Friday, 2 May 2025

वेव्हज 2025 ने अधोरेखित केले भारताचे बदलणारे प्रसारण

 वेव्हज 2025 ने अधोरेखित केले भारताचे बदलणारे प्रसारण

नियामक परिदृश्य आणि भविष्यातील आव्हाने

 

मुंबई,दि.: मुंबईत कालपासून सुरू झालेल्या वेव्हज 2025 (WAVES 2025)  या  जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचा भाग म्हणून आयोजित केलेल्या ब्रेकआउट सत्रांमध्ये माध्यम आणि मनोरंजन (M&E) क्षेत्रातील बदलणारे परिदृश्य आणि  नियामक आराखड्याची गरज यांना महत्त्व प्राप्त झाले.

 

'डिजिटल युगातील प्रसारण नियमन - चौकटी आणि आव्हानेया ब्रेकआउट सत्रात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय माध्यम नियामक संस्थांमधील प्रमुख व्यक्तींनी आपले विचार व्यक्त केले. पॅनेल सदस्यांमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चे अध्यक्ष  अनिल कुमार लाहोटीआशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट (AIBD) च्या संचालक  फिलोमेना ज्ञानप्रगासमआशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन (ABU) चे सरचिटणीस अहमद नदीम आणि मेडियासेटच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा संचालक  कॅरोलिना लोरेन्झो यांचा समावेश होता.

 

लाहोटी यांनी भारतातील नियामक उत्क्रांतीचा आलेख सादर केलाज्यात 1995 च्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायद्यापासून ते केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनपर्यंत आणि आता ग्राहक निवड व सेवेच्या गुणवत्तेवर ट्राय भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सध्या देत असलेला भर यांचा समावेश होता. त्यांनी समान संधी सुनिश्चित करण्याच्या (TRAI) प्रयत्नांवर भर दिला आणि जिथे ग्राहकांच्या हिताशी तडजोड केली जात नाहीतिथे नियम शिथिल करण्याचा पुरस्कार केला.

 

पॅनेल सदस्यांनी ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्म्सच्या झपाट्याने झालेल्या वाढीवर आणि त्यांनी निर्माण केलेल्या गुंतागुंतीवर चर्चा केली. 2024 मध्ये भारताची डिजिटल मीडिया बाजारपेठ 9.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्यामुळेसंतुलित नियमनाची गरज सर्वोच्च आहे.  लाहोटी यांनी डिजिटल रेडिओसिंप्लिफाईड नेटवर्क आर्किटेक्चर आणि राष्ट्रीय प्रसारण धोरणासंबंधी या प्राधिकरणाच्या  प्रस्तावांना अधोरेखित केले.

 

ज्ञानप्रगासम यांनी नियमनासोबतच माध्यम साक्षरतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. अहमद नदीम यांनी जबाबदारी सुनिश्चित करताना नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमनाच्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा पुरस्कार केला. मेडियासेटच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संचालक कॅरोलिना लोरेन्झो यांनी स्मार्ट टीव्हीसारख्या तंत्रज्ञानातील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये नेटवर्क इफेक्ट्सच्या उदयास येत असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकतप्लॅटफॉर्मच्या जबाबदारीबाबत युरोपमधील अनुभवाकडे लक्ष वेधले.

 

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे आणि नियामक गुंतागुंत कमी करणे यासोबतच सुसंगत नियमनाची गरज यावरील सहमतीने या सत्राचा समारोप झाला.

000000


जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये (WAVES 2025) मुकेश अंबानी यांनी मांडली भारताच्या नेतृत्वातील जागतिक मनोरंजन विश्वाच्या क्रांतीची कल्पना

 जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये (WAVES 2025) मुकेश अंबानी यांनी मांडली भारताच्या नेतृत्वातील जागतिक मनोरंजन विश्वाच्या क्रांतीची कल्पना

 

मुंबई,: दि. : भारत केवळ एक देश नाही ती कथांची एक अशी समाजव्यवस्था आहेजिथे कथात्मक मांडणी ही एक जीवनशैलीच आहे," असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी नुकतेच जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील भाषणात  केले.

 

             कथात्मक मांडणी ही भारतीय जीवनशैलीशी घट्टपणे विणलेली वीण असूनइथल्या  महाकाव्यांपासून पौराणिक कथांपर्यंतकथात्मक मांडणी हा भारताचा वारसा राहिलाआशय हा महत्वपूर्ण असूनचांगल्या कथांना कायमच बाजारपेठेत मोल  मिळतेहे कालातीत तत्त्व असूनहेच जागतिक मनोरंजनाचा आधार आहे असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी अंबानी यांनी  भारत हा जगाच्या मनोरंजन उद्योग क्षेत्राचे मुख्य केंद्र बनणार असल्याची कल्पना उपस्थितांसमोर मांडलीआपल्या संबोधनातून त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनाची प्रेरणा देणार्या  दृष्टिकोनाबाबत प्रशंसा केली तसेच वेव्हज शिखर परिषद ही याच भविष्याच्या  दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे गौरवोद्गारही काढले.

 

            आपल्या भाषणातून अंबानी यांनी जागतिक संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात भारताचा वाढत्या प्रभावावावरही शिक्कामोर्तब केलेमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्र ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ अर्थात राजकीय क्षेत्रापलीकडची सांस्कृतिक ताकद असल्याचे लोक म्हणतातमात्र ही भारताची खरी ताकद असल्याचे आपण  मानतो असे त्यांनी सांगितले.

 

श्री.अंबानी म्हणाले कीआकर्षक आशय मांडणीगतिमान लोकसंख्याशास्त्र आणि तंत्रज्ञानात्मक नेतृत्व या तीन स्तंभांनी बळकट असलेल्या मनोरंजन क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी देश सज्ज आहेभारताची डिजिटल क्रांती ही केवळ व्यापकतेची कथा नाही तर ती आकांक्षामहत्त्वाकांक्षा आणि परिवर्तनाची कहाणी आहेअसे मत त्यांनी व्यक्त केले.

 

00000

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ

 मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक,

असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात

 

पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ

 

मुंबईदि.२: देशात विविध भाषाजातीधर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असोचित्रपटात जर मानवी भाव-भावनासहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषाप्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो  हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेतेअभिनेत्री यांनी व्यक्त केले.

 

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये आयोजित 'पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटमया विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेरदाक्षिणात्य अभिनेते नागार्जुनकारथीअभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केले.

 

काही वेळा फक्त हिंदी कलाकार घेऊन किंवा सिनेमा डब करून तो पॅन-इंडिया ठरत नाही. कथेला सर्व भारतीय प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवेअसाही सूर चर्चासत्रात उमटला.

 

श्रीमती खुशबू म्हणाल्याआजच्या काळात प्रेक्षकांना भावणारी कथा वेगळी नसते तर तिची मांडणी वेगळी असतेसाऊथ आणि हिंदी सिनेमात जास्त फरक नाही. विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नयेतोही भारतीय सिनेमा आहे.

 

नागार्जुन म्हणाले कीचित्रपटाची भाषा महत्वाची नसते, तर त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि मानवी भावना यांचा स्पर्श असेल तर  तो सिनेमा अधिक लोकप्रिय होतो. तो सिनेमा बॉलिवूड असो की टॉलिवूड फरक पडत नाही. विविध प्रादेशिक भाषेतील सिनेमांचे हिंदीमध्ये डबिंग झाले आहेहोत आहेत.

 

कारथी म्हणाले कीप्रामाणिकपणा हा कोणताही सिनेमा असो थोडा रंगवलेला असला तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्रत्येक दिग्दर्शक यशस्वी होतोच असं नाही. पहिला चित्रपट प्रामाणिक असतोत्यातला अभिनय स्वतःच्या अनुभवांवर आधारित असतो. त्यानंतर कलाकार त्याच भावनेची नक्कल करत राहतो आणि तेव्हा ते खोटं वाटायला लागतं.

 

अनुपम खेर म्हणाले कीआता कलाकारदिग्दर्शक आणि तंत्रज्ञ विविध भाषांमध्ये सहज काम करत आहेत. यामुळे प्रादेशिक भिंती कमी होत आहेत. मी तेलगूतमिळमध्ये काम केलेमात्र हिंदीवर जास्त प्रेम आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये कोविडनंतर खूप बदल पाहायला मिळतातमात्र तो कोणत्याही भाषेतील असला तरी तो भारतीय सिनेमा म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता जगभर पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

पारंपारिक माध्यमे व डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे माध्यम विश्वास क्रांतिकारी बदल

 पारंपारिक माध्यमे व डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे माध्यम विश्वास क्रांतिकारी बदल

-         गॅझप्रोम मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

 

मुंबईदि.२ : पारंपरिक प्रसारमाध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांच्या एकत्रीकरणामुळे माध्यम जगतात क्रांतिकारक बदल घडून येत असून यामुळे सशक्त माध्यम इकोसिस्टम’ तयार होत आहेअसे प्रतिपादन गॅझप्रोम मीडिया होल्डिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर झारोव्ह यांनी केले.

 

वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये सुरू असलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (WEAVES) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यम सामग्रीच्या एकत्रित शक्ती’ या विषयावर आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते.

 

 श्री. झारोव्ह म्हणालेभारत-रशिया सहनिर्मितीचा द लिट्ल किंग ऑफ माय हार्ट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असूनत्याचे चित्रीकरण मुंबई आणि जोधपूर येथील ऐतिहासिक स्थळांवर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात भारतीय कलाकारांनी रशियन कलाकारांसोबत एकत्रित काम केले आहे. यामध्ये भारतीय सिनेमातील भावनात्मक शैली आणि रशियन विनोद यांचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेले देश आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीत दोन्ही देशांमधील कलावंत  एकमेकांच्या संस्कृती समजून घेऊन  काम करत होते,असेही झारोव्ह यांनी यावेळी नमूद केले.

 

तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहेअसेही यावेळी त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावरील ब्लॉगर आणि कंटेंट क्रिएटर्सनी मोलाची भूमिका बजावली आहे. या माध्यमातून दोन्ही देशांमधील मैत्री आणि सांस्कृतिक संबध अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास श्री.झारोव्ह यांनी यावेळी व्यक्त केला.

0000

प्रशासकीय गुणांकनात महिला व बालविकास विभाग प्रथम क्रमांकावर

 प्रशासकीय गुणांकनात महिला व बालविकास विभाग प्रथम क्रमांकावर

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. 1 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून व संकल्पनेतून शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी राबविलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रम अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविकेचीप्रत्येक लाभार्थिनीची आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आहे. सर्व सहकारीमहिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरमहिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादवएकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री. कैलास पगारेमहिला व बाल विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडेजिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठता आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत वेबसाईट कार्यक्षमताकार्यालयीन सोयीसुविधातक्रार निवारण व्यवस्थागुंतवणूक अनुकूलतानागरिकांसाठी सेवा-सुलभतातंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करून विभागाने 80 टक्के गुण प्राप्त केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

विभागाची वेबसाइट कंटेंट मॅनेजमेंट सिस्टमचा वापर करून विभागाच्या सर्व योजनाही अद्यावत करण्यात आल्या आहेततसेच माहितीचा अधिकार अंतर्गत देखील सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळाचे सिक्युरिटी ऑडिटत्याचबरोबर Right to Service Act खाली अधिसूचित सेवांची यादीकेंद्र शासनाशी संपर्क साधून 13 हजार 11 मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडीत रूपांतर करण्यात आले आहे. तसेच 9 हजार 664 अंगणवाडी केंद्रांना शौचालयाची व्यवस्था पुरवण्यात आलीकेंद्र सरकारच्या प्रशिक्षणाच्या धोरणानुसार 37 हजार अंगणवाडी सेविकांना "पोषण भीपढाई भी" चे प्रशिक्षण व FSSAI चे प्रशिक्षण दिले आहे. नवीन 10 one stop centre ला मान्यता देण्यात आली आहे. केंद्राने दिलेल्या सर्व लक्षांक महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून पोषण पखवाडीमध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवला. 17 हजार 254 अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. 13 हजार 595 अंगणवाडी केंद्रांचे सक्षम अंगणवाडी केंद्रामध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर दत्तक प्रक्रियेमध्ये 537 बालके कायदेशीररित्या हस्तांतर करुन देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून कार्यालयीन कामकाजाबाबत स्वच्छतातक्रार निवारणजुन्या वाहनाचे निर्लेखनजुन्या दस्तऐवजांचे निर्लेखनकार्यालयीन सोयीसुविधा यावर लक्ष देत कामात सुधारणा करण्यात आली आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी प्रोत्साहन देण्यात आले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. UCDC व महिला व बालविकास भवन यासारखे देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. असे विविध उपक्रम राबवून व दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून सांघिक कार्याने महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रीय अप्रेंटीस योजनेत महाराष्ट्र प्रथम

 राष्ट्रीय अप्रेंटीस योजनेत महाराष्ट्र प्रथम स्थानावर

केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी केले

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन

 

मुंबई, दि. 1 : राष्ट्रीय शिकावू (अप्रेंटीस) उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल राहिल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी मंत्रालयात कौशल्य विकास विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कौशल्य विकासाच्या उपक्रमांचा आढावा घेऊन विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

 

          कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दालनात झालेल्या बैठकीला कौशल्य विभागाचे आयुक्त नितीन पाटील,व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधुरी सरदेशमुखरतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

          राष्ट्रीय शिकावू उमेदवारी प्रोत्साहन योजनेचा सध्या राज्यातील 2 लाख 78 हजार प्रशिक्षणार्थी उमेदवार लाभ घेत असून आय. टी.  आय. मधील तब्बल 52 हजार विद्यार्थ्यांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेत महाराष्ट्राचे काम चांगले असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी यावेळी काढले. केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी राज्यातील कौशल्य आणि रोजगार विषयक विविध धोरणांबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत चर्चा चर्चा केली.

 

     आय. टी.आय मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणेकेंद्रीय राष्ट्रीय शिकावू योजना (NAPS) आणि महाराष्ट्राची शिकावू योजना (MAPS) यांच्यात समन्वय साधणारी यंत्रणा विकसित करावीअशी मागणी  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांच्याकडे केली. ग्रामीण अथवा शहरातील झोपडपट्टी परिसरात युवक-युवतींना नव्याने प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी दीड हजार चौरस फुटांच्या जागेमध्ये नवीन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी केंद्रीय निकष आहेत. त्या निकषात शिथिलता आणून तीनशे चौरस फुटांच्या जागेत नवीन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यास  मान्यता द्यावीराष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ आणि केंद्रीय कामगार विभागांतर्गत असलेले नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलमध्ये समन्वय केल्यास रोजगाराच्या दृष्टीने युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करू शकतोअसे ही श्री. लोढा यांनी यावेळी नमूद केले. राज्याच्या कौशल्यरोजगार विभागाला केंद्राचे सहकार्य लाभत असून यामागे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांचे प्रयत्न असल्याचे मंत्री लोढा यांनी आवर्जून सांगितले.

****

शेतीच्या सुधारणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर,१०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत कृषी विभागाचा तिसरा क्रमांक

 शेतीच्या सुधारणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर

- कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

१०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत कृषी विभागाचा तिसरा क्रमांक

              मुंबई, दि. १ : शाश्वत शेतीच्या वाटचालीसाठी कृषी विभाग काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन सुधारणा मोहिमेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये पहिल्या टप्प्यात कृषी विभागाने ६६.१५ टक्के गुण प्राप्त करत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेकडून विभागाने केलेल्या कामांचे मुल्यांकन करण्यात आले. कृषी विभागात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजनानव्या योजनांची अंमलबजावणीपारदर्शकतानवकल्पनाआणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या बाबींवर भर दिला असल्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

              कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले कीपदभार स्वीकारल्यानंतरच्या या १०० दिवसांच्या कालावधीत शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. विभागीय परिसंवाद दौ-याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद  साधला. पुणे येथे महाराष्ट्रातील पहिली कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळा यशस्वी झाली. बियाणे- खत -किटकनाशक उत्पादक कंपन्या आणि विक्रेते संघटनांसोबत गुणवत्तेची खात्रीबाजारातील उपलब्धता आणि संभाव्य समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

           कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले कीॲग्रीस्टेक या   (शेतकरी आयडी उपक्रम) आयडीद्वारे सर्व योजनांचा लाभ एकाच ओळखीद्वारे मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची खरी संख्या व माहिती अचूकपणे उपलब्ध होणार आहे तसचे राज्यात 92 लाख शेतकरी ID तयार झाले आहेत त्यामुळे  शेतकरी डेटाचा मजबूत आधार तयार झाला आहे.  एक खिडकी सेवा उपक्रमामध्ये सर्व कृषी योजनासेवा आणि माहिती एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांसाठी अर्जट्रॅकिंगआणि तक्रार निवारण एकाच ठिकाणी अ‍ॅप व वेब पोर्टलच्या माध्यमातून सेवा प्रदान होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, सूक्ष्म सिंचन योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना, जमीन आरोग्य पत्रिका वितरण यासह केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा, तक्रार निवारण, कार्यालयीन बाबी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर या बाबी यावर १०० दिवसात भर दिला आहे. अधिक प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी वाढली असल्याचेही कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

*****

Featured post

Lakshvedhi