Saturday, 10 May 2025

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

 

मुंबईदि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या अर्हता प्राप्त उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

दि. ४ मार्च ते ९ मे २०२५ या कालावधीत नवी मुंबई केंद्रावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यानंतर आयोगाने सदर यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही यादी तात्पुरती असूनअंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र पडताळणी अंती उमेदवारांच्या गुणवत्ताक्रमात बदल होऊ शकतो किंवा काही उमेदवार अपात्र ठरू शकतात.

 

या यादीवर अंतिम निर्णय विविध न्यायप्रकरणांवरील न्यायालयीन निकालांवर अवलंबून असेल. उमेदवारांनी आपला पद पसंतीक्रम दिनांक १० ते १६ मे २०२५ दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन सुविधेमार्फत नोंदवणे आवश्यक आहे.

 

उमेदवारांनी पसंतीक्रम नोंदवताना आयोगाने अधिसूचित केलेल्या सात संवर्गांपैकी निवड करावीअन्यथा 'No Preference' विकल्प निवडावा. एकदा सादर केलेला पसंतीक्रम कालावधी नंतर बदलता येणार नाही. तसेचपसंतीक्रम नोंदवले नसल्यास उमेदवारांच्या शिफारशीचा  विचा केला जाणार नाही.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – प्रवेशपत्र उपलब्ध*

 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – प्रवेशपत्र उपलब्ध*

 

            मुंबई१० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) रविवारदिनांक १८ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेदवारांना ही प्रमाणपत्रे https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर त्यांच्या खात्यात लॉगिन करून डाउनलोड करता येतील.

 

परीक्षेसंदर्भातील सर्व सूचना व मार्गदर्शक तत्त्वे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असूनउमेदवारांनी त्या काटेकोरपणे पाळाव्यात. सूचनांचे उल्लंघन केल्यास आयोग उमेदवारावर प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो. प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करण्यात अडचण असल्यास उमेदवारांनी contact-secretary@mpsc.gov.in किंवा support-online@mpsc.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा अथवा ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२ या क्रमांकांवर आवश्यक ती मदत मिळवता येईल असे आयोगाने कळविले आहे.

 

00000000

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 – प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध

 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 – प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध

            मुंबई 10: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक 18 मे 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी पात्र उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


 


निर्धारित वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. आयोगाने संकेतस्थळावर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक असून त्यांचे उल्लंघन केल्यास उमेदवारावर कारवाई होऊ शकते. प्रवेश प्रमाणपत्र मिळविताना अडचण आल्यास उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत ईमेल किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


 


 महाराष्ट्र लोकसेवा आयोग


संपर्क: contact-secretary@mpsc.gov.in


 दूरध्वनी क्र. ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२


वेबसाइट: https://mpsc.gov.in | https://mpsconline.gov.in


अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर भेट द्यावे.

शेतकऱ्यांच्या समृद्धीची गाथा,ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक आणि पर्यावरणीय उत्थानाचे प्रेरणास्थान

 शेतकऱ्यांच्या समृद्धीची गाथा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये या योजनेचा प्रारंभ करताना स्पष्ट केले होते कीही योजना केवळ गाळ काढण्यापुरती मर्यादित नाहीतर ती जलसंवर्धनजमिनीची सुपीकता आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीची गाथा आहे. आजत्यांच्या या दूरदृष्टीला राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद हे या योजनेचे यश अधोरेखित करतो.

ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक आणि पर्यावरणीय उत्थानाचे प्रेरणास्थान

राज्य शासनाने या योजनेसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असूनशेतकऱ्यांना संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभागी बनवले आहे. ‘गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार’ ही योजना आता केवळ जलसंधारण उपक्रम नसूनती ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक आणि पर्यावरणीय उत्थानाची प्रेरणास्थान बनली आहे.

0000

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना

 अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणेबंधारे आणि तलावांमधील गाळ काढून त्या परिसरातील जमिनीवर टाकला जातो.शासन त्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपीकता वाढते आणि पाणी साठवण क्षमता देखील सुधारते. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे मर्यादित संसाधने असतातत्यामुळे त्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीच्या योग्य वापरामुळे थेट फायदा होतो. शासनाचा उद्देशही शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे हाच आहे. त्यामुळे ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त ठरत आहे.

१ एप्रिल २०२४ ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात १२७४ एकूण ६६.९१ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होतेत्यापैकी ४२.२९ कोटी घनमीटर गाळाचे उत्खनन पूर्ण झाले असूनहे लक्ष्याच्या ६३ टक्के इतके आहे. ही भरघोस कामगिरी प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शक्य झाली आहे.

राज्य शासनाकडून २७८१.८ कोटी रुपये निधीची तरतूद

योजनेसाठी राज्य शासनाकडून २७८१.८ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असूनआतापर्यंत १५४९.९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये ३५,२०५ शेतकऱ्यांपैकी ३१,७१९ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असूनत्यांनी ३४.१७ कोटी घनमीटर गाळ काढला आहे. यासाठी १२२१.६ कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित असूनआतापर्यंत ५१२.४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ४६ टक्के वाढ

 बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ४६ टक्के वाढ

   सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसा 

            मुंबईदि१० डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी संस्थेत  मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहे. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहेअसे सामाजिक न्याय  मंत्री संजय शिरसा यांनी सांगितले.

            मंत्री शिरसा म्हणाले, वाढत्या महागाईमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेता ही वाढ अत्यंत आवश्यक होती. या निर्णयामुळे जात पडताळणी कार्यालयेबार्टी मुख्यालयउपकेंद्रे तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ या मागणीवर  समाधानकारक तोडगा निघाला आहेकर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी असल्याच भावना सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त करुन सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसा यांचे आभार मानले आहेत. 

0000


शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ब्लॉकचेन प्रणाली प्रभावी

 शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि

सुरक्षा वाढवण्यासाठी ब्लॉकचेन प्रणाली प्रभावी 

- बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ लौकिक रगजी

 

              मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो, ही तंत्रज्ञान प्रणाली शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे  बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ  लौकिक रगजी यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक"  मंत्रालयात आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ या विषयावर श्री. रगजी यांनी मार्गदर्शन केले.

ब्लॉकचेन’ ही संज्ञा मुख्यतः क्रिप्टोकरन्सी (जसे बिटकॉइन) संदर्भात वापरली जाते. ही तंत्रज्ञान प्रणाली माहिती सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने साठवण्यासाठी वापरली जात असल्याचे सांगून श्री. रगजी यांनी ब्लॉकचेनच्या मूलभूत तीन-चार संकल्पना समजावून सांगितल्या. तसेच प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व सुरक्षा वाढवण्यासाठी ब्लॉकचेन उपयुक्त ठरू शकतेअसे त्यांनी सांगितले.

 ‘प्रूफ ऑफ वर्क’ ही संकल्पना तशी कमी परिचित असलीतरी ती ब्लॉकचेनमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. जसे महसूल विभागामध्ये मालमत्ता नोंदवही असतेतसेच ब्लॉकचेनमध्ये व्यवहारांची माहिती साठवली जाते. ही माहिती जर चुकीने भरली गेलीतर ती ओळखणे शक्य होतेकारण प्रत्येक नोंदीची पडताळणी करण्याची यंत्रणा त्यामध्ये असते.

पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून ब्लॉकचेन ही विकेंद्रित प्रणाली आहेत्यामुळे केवळ एका व्यक्तीकडे नियंत्रण न राहता अनेक नोंदी सार्वजनिक स्वरूपात ठेवता येतात. यामुळे प्रणाली अधिक पारदर्शक बनते. प्रत्येक बदलासाठी प्रूफ ऑफ वर्क’ हे क्लिष्ट गणिती प्रमाणीकरण आवश्यक असल्यामुळेअनधिकृत बदल करणे जवळजवळ अशक्य होते,  असे त्यांनी सांगितले.

श्री. रगजी यांनी सांगितले कीब्लॉकचेनमध्ये कोण छेडछाड करतो हे शोधणे कठीण असलेतरी याबाबतचे संकेत लगेच समजतात. त्यामुळे ही तंत्रज्ञान प्रणाली शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा व्यवसायिक माहितीच्या सुरक्षिततेसाठी कसा वापर करता येतोयावर त्यांनी सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली.

यावेळी श्री. रगजी यांनी अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. स्वागत सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी केले.

Featured post

Lakshvedhi