Friday, 4 April 2025

बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत वाढ

 बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत वाढ

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

·         महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत निर्णय

 

मुंबई,दि.२ : कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कलानिर्मितीच्या क्षेत्रात पारंगत बनविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे,  कलात्मक विचार आणि सृजनशीलतेला चालना देणे देऊन आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे असते त्यामुळे बालचित्रकला स्पर्धेसाठी दिल्या जाणाऱ्या बक्षीसांमध्ये वाढ करण्यात आली असून  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुधारित बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे अशी माहिती उच्च व इतर तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील  यांनी दिली.

मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची द्वितीय बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

राज्यस्तरीय बक्षीस : अनुक्रमे 10 हजार, 5 हजार 2 हजार ५००१हजार  असे असून  जिल्हास्तरीय बक्षीस: प्रथम  २ हजारद्वितीय १ हजार, तृतीय ५०० तर चौथे २५० रुपये असणार आहेत

शासकीय रेखाकला परीक्षेच्या बक्षीस रकमेतील वाढ

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षांसाठी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना दिली जाणारी बक्षीस रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. नवीन सुधारित बक्षीस रक्कम एकूण ₹४ लाख रुपये२० हजार एवढी असणार आहे.

शासकीय उच्चकला परीक्षेस मान्यता

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनमान्य अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली आहे  तसेच वित्तीय नियमन आणि अर्थसंकल्प मंडळाच्या वित्तीय नियमावलीस तसेच वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे

शैक्षणिक शुल्क निश्चिती

विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमधील अभ्यासक्रमांचे तात्पुरते (Ad-hoc) शुल्क निश्चित करण्याचा अधिकार शुल्क निश्चिती समितीला देण्यात आला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या आधारावर पदविका अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कला पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी आता तीन वर्षांचा करण्यात येणार आहे.तसेच कला शिक्षण संस्थांची संलग्नता सर्व शासनमान्य कला परिसंस्थांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत मंडळाची संलग्नता घेणे बंधनकारक राहणार आहे.

फोटोग्राफी अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

फोटोग्राफी अभ्यासक्रम यापूर्वी सर ज.जी. उपयोजित कला या संस्थेमध्ये सुरू होता. परंतु तो सध्या बंद आहे. अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन फोटोग्राफी अभ्यासक्रम एक महिन्याच्या आत सुरू करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.

००००

महाराष्ट्र दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थानी ५३७ बालकांना मिळाले हक्काचे घर

 महाराष्ट्र दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थानी

५३७ बालकांना मिळाले हक्काचे घर

- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. २ : महाराष्ट्र राज्याने दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. सन २०२४-२५ या वर्षात सर्वाधिक ५३७ बालकांना कायदेशीर प्रक्रियेनंतर दत्तक इच्छुक पालकांना सोपविण्यात आले. यामुळे बालकांना हक्काचे ‘पालक’ व ‘घर’ मिळाले आहे, अशी समाधानाची भावना महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

देशात एकूण कायदेशीर दत्तक मुक्त बालकांची संख्या ४५१२ इतकी असून यापैकी महाराष्ट्रात एकूण ५३७ बालके कायदेशीर दत्तक मुक्त करण्यात आली आहे. या दत्तक प्रक्रियेद्वारे हक्काचे आई-वडील व कुटुंब मिळवून देण्यात आली आहेत. सातत्याने काम करुन दत्तक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राला देशात अव्वलस्थानी आणल्याबद्दल या उल्लेखनीय यशासाठी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व संबंधित अधिकारी – कर्मचारी संस्था व राज्याच्या दत्तक स्त्रोत संस्थांचे अभिनंदन केले आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, सुधारित अधिनियम २०२१ आणि कारा दत्तक नियमावली २०२२ च्या अनुषंगाने राज्यात प्रभावीपणे दत्तक प्रक्रिया राबवण्यात आली आहे. केंद्रीय दत्तक स्त्रोत संस्था (कारा) नवी दिल्ली यांनी या उल्लेखनीय कामाची दखल घेतली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत ६० विशेष दत्तक मान्यता प्राप्त संस्था कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून दत्तक पात्र बालकांना कायदेशीर मुक्त घोषित करून त्यांना हक्काचे पालक व कुटुंब मिळवून देण्याचे कार्य केले जाते.

महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव आणि आयुक्त  नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. अनेक बालकांना सुरक्षित आणि प्रेमळ कुटुंब मिळावे यासाठी  दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळेत होणार; नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

 महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळेत होणार;

नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

 मुंबईदि.२ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच गुरुवार दि.३  एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने SLP No. ८५७६/२०२५ या याचिकेमध्ये विद्यमान निर्वाचन अधिकाऱ्यांऐवजी "अवर सचिव स्तराचे नवीन निर्वाचन अधिकारी" तात्काळ नियुक्त केल्यास निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येईल असे निर्देश २ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशान्वये दिले आहेत. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूक घेण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे अवर सचिव सुनीलकुमार धोंडे यांची नियुक्ती निर्वाचन अधिकारी म्हणून करण्यात आली आहेअसेही सचिव धीरज कुमार यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग यांच्यात सामंजस्य करार विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध

 महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग यांच्यात सामंजस्य करार

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबईदि. २ : उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग)शिक्षा मंत्रालयकेंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात  सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धीप्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरेल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सिंहगड शासकीय निवासस्थान येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरबोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत AEDP कोर्सेस समाविष्ट करण्यात आले असूनविद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशिपसाठी अधिक संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला किमान ८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असूनत्यातील ५०टक्के रक्कम केंद्र सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

संचालक पी. एन. जुमले म्हणाले कीपूर्वी केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीच ॲप्रेटीसशिप उपलब्ध होती. मात्रनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सर्व पदवीधर आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांनाही ॲप्रेंटीसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील १० विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांसाठी भव्य मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी यावेळी दिली.

वांद्र स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार

 वांद्र स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत 

घरांचे स्वप्न पूर्ण होणार

- पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

वांद्रे येथील पुनर्वसित रहिवाश्यांना करारपत्रे वितरित

 

मुंबईदि. ३ : विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे 'वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्टअंतर्गत गौतम नगर येथील अनेक कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहेअसे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

वांद्रे पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसित होत असलेल्या रहिवाशांना त्यांच्या नवीन घरांचे करारपत्रे वितरणाचा कार्यक्रम मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते १० लाभार्थ्यांना घरांचे करारपत्रे यावेळी वितरित करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड.शेलार म्हणाले कीमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्रीगृहनिर्माण मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होत आहे. गणपती उत्सवाच्या आधीच रहिवाशांनी त्यांच्या नव्या घरात प्रवेश करावायासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

वांद्रे पूर्व येथील ३०.१६ एकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जमीन उच्च न्यायालयाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आलाअसे सांगून पालकमंत्री ॲड.शेलार म्हणाले कीझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वांद्रे पूर्व येथील ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या ७७ सदनिका व बालाजी शॉप किपर्स येथील ६७ सदनिका अशा एकूण १४४ सदनिका शासनाकडे पाठपुरावा करुन उपलब्ध करुन घेतल्या आहेत. या सदनिका तयार होण्यास सहा ते नऊ महिन्याचा अवधी लागणार असल्याने १०० पात्र झोपडीधारकांने स्वखर्चाने पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची अट नमूद करुन पात्र झोपडीधारकांशी करारनामे करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बंदिजनांच्या आयुष्यात 'सकारात्मकते'ची पहाट कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी

 बंदिजनांच्या आयुष्यात 'सकारात्मकते'ची पहाट

कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी

 

मुंबईदि. ३ : क्रोधद्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतात. अशा गुन्हेगारांच्या आयुष्यात भगवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेची जोड दिल्यास त्यांच्या आयुष्यात  नवी पहाट निर्माण होऊ शकते. याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातील कारागृहातून १९० बंदिजनांच्या साधनेतून दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर घुमत आहेत.

मागील वर्षभर गीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहात भगवद्गीता संथा वर्ग सुरू आहेत. स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. गीता परिवारद्वारा आजतागायत १२ लाख साधकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहे. पूर्णपणे निःशुल्क असे हे वर्ग १३ भाषांतून व २१ 'टाईम स्लॉट्स मध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज घेतले जात आहेत. हा वर्ग ४० मिनिटांचा आहे. वर्गामध्ये गीतेच्या श्लोकांचे शुद्ध उच्चारण शिकवले जाते. राज्यात या उपक्रमाचा व्यापक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमाच्या ऑनलाईन वर्गासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता कारागृह प्रशासक आणि कर्मचारी करत आहेत. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात डिसेंबर २०२३ मध्ये पहिला वर्ग सुरू झाला. टप्प्याटप्प्याने यात कोल्हापूर, नाशिक, ठाणेतळोजा येथील केंद्रीय कारागृहांना समाविष्ट केले गेले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात २५ठाणे ३५कोल्हापूर ४५नाशिक ४०तळोजा ३५येरवडा १० कैद्यांचा समावेश आहे. या कारागृहातील सुमारे १९० बंदी साधक गीता श्लोक पठण करीत आहेत.

प्रत्येक अध्यायाचे अर्थ विवेचन सुद्धा ऑनलाईन माध्यमातून केले जात आहे. सध्या ठाणेनाशिककोल्हापूर आणि तळोजा येथील कारागृहांमध्ये तिसऱ्या टप्प्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आले आहे. येथे एकूण १२ अध्यायांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहे. गीता परिवाराकडून सरळ पठणीय गीतेची पुस्तके साधकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कारागृह अधिकारी आणि साधक या उपक्रमाबाबत समाधानी आहेत. याबरोबरच येरवडा महिला कारागृहामध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्यात आले.पुरुष बंदी बांधवांकरिता रविवारी उद्बोधनपर व्याख्याने घेतली जात आहेत. 

            शनिवारी व रविवारी शिकलेल्या श्लोकांचे विवेचन केले जाते. यावेळी उपस्थित साधकांच्या शंकांचे निरसनदेखील केली जाते. गीता परिवाराचे हे वर्ग चार टप्प्यांमध्ये चालत आहेत. या चार टप्प्यातील वर्गांना चार स्तर म्हटले जाते. पहिल्या स्तरावर दोन अध्याय शिकवले जातात. दुसऱ्या स्तरामध्ये चार अध्याय शिकवले जातात. तिसऱ्या आणि चौथ्या स्तरमध्ये प्रत्येकी सहा अध्याय शिकवले जातात.

या उपक्रमामुळे बंदीजनांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम निश्चितच बंदीजनांना नव्या आयुष्याच्या वळणावर आणण्यास यशस्वी होत आहे. अशा उपक्रमांमुळे बंदीजन आपल्या कुटुंबात परत येवून एक चांगले आयुष्य जगू शकणार आहेत, असा विश्वास कारागृह प्रशासनाने व्यक्त केला आहे.

0000

एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे

 एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे

-   परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. 3 : एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे अशा निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.

            परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,  यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

            सध्या ज्या जाहिरात संस्थंना काम दिले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचे करार रद्द करावेत. अशा सूचना देऊन मंत्री सरनाईक म्हणाले की, यासाठी चांगले उत्पन्न देणाऱ्या संस्थांची निवड करावी. सध्या जाहिरातीच्या माध्यमतून महामंडळाला 22-24 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामध्ये वाढ करुन हे उत्पन्न 100 कोटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.

 नवीन बस खरेदीमध्ये प्रवासी व बस यांची सुरक्षा लक्षात घेऊन जाहिरातीसाठी उपयुक्त पॅनेल   बसवण्याची व्यवस्था करावी. तसेच जुन्या बसेसमध्येही याची व्यवस्था करण्यात यावी. बसस्थानके सुधारण्यासाठी नियोजन करावे.त्यासाठी एसटीला डिझेल पुरवठा करण्याऱ्या संस्थांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमतून राज्यातील महत्त्वाच्या बसस्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष उभारून ते चांगल्या स्थितीत राहतील याची व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

            मंत्री सरनाईक म्हणाले की, महामंडळ मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करते. यासाठीच्या भविष्यात निविदा काढताना त्यामध्ये सीएसआर फंडाची अट समाविष्ट करावी.

भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या संस्थेचा करार रद्द करा

            सध्या 5150 इलेक्ट्रिक बस पैकी केवळ 220 बसेस एसटी महामंडळाला संबंधित संस्थेने भाडेतत्त्वावर पुरविल्या आहेत. भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्याचा करार केलेल्या आणि अद्यापही बस पुरवठा न करणाऱ्या संबंधित संस्थेला अंतिम नोटीस पाठवावी. त्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्यांचा करार रद्द  करण्याची कार्यवाही करावी.

नवीन बसेस प्रत्येक आगाराला पोहोचल्या पाहिजेत

यंदा 2 हजार 640 लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी मार्च अखेर 800 बसेस 100 आगारात दाखल झाल्या असून प्रवासी सेवेत रुजू झालेल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व 251 आगारांना नवीन बसेस मिळतील असे नियोजन करावे. महामंडळाच्या नवीन बसेसचे लोकांनी चांगले स्वागत केले आहे. येथून पुढेही अशाच प्रकारे चांगल्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात. सर्व बसेसमध्ये जीपीएस सह सीसीटीव्ही कॅमेराही बसवण्यात यावेत, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या.

 

Featured post

Lakshvedhi