Friday, 2 May 2025

बॉलिवूडचे महान अभिनेते मनोज कुमार यांना वेव्हज २०२५ ने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

 बॉलिवूडचे महान अभिनेते मनोज कुमार यांना

वेव्हज २०२५ ने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

·         "मनोज कुमार यांच्या आठवणींना उजाळा : उत्कृष्ट चित्रपट निर्मातेअस्सल राष्ट्रवादी"

·         वेव्हजमधील ब्रेकआउट सत्रात तळमळअंतर्दृष्टी आणि चित्रपट वारसा यांचे घडले दर्शन

 

मुंबई, दि. १ :- वेव्हज २०२५ मधील  सिनेमाचे वातावरण एका भावनिक क्षणाने भारावून गेले.  "मनोज कुमार यांच्या आठवणींना उजाळा : उत्कृष्ट चित्रपट निर्मातेअस्सल राष्ट्रवादी" या वेव्हज ब्रेकआउट’ सत्रात भारतीय चित्रपटसृष्टीतील देशभक्त नायकांपैकी एक ओळख असलेले दिवंगत अभिनेते मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि पॉडकास्टर मयंक शेखर यांनी  सूत्रसंचालन केलेल्या या सत्रात चित्रपट आणि साहित्य जगतातील प्रमुख व्यक्तींनी एकत्र येत दिग्गज अभिनेतेलेखक आणि चित्रपट निर्मात्याच्या वारशाबाबत आपले विचार मांडले.

हरिकिशन गिरी गोस्वामी हे मनोज कुमार यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म 1937 मध्ये झाला.  मनोज कुमार यांचे आयुष्य त्यांच्या चित्रपटांइतकेच नाट्यमय आणि प्रेरणादायी होते. फाळणीमुळे कोलमडून गेलेले मनोजकुमार  अनेक  स्वप्ने उराशी बाळगून  मुंबईत आले पण चित्रपट जगतामध्‍ये   त्यांचा कुणाशीही संबंध नव्हता. सुरुवातीला  उर्दूमध्ये पटकथा लिहिणारे एक स्वयंघोषित कथाकार असणा-या मनोज  कुमार यांनी  चित्रपट अभिव्यक्तीत वेगळा बाज  तयार केला - मुख्य प्रवाहातील आकर्षणाला राष्ट्रवाद आणि सामाजिक विवेकाच्या भावनेची जोड दिली.

मनोज कुमार यांचे सुपुत्र  आणि अभिनेता कुणाल गोस्वामी यांनी सत्राची सुरुवात जिव्हाळ्याच्या आठवणींनी केली: माझ्या वडिलांनी फाळणीत सर्वस्व गमावलेपण त्यांनी कधीही आपले स्वप्न हरवू दिले  नाही. निर्वासित छावण्यांमध्ये राहण्यापासून ते उर्दूमध्ये वैशिष्ट्यपूर्ण  कथा लिहिण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास लवचिकतेचा दाखला  आहे. त्यांनी भगतसिंगांच्या आईला 'शहीद'च्या प्रीमियर प्रसंगी सोबत आणले होते  - वैयक्तिक स्तरावरही त्यांची देशभक्ती इतकी प्रखर  होती कीत्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली त्याच्या खोलवर मुळाशी  राष्ट्रवादच  असेआणि ती एक अतिशय दुर्मिळ कामगिरी होत असे.’’

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी मनोज कुमार यांच्या सिनेमॅटिक तंत्रांची आठवण करून देताना सांगितले की गाणी चित्रित करण्याची त्यांची शैली आगळी-वेगळी होती. भांडारकर पुढे म्हणाले की मनोज कुमार यांचे चित्रपट राष्ट्रवाद आणि सामाजिक वास्तववादाने भरलेले होतेजे त्यांनी स्वतःच्या कामातही प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्येष्ठ लेखक आणि गीतकार डॉ. राजीव श्रीवास्तव म्हणाले की,  मनोज कुमार यांचे जीवन म्हणजे सामान्य माणसाच्या भाषेतील सिनेमॅटिक मिशन होते.

ज्येष्ठ स्तंभलेखिका आणि चरित्रकार भारती एस. प्रधान म्हणाल्या कीमनोज कुमार यांना   प्रचंड यश मिळाल्यानंतरही ते सर्वांना अगदी सहजतेने भेटत होते. इतकेच नाही तर आजारी असतानाही ते त्यांच्या पुढच्या चित्रपटाचे स्वप्न पाहत असत. नेहमी पुढचीभविष्‍यात करावयाच्या  नवीन कामांविषयी त्यांना खूप उत्साह असे.’’

एक वारसा जो जिवंत राहिला...

प्रेमाने  भारत कुमार म्हणून ओळखले जाणारे मनोज कुमार यांना पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. त्यांचे चित्रपट - शहीदपूरब और पश्चिमरोटी कपडा और मकानउपकारक्रांती - हे केवळ चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचे टप्पे नव्हतेतर सांस्कृतिक टप्पे होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात तसेच देशभक्ती आणि कथाकथनाला उदात्त बनवणाऱ्या माणसाबद्दल कृतज्ञतेच्या सामूहिक भावनेने सत्राचा शेवट झाला.

0000

वेव्हज सारख्या सुंदर उपक्रमाचा भाग असल्याचा अतिशय आनंद - हेमा मालिनी

 वेव्हज सारख्या सुंदर उपक्रमाचा भाग असल्याचा अतिशय आनंद - हेमा मालिनी

·         कला आणि व्यावसायिक सिनेमा यामध्ये भेदभाव नाही - लोकांच्या हृदयाला स्पर्श करतं ते कथाकथन मोहनलाल

·         अभिनय हे माझं बालपणापासूनचं पहिलं प्रेम आहे चिरंजीवी

·         महान व्यक्तिमत्वे आणि त्यांचा वारसा यावरील चर्चेने वेव्हज २०२५ चा प्रारंभ

 

मुंबई, दि. १ :- जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेची जियो वर्ल्ड सेंटरमध्ये महान व्यक्तिमत्वे आणि त्यांचा वारसा  यावरील चर्चेने  अतिशय दिमाखदार सुरुवात झाली. या सत्रामध्ये भारतातील सर्वाधिक नामवंत सिनेकलावंत कथाकथनसर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसा या विषयांवरील अतिशय उत्कंठावर्धक चर्चेसाठी एकत्र जमले होते.

या उद्घाटन कार्यक्रमातील पॅनेलमध्ये प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनीमोहनलाल आणि चिरंजीवी यांसारखे नामवंत सिनेकलाकार सहभागी झाले होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते अक्षय कुमार यांनी केले.

यावेळी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्या म्हणाल्या भारत सरकारचा हा अतिशय सुंदर उपक्रम आहेयाचा एक भाग असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि त्यांचे नेतृत्व यामुळे वेव्हज हा सृजनकार आणि नवोन्मेषकर्त्यांसाठी एक उल्लेखनीय मंच बनला आहेत्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार

प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल सिनेमाच्या विकसित होत असलेल्या स्वरूपाबद्दल म्हणाले की, आर्ट सिनेमा आणि मनोरंजनासाठीचा सिनेमा यामध्ये सूक्ष्म फरक आहेकारण आर्ट सिनेमामध्येही  मनोरंजनाचे मूल्यदेखील असते. "मी कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटांमध्ये फरक करत नाही. ते एक प्रकारचे कथाकथन आहेजे लोकांच्या हृदयाला स्पर्श करत असते".

प्रख्यात अभिनेते चिरंजीवी यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या प्रवासाबद्दल हृदयस्पर्शी आठवण सांगितलीज्यामध्ये सिनेमावरील अढळ प्रेम आणि उत्कृष्ट योगदानासाठी अथक प्रयत्न सर्वांनीच अनुभवले. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील धडपड आणि मेहनतीचा उल्लेख करताना ते म्हणाले, "लहानपणापासूनच अभिनय हे माझे पहिले प्रेम राहिले आहे. मी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इच्छेने प्रेरित असे. एक चांगला अभिनेता बनण्यासाठी मी कोणती अनोखी गोष्ट करू शकतो?" असे मी सतत स्वतःला विचारत असे.

प्रामाणिक कामाबद्दलच्या वचनबद्धतेवर त्यांनी विशेष भर दिला. चिरंजीवी यांनी स्थिरता आणि एकमेकांशी आपलेपणाने जोडलेले राहण्याची उत्कट इच्छा यावेळी व्यक्त केली. "प्रेक्षकांनी मला नेहमीच 'त्यांच्यातील एकअशा रूपात पाहावे अशी माझी इच्छा होती. म्हणूनच मी शक्य तितका नैसर्गिक आणि प्रामाणिक अभिनय करण्याचा प्रयत्न करतो," असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कलेलात्यांच्यातील अभिनेत्याला घडवणाऱ्या दिग्गजांप्रति त्यांनी आदर व्यक्त केला. मिथुन चक्रवर्तीअमिताभ बच्चन आणि कमल हासन यांसारख्या सिनेमा जगतातील आदर्श कलाकारांचा त्यांच्यातील अभिनेत्याच्या जडणघडणीवर खोलवर प्रभाव असल्याचे चिरंजीवी म्हणाले.

ही चर्चा वैयक्तिक विचार आणि सामायिक वारशांचे एक मार्मिक मिश्रण होतेज्याद्वारे प्रेक्षकांना भारतातील सिनेसृष्टीतील महान व्यक्तींच्या मनातल्या विचारांची दुर्मिळ झलक पाहायला मिळाली.

0000

जागतिक बौद्धिक संपदा (आयपी) परिसंस्थेत परिवर्तनाची गरज; आयपी सर्व देशांसाठी रोजगार, विकास आणि नवोन्मेषासाठी उत्प्रेरक म्हणून काम करते

 जागतिक बौद्धिक संपदा (आयपी) परिसंस्थेत परिवर्तनाची गरज;

आयपी सर्व देशांसाठी रोजगारविकास आणि नवोन्मेषासाठी

उत्प्रेरक म्हणून काम करते

- डॅरेन टांगमहासंचालकडब्ल्यूआयपीओ

वेव्हज २०२५ मध्ये "दृकश्राव्य कलाकार आणि आशय निर्मात्यांसाठी बौद्धिक संपदा (आयपी) आणि कॉपीराइटची भूमिका" या विषयावरील सत्राने माहितीपूर्ण संवादाला दिली चालना

 

मुंबई१ :-मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद  (वेव्हज) मध्ये "दृकश्राव्य  कलाकार आणि आशय निर्मात्यांसाठी आयपी आणि कॉपीराइटची भूमिका" यावर पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली. डिजिटल युगात निर्मात्यांना सक्षम बनवण्यात बौद्धिक संपदा (आयपी) अधिकारांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी जागतिक मनोरंजनकायदा  आणि सर्जनशील उद्योगांमधील प्रभावशाली व्यक्ती  या सत्रात एकत्र आल्या होत्या.

या पॅनेलने कायद्याशी संबंधित बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले आणि विशेषत: कलाकार आणि आशय निर्मातेज्यांचे काम अनधिकृत वापर आणि शोषणासाठी असुरक्षित आहेत्यांच्यासाठी आयपी अधिकारांबद्दल अधिक जागरूकता आणि संरक्षणाची तातडीची गरज अधोरेखित केली.

ज्येष्ठ वकील अमित दत्ता यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले आणि तज्ञ आणि निर्मात्यांच्या प्रतिष्ठित  पॅनेलदरम्यान चर्चेला गती दिली.  पॅनेलमध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे (डब्ल्यूआयपीओ) महासंचालक. डॅरेन तांग यांचा समावेश होताज्यांनी धोरणात्मक चौकटी आणि जगभरातील कलाकारांसाठी संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी डब्ल्यूआयपीओच्या प्रयत्नांबाबत जागतिक दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की गेल्या 5  दशकांमधील भारताचा बौद्धिक संपदाविषयक  प्रवास असामान्य   आहे आणि त्याची सर्जनशील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आयपी सर्व देशांसाठी रोजगारविकास आणि नवोन्मेषासाठी  उत्प्रेरक म्हणून काम करते त्यामुळे जागतिक आयपी परिसंस्थेत परिवर्तन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. डब्ल्यूआयपीओच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या डेटा मॉडेलबद्दल बोलताना ते म्हणाले की ते धोरणकर्तेअर्थतज्ज्ञ आणि त्याच्या सदस्य देशांच्या निर्मात्यांना सर्जनशील अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्यासाठी चांगली मोजमाप प्रणाली शोधण्यास मदत करत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाटककार फिरोज अब्बास खान यांनी रंगभूमीतील अनेक दशकांच्या त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि मूळ सर्जनशील कलाकृती जपताना येणाऱ्या आव्हानांमधून अनेक अंतरंग उपस्थितांसोबत सामायिक केले. ते म्हणालेकी बौद्धिक संपदा हा मानवी प्रतिष्ठेचा भाग आहे आणि समाजाने सर्वप्रथम कलाकारांच्या कामाचा आदर केला पाहिजे.

प्रसिद्ध चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माते स्टीव्ह क्रोन यांनी दृकश्राव्य कथाकथनामधील योगदानाचे संरक्षण करण्यासाठी कॉपीराइटचे महत्त्व आणि प्रमाणित जागतिक अंमलबजावणी यंत्रणेची आवश्यकता यांवर भर दिला. ते म्हणालेकी कॉपीराइट केवळ कमाईसंदर्भात नाहीतर निर्मात्यांच्या कामांचे शोषण होऊ नये यासाठी नियंत्रण म्हणून गरजेचे आहे.

ज्येष्ठ पटकथालेखक अंजुम राजाबली यांनी सर्जनशील प्रक्रियेबद्दल आणि गुंतागुंत वेगाने वाढणाऱ्या आशय अर्थव्यवस्थेत लेखकांनी त्यांचे हक्क समजून घेण्याचीतसेच त्यांच्या अधिकारांवर दावा करण्याची आवश्यकता याबद्दल विचार व्यक्त केले. ते म्हणालेकी आज कशाचाही अ‍ॅक्सेस मिळणे खूपच सोपे झाले आहेपण त्यावर निर्बंध असले पाहिजेत.

संपूर्ण सत्रातपॅनेलवरील सदस्यांनी कॉपीराइट मालकीपरवानानैतिक अधिकारएआयचा प्रभाव आणि वेगाने डिजिटलाइझ होत असलेल्या जगात प्रवेश आणि संरक्षण यांच्यातील संतुलन यावर सखोल चर्चा केली.

वेव्हज २०२५ मध्ये भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्याबाबत विचारांचे आदानप्रदान

 वेव्हज २०२५ मध्ये भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या

भविष्याबाबत विचारांचे आदानप्रदान

वेव्हज २०२५ मध्ये भारतीय माध्यम आणि मनोरंजन @१०० :

माध्यम आणि मनोरंजनाच्या भविष्याची पुनर्कल्पना

 

मुंबईदि. १ :- मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे वेव्हज २०२५  च्या पहिल्या  दिवशी "भारतीय माध्यम आणि मनोरंजन @१०० : माध्यम आणि मनोरंजनाच्या भविष्याची  पुनर्कल्पना" या शीर्षकाअंतर्गत लक्षवेधी  पॅनेल चर्चा झाली. या सत्रात उद्योगातील प्रमुख व्यक्तींनी २०४७ च्या दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या भारताचा  विकास  आणि पुढील वाटचालीबाबत आपले विचार मांडले.  बिझनेस स्टँडर्डच्या स्तंभलेखिका  वनिता कोहली खांडेकर यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले.

सत्राच्या सुरुवातीलावनिता कोहली खांडेकर यांनी वर्ष २००० च्या सुमारास अवघे ५०० कोटी रुपये  मूल्य असलेले माध्यम  आणि मनोरंजन क्षेत्र आता ७०,००० कोटी रुपयांची उलाढाल असलेलं प्रमुख उद्योग बनला असल्याचे सांगितले. या वाढीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन धोरणात्मक निर्णयांकडे त्यांनी लक्ष वेधले. यापैकी एक आहे  चित्रपट निर्मितीला देण्यात आलेला उद्योगाचा दर्जा आणि मल्टीप्लेक्सना दिलेल्या प्रारंभिक  कर सवलती. आशय सामग्रीचा केवळ दर्जा सुधारण्यात नाही तर महसूल वाढीतही  मदत करण्याच्या  एआयच्या क्षमतेबाबत त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. देशाच्या सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेवर भर देतत्यांनी अधोरेखित केले की वेगवान वाढ ही भारताच्या विविध प्रेक्षकांसाठी समावेशक आणि संवेदनशील असायला हवी. 

ग्रुपएमचे व्यवस्थापकीय संचालक विनित कर्णिक यांनी नमूद केले की आज माध्यम आणि मनोरंजन  क्षेत्रातील ६०% जाहिरात महसूल डिजिटल प्लॅटफॉर्मवरून येतो.  गेल्या काही वर्षांत या क्षेत्राला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले आहेत्यामुळे आशय सामग्रीचा वापर आणि विपणन यात मूलभूत बदल झाला आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एक मजबूत सक्षमकर्ता म्हणून एआय चा स्वीकार करतानात्यांनी आशय  मानवीय राहिला पाहिजे यावर भर दिला - विशेषतः अशा वेळी जेव्हा संस्कृती स्वतः मोबाइल तंत्रज्ञानाद्वारे आकाराला येत आहे . कथात्मक मांडणीला गती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा रचनात्मक वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आणि भविष्यातील व्यावसायिकांना सुसज्ज करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या  नवीन अभ्यासक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

जेटसिंथेसिसचे संस्थापक आणि सीईओ राजन नवानी यांनी भविष्यातील कंटेंट डिलिव्हरीवर लक्ष केंद्रित केलेजे क्रॉस-प्लॅटफॉर्म इंटरॅक्टिव्ह अनुभवांमध्ये विकसित होईल असा त्यांचा विश्वास आहे. त्यांनी सांगितले की जागतिक एम अँड ई बाजारपेठेत भारताचा वाटा फक्त २-% आहे आणि २०४७ पर्यंत हा वाटा आणखी वाढवण्याच्या दृष्टीने प्रतिभेमध्ये गुंतवणूक करणे आणि देशाची गुंतवणूक क्षमता वाढवणे अत्यावश्यक आहे. त्यांनी नमूद केले की मनोरंजन अधिकाधिक गतिमान होत आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपांसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल.

वनिताच्या मुद्रीकरणाबाबतच्या चिंतेचे निराकरण करताना त्यांनी विकसित बाजारपेठांच्या तुलनेत भारतातील  ग्राहकांच्या तुलनेने कमी खर्च करण्यायोग्य उत्पन्नाकडे लक्ष वेधलेपरंतु शाश्वत आर्थिक वाढीमुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ होईल असा आशावाद व्यक्त केला. त्यांनी ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगचे उदाहरण दिलेजिथे प्रेक्षक आधीच वैयक्तिकरीत्या वापर आणि पेमेंटमध्ये सहभागी होत आहेत.

इरॉस नाऊचे सीईओ विक्रम टन्ना यांनी भारताला माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनविण्याचे आवाहन केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की आशय सामग्रीची निर्मिती आणि वितरण या दोन्हीमध्ये ए आय बदल घडवून आणेलज्यामुळे वापरकर्त्यांना निर्माता बनण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. त्यांच्या मते डिजिटल युगात अनेक वळणे येतील आणि भारत स्पर्धात्मक राहावा यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहेत. त्यांनी यावर भर दिला की नवीन तंत्रज्ञान सोपे करणे - त्यांना इंटरनेट इतके सुलभ करणे - यामुळे स्वाभाविकपणे व्यवसायाचा विस्तार होईल. त्यांनी सत्राचा समारोप करताना असे नमूद केले कीया विकसित वातावरणातउद्योगाने मशीनशी कसे जोडले जावे आणि जाहिराती आणि प्रेक्षकांच्या सहभागासाठी विशाल आशय सामग्री परिचित्राचा कसा वापर करावा हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या सत्रात भारताच्या एम अँड ई क्षेत्राचा भविष्यकालीन दृष्टिकोन सादर करण्यात आलाज्यात त्याचे भविष्य घडवण्यासाठी धोरणतंत्रज्ञानप्रतिभा आणि सांस्कृतिक प्रासंगिकता यांच्या परस्परसंवादावर भर देण्यात आला. वेव्हज २०२५ जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ४ मे पर्यंत सुरू राहीलज्यामध्ये ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन उद्योगांमधील जागतिक कल दर्शविणारी  सत्रे असतील.

मीडिया आणि विकास क्षेत्रात आघाडी - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

 मीडिया आणि विकास क्षेत्रात आघाडी - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

भारत प्राचीन कला आणि आधुनिकतेला एकत्र आणत आहेम्हणूनच जागतिक माध्यमे आणि विकास क्षेत्रात आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी भारत नैसर्गिक पर्याय ठरत आहे. वेव्हजच्या माध्यमातून आपण मनोरंजनासह देशाच्या संस्कृतीच्या संवर्धनाची प्रेरणा देत असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादनाने झाली. त्यांच्या वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. नागालँड येथील कलाकारांनी नागालँडची लोककला सादर केली.

पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांच्या 'अप्सरा आली' या गाण्याला तर पॉप संगीत गायक अलन वाल्कर यांच्या पॉप संगीताला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

वेव्हज ऑफ इंडिया अल्बमचे लोकार्पण

एम एम किरामणी यांनी संगीत दिलेल्या आणि ए आर रहमानशंकर महादेवनप्रसन्न जोशीरॉकी केजमित ब्रदर यांनी गायलेल्या वेव्हज ऑफ इंडिया अल्बमचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.

0000

सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जागर

 सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जागर

- केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

            मुंबईदि. १ : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढवण्याचे कार्य केले आहे. जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेच्या माध्यमातून भारतीय कला जगभर पोहोचवण्याची संधी प्राप्त झाली आहे. यातून सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जागर होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत सांस्कृतिक कार्यक्रमात मंत्री श्री. शेखावत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवउद्योगमंत्री उदय सामंतराजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावलसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारकौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढायुट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी निल मोहन तसेच विविध देशातील मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक मंत्री श्री. शेखावत म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा उद्घोष झाला आहे. भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर नेल्याने

याचे फलित म्हणून कोडियाट्टमवैदिक पठणरामलीलागरबा यांसह १५ सांस्कृतिक घटक युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. याशिवायभरतमुनींचे नाट्यशास्त्र आणि भगवद्गीताही युनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्डरजिस्टरमध्ये नोंदवण्यात आली.

वेव्हज आंतरराष्ट्रीय मनोरंजन परिषदेत जागतिक माध्यम संवादासह २ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

 वेव्हज आंतरराष्ट्रीय मनोरंजन परिषदेत जागतिक माध्यम संवादासह

२ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

 

मुंबईदि. 1 : वेव्हज 2025 या आंतरराष्ट्रीय मनोरंजन परिषदेचे आयोजन जिओ वर्ल्ड सेंटरबीकेसी मुंबई येथे एक ते चार मे 2025 दरम्यान करण्यात आले आहे. या परिषदेत 2 मे 2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

 दालन क्रमांक 105 ए अण्ड बीदालन क्रमांक 104 ए आणि 103क्युब ॲण्ड स्टुडिओ येथे वेव्हज बाजार असणार आहे. वेव्हज बझार हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठीची प्रमुख जागतिक बाजारपेठ असूनते चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांना खरेदीदारविक्रेते आणि विविध प्रकल्प आणि प्रोफाइलशी जोडून घेण्याची संधी देईल. व्ह्यूइंग रूम हे वेव्हज बझारमध्ये उभारलेले एक समर्पित व्यासपीठ असूनते 1 ते 4 मे 2025 या काळात खुले राहील.

तसेच लोटस-1 येथे जागतिक माध्यम संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये जागतिक धोरणकर्तेउद्योग क्षेत्रातील भागधारकमीडिया व्यावसायिक आणि कलाकार एकत्र येतील आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यतांत्रिक नवोन्मेष आणि नैतिक पद्धतींवर लक्ष केंद्रित करून दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्राचे भविष्य घडवण्याच्या उद्देशाने रचनात्मक चर्चेत सहभागी होतील. तसेच दु. 2.30 जास्मिन हॉल क्र.1 येथे क्रिएट इंडिया चँलेज पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

परिषदेत प्लेनरी सत्रमध्ये जस्मिन हॉल क्र.1 येथे स. 10 ते दुपारी 2 पर्यंत विविध विषयांच्या पॅनलवरील चर्चासत्रेसादरीकरण आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  तर जास्मिन हॉल क्र.2 येथे स 10 ते सायंकाळी 6 दरम्यान विविध विषयांच्या पॅनलवरचे चर्चासत्रेसंवाद सत्रफायर साईट चॅट उपक्रम होणार आहे. तसेच जास्मिन हॉल क्र.3 येथे स 10 ते सायंकाळी 6 पर्यंत विविध विषयांच्या पॅनलवरचे चर्चासत्रेपरिसंवादफायर साईट चॅट होणार आहे.

या परिषदेत ब्रेकऑउट सत्रात दालन क्रमांक 202203205206 मध्ये स 9.30 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत चित्रपट माध्यम क्षेत्राचे विविध तंत्रज्ञाननवीन आवाहनेनवीन संधी याविषयी चर्चासत्रे होणार आहेत. परिषदेत मास्टर क्लास सत्रात स 10 ते दु.1 पर्यंत दालन क्रमांक 204 ए मध्ये विविध मनोरंजन क्षेत्राविषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेव्ह एक्स या सत्रामध्ये स 10 ते दु.3.30 दरम्यान दालन क्रमांक 104 बी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.

Featured post

Lakshvedhi