Friday, 9 May 2025

समुदाय स्तरावरील उद्दिष्टे, कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन काम करावे

 समुदाय स्तरावरील उद्दिष्टे, कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन काम करावे

-         सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक

 

मुंबई, दि.9 : एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात समुदाय स्तरावरील उद्दिष्टे व कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांनी केले.

एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने ७ मे २०२५ रोजी नवी मुंबई येथे ‘NACP-V’ अंतर्गत कार्यशाळा आयोजित केली. भविष्यातील कार्यपद्धतीअडथळे आणि त्यावरचे उपाय यावर लक्ष केंद्रित करून पुढील वाटचालीचा नवा मार्ग आखण्यात आला.

राज्यातील सुविधास्तरावरील १४० अधिकारी आणि कर्मचारी ( वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीजिल्हा कार्यक्रम अधिकारीजिल्हा पर्यवेक्षकसामाजिक संस्थापार्टनर इ.) आणि ‘महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी’ चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यशाळेत मुख्य NACP-V अंतर्गत चालू असलेल्या व नियोजित उपक्रमांची स्थिती जाणून घेणे, त्या अनुषंगाने सेवांमध्ये करावयाच्या सुधारणा  याबाबत सर्व उपस्थितांचे मत जाणून घेण्यात आले. उपस्थितांना गटामध्ये विभागण्यात आले. प्रत्येक गटामध्ये आठ ते नऊ अधिकारी व कर्मचारी यांचे 17 गट बनविण्यात आले. गटचर्चा करतांना, एचआईव्ही /एड्स आजाराबाबत सादर करण्यात येणाऱ्या विविध रिपोर्ट्सची अचूकता, सद्यस्थिती, जोखीमग्रस्त कुणाला म्हणायचे तसेच गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी करावयाची कार्यवाही या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.  

एचआयव्ही/एड्सचा धोका कोणाला नाही किंवा असुरक्षित घटक कोण आहेत?, अंदाजे किती टक्के आरोग्य संस्थांमध्ये दर्जेदार एसटीआय / आरटीआय सेवा मिळतात?, किती टक्के एचआयव्ही सह जगणारे हे एआरटी पासून सुटतात?NACP-V अंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्राची प्रगती ० ते १० या मापदंडामध्ये किती झाली असे तुम्हाला वाटते?, एचआयव्हीसह जगत आहेत (एचआयव्ही पॉझिटिव्ह) परंतुआरोग्य यंत्रणेकडे त्याची नोंद नाही अशा लोकसंख्येचा अंदाजे आकडा किती आहे?,मुद्द्यांवर गटामध्ये चर्चा झाली त्यानंतर गटांचे सादरीकरण झाले.

या सादरीकरणामधून एचआयव्हीचा बदलता कल आणि वयोगट समजला. राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. मात्रअद्यापही काही क्षेत्रांमध्ये लोकांपर्यंत माहिती व सेवा पोहोचविण्याचे आव्हान कायम आहे. त्यामुळे ९५-९५-९५’ या राष्ट्रीय उद्दिष्टाकडे वाटचाल करताना  सुसंगत व सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

      कार्यशाळेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव डॉ. निपुण विनायकडॉ. सुनील भोकरेमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.विजय करंजकर आदी उपस्थित होते

परंपरा आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधणारा ‘टेक वारी’ उपक्रमाचा यशस्वी समारोप

 परंपरा आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधणारा

टेक वारी’ उपक्रमाचा यशस्वी समारोप

 

मुंबईदि. ९ : माऊली... माऊली... च्या जय घोषातटाळ-मृदंगाच्या नादात आणि हरिभक्तीच्या भक्तीरसात न्हालेल्या वातावरणात मंत्रालयात पार पडलेल्या  टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या अनोख्या उपक्रमाचा  सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप झाला.

यावेळी अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डीमहाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमलासंगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा आदी उपस्थित होते. राज्याचे प्रशासनातील मनुष्यबळ अधिक तंत्र कुशलगतिमान होण्यासाठी मंत्रालय व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 5 ते 9 मे दरम्यान सामान्य प्रशासन विभागामार्फत टेक वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी म्हणालेसद्यस्थितीत तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे आवश्यक ठरते. प्रशासकीय कामकाजात अचूकता आणि गतीमानता आणण्याबरोबरच कार्यप्रणालीत परिणामकारकता वाढविणेतसेच कामाच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन मिळावेया उद्देशाने टेक वारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त आर. विमला म्हणाल्याभविष्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि संवेदनशील करण्याच्या दृष्टीने टेक वारी’ उपक्रम हा महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. या उपक्रमातून केवळ नवतंत्रज्ञानाची ओळख नव्हेतर मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा मार्ग उघडण्यात आला आहे.

डॉ. संध्या पुरेचा म्हणाल्यातंत्रज्ञानाचा स्वीकार जितका आवश्यक आहेतितकेच संस्कृतीचे संवर्धनही महत्त्वाचे आहे. मातृभाषाकला आणि परंपरेच जतन करा, टेक वारी’ उपक्रमातून याच संतुलनाचा संदेश देण्यात आला आहे.

टेक वारी’ उपक्रमात प्रशासनाच्या डिजिटल परिवर्तनाची दिशा दाखवणाऱ्या विविध विषयांवर तज्ज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ब्लॉकचेन’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘सायबर सुरक्षा’, ‘डिजिटल फायनान्स’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक’ यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर आधारित सत्रांमधून सहभागी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना समृद्ध माहिती मिळाली. या तांत्रिक विषयांचे सुलभ व समजण्यायोग्य पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. तज्ज्ञांनी आपल्या सादरीकरणातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईलयाची दिशा दाखवली आहे.

एल.एन.जी. इंधनावर २० टक्के सुट

 एल.एन.जी. इंधनावर २० टक्के सुट

 

          एसटी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत केलेल्या करारानुसार एल.एन.जी.इंधन हे तत्कालीन डिझेल इंधनाच्या किमतीच्या २० सूट कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी २३५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

 

      राज्याभरात ९० ठिकाणी एल.एन.जी. चे पंप उभारले जाणार आहेत. तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सी.एन.जी. चे २० पंप उभारले जात आहेत. त्यामुळे भविष्यात इंधन पुरवठ्याची व्यवस्था होणार आहे. या दोन्ही इंधना सोबत डिझेल इंधनावर चालेल अशी हायब्रीड बसेस तयार करण्याचे प्रस्ताव बस मॅन्युफॅक्चर कंपन्याकडून मागविण्यात आले आहेत. भविष्यात एसटीच्या तफ्यात या दोन इंधनावर चालणाऱ्या हायब्रीड बसेस घेण्याचा एसटीचा मानस असल्याचे मंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले.

0000

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर

 भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक


 


मुंबई, दि. ९ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन.२०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सी.एन.जी. व एल.एन.जी. सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रीड करून चालणाऱ्या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते पर्यावरण पूरक इंधनाच्या संदर्भात बोलावलेल्या एसटी अधिकारी व संबंधित इंधन पुरवठादार संस्थांच्या बैठकीमध्ये बोलत होते.


मंत्री श्री.सरनाईक म्हणाले, एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चा पैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर होतो. दररोज सुमारे १० लाख ७० हजार लिटर इतके डिझेल लागते. वर्षाला सुमारे ३४ हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतो.


      भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता व वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेता, पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे. सी.एन.जी. आणि एल. एन. जी. हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेल पेक्षा स्वस्त असून पर्यावरण पूरक देखील आहेत. तसेच या इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रति लिटर ५-५.५ किलोमीटर अंतर कापते. डिझेल इंधनावर मात्र बस प्रति लिटर केवळ ४ किलोमीटर अंतर कापते. सहाजिकच एल.एन.जी. व सी एन.जी. इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुढील वर्षीपासून घेण्यात येणाऱ्या नव्या २० हजार बसेस हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या घेण्यात येणार आहेत.

प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासनः

 प्रशासकीय नावीन्यताउत्कृष्टता व सुशासनः

या वर्गवारीमध्ये संकेतस्थळ सुरुः www.mahanwans.org. केंद्र शासनाशी सुसंवादः देशात सर्वोत्कृष्ट काम,  स्वच्छता उपक्रमः 2449 नस्त्यांचे निंदणीकरण व वर्गीकरण पूर्णतक्रार निवारणः "आपले सरकार" पोर्टलवरील 96% व "PG पोर्टल "वरील 98% तक्रारींचे निराकरण,  कार्यालयीन सुविधाः कार्यालयांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध,  ई-ऑफिस प्रणालीचा वापरः 100% अमलबजावणी,  प्रशिक्षण व AI वापरः सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापर,  CSR अंतर्गत आर्थिक सहकार्य: 30 जिल्ह्यांतील 2,33,664 लाभार्थ्यांना CSR माध्यमातून सहकार्य,  नाविन्यपूर्ण उपक्रम "सुकर जीवनमान" या अंतर्गत  १०० दिवसीय महा आवास अभियानामार्फत गतिमानता व गुणवत्ताबहुमजली इमारतीलैंड बैंकगृहसंकुलघरकुल मार्टडेमो हाऊससॅण्ड बैंककॉप शॉपनागरी सुविधाकॉर्पोरेट व अॅकेडेमिया सहभागनाविन्यपूर्ण उपक्रम कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणाः,  महाआवास पोर्टलहेल्पलाईन,  भूमिलाभ पोर्टल, "आवास मित्र" अॅप या कामांचा समावेश आहे.

शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाची उल्लेखनीय कामगिरी

 शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयची 

 उल्लेखनीय कामगिरी


मुंबई,दि.9: शासनाच्या 100 दिवसीय कार्यक्रमा' अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने उत्कृष्ट गुणवत्ता व कार्यक्षमतेने काम पूर्ण करून राज्यातील सर्व आयुक्तालये व संचालनालये यांच्या गटामध्ये राज्यामध्ये सहाव्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे.


ही कामगिरी मुख्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, तसेच . प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विभागातील संपूर्ण प्रशासन यंत्रणेच्या एकात्मिक, उद्दिष्टाभिमुख व लोकसहभागावर आधारित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे विभागाने कळविले आहे.


QCI (Quality Council of India), नवी दिल्ली यांनी केलेल्या प्रत्यक्ष स्थळपाहणी व मूल्यांकनामध्ये ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने समाधानकारक प्रगती दर्शवली असून, राज्यस्तरीय मानांकनात विशेष उल्लेखनीय स्थान प्राप्त केले आहे.


 (अ) कार्यक्रम अंमलबजावणीतील प्रमुख घटकः


 


1 घरकुलांना मंजूरी: 13,60,084 घरकुलांना मंजुरी देण्यात आली ( उद्दिष्टाच्या 104.6% पूर्तता)


2. पहिला हप्ता वितरणः 12,85,553 लाभार्थ्यांना ₹2062.06 कोटी वितरीत ( 428.5% पूर्तता)


3. भौतिक पूर्तता (पूर्ण बांधलेली घरकुले): 1,48,542 घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण (148.5% पूर्तता)


4. भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्धताः23,333 लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा प्रदान ( 466.7% पूर्तता)


5. महा आवास अभियान राज्यभर 10 उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी ( नियोजनबद्ध आणि सुसंगत अंमलबावणी)

मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमुंबईकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मेट्रोमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मेट्रोमुळे या मार्गावरील सुमारे चार ते पाच लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन व वेळेची बचत होणार आहे. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबईत उभारण्यात येत आहे. नागरिकांची गरज ओळखून कामे होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील 50 टक्के वाहने कमी होतील. त्यामुळे महामुंबईकरांसाठी मेट्रो प्रकल्प वरदान ठरणार आहे.

 

टप्पा 2 अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाची माहिती :

- स्थानकांची संख्या - 6 (सर्व भूमिगत)

- अंतर – 9.77 किमी

- हेडवे - 6 मि 20 सेकंद

- तिकिटाचे दर - किमान भाडे रु. १०/-कमाल भाडे रु. ४०/-

- गाड्यांची संख्या - ८

- प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)- १५ मिनिटे २० से

- फेऱ्यांची संख्या - २४४ फेऱ्या

- प्रवास वेळ आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक- ३६ मी

- तिकिट दर आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक किमान भाडे रु. १०/-कमाल भाडे रु. ६०/-

- एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) २०८

- एकूण उद्वाहक (लिफ्ट) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) - ६७

कनेक्टिविटी

बीकेसीवरळी यांसारख्या बिझनेस हब्सना जोडले जाणार आहे. बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग 2 बी आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार असून त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. सिद्धिविनायक मंदिरमाहीम दर्गा आणि माहीम चर्च यासारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्करवींद्र नाट्य मंदिरशिवाजी मंदिरयशवंत नाट्य मंदिरप्लाझा सिनेमा यासारखी मनोरंजनाची ठिकाणे देखील या मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहेत.

Featured post

Lakshvedhi