Saturday, 3 May 2025

मॅजिकल महाराष्ट्र’ दालन ठरले प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

 मॅजिकल महाराष्ट्र’ दालन ठरले 

प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

  • डिजिटल दालनाची प्रेक्षकांवर मोहिनी

 

मुंबईदि. ३ : एखाद्या परिषदेमध्ये किंवा महोत्सवामध्ये उभारलेल्या दालनात पुस्तिकेच्या रूपाने माहिती देण्याची प्रचलित पद्धत आहे. वेव्हज २०२५ मध्ये उभारलेल्या महाराष्ट्राच्या दालनाने ही परंपरा मोडीत काढली असून मॅजिकल महाराष्ट्र’ या नावाने संपूर्णतः डिजिटल स्वरूपात उभारलेल्या या दालनाने येथे भेट देणाऱ्या प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली आहे. या दालनाचे त्रिमिती मधील डिजिटल प्रवेशद्वार आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची शानदार झलक दाखवित आहे.

हे दालन खास करून मराठी चित्रपटांना समर्पित करण्यात आले आहे. गाजलेल्या मराठी चित्रपटांची माहिती येथे आधुनिक स्वरूपात प्रदर्शित करण्यात आली असून महाराष्ट्राच्या समृद्ध मनोरंजन वारशाची ही जादुई झलक मराठीहिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये ऐकण्यासाठी सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीच्या प्रारंभापासून आजच्या गेमिंग आणि डिजिटल उत्क्रांतीपर्यंतचा मनोहारी प्रवासनावाजलेले स्टुडिओजमनोरंजन उद्योगात होत असलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांमधील बदलांचा वेध घेण्यात आला आहे.

मराठीचा वारसा

महाराष्ट्राने देशाला अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट दिले आहेत. मूकपटांपासून ते आधुनिक उत्कृष्ट कलाकृतींपर्यंत. या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या सिनेमाच्या वारशाचा गौरव करण्यात आला आहे.

जागतिक दर्जाची निर्मिती

महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे व्हीएफएक्सअ‍ॅनिमेशन आणि पोस्ट-प्रॉडक्शन स्टुडिओ आहेत. गाजलेल्या चित्रपटांपासून ते ओटीटी मालिकांपर्यंत निर्मिती होत असलेल्या या स्टुडिओंची माहिती येथे देण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्मिती झालेल्या आणि जागतिक स्तरावर गौरव प्राप्त झालेल्या चित्रपटांचा या प्रदर्शनात सन्मान करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैविध्यशास्त्रीय संगीतनृत्यापासून गणेशोत्सवासारख्या सणांपर्यंतची समृद्ध परंपरा जगप्रसिद्ध आहे. याबाबतही या दालनात विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

महाराष्ट्र डिजिटल क्रांतीच्या अग्रभागी आहेयेथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. एआय-आधारित जाहिरातींपासून येथील क्रिएटिव्ह स्टुडिओजमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जाहिरात निर्मिती देखील करण्यात येते. यांच्यासह महाराष्ट्रातील चित्रीकरण स्थळांबाबतची माहिती या दालनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

सृजनात्मक उद्योगांना चालना देण्यात राज्य शासनाची भूमिका

चित्रीकरण सुविधांचा विकासस्थानिक थिएटरचे समर्थनकलाकृतींना अनुदान व प्रशिक्षण आदी माध्यमातून राज्य शासनाने मनोरंजन क्षेत्राच्या वाढीस सक्रिय चालना दिली आहे. या उपक्रमांमुळे महाराष्ट्र राज्य सृजनशील आणि सांस्कृतिक क्षेत्राचे भारतातील आघाडीचे केंद्र म्हणून ओळखले जाते.

लाईव्ह स्टुडिओ – एलईडी व्हॉल्यूम

आधुनिक चित्रपट निर्मितीच्या अग्रभागीएलईडी वॉल्यूम तंत्रज्ञानाने चित्रपट निर्मितीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवला आहे. मोठ्या हाय डेफिनिशन एलईडी स्क्रीनद्वारे वैविध्यपूर्ण वातावरण तयार करूनदिग्दर्शक प्रत्यक्ष सेटवर गुंतागुंतीच्या दृश्यांचे चित्रीकरण करू शकतात. या दालनात उभारलेले या चित्रीकरणाचे प्रात्यक्षिक नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. 

0000

अल्पसंख्यांक समुहाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना अल्पसंख्यांक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

 अल्पसंख्यांक समुहाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना

अल्पसंख्यांक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहेयाची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व वर्गातील लोकांच्या विकासाबरोबरच अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात राहता यावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन विविध सामाजिक आणि शैक्षणिकआर्थिक योजना राबवितात भारतात राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायद्या अंतर्गत मुस्लिमशीखख्रिश्चनबौद्धजैन आणि झोरोस्ट्रियन (पारशीया सहा धार्मिक समुदाय अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात.

परदेश शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या होतकरू व गुणवत्ताधारक मुलांना व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळवून देण्यासाठी त्यांना परदेश शिष्यवृत्ती योजना प्रदान करण्यात येते. 

२०२५ – २६ या आर्थिक वर्षाकरिता  १५.१५ कोटी रूपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहेपदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहेपदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आणि पी.एच.डीअभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहेज्या विद्यार्थ्यांचया कुटूंबाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नाहीतसेच एकाच कुटूंबातील किमान दोन विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो७५ विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची अथवा अन्य संस्थांकडून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.  प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशीत असावा तसेच अभ्यासक्रमाचा कालावधी कमीत कमी दोन वर्षाचा असावाएक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांत प्रवेशित विद्यार्थी या योजनेस पात्र असणार नाहीत.

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित कायम अथवा विना अनुदानित अथवा विनाअनुदानित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्था व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येतातसदर योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात  245 शाळांमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे.

अल्पसंख्यांक समाजातील होतकरू व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटूंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रमतांत्रिक व व्यावसायीक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी ५० हजार किंवा शैक्षणिक शुल्क तसेच १२ वी नंतरचे कलावाणिज्यविज्ञान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ५ हजार रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.

राज्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकांना २० लाखअ वर्ग नगरपालिकांना १५ लाख तर ब व क वर्ग नगरपालिकांना  १० लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते.

राज्यातील अल्पसंख्याकांना शिक्षणआरोगनिवास सुविधारोजगारपतपुरवठा व इतर मुलभूत सुविधाप्राप्त करण्यासाठी सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या विविध प्रश्नांबाबत संशोधन करून त्यावर उपाययोजना करणेयासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

मुस्लीमबौद्धख्रिश्चनशीखपारशी व जैन विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख व्यावसायिक शिक्षण देणेमुंबईतील मांडवीउपनगरमधील चांदिवली येथे व राज्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि वसतीगृहात विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या/तिसऱ्या पाळीत अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे४४१६ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेतसेच शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये दुसऱ्या पाळीत अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण देण्यात येते.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहारासाठी ०.४० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत वसतीगृहशाळा इमारतइत्यादी संस्थाद्वारे अल्पसंख्यांक बहुल जिल्ह्यातील लोकांच्या एकंदर राहणीमानाचा दर्जा उंचावणेमुलभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तरात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातातयासाठी राज्य हिस्सा ८० कोटीकेंद्र हिस्सा १२० कोटीची निधीची तरतूद करण्यात आली आहे.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीसाठी वसतीगृह योजनेअंतर्गत मुलींसाठी वसतीगृहाची सोय उपलब्ध करून मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी ३ कोटी निधीची तरतूद करण्यात आली२५ जिल्ह्यांमधील ४३ शहरे अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रे घोषित केली आहेतअशा २५ जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने वसतीगृह उभारण्यात येणार आहेतराज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी शासकीय सेवा भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग तसेच मराठी भाषा फाउंडेशन वर्ग चालविले जाताततसेच आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहायाने अल्पसंख्यांक महिलांचे मागासलेपण दूर करण्यासाठी स्वयंसहाय्यता गटांकरिता अनुदान देण्यात येते.

डॉझाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात १९० पात्र मदरसांना एकूण ११.५५ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला.  १६५ मदरसांमध्ये विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञानगणितसमाजशास्त्रहिंदीमराठीइंग्रजी व उर्दु या विषयांचे शिक्षण देण्यात येते.

राज्यात उर्दू भाषेची वाड्.मयीन प्रगतीमराठी व उर्दू भाषेमधील लेखककवीविचारवंत यामध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड्.मयीन विकास व्हावा यासाठी उर्दू घर नांदेडमालेगावसोलापूर येथे कार्यान्वित असून नागपूर येथे काम सुरू आहे.

याचबरोबर अल्पसंख्यांक लकसमुहाकरीता धर्मक्षेत्र व परिसर विकास आराखडा योजनामहिला बचत गटातील सदस्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणेमहिला व युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणेपोलीस भरती पूर्व परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याकरिता अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने योजना राबविण्यात येतात.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणे ही केवळ त्यांच्या वैयक्ति प्रगतीची बाब नाही तर ती संपूर्ण समाजाच्या विकासाची दिशा आहेत्यामुळे अल्पसंख्यांक समूहातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या परदेश शिक्षणाच्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जीवनाला नवी दिशा द्यावी.

 

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदीत पारदर्शकतेसाठी केंद्रिकरणावर भरmmgpa.maharashtra.gov.in या

 महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदीत पारदर्शकतेसाठी केंद्रिकरणावर भर

– सचिव निपूण विनायक

 

मुंबईदि. 3 : महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे कार्य अधिक गतिमान करण्यात यावे जेणेकरून रुग्णांना वेळेवर औषधे व वैद्यकीय सामग्री उपलब्ध होऊ शकतीलअसे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपूण विनायक यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्राधिकरणामार्फत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. रुग्णसेवेत गुणवत्ता व औषध पुरवठ्यात गती साधण्यासाठी वैद्यकीय खरेदी प्रक्रियेत सुधारणा यावर चर्चासत्रात भर देण्यात आला.

यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश आव्हाडमहाव्यवस्थापक स्नेहल किस्वे , मुख्य लेखाधिकारी विक्रमसिंह यादवमहाव्यवस्थापक डॉ. संजीवकुमार जाधव यांच्यासह औषध व वैद्यकीय सामग्री उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सचिव निपूण विनायक यांनी यावेळी सांगितले कीतामिळनाडू राज्याच्या धर्तीवर औषधांसाठी एक वर्ष व वैद्यकीय उपकरणांसाठी दोन वर्षांच्या कालावधीचे टेंडर काढण्यात येणार आहेत. यामुळे पुरवठा प्रक्रियेत स्थिरता येईल व रुग्णसेवा अधिक गतिमान होईल. त्यांनी वैद्यकीय खरेदी प्रक्रियेत समन्वय व पारदर्शकता असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितलेप्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत उपस्थित प्रतिनिधींकडून मते जाणून घेतली

प्रत्येक जिल्ह्यात औषध साठवणूक करण्यासाठी वेअरहाऊसची उभारणी करण्यात येणार असूनप्राधिकरणाचे mmgpa.maharashtra.gov.in या संकेतस्थळामुळे उत्पादक कंपन्यांसाठी व्यवहार सुलभ होतील.

औषध पुरवठ्यामध्ये एका कंपनीची मक्तेदारी होऊ नये यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार असूनविविध जिल्ह्यांमध्ये औषधाचे दर व गुणवत्तेचे प्रमाण राखण्यासाठी स्टँडर्ड इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

औषध पुरवठादारांची मते जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल औषध उत्पादक कंपनी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. श्रीमहेश आव्हाड यांनी आभार मानले

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवा,pl share

 साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी

अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

नवी दिल्लीदि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे.

साहित्य अकादमी १९८९ पासून मान्यताप्राप्त २४ भारतीय भाषांपैकी प्रत्येकी २४ भाषांमध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करत आहे.

 साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दरवर्षी भारतीय अनुवादकांनी आसामीबंगालीबोडोडोगरीइंग्रजीगुजरातीहिंदीकन्नडकाश्मिरीकोकणीमैथिलीमल्याळममणिपुरीमराठीनेपाळीओडियापंजाबीराजस्थानीसंस्कृतसंथालीसिंधीतामिळउर्दू आणि तेलुगू या भाषांमध्ये अनुवादित केलेल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो.

हे पुरस्कार एका दिमाखदार समारंभात प्रदान केले जातात.  पुरस्काराचे  स्वरूप ५०,००० रुपये आणि ताम्रपट असे आहे.

साहित्य अकादमी यांनी भारतीय अनुवादकांनात्यांच्या हितचिंतकांना आणि प्रकाशकांना २०२५ च्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठी मान्यताप्राप्त सर्व २४ भारतीय भाषांमध्ये अनुवादित पुस्तके सादर करण्याचे आमंत्रण दिले आहे. २०१९२०२०२०२१२०२२ आणि २०२३ मध्ये (म्हणजे १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान) प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

प्रत्येक पुस्तकाच्या १ प्रतीसह अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. पुरस्काराची सविस्तर माहिती,  www.sahitya-akademi.gov.in  या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे अकादमीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

००००

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित

 डिजिटल पत्रकारिता : वर्गणीगुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद२०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा

 

मुंबईदि. ३ : डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणीगुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा राहिलेला नाही. विश्वासार्हतापारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी माध्यम संस्थांना आता नव्या रणनीतीची गरज आहेअसे मत वरिष्ठ पत्रकार आणि संपादकांनी पॅनल चर्चासत्रात व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद२०२५ मध्ये इवोल्युशन ऑफ डिजिटल न्यूज : स्टेइंग रिलीव्हेंट इन द एज ऑफ इन्फॉर्मेशन ओवरलोड या विषयावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बिझनेस टुडेचे संपादक सिद्धार्थ झराबी यांच्या सूत्रसंचालनाखाली या चर्चेत मनीकंट्रोलचे कार्यकारी संपादक नलिन मेहताद इंडियन एक्सप्रेस डिजिटलचे सीईओ संजय सिंधवानीआरटी इंडियाचे कार्यकारी संपादक अशोक बजरिया यांनी सहभाग घेतला.

श्री.झराबी यांनी सांगितले कीडिजिटल युगात वितरणाची साखळी आता केवळ काही मोजक्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या हातात आहेत्यामुळे कधी कधी त्या विशिष्ट ग्राहकांपर्यंत पोहोचतातत्यांचे डेटा आणि अल्गोरिदम त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पारंपरिक माध्यम संस्थांची भूमिका आणि त्यांचे अस्तित्व याबाबत बदलणाऱ्या संदर्भात विचार करण्याची गरज भासू शकते. डिजिटल माध्यमांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात क्रांती केली असलीतरी या बदलासोबत अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.

श्री. सिंधवानी यांनी सांगितले कीडिजिटल युगात बातमी पोहोचवणाऱ्या पारंपरिक यंत्रणा मागे पडल्या आहेत. पूर्वी माध्यम संस्थांकडे कंटेंटपासून वितरणापर्यंत सर्व नियंत्रण होते. पण आता सर्च इंजिन्ससोशल मीडिया आणि ‘एआय’ या तंत्रज्ञान कंपन्यांकडे ग्राहकांचे लक्ष आहेत्यांच्याकडे डेटा आहेआणि त्यांचे अल्गोरिदम्स निर्णायक ठरत आहेत.

श्री. मेहता यांनी सांगितले कीआजचे युग हे न्यूजची व्याख्या पुन्हा लिहित आहे. पूर्वी संपादक ठरवत असत की जनतेने काय वाचावे. पण आजचा डिजिटल वापरकर्ता आपल्या गरजांनुसार कंटेंट शोधतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बनवलेली बातमी आता अप्रासंगिक ठरू शकते. आता पत्रकारांना ग्राहक शोधावा लागतो. 'जर्नालिझम बाय डिफॉल्टचं युग संपलंय," असे त्यांनी स्पष्ट केले.बातमी ही आता एकटी उभी राहत नाही. तिच्याभोवती सखोल माहिती आणि विश्लेषण हवे असतेअसे श्री. बजरिया यांनी सांगितले.

वापरकर्त्यांकडे आज इतकी माहिती आहे की कोणती बातमी खरीअचूक आणि विश्वासार्ह याबाबत आव्हानात्मक परिस्थिती येवू शकते. सर्वच गोष्टी फॉरवर्ड’ स्वरूपात फिरत आहेत. माहितीचा अतिप्रवाह आहे. डिजिटल माध्यमांवर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. ‘एआय’मुळे बातमी संकलनाचे स्वरूप बदलत चालले आहे. अनेक पूर्वनियोजितडेटा-आधारित गोष्टी ‘एआय’ करू शकतो. पण दृष्टीकोनमुलाखतीविश्लेषण हे मानवी मन आणि बुद्धीचेच काम आहे. त्यामुळे पत्रकारांनी आता अधिक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहेअसे सूर चर्चेत उमटला.

०००

डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक

 डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक

- डॉली सिंग

 

मुंबईदि. ३ : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिताविषयांची प्रभावी मांडणीव्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच  नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक असतेअसे मत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर डॉली सिंग यांनी व्यक्त केले.

 

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत "Connecting Creators, Connecting Countries" या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी देश-विदेशातील नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते.

 

डिजिटल माध्यमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी करण्यासाठी प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे तेवढेच महत्वाचे आहे. यामध्ये नाविन्यता आणि नियमित  दर्जेदार मजकूर अपलोड  करणे गरजेचे असते,असे श्रीमती सिंग यांनी यावेळी सांगितले.

 

सोशल मीडियावरील पोस्टसाठी आवश्यक व्हिडिओमजकूर,विषय मांडण्याची पद्धतसंपादनाची शैली आणि सादरीकरणाची पद्धत हे सर्व घटक वेगळेपण सिद्ध करतात. तसेच कोणतीही प्रसिद्धी करण्यापूर्वी सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओटीझर किंवा ट्रेलर प्रसिद्ध करणे आवश्यक असते तरच त्या इव्हेंटबाबत उत्सुकता निर्माण होते आणि प्रेक्षक जोडले जातात असे सांगून डॉली सिंग यांनी स्वतःच्या अनुभवातून कंटेंट निर्मितीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

0000

Featured post

Lakshvedhi