Sunday, 11 May 2025

जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार

 जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 पुणेदि. 10 : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईलअशी घोषणा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकरआमदार उमा खापरेशंकर जगतापबाबाजी काळेप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजनविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपोलीस आयुक्त विनयकुमार चौबेपिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंहपीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीश्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमापडॉ. भावार्थ देखणेयोगी निरंजन नाथॲड. रोहणीताई पवारपुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानाही असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह 39 गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छनिर्मळ आणि पुजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईलअशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.

ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन करण्याची संधी मिळाली अशी भावना व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेदेशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचारसंस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणाच्यावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे.

सर्व निवृत्ती धारकांनी सूचना

 


गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेद्वारे जलसंधारण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल,अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना

 गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवारयोजनेद्वारे

जलसंधारण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल

 

मुंबईदि.८ : राज्यातील जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतीला पोषण देणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतला ‘गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार’ ही योजना  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विकासाचे नवे पर्व घडवते आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे धरणांत साचलेल्या गाळाचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर शिवारांमध्ये करणे. परिणामीजलसाठ्याची क्षमता वाढवली जाते आणि गाळातील पोषणमूल्ययुक्त माती शेतजमिनीत वापरून जमिनीची सुपीकता सुधारली जाते. ही योजना विशेषतः अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणेबंधारे आणि तलावांमधील गाळ काढून त्या परिसरातील जमिनीवर टाकला जातो.शासन त्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपीकता वाढते आणि पाणी साठवण क्षमता देखील सुधारते. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे मर्यादित संसाधने असतातत्यामुळे त्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीच्या योग्य वापरामुळे थेट फायदा होतो. शासनाचा उद्देशही शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे हाच आहे. त्यामुळे ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त ठरत आहे.

१ एप्रिल २०२४ ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात १२७४ एकूण ६६.९१ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होतेत्यापैकी ४२.२९ कोटी घनमीटर गाळाचे उत्खनन पूर्ण झाले असूनहे लक्ष्याच्या ६३ टक्के इतके आहे. ही भरघोस कामगिरी प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शक्य झाली आहे

सर्व कामे दर्जेदार व्हावीत

 सर्व कामे दर्जेदार व्हावीत- चंद्रशेखर बावनकुळे

कामठी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत व्यावसायिक पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे. येथे 7 हजार कंत्राटी कामगारांसाठी घरे बांधण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने हे काम हाती घेऊन हा प्रकल्प तातडीने सुरू करावाअसे निर्देश पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. शासकीय मुद्रणालयाच्या जागेचाही पुनर्विकास करण्यात येणार असून तेथे मुद्रणालयासह अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयासाठी जागा देण्यात येईलअसे त्यांनी सांगितले. नागपूर शहराच्या विकासाची सर्वच कामे दर्जेदार व्हावीतअसे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले.

            नागपूर शहरातील ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प येथे परफॉर्मन्स गॅलरी तयार करण्यात येणार आहे. येथे अकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्ट तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 20 हजार चौ.मीटरच्या या जागेत 6.2 लाख चौ.फुट जागेच्या विकासाला परवानगी मिळाली असून यातील 1.2 लाख चौ.फुट जागेत सभागृह बांधण्यात येईलतसेच उर्वरित जागेत इतर सोयी सुविधा तयार करण्यात येतीलअशी माहिती यावेळी देण्यात आली.

            नागपूर शहराचे कारागृह कामठी तालुक्यातील बाबुलखेडाजवळ 81.6 एकर जागेत तयार करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामासाठी पालघरतळोजा व दिल्ली येथे बांधलेल्या कारागृहाच्या आर्किटेक्टशी सल्लामसलत करुन जेल मॅन्युअलनुसार कार्यवाही करण्यात यावीतसेच जेल सदनिका बांधण्यात याव्यात असे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

 

शहरातील मोरभवन आणि गणेशपेठ येथील बसस्टँडच्या पुनर्विकासाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मोरभवन येथे शहर बससेवा आणि खासगी बस यांच्यासाठी तर गणेशपेठ येथे एसटी महामंडळाच्या बस आणि शहर बस यांच्यासाठी सुविधा निर्माण करुन पुनर्विकास करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. याचबरोबर डिक दवाखानाकॉटन मार्केटदहीबाजारइतवारी बाजारनेताजी मार्केटसंत्रा मार्केट आदी परिसरांचा विकास करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

नवीन नागपूर’ या दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पास तत्वतः मान्यता

 नवीन नागपूर’ या दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पास तत्वतः मान्यता

नवीन नागपूर’ या दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पास या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली. हा प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) यांचाद्वारे संकल्पित करण्यात आला आहे. एनएमआरडीएच्या हद्दीत हे शहर होणार असून यात स्टार्टअप्सएमएसएमईतंत्रज्ञान कंपन्या व आंतरराष्ट्रीय सेवा प्रदात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. या भागातील पहिलीच अशी अत्याधुनिक भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली ही या शहरातील मुख्य वैशिष्ट्य असेल. प्लग-अँड-प्ले मॉडेलवर आधारित ही प्रणाली डिस्ट्रिक्ट कूलिंगस्वयंचलित कचरा व्यवस्थापनवीजपाणीवायू व टेलिकॉम यांसारख्या सर्व मूलभूत नागरी सुविधा एकत्रितपणे पुरवेल. खोदकामविरहित व भविष्यातील गरजांना अनुकूल असे शहर साकारले जाईल. या प्रकल्पामुळे आयटीवित्त व सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असूनएकात्मिक पायाभूत सुविधागुंतवणूक सुलभता व मजबूत प्रशासन मॉडेल यांच्या जोरावर हे शहर नागपूरच्या आर्थिक महत्त्वाला नव्याने परिभाषित करेलअशी माहिती एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी यावेळी दिली.

            या बैठकीस नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्तासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकरमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.गोविंदराजगृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगीमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीउद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बळगनअन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगलमहाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासुमहाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितनागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त संजय मीनानागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजत चौधरीनागपूर जिल्हाधिकारी बिपीन इटनकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश ---- ‘झिरो माईल’ होणार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

 नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

----

झिरो माईल’ होणार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

 

मुंबईदि. 8 – नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प येथे परफार्मन्स गॅलरीझिरो मॉईल सुशोभिकरणकॉटन मार्केट विकासफुल मार्केटकारागृह स्थलांतरण ही कामे महानगराच्या चौफेर विकासाला हातभार लावणारी आहेत. यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित कामे तत्काळ सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अखंड भारताचा केंद्रबिंदू असलेले झिरो माईल’ हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरावे अशा पद्धतीने त्या परिसराचा विकास करण्याची सूचना त्यांनी केली.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाशी संबंधित कामांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिवतसेच संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            नागपूर शहराच्या आणि अखंड भारताच्या केंद्रस्थानी असलेले झिरो माईल स्टोन येथे सध्या पर्यटक येताततथापि तेथे त्यांनी थांबावे यासाठी या परिसराचा विकास होणे आवश्यक आहे. यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या परिसरातील जागा राज्य शासनाच्या अखत्यारित असून येथे अखंड भारत कसा होता त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर केंद्रस्थानी कसे आले याबाबचा इतिहास दर्शविणारे एक्सपिरियन्स सेंटर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. एकूण 45 कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून संग्रहालयआवश्यक सोयी सुविधा आणि वाहनतळ तयार करण्यात येईलतसेच भविष्यात महानगरपालिकेमार्फत याची देखभाल दुरुस्ती केली जाईलअशी माहिती यावेळी देण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता व शिस्त रुजवावी

 विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमस्वच्छता व शिस्त रुजवावी

-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत

सिंगापूर अभ्‍यास दौरा : समृद्ध अनुभव’ चर्चासत्राचे आयोजन

 

मुंबईदि. ८ : सिंगापूरच्‍या शिक्षण प्रणालीमध्‍ये देशप्रेमाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्‍यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्‍कृष्‍ट नागरिक कसे घडतील याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले आहे. त्‍याप्रमाणेच आपण देखील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमस्वच्छता आणि शिस्त रुजवून ते भविष्‍यात सुजाण नागरिक घडतीलयावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. सिंगापूर अभ्‍यास दौऱ्यातील शिक्षकांच्‍या गटांने अभ्‍यासपूर्ण सादरीकरण केल्याबद्दल श्री.भुसे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणामध्ये होत असलेले विविध बदल तसेच राबविण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ४८ शिक्षकांचा अभ्यास दौरा नुकताच सिंगापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यामध्ये सहभागी शिक्षकांनी जाणून घेतलेल्या तेथील शिक्षण व्यवस्थेच्या अनुषंगाने केलेल्या अभ्यासाचे मुद्देनिहाय सादरीकरण शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित चर्चासत्रात करण्यात आले. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओलराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावारमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते.

प्रतिकूल परिस्थितीत समर्पित भावनेने मार्गक्रमण करणाऱ्या शिक्षक आणि संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून इतरांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावीअसे आवाहन श्री.भुसे यांनी केले. शिक्षक ज्‍या प्रयोजनासाठी सिंगापूरला गेले होतेतो हेतू साध्य झाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी करताना शासनाने शाळास्तरावर केवळ चार समित्‍या ठेवल्‍याची माहिती त्यांनी दिली.

प्रधान सचिव श्री.देओल म्हणालेसिंगापूरची शैक्षणिक व्यवस्था आणि आपल्या देशाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जवळपास सारखे असल्याचे दिसून येत असून शिक्षकांनी दैनंदिन अध्यापनात अनुभवात्मक शिक्षण पद्धतीचे प्रमाण वाढवावे. शिक्षण परिषदांमध्‍ये उपक्रमशील शिक्षकांनी इतर शिक्षकांना त्‍यांच्या शाळेत नवनवीन उपक्रम राबविण्‍यासाठी प्रेरित करावे. सिंगापूर अभ्‍यास दौऱ्यातील शिक्षकांच्‍या अनुभवानुसार आपल्‍या शैक्षणिक धोरणात बदल करण्याबाबत विचार केला जाईलअसे सांगून निपुण महाराष्‍ट्र अभियानाची उत्‍कृष्ट अंमलबजावणी केल्‍यास राष्ट्रीय संपादणूक पातळीत प्रगती दिसून येईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचा शिक्षण क्षेत्रातील वारसा राखण्‍यासाठी आपल्‍याला अध्‍ययन-अध्‍यापन पद्धतीत नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबवावे लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.रेखावार म्हणालेसिंगापूर अभ्‍यास दौऱ्याचे सादरीकरण अभ्‍यास दौऱ्यातील सर्व शिक्षकांना आपल्‍या शाळेत नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी उद्युक्‍त करेल. सिंगापूरच्‍या शिक्षण व्‍यवस्‍थेच्‍या धर्तीवर शिक्षकांनी आपल्‍या अध्‍यापनात बदल केल्‍यासत्‍याचे सकारात्‍मक दृश्‍य परिणाम नजिकच्‍या काळात दिसून येतीलअसे ते म्हणाले.

श्री.यादव यांनी प्रास्ताविकात नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धतीयशस्वी प्रशासकीय पद्धतीजागतिक स्तरावरील विविध सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकआर्थिकऐतिहासिकभौगोलिक वातावरण आदींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन नवीन दृष्टीकोन स्वीकारणेस्वत:च्या राज्यातजिल्ह्यातकार्यालयातशाळेत नवीन शैक्षणिक व प्रशासकीय बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे हा या सिंगापूर अभ्यास दौऱ्याचा उद्देश असल्याचे सांगितले. सिंगापूर अभ्यास दौऱ्याचे नेतृत्व करणाऱ्या सहायक संचालक श्रीमती सरोज जगताप यांनी दौऱ्यातील अनुभव कथन केले. उपसचिव तुषार महाजन यांनी सर्वांचे आभार मानले.

00000

Featured post

Lakshvedhi