वेतनासाठी दरवर्षी २३२.०१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चासाठीही मान्यता देण्यात आली. या पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यासही आज मंजुरी देण्यात आली. संस्थेकरिता आवश्यक यंत्रसामग्रीहत्यारे आणि इतर खर्च यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात अकरा कोटी ऐंशी लाख एकोणीस हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

००००


 


Featured post

Lakshvedhi