Saturday, 3 May 2025

Stories That Touch Hearts Across the World” – Special Panel Discussion Global Dialogue on the Future of Storytelling Sparked at WAVES 2025

 Stories That Touch Hearts Across the World” – Special Panel Discussion

Global Dialogue on the Future of Storytelling Sparked at WAVES 2025

Broadcasting, Cinema, and Literature Converge at WAVES 2025

 

Mumbai, May 3 – At the inaugural WAVES 2025 Summit, a special session titled “Stories That Touch Hearts Across the World” brought together voices from diverse sectors to discuss the evolution and power of storytelling. The panel featured Caitlin Yarnall, Chief Storytelling Officer, National Geographic Society; Justin Warbrooke, EVP and Head of Corporate Development at The Walt Disney Company; Kelly Day, VP of International at Amazon Prime Video; Phil Hardman, EVP and Managing Director for Asia at BBC Studios; acclaimed filmmaker Rajkumar Hirani; and bestselling author and political analyst Anish Tripathi. The discussion was moderated by a host.

 

This session united visionary leaders and accomplished storytellers from the global media, entertainment, and literary industries to explore the changing dynamics of storytelling. Renowned speakers from broadcasting platforms, film, and literature shared insights on how compelling stories transcend borders, shape culture, and connect people across the globe.

 

The discussion focused on the strategic, creative, and emotional forces that drive global storytelling and how these elements deeply influence perspectives, cultures, and societal transformation.

 

Caitlin Yarnall (National Geographic) offered a strategic vision for crafting powerful stories woven with science, discovery, and visual storytelling to captivate global audiences. She emphasized the importance of truth and excellence in storytelling and spoke about both the challenges and opportunities in creating content that feels truly authentic to audiences.

 

Justin Warbrooke (Walt Disney) highlighted the Indian market as a top priority, calling it the world’s most populous and rapidly expanding media and entertainment market. He also spoke about Disney’s collaborations with Indian entities, emphasizing how such partnerships foster cultural exchange and bring global audiences closer through storytelling.

 

Kelly Day (Amazon Prime Video) shared thoughts on content strategy and global expansion, stressing how the platform brings diverse, locally rooted stories to audiences across continents. She underlined that success lies in identifying strong stories, understanding local audience preferences, and choosing the right formats and styles that resonate both domestically and internationally.

 

Phil Hardman (BBC Studios Asia) spoke about leading the distribution of select British content tailored for Asian audiences. Emphasizing the sustainable power of quality content, he reiterated BBC’s core mission of educating and informing, noting the importance of delivering meaningful stories aligned with that goal.

 

India’s renowned filmmaker Rajkumar Hirani remarked that storytelling is inherently personal, and its impact varies from person to person. He expressed optimism about artificial intelligence, calling it a valuable tool that can enhance creativity and narrative styles.

000


दुनियाभर के दर्शकों के दिलों को छूने वाली कहानियाँ”

 दुनियाभर के दर्शकों के दिलों को छूने वाली कहानियाँ – विशेष परिचर्चा सत्र

,

प्रसारणसिनेमा और साहित्य का वेव्स 2025 में संगम

 

मुंबई3 मई – पहली बार आयोजित वेव्स 2025 शिखर सम्मेलन में दुनियाभर के दर्शकों के दिलों को छूने वाली कहानियाँ विषय पर आधारित एक विशेष सत्र में विभिन्न क्षेत्रों की चर्चित हस्तियों ने भाग लिया। इस पैनल में नेशनल जिओग्राफिक सोसायटी की प्रमुख स्टोरीटेलिंग अधिकारी केटलिन यार्नालवॉल्ट डिज़्नी कंपनी के ईवीपी और कॉर्पोरेट विकास प्रमुख जस्टिन वॉरब्रुकअमेज़न प्राइम वीडियो की इंटरनेशनल विभाग की उपाध्यक्ष केली डेबीबीसी स्टूडियोज एशिया के ईवीपी और महाप्रबंधक फिल हार्डमैनप्रसिद्ध फिल्म निर्देशक राजकुमार हिरानी और बेस्टसेलिंग लेखक व राजनीतिक विश्लेषक अनीश त्रिपाठी ने भाग लिया। चर्चा का संचालन एक होस्ट द्वारा किया गया।

यह सत्र वैश्विक मीडियामनोरंजन और साहित्यिक जगत के दूरदर्शी नेताओं और अनुभवी कहानीकारों को एक मंच पर लायाजिन्होंने कहानी कहने के बदलते स्वरूप और उसके प्रभाव पर विचार साझा किए। प्रसारणफिल्म और साहित्य जगत के वक्ताओं ने बताया कि किस तरह प्रभावशाली कहानियाँ सीमाओं के पार जाती हैंसंस्कृतियों को आकार देती हैं और दुनिया भर के लोगों को जोड़ती हैं।

इस चर्चा में वैश्विक कहानी कहने को प्रेरित करने वाले रणनीतिकरचनात्मक और भावनात्मक कारकों पर विशेष ध्यान दिया गयाऔर इनका दृष्टिकोणसंस्कृति व सामाजिक बदलावों पर पड़ने वाले गहरे प्रभाव को रेखांकित किया गया।

            केटलिन यार्नाल (नेशनल जिओग्राफिक) ने विज्ञानखोज और दृश्यात्मक कथानक के संयोजन से वैश्विक दर्शकों को आकर्षित करने वाली सशक्त कहानियाँ रचने की रणनीति साझा की। उन्होंने स्टोरीटेलिंग में सत्यता और उत्कृष्टता के महत्व पर बल दिया और यह भी बताया कि दर्शकों से जुड़ने वाली प्रामाणिक सामग्री तैयार करने में क्या चुनौतियाँ और अवसर होते हैं।

जस्टिन वॉरब्रुक (वॉल्ट डिज़्नी) ने भारत को डिज़्नी की शीर्ष प्राथमिकता बताते हुए इसे दुनिया का सबसे अधिक जनसंख्या वाला और सबसे तेजी से बढ़ता मीडिया और मनोरंजन बाज़ार कहा। उन्होंने डिज़्नी की भारतीय कंपनियों के साथ साझेदारी का उल्लेख करते हुए बताया कि यह सहयोग कैसे सांस्कृतिक आदान-प्रदान को बढ़ाता है और वैश्विक दर्शकों को कहानियों के ज़रिए एक-दूसरे के करीब लाता है।

केली डे (अमेज़न प्राइम वीडियो) ने वैश्विक विस्तार और कंटेंट स्ट्रेटेजी पर अपने विचार साझा किए। उन्होंने बताया कि किस प्रकार प्लेटफॉर्म विभिन्न महाद्वीपों में स्थानीय रूप से जुड़ी विविध कहानियाँ दर्शकों तक पहुँचाता है। उन्होंने यह भी कहा कि सफलता की कुंजी है – सशक्त स्टोरीटेलिंगस्थानीय दर्शकों की पसंद को समझना और उपयुक्त फॉर्मेट व शैली का चयन करना।

फिल हार्डमैन (बीबीसी स्टूडियोज एशिया) ने एशियाई दर्शकों के लिए चयनित ब्रिटिश सामग्री के वितरण के अपने अनुभव साझा किए। उन्होंने गुणवत्ता वाली सामग्री की स्थायी ताकत पर ज़ोर देते हुए बीबीसी के शिक्षा और जानकारी देने के मिशन की बात कीऔर बताया कि इस उद्देश्य को ध्यान में रखते हुए कैसे अर्थपूर्ण कहानियों की खोज कर उन्हें दर्शकों तक पहुँचाया जाता है।

भारत के प्रसिद्ध फिल्म निर्देशक राजकुमार हिरानी ने कहा कि कहानी कहने की प्रक्रिया स्वाभाविक रूप से व्यक्तिपरक होती है और हर व्यक्ति पर उसका प्रभाव अलग होता है। उन्होंने आर्टिफिशियल इंटेलिजेंस को लेकर आशावाद व्यक्त करते हुए कहा कि यह एक मूल्यवान उपकरण है जो रचनात्मकता और स्टोरीटेलिंग शैली को समृद्ध कर सकता है।

0000

भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ : किरण मझुमदार शॉ

 भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या

नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ : किरण मझुमदार शॉ

  • किरण मझुमदार शॉ यांनी वेव्हजमध्ये मांडला भारताच्या सृजनशील भवितव्याचा आलेख
  • स्टार्ट अप्सनी चित्रपटांच्या पलीकडचा विचार करण्याचे आवाहन

मुंबईदि. 3 :- सृजनशील आशय निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय स्टार्टअप्सनी चित्रपटांच्या पलीकडे विचार करत जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे ब्रँड्सपरिसंस्था आणि बौद्धिक संपदा निर्माण केली पाहिजेअसे प्रतिपादन जागतिक व्यवसायातील अग्रणी आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मझुमदार शॉ यांनी  केले आहे. त्या  मुंबईत जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित पहिल्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) दुसऱ्या दिवशीच्या संवाद सत्रात बोलत होत्या.

"भारताचे नवोन्मेष पुनरुत्थान: जागतिक स्तरावरील पहिल्या स्टार्टअप्सचे पुढील दशक" या विषयावर फोर्ब्स एडिटर ॲट लार्ज मनीत आहुजा यांच्यासोबत चर्चेची सुरुवात करताना मझुमदार शॉ यांनी भारतीय कथांमधील जागतिक क्षमतेविषयी सांगितले. रामायणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्यापरंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची ही  वेळ आहे. ज्याप्रकारे जॉर्ज लुकास यांनी स्टार वॉर्ससाठी भारतीय अजरामर महाकाव्यांपासून प्रेरणा घेतलीत्याप्रकारे आपणही आपल्या सांस्कृतिक वारशाचे रुपांतर जागतिक फ्रँचायझीमध्ये करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो.

भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय आणि डिजिटल सामर्थ्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "अब्जावधी स्मार्टफोन आणि तंत्रज्ञान-सजग जनरेशन झेड सहभारत जागतिक नवोन्मेषासाठी सज्ज आहे. पण कोणत्याही ब्लॉकबस्टर म्हणजेच अतिशय गाजलेल्या सिनेमा किंवा विषयाप्रमाणे यशाची सुरुवात  एका कल्पनेने आणि अथक  लक्ष्यकेंद्री पद्धतीने एका लहान स्तरावर होते." हे  सांगताना त्यांनी गॅरेजमध्ये बायोकॉन सुरू करून जागतिक बायोटेक पॉवरहाऊसमध्ये रूपांतरित करण्याच्या स्वतःच्या प्रवासाची तुलना केली.

भारताच्या सृजनशील अर्थव्यवस्थेविषयी बोलताना त्यांनी सांगितले कीया क्षेत्रातील लोकांनी प्रचंड क्षमता असलेल्या ऑरेंज  अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र जीडीपीमध्ये 20 अब्ज डॉलर्सचे योगदान देते. आपण 2047 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स आणि सरतेशेवटी 1 ट्रिलियन डॉलर्सच्या केशरी अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले पाहिजेजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या स्वप्नाशी सुसंगत असेल," असे शॉ म्हणाल्या.

सृजनशील निर्माते आणि स्टार्ट अप्सचे सक्षमीकरण

भारताच्या सृजनशील क्षमतेविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शॉ यांनी एआर (AR), व्हीआर (VR) आणि  इमर्सिव्ह अनुभवांचे  एकत्रीकरण हे महत्त्वाचे आघाडीचे क्षेत्र असल्याचे सांगितले. "पुढचे युनिकॉर्न केवळ ॲप्स नसतील  तर ज्यांना बौद्धिक संपदा तंत्रज्ञान आणि इमर्सिव्ह  कथाकथनाचे आकलन होतेअसे सृजनशील  निर्माते असतील " असे त्यांनी नमूद केले. 'आरआरआरचित्रपटातील 'नाटू नाटूगाण्याचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की भारतीय सृजनशीलतेला केवळ समुदायाला भावनिक साद घालण्याच्या पलीकडे जावे लागेल. ते जागतिक स्तरावर प्रासंगिक असले पाहिजे .प्रत्येक महान कल्पना लहान स्तरावर सुरू होते. तुम्ही तिला किती दूर घेऊन जाता हे महत्त्वाचे आहे. अपयश हा या वाटचालीचाच एक भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा” विशेष चर्चासत्र

 जगभरातील रसिकांच्या हृदयाला 

स्पर्श करणाऱ्या कथा विशेष चर्चासत्र

  • वेव्हज - 2025 मध्ये कथाकथनाच्या भविष्याबाबत  जागतिक संवादाला मिळाली चालना
  • प्रसारणचित्रपट आणि साहित्य यांचा मिलाफ

मुंबईदि. ३ :- पहिल्यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्या  वेव्हज २०२५ शिखर परिषदेत  जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा या विषयावर आधारित सत्रात विविध क्षेत्रातील मते ऐकण्याची संधी  मिळाली. नॅशनल जिओग्राफिक सोसायटी संस्थेतील मुख्य कथाकथनकार केटलिन यार्नालवॉल्ट डिस्ने कंपनीचे ईव्हीपी तसेच कॉर्पोरेट विकास विभाग प्रमुख जस्टीन वॉरब्रूकअॅमेझॉन प्राईम व्हिडीओ कंपनीत आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपाध्यक्ष केली डेबीबीसी स्टुडीओजच्या आशिया विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक फिल हार्डमनप्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी,  गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि राजनीती तज्ज्ञ अनिश त्रिपाठी यांनी चर्चा संचालक म्हणून या चर्चेत  भाग घेतला.

कथाकथनातील परिवर्तनशील घटकांचा शोध घेण्यासाठी या सत्राने जागतिक माध्यमेमनोरंजन आणि साहित्य विश्वातील अनेक दूरदर्शी नेते आणि कथाकथनात प्रभुत्व मिळवलेले वक्ते यांना एकत्र आणले. विविध प्रसारण मंच आणि प्रसारण क्षेत्रातील  कंपन्या ते चित्रपट आणि साहित्य जगत यांच्यात गाजलेल्या वक्त्यांनी गुंगवून टाकणाऱ्या कथा कशा पद्धतीने सीमापार प्रवास करुन संस्कृतीला आकार देतात आणि जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडतात याबद्दलचे विचारधन सामायिक केले.

या कार्यक्रमातील चर्चेने जागतिक कथाकथन क्षेत्राला चालना देणाऱ्या धोरणात्मकसर्जनशील आणि भावनिक शक्तींवर आणि या शक्तींचा दृष्टीकोनसंस्कृती तसेच सामाजिक बदलांवर किती मोठा प्रभाव पडतो हे सांगण्यावर अधिक भर दिला.

जगभरातील प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी विज्ञानशोध तसेच दृश्य कथाकथन यांची वीण असलेल्या सशक्त कथा निर्माण करण्यासाठीची धोरणात्मक दृष्टी केटलिन यार्नाल (नॅशनल जिओग्राफिक) यांच्याकडे आहे. उपरोल्लेखित चर्चेदरम्यान त्यांनी कथाकथन क्षेत्राची सत्यता तसेच उत्कृष्टता यांचे महत्त्व सांगण्यावर अधिक भर दिला. तसेच त्यांनी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आपलासा वाटेल अशा आशयाच्या निर्मितीत असलेली आव्हाने आणि संधी अशा दोन्हींवर त्यांनी यावेळी अधिक भर दिला.

जस्टिन वारब्रुक (वॉल्ट डिस्ने) यांनी भारतीय बाजारपेठेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आणि वेगाने वाढणारी माध्यम आणि मनोरंजन बाजारपेठ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी डिस्नेच्या भारतीय कंपन्यांबरोबरच्या सहकार्याबद्दलही सांगितलेआणि ही भागीदारी परस्परांच्या संस्कृतीला जोडण्यासाठी आणि कथाकथनाच्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी कशी सहाय्य करत आहेयावर भर दिला.

केली डे (अमेझॉन प्राइम व्हिडिओ) यांनी जागतिक विस्तार आणि आशय सामग्री विषयक धोरणविविध खंडांमधील प्रेक्षकांपर्यंत वैविध्यपूर्ण आणि स्थानिक पातळीवर गुंफलेल्या कथा आणण्याचे काम कसे करतेयावर आपले विचार मांडले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या कथा आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतीलहे व्यासपीठ ठरवते.  सशक्त कथाकथनस्थानिक प्रेक्षकांचा कल ओळखणे आणि योग्य स्वरूप आणि शैली निवडणे यात यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.

फिल हार्डमन (बीबीसी स्टुडिओआशिया) आशियाई प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या निवडक ब्रिटिश सामग्रीच्या वितरणाचे प्रमुख आहेत. त्यांनी दर्जेदार सामग्रीच्या शाश्वत सामर्थ्याबद्दल बोलतानात्यांनी बीबीसीच्या शिक्षण आणि माहिती देण्याच्या मुख्य मिशनवर भर दिला. त्या ध्येयाला अनुसरून अर्थपूर्ण कथांचा शोध घेऊन त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक्‍ राजकुमार हिरानी म्हणाले कीकथाकथन हे स्वाभाविकपणे व्यक्तीनिष्ठ असतेत्याचा प्रतिध्वनी व्यक्तीनुरूप वेगळा असतो.  कृत्रिम बुद्धीमत्तेबद्दल आपण आशावादी असूनसर्जनशीलता आणि कथाकथन शैलीत भर घालणारे हे एक मौल्यवान  साधन असल्याचे ते म्हणाले.

0000

एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य भारतीय उद्योजकतेचे भवितव्य चर्चासत्रातील सूर

 एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य

भारतीय उद्योजकतेचे भवितव्य चर्चासत्रातील सूर

 

मुंबईदि. 3 : भारतात स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने आयटीफिनटेकशिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. राज्य शासनाकडून स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून विविध योजनांमुळे तरुण उद्योजकांना मोठा आधार मिळत असल्याने नवउद्योजकांना उद्योगात उज्ज्वल भवितव्य आहे. आधुनिकतेचा स्वीकार करून ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर स्वीकारावा लागणार असल्याचा सूर 'भारतीय उद्योजकतेचे भवितव्य-एक दृष्टिक्षेपचर्चासत्रातून उमटला.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेमध्ये 'भारतीय उद्योजकतेचे भवितव्य-एक दृष्टिक्षेपचर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्रात 'बोटलाइफस्टाइलचे सहसंस्थापक अमन गुप्ताशादी डॉट.कॉमचे अनुपम मित्तल यांनी भाग घेतलाउद्योजक श्री. खुराणा यांनी मुलाखत घेतली.

श्री. गुप्ता म्हणाले कीसध्या कोणताही छोटा मोठा व्यवसाय करात्यामध्ये ‘एआय’चा वापर हा राहणार आहेयामुळे गुंतवणूकदारांनी अशा उद्योगात पैसे गुंतवायला हवेत. आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूकदारांसाठी काही समस्या असतात, मात्र व्यवसाय आणि पैसा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार हवेतच. पूर्वी शासकीय नोकरीला प्राधान्य होतेमात्र सध्या स्टार्टअपला प्राधान्य आहे. सुरुवातीला स्टार्टअपमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. मात्र कधीतरी आपल्याला नफा मिळणार असल्याने कष्ट करण्याच्या मानसिकतेवर भर द्यायला हवा.

उद्योजक बनू लागले सेलिब्रिटी - गुप्ता

हिंदी आणि मराठी चित्रपटातील अभिनेतेअभिनेत्री यांना आपण पूर्वी सेलिब्रिटी समजत होतो. सध्या स्टार्टअप आणि उद्योजकांचे युग आहे. उद्योजक हे नव्या पिढीचे सेलिब्रेटी बनत असल्याचे श्री. गुप्ता यांनी सांगितले. सध्या व्यवसायामध्ये महिलांचा वाढता सहभाग हा भारताच्या उद्योजकतेच्या विकासात सकारात्मक पाऊल आहे. सर्व क्षेत्रात महिला पुढे येत असून त्यांचा सहभाग वाढत आहे. महिला उद्योजकांसाठी विविध प्रशिक्षण व निधी शासकीय योजनातून मिळत आहे. मनबुद्धी आणि वेळ दिला तर आपल्याला  कोणत्याही क्षेत्रांमध्ये यश नक्की मिळतेअसेही श्री. गुप्ता यांनी सांगितले.

‘एआय’मुळे रोजगार जाण्याची भीती नाही - मित्तल

मोबाईल आणि सोशल मीडिया वापरासह सर्व क्षेत्रामध्ये ‘एआय’चा वापर होणार आहे. ‘एआय’ वापराने रोजगार जाण्याची भीती नाहीमात्र त्याचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार करून आपल्या व्यवसायात वापर करायला हवा. विकसित भारताच्या जीडीपीमध्ये नवउद्योजकांचा खूप मोठा वाटा असेलअसे शादी डॉट कॉमचे श्री. मित्तल यांनी सांगितले.

चॅट जीपीटीगो टू चाही वापर वाढत आहे. कोणतेही टेक्स्ट बाबत सर्व उपलब्ध माहिती मिळते. ॲप बनवायला सोपे असल्याने यामध्येही रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. चांगली जागा/क्षेत्र (Area) निवडा. चांगल्या कल्पनांची अंमलबजावणी करण्याची क्षमता असेल तर चांगले उद्योजक बनाल. काहीतरी बदल घडवण्यासाठी किंवा समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने उद्योगाची सुरुवात करामहिलांनी उद्योग करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यायला हवेअसेही श्री.मित्तल यांनी यावेळी सांगितले.

000

धोंडिराम अर्जुन/ससं/

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रितडिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा

 डिजिटल पत्रकारिता : वर्गणीगुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद२०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा

 

मुंबईदि. ३ : डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणीगुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा राहिलेला नाही. विश्वासार्हतापारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी माध्यम संस्थांना आता नव्या रणनीतीची गरज आहेअसे मत वरिष्ठ पत्रकार आणि संपादकांनी पॅनल चर्चासत्रात व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद२०२५ मध्ये इवोल्युशन ऑफ डिजिटल न्यूज : स्टेइंग रिलीव्हेंट इन द एज ऑफ इन्फॉर्मेशन ओवरलोड या विषयावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बिझनेस टुडेचे संपादक सिद्धार्थ झराबी यांच्या सूत्रसंचालनाखाली या चर्चेत मनीकंट्रोलचे कार्यकारी संपादक नलिन मेहताद इंडियन एक्सप्रेस डिजिटलचे सीईओ संजय सिंधवानीआरटी इंडियाचे कार्यकारी संपादक अशोक बजरिया यांनी सहभाग घेतला.

श्री.झराबी यांनी सांगितले कीडिजिटल युगात वितरणाची साखळी आता केवळ काही मोजक्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या हातात आहेत्यामुळे कधी कधी त्या विशिष्ट ग्राहकांपर्यंत पोहोचतातत्यांचे डेटा आणि अल्गोरिदम त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पारंपरिक माध्यम संस्थांची भूमिका आणि त्यांचे अस्तित्व याबाबत बदलणाऱ्या संदर्भात विचार करण्याची गरज भासू शकते. डिजिटल माध्यमांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात क्रांती केली असलीतरी या बदलासोबत अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.

श्री. सिंधवानी यांनी सांगितले कीडिजिटल युगात बातमी पोहोचवणाऱ्या पारंपरिक यंत्रणा मागे पडल्या आहेत. पूर्वी माध्यम संस्थांकडे कंटेंटपासून वितरणापर्यंत सर्व नियंत्रण होते. पण आता सर्च इंजिन्ससोशल मीडिया आणि ‘एआय’ या तंत्रज्ञान कंपन्यांकडे ग्राहकांचे लक्ष आहेत्यांच्याकडे डेटा आहेआणि त्यांचे अल्गोरिदम्स निर्णायक ठरत आहेत.

श्री. मेहता यांनी सांगितले कीआजचे युग हे न्यूजची व्याख्या पुन्हा लिहित आहे. पूर्वी संपादक ठरवत असत की जनतेने काय वाचावे. पण आजचा डिजिटल वापरकर्ता आपल्या गरजांनुसार कंटेंट शोधतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बनवलेली बातमी आता अप्रासंगिक ठरू शकते. आता पत्रकारांना ग्राहक शोधावा लागतो. 'जर्नालिझम बाय डिफॉल्टचं युग संपलंय," असे त्यांनी स्पष्ट केले.बातमी ही आता एकटी उभी राहत नाही. तिच्याभोवती सखोल माहिती आणि विश्लेषण हवे असतेअसे श्री. बजरिया यांनी सांगितले.

वापरकर्त्यांकडे आज इतकी माहिती आहे की कोणती बातमी खरीअचूक आणि विश्वासार्ह याबाबत आव्हानात्मक परिस्थिती येवू शकते. सर्वच गोष्टी फॉरवर्ड’ स्वरूपात फिरत आहेत. माहितीचा अतिप्रवाह आहे. डिजिटल माध्यमांवर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. ‘एआय’मुळे बातमी संकलनाचे स्वरूप बदलत चालले आहे. अनेक पूर्वनियोजितडेटा-आधारित गोष्टी ‘एआय’ करू शकतो. पण दृष्टीकोनमुलाखतीविश्लेषण हे मानवी मन आणि बुद्धीचेच काम आहे. त्यामुळे पत्रकारांनी आता अधिक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहेअसे सूर चर्चेत उमटला.


डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक

 डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक

- डॉली सिंग

 

मुंबईदि. ३ : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिताविषयांची प्रभावी मांडणीव्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच  नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक असतेअसे मत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर डॉली सिंग यांनी व्यक्त केले.

 

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत "Connecting Creators, Connecting Countries" या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी देश-विदेशातील नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते.

 

डिजिटल माध्यमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी करण्यासाठी प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे तेवढेच महत्वाचे आहे. यामध्ये नाविन्यता आणि नियमित  दर्जेदार मजकूर अपलोड  करणे गरजेचे असते,असे श्रीमती सिंग यांनी यावेळी सांगितले.

 

सोशल मीडियावरील पोस्टसाठी आवश्यक व्हिडिओमजकूर,विषय मांडण्याची पद्धतसंपादनाची शैली आणि सादरीकरणाची पद्धत हे सर्व घटक वेगळेपण सिद्ध करतात. तसेच कोणतीही प्रसिद्धी करण्यापूर्वी सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओटीझर किंवा ट्रेलर प्रसिद्ध करणे आवश्यक असते तरच त्या इव्हेंटबाबत उत्सुकता निर्माण होते आणि प्रेक्षक जोडले जातात असे सांगून डॉली सिंग यांनी स्वतःच्या अनुभवातून कंटेंट निर्मितीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

0000

Featured post

Lakshvedhi