Thursday, 8 May 2025

मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत प्रभावी माध्यम

 मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत प्रभावी माध्यम

-         डॉ. संतोष बोराडे

 

मुंबईदि. ८ : मानवाच्या मानसिकभावनिक आणि शारीरिक आरोग्यावर संगीताचा सकारात्मक परिणाम होतोहे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहताकार्यक्षमतेत वाढमानसिक शांतता आणि आरोग्यवर्धनासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असे जीवनसंगीत समर्थक डॉ. संतोष बोराडे यांनी सांगितले.

 

टेक-वारी कार्यक्रमांतर्गत मंत्रालयात 'जीवन संगीतया विषयावर डॉ. संतोष बोराडे यांचे व्याख्यान झाले.

 

डॉ. संतोष बोराडे म्हणालेतंत्रज्ञान म्हणजे केवळ यंत्र नाहीतर जीवन जगण्याची आधुनिक पद्धती आहे. छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेतल्यास जीवन अधिक सुलभ आणि आनंददायी होऊ शकत. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात सतत अद्ययावत राहणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे हे जिवंतपणाच लक्षण आहे.

 

संगीतामध्ये माणसाचे आयुष्य बदलण्याची ताकद असते. चांगले संगीत मनाला उभारी देतेविचारशक्ती प्रगल्भ करते आणि नातेसंबंधांमध्ये सौहार्द निर्माण करते. अनेकवेळा जीवनातील तणावनैराश्यकिंवा अडचणींच्या वेळी संगीतच माणसाला मानसिक आधार देते.

 

डॉ. बोराडे यांनी या सत्रात ओव्यागीत आणि संगीताच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल उपस्थितांशी संवाद साधला. तंत्रज्ञान हे सतत अद्ययावत राहण्याची प्रक्रिया आहे. रोज काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती अंगीकारलीतर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्ही समृद्ध होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

धोरणात्मक अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

 धोरणात्मक अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

      नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळातुळजापूर मंदिर संस्थानवाळू उत्खनन आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांसारख्या प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करण्यात आला याचे उदाहरणे दिली. जीआयएसपिंग काउंटजन स्वास्थ्य व्यवस्थापन इ. माध्यमातून कार्यपद्धतीचे संपूर्ण मॉनिटरिंग शक्य झाले. आयुष्मान भारत डिजिटल मिशनयुपीआयअ‍ॅग्री स्टॅक याबाबतही त्यांनी माहिती दिली. तंत्रज्ञानाच्या प्रभावी अंमलबजावणीपूर्वी  संबधित तंत्रज्ञानाची शाश्वतताविस्तारक्षमता आणि अनुकरणीय आहे का याबाबतही खात्री करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

          या सत्रात सहभागी तज्ज्ञांनी शासकीय यंत्रणांमध्ये तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देत त्याद्वारे कार्यक्षमतापारदर्शकता आणि जलद सेवा वितरण कसे शक्य होते याची सखोल माहिती दिली. यामुळे आगामी काळात शासकीय धोरणांची अंमलबजावणी अधिक सक्षमडिजिटल आणि लोकाभिमुख होणार असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर. विमला यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

आपत्ती व्यवस्थापनात ‘ई-पंचनामा’ची भूमिका

 आपत्ती व्यवस्थापनात ई-पंचनामाची भूमिका

       नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानीचे मूल्यांकन तंत्रज्ञानाच्या मदतीने कसे अधिक कार्यक्षम होऊ शकतेयाचे उदाहरण ई-पंचनामा प्रणाली’ द्वारे स्पष्ट केले. या प्रणालीमुळे थेट लाभ हस्तांतरणई पिक पाहणीराष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण आणि मदत वितरण या साऱ्या प्रक्रिया सुलभ व पारदर्शक बनल्या आहेत. मोबाईल अ‍ॅप व पोर्टलद्वारे मिळणाऱ्या डेटाच्या आधारे निर्णय प्रक्रिया अधिक जलद व अचूक होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टेक वारी - महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ मध्ये तज्ज्ञांचे मत ,,स्मार्ट सिटी’ मध्ये तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर

 शासकीय कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक

टेक वारी - महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ मध्ये तज्ज्ञांचे मत

 

        मुंबईदि. ८ : शासकीय कामकाजामध्ये अत्याधुनिक फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा केवळ एक पर्याय नसून भविष्यातील गरज ठरणार आहेअसे मत टेक वारी - महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत चौथ्या दिवशी 'शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरया विषयावर झालेल्या पहिल्या सत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले. या सत्रात नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरीविभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

स्मार्ट सिटी’ मध्ये तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर

             पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत एआयमशिन लर्निंगडेटा सायन्सजीआयएस आणि ब्लॉकचेन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर प्रशासकीय कामकाजासाठी केला जात असल्याचे सांगितले. ई-गव्हर्नन्स अंतर्गत ई -ऑफीसजीआयएस एनबल्ड ईपीआर ड्रोन सर्व्हेद्वारे प्रॉपर्टी टॅक्स मूल्यांकनडेटा सेंट्रलायझेशनफील्ड अ‍ॅक्टिव्हिटीजचे मॉनिटरिंग यासंदर्भातील कार्यप्रणालीही त्यांनी स्पष्ट केली.

आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

 आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

-मंत्री अतुल सावे

 

  मुंबईदि. ८ : आश्रमशाळांच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतात. त्यामुळे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या  विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (विजाभज) प्रवर्गाच्या निवासी आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळांतील अडचणींबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगलविभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच निवासी आश्रमशाळाचे संस्थाचालक उपस्थित होते.

   मंत्री श्री. सावे म्हणालेआश्रम शाळांच्या प्रलंबित अनुदानाचे वितरण टप्प्याटप्प्याने लवकरच करण्यात येईल. संचमान्यताबाबत शिक्षण विभागासोबत बैठक घेण्यात येईल. संचमान्यता व वेतन अनुदानासाठी प्रस्ताव तयार  करावेत  संचमान्यता प्रक्रियेनंतरच रिक्त पदांची यादी तयार करावी. आश्रम शाळांच्या संस्थाचालकांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. शासनाच्या सीएमश्री योजनेत आश्रमशाळांचा समावेश करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या तसेच आश्रम शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांसाठी राज्यविभाग आणि जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

             या बैठकीत आश्रमशाळेत महिला अधीक्षकांची नियुक्तीरिक्त पदांची भरतीआश्रम शाळांमध्ये सौरऊर्जेचा वापरसीएमश्री योजनेत समावेश,  क्रीडा स्पर्धांचे आयोजनआश्रमशाळा संहिता याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

 

00000

 

प्रत्येक नागरिकाने आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत,आयटीआय’ मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही घोषणा · 'आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

  

प्रत्येक नागरिकाने आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत

- कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

 

·         ‘आयटीआय’ मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही घोषणा

·         'आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

 

मुंबई दि८ : आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावायाचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतले पाहिजे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आपत्ती व्यवस्थापना विषयीच्या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत.  

         मंत्री श्री. लोढा म्हणाले कीमानवाने प्रगती केली असली तरीआपत्तीचे स्वरूप ही बदलले असून या पार्श्वभूमीवर बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा उद्देश आहे. आयटीआय मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमाची घोषणा केली. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)ईव्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापनइंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंगड्रोन तंत्रज्ञानसोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.

        दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आयटीआय विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

          राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉ. लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना सांगितली. या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदतकार्य याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. मानवनिर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून त्या काळात घ्यायची काळजीउपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बचावाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती. एस.एस. माने यांनी आभार व्यक्त मानले.

                                                                   

थॅलेसेमिया टाळण्यासाठी , या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

 सकारात्मक परिणाम घडविणारा उपक्रम


- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर


शासनाचा हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता, तो समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारा एक मोठा पाऊल ठरेल असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी व्यक्त केला. जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही, हे स्पष्ट करत सर्व नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.


सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे - बोर्डीकर म्हणाल्या, थॅलेसेमिया आजारावरील उपचारपद्धती आता प्रगत झाली असून यांसदर्भात अधिक जनजागृती करण्यात यावी.


 


 या उपक्रमांतर्गत थॅलेसेमिया टाळण्यासाठी विवाहपूर्व चाचण्यांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. “थोडीशी काळजी, पुढच्या पिढीचं आयुष्य वाचवू शकते” या घोषवाक्याद्वारे उद्देशून जागरूकतेचा संदेश देण्यात आला. "जीवन सक्षम बनवा, प्रगतीला स्वीकारा" या अभियानाच्या मुख्य सूत्रातुन आरोग्यदृष्टीने सक्षम व थॅलेसेमिया-मुक्त महाराष्ट्राचा संकल्प अधोरेखित करण्यात आला आहे.


यावेळी थॅलेसेमिया रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. www.thalesemiyasupport.com या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.


मोफत आरोग्य सल्ल्यासाठी १०४ क्रमांक उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली

Featured post

Lakshvedhi