Monday, 12 May 2025

एल.एन.जी. इंधनावर २० टक्के सुट

 एल.एन.जी. इंधनावर २० टक्के सुट

 

          एसटी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत केलेल्या करारानुसार एल.एन.जी.इंधन हे तत्कालीन डिझेल इंधनाच्या किमतीच्या २० सूट कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी २३५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

 

      राज्याभरात ९० ठिकाणी एल.एन.जी. चे पंप उभारले जाणार आहेत. तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सी.एन.जी. चे २० पंप उभारले जात आहेत. त्यामुळे भविष्यात इंधन पुरवठ्याची व्यवस्था होणार आहे. या दोन्ही इंधना सोबत डिझेल इंधनावर चालेल अशी हायब्रीड बसेस तयार करण्याचे प्रस्ताव बस मॅन्युफॅक्चर कंपन्याकडून मागविण्यात आले आहेत. भविष्यात एसटीच्या तफ्यात या दोन इंधनावर चालणाऱ्या हायब्रीड बसेस घेण्याचा एसटीचा मानस असल्याचे मंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले.

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर

 भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. ९ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन.२०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सी.एन.जी. व एल.एन.जी. सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रीड करून चालणाऱ्या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईलजेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते पर्यावरण पूरक इंधनाच्या संदर्भात बोलावलेल्या एसटी अधिकारी व संबंधित इंधन पुरवठादार संस्थांच्या बैठकीमध्ये बोलत होते.

मंत्री श्री.सरनाईक म्हणालेएसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चा पैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर होतो. दररोज सुमारे १० लाख ७० हजार लिटर इतके डिझेल लागते. वर्षाला सुमारे ३४ हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतो.

      भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता व वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेतापर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे. सी.एन.जी. आणि एल. एन. जी. हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेल पेक्षा स्वस्त असून पर्यावरण पूरक देखील आहेत. तसेच या इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रति लिटर ५-५.५ किलोमीटर अंतर कापते. डिझेल इंधनावर मात्र बस प्रति लिटर केवळ ४ किलोमीटर अंतर कापते. सहाजिकच एल.एन.जी. व सी एन.जी. इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुढील वर्षीपासून घेण्यात येणाऱ्या नव्या २० हजार बसेस हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या घेण्यात येणार आहेत.

प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासनः या वर्गवारीमध्ये www.mahanwans.org.

 प्रशासकीय नावीन्यताउत्कृष्टता व सुशासनः

या वर्गवारीमध्ये संकेतस्थळ सुरुः www.mahanwans.org. केंद्र शासनाशी सुसंवादः देशात सर्वोत्कृष्ट काम,  स्वच्छता उपक्रमः 2449 नस्त्यांचे निंदणीकरण व वर्गीकरण पूर्णतक्रार निवारणः "आपले सरकार" पोर्टलवरील 96% व "PG पोर्टल "वरील 98% तक्रारींचे निराकरण,  कार्यालयीन सुविधाः कार्यालयांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध,  ई-ऑफिस प्रणालीचा वापरः 100% अमलबजावणी,  प्रशिक्षण व AI वापरः सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापर,  CSR अंतर्गत आर्थिक सहकार्य: 30 जिल्ह्यांतील 2,33,664 लाभार्थ्यांना CSR माध्यमातून सहकार्य,  नाविन्यपूर्ण उपक्रम "सुकर जीवनमान" या अंतर्गत  १०० दिवसीय महा आवास अभियानामार्फत गतिमानता व गुणवत्ताबहुमजली इमारतीलैंड बैंकगृहसंकुलघरकुल मार्टडेमो हाऊससॅण्ड बैंककॉप शॉपनागरी सुविधाकॉर्पोरेट व अॅकेडेमिया सहभागनाविन्यपूर्ण उपक्रम कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणाः,  महाआवास पोर्टलहेल्पलाईन,  भूमिलाभ पोर्टल, "आवास मित्र" अॅप या कामांचा समावेश आहे.

                             कार्यप्रदर्शनामागील व्यवस्थापनाची सामूहिक ताकद

उल्लेखनीय यशामागे केवळ सांख्यिकीय प्रगती नसूनराज्यातील लाखो पात्र लाभार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. राज्यजिल्हातालुका व ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण समर्पणप्रभावी समन्वय व कार्यक्षम अंमलबजावणीमुळे ही प्रगती शक्य झाली असल्याचे  ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाची उल्लेखनीय कामगिरी

 शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाची

 उल्लेखनीय कामगिरी

मुंबई,दि.9:  शासनाच्या 100 दिवसीय कार्यक्रमाअंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने उत्कृष्ट गुणवत्ता व कार्यक्षमतेने काम पूर्ण करून राज्यातील सर्व आयुक्तालये व संचालनालये यांच्या गटामध्ये राज्यामध्ये सहाव्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे.

ही कामगिरी  मुख्यमंत्री,  ग्रामविकास व पंचायतराज मंत्रीतसेच . प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या मार्गदर्शनाखालीतसेच विभागातील संपूर्ण प्रशासन यंत्रणेच्या एकात्मिकउद्दिष्टाभिमुख व लोकसहभागावर आधारित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे विभागाने कळविले आहे.

QCI (Quality Council of India), नवी दिल्ली यांनी केलेल्या प्रत्यक्ष स्थळपाहणी व मूल्यांकनामध्ये ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने समाधानकारक प्रगती दर्शवली असूनराज्यस्तरीय मानांकनात विशेष उल्लेखनीय स्थान प्राप्त केले आहे.

 (अ) कार्यक्रम अंमलबजावणीतील प्रमुख घटकः

 

1 घरकुलांना मंजूरी: 13,60,084 घरकुलांना मंजुरी देण्यात आली ( उद्दिष्टाच्या 104.6% पूर्तता)

2. पहिला हप्ता वितरणः 12,85,553 लाभार्थ्यांना ₹2062.06 कोटी वितरीत ( 428.5% पूर्तता)

3. भौतिक पूर्तता (पूर्ण बांधलेली घरकुले): 1,48,542 घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण (148.5% पूर्तता)

4. भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्धताः23,333 लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा प्रदान ( 466.7% पूर्तता)

5. महा आवास अभियान राज्यभर 10 उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी ( नियोजनबद्ध आणि सुसंगत अंमलबावणी)

मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाची माहिती :

 मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमुंबईकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मेट्रोमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मेट्रोमुळे या मार्गावरील सुमारे चार ते पाच लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन व वेळेची बचत होणार आहे. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबईत उभारण्यात येत आहे. नागरिकांची गरज ओळखून कामे होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील 50 टक्के वाहने कमी होतील. त्यामुळे महामुंबईकरांसाठी मेट्रो प्रकल्प वरदान ठरणार आहे.

 

टप्पा 2 अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाची माहिती :

- स्थानकांची संख्या - 6 (सर्व भूमिगत)

- अंतर – 9.77 किमी

- हेडवे - 6 मि 20 सेकंद

- तिकिटाचे दर - किमान भाडे रु. १०/-कमाल भाडे रु. ४०/-

- गाड्यांची संख्या - ८

- प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)- १५ मिनिटे २० से

- फेऱ्यांची संख्या - २४४ फेऱ्या

- प्रवास वेळ आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक- ३६ मी

- तिकिट दर आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक किमान भाडे रु. १०/-कमाल भाडे रु. ६०/-

- एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) २०८

- एकूण उद्वाहक (लिफ्ट) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) - ६७

कनेक्टिविटी

बीकेसीवरळी यांसारख्या बिझनेस हब्सना जोडले जाणार आहे. बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग 2 बी आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार असून त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. सिद्धिविनायक मंदिरमाहीम दर्गा आणि माहीम चर्च यासारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्करवींद्र नाट्य मंदिरशिवाजी मंदिरयशवंत नाट्य मंदिरप्लाझा सिनेमा यासारखी मनोरंजनाची ठिकाणे देखील या मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहेत.

००००

सिंगल प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवा मिळणार

 सिंगल प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवा मिळणार

मेट्रोबेस्टलोकल या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी सिंगल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यातून प्रवाशांना एकाच तिकीटावर प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत हा प्रयोग सुरू करण्यात येणार असून त्यानंतर महामुंबईतही ही सेवा देण्यात येणार आहे. सध्या यावर प्रायोगिक तत्वावर काम सुरू असून लवकरच त्याचा व्यावसायिक वापर सुरू होईल. यामुळे नागरिकांना मुंबई तसेच महामुंबई परिसरात सुलभपणे प्रवास करता येईलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बेस्टने कालच गुगल सेवेबरोबर सांमजस्य करार केला आहे. यापुढे बेस्टच्या बसेसचे रिअल टाईम लोकेशन गुगलवर मिळणार असून या ठिकाणी प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजनही करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार

 मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रोचा मार्ग मिठी नदीच्या खालून जात आहे. त्याचप्रमाणे गिरगाव सारख्या गर्दीच्या ठिकाणीही मेट्रोचे काम सुरळीत झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील दोन स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंतच्या मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मार्गावर प्रवाशांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून प्रत्येक स्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेश मार्ग असल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच मेट्रो मार्ग हे प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक आहेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. याद्वारे मुंबईकर तसेच महामुंबईतील नागरिकांसाठी सुलभ व अखंड परिवहन जोडणी (सिमलेस ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी 50 कि.मी. तर पुढील वर्षी आणखी 50 कि.मी. मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा मानस आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi