Monday, 12 May 2025

मुंबई मेट्रोचा प्रवास सुसाट; बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाचे लोकार्पण मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

 मुंबई मेट्रोचा प्रवास सुसाटबीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाचे लोकार्पण

मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 9 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानका दरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुंबई मेट्रो लाईन-3 (फेज 2अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी स्थानकातून हिरवी झेंडी दाखवून केला. त्यानंतर मान्यवरांनी बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटला. यावेळी जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी सानप्रभारी मुख्य सचिव राजेश कुमारबृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीमुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मेट्रोच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले कीकुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी  या 13 कि.मी. मार्गाचे लोकार्पण 7 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. आता फेज 2अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा उद्यापासून नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत 22 कि.मी. मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असून मेट्रो तीनचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. येत्या ऑगस्टमध्ये मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचा मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रो 3 मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे.

जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य

 जातपंथधर्म विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य

 संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. संतांची ही मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. जातपंथधर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो. वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे.

भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही तर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. संत परंपरेमुळेत्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती मिळत नाही. या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

वारीमध्ये स्वयंशिस्त असतेवारी करणाऱ्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो. गितेतला विचार वारीद्वारे रुजविण्याचा प्रयत्न होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी गितेतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून मांडला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाविताना ज्ञानेश्वरी ग्रंथ उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यात आलाअसेही श्री. फडणवीस म्हणाले. अशा अध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून विचारांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या 'नमो ज्ञानेश्वराया ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000

 

जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार

 जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 पुणेदि. 10 : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईलअशी घोषणा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकरआमदार उमा खापरेशंकर जगतापबाबाजी काळेप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजनविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपोलीस आयुक्त विनयकुमार चौबेपिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंहपीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीश्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमापडॉ. भावार्थ देखणेयोगी निरंजन नाथॲड. रोहणीताई पवारपुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानाही असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह 39 गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छनिर्मळ आणि पुजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईलअशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.

ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन करण्याची संधी मिळाली अशी भावना व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेदेशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचारसंस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणाच्यावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

 

मुंबईदि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या अर्हता प्राप्त उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

दि. ४ मार्च ते ९ मे २०२५ या कालावधीत नवी मुंबई केंद्रावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यानंतर आयोगाने सदर यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही यादी तात्पुरती असूनअंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र पडताळणी अंती उमेदवारांच्या गुणवत्ताक्रमात बदल होऊ शकतो किंवा काही उमेदवार अपात्र ठरू शकतात.

 

या यादीवर अंतिम निर्णय विविध न्यायप्रकरणांवरील न्यायालयीन निकालांवर अवलंबून असेल. उमेदवारांनी आपला पद पसंतीक्रम दिनांक १० ते १६ मे २०२५ दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन सुविधेमार्फत नोंदवणे आवश्यक आहे.

 

उमेदवारांनी पसंतीक्रम नोंदवताना आयोगाने अधिसूचित केलेल्या सात संवर्गांपैकी निवड करावीअन्यथा 'No Preference' विकल्प निवडावा. एकदा सादर केलेला पसंतीक्रम कालावधी नंतर बदलता येणार नाही. तसेचपसंतीक्रम नोंदवले नसल्यास उमेदवारांच्या शिफारशीचा  विचा केला जाणार नाही.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – प्रवेशपत्र उपलब्ध*

 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – प्रवेशपत्र उपलब्ध*

 

            मुंबई१० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) रविवारदिनांक १८ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेदवारांना ही प्रमाणपत्रे https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर त्यांच्या खात्यात लॉगिन करून डाउनलोड करता येतील.

 

परीक्षेसंदर्भातील सर्व सूचना व मार्गदर्शक तत्त्वे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असूनउमेदवारांनी त्या काटेकोरपणे पाळाव्यात. सूचनांचे उल्लंघन केल्यास आयोग उमेदवारावर प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो. प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करण्यात अडचण असल्यास उमेदवारांनी contact-secretary@mpsc.gov.in किंवा support-online@mpsc.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा अथवा ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२ या क्रमांकांवर आवश्यक ती मदत मिळवता येईल असे आयोगाने कळविले आहे.

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 – प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध

 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 – प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध

 

            मुंबई 10: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारदिनांक 18 मे 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी पात्र उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

 

निर्धारित वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. आयोगाने संकेतस्थळावर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक असून त्यांचे उल्लंघन केल्यास उमेदवारावर कारवाई होऊ शकते. प्रवेश प्रमाणपत्र मिळविताना अडचण आल्यास उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत ईमेल किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग

संपर्क: contact-secretary@mpsc.gov.in

 दूरध्वनी क्र. ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२

वेबसाइट: https://mpsc.gov.in | https://mpsconline.gov.in

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर भेट द्यावे

धरण, गाळयुक्त शिवार' योजनेद्वारे जलसंधारण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून 'गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवारयोजनेद्वारे

जलसंधारण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल

मुंबईदि.८ : राज्यातील जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतीला पोषण देणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतला ‘गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार’ ही योजना  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विकासाचे नवे पर्व घडवते आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे धरणांत साचलेल्या गाळाचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर शिवारांमध्ये करणे. परिणामीजलसाठ्याची क्षमता वाढवली जाते आणि गाळातील पोषणमूल्ययुक्त माती शेतजमिनीत वापरून जमिनीची सुपीकता सुधारली जाते. ही योजना विशेषतः अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे

Featured post

Lakshvedhi