Thursday, 3 April 2025

बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत वाढ,फोटोग्राफी अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

 बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत वाढ

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

·         महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत निर्णय

 

मुंबई,दि.२ : कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कलानिर्मितीच्या क्षेत्रात पारंगत बनविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे,  कलात्मक विचार आणि सृजनशीलतेला चालना देणे देऊन आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे असते त्यामुळे बालचित्रकला स्पर्धेसाठी दिल्या जाणाऱ्या बक्षीसांमध्ये वाढ करण्यात आली असून  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुधारित बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे अशी माहिती उच्च व इतर तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील  यांनी दिली.

मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची द्वितीय बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

राज्यस्तरीय बक्षीस : अनुक्रमे 10 हजार, 5 हजार 2 हजार ५००१हजार  असे असून  जिल्हास्तरीय बक्षीस: प्रथम  २ हजारद्वितीय १ हजार, तृतीय ५०० तर चौथे २५० रुपये असणार आहेत

शासकीय रेखाकला परीक्षेच्या बक्षीस रकमेतील वाढ

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षांसाठी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना दिली जाणारी बक्षीस रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. नवीन सुधारित बक्षीस रक्कम एकूण ₹४ लाख रुपये२० हजार एवढी असणार आहे.

शासकीय उच्चकला परीक्षेस मान्यता

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनमान्य अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली आहे  तसेच वित्तीय नियमन आणि अर्थसंकल्प मंडळाच्या वित्तीय नियमावलीस तसेच वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे

शैक्षणिक शुल्क निश्चिती

विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमधील अभ्यासक्रमांचे तात्पुरते (Ad-hoc) शुल्क निश्चित करण्याचा अधिकार शुल्क निश्चिती समितीला देण्यात आला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या आधारावर पदविका अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कला पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी आता तीन वर्षांचा करण्यात येणार आहे.तसेच कला शिक्षण संस्थांची संलग्नता सर्व शासनमान्य कला परिसंस्थांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत मंडळाची संलग्नता घेणे बंधनकारक राहणार आहे.

फोटोग्राफी अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

फोटोग्राफी अभ्यासक्रम यापूर्वी सर ज.जी. उपयोजित कला या संस्थेमध्ये सुरू होता. परंतु तो सध्या बंद आहे. अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन फोटोग्राफी अभ्यासक्रम एक महिन्याच्या आत सुरू करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.

००००

महाराष्ट्र दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थानी ५३७ बालकांना मिळाले हक्काचे घरयोजना

 महाराष्ट्र दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थानी

५३७ बालकांना मिळाले हक्काचे घर

- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. २ : महाराष्ट्र राज्याने दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. सन २०२४-२५ या वर्षात सर्वाधिक ५३७ बालकांना कायदेशीर प्रक्रियेनंतर दत्तक इच्छुक पालकांना सोपविण्यात आले. यामुळे बालकांना हक्काचे ‘पालक’ व ‘घर’ मिळाले आहे, अशी समाधानाची भावना महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

देशात एकूण कायदेशीर दत्तक मुक्त बालकांची संख्या ४५१२ इतकी असून यापैकी महाराष्ट्रात एकूण ५३७ बालके कायदेशीर दत्तक मुक्त करण्यात आली आहे. या दत्तक प्रक्रियेद्वारे हक्काचे आई-वडील व कुटुंब मिळवून देण्यात आली आहेत. सातत्याने काम करुन दत्तक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राला देशात अव्वलस्थानी आणल्याबद्दल या उल्लेखनीय यशासाठी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व संबंधित अधिकारी – कर्मचारी संस्था व राज्याच्या दत्तक स्त्रोत संस्थांचे अभिनंदन केले आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, सुधारित अधिनियम २०२१ आणि कारा दत्तक नियमावली २०२२ च्या अनुषंगाने राज्यात प्रभावीपणे दत्तक प्रक्रिया राबवण्यात आली आहे. केंद्रीय दत्तक स्त्रोत संस्था (कारा) नवी दिल्ली यांनी या उल्लेखनीय कामाची दखल घेतली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत ६० विशेष दत्तक मान्यता प्राप्त संस्था कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून दत्तक पात्र बालकांना कायदेशीर मुक्त घोषित करून त्यांना हक्काचे पालक व कुटुंब मिळवून देण्याचे कार्य केले जाते.

महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव आणि आयुक्त  नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. अनेक बालकांना सुरक्षित आणि प्रेमळ कुटुंब मिळावे यासाठी  दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत AEDP कोर्सेस समाविष्ट करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशिपसाठी अधिक संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे

 महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग यांच्यात सामंजस्य करार

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबईदि. २ : उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग)शिक्षा मंत्रालयकेंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात  सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धीप्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरेल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सिंहगड शासकीय निवासस्थान येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरबोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत AEDP कोर्सेस समाविष्ट करण्यात आले असूनविद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशिपसाठी अधिक संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला किमान ८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असूनत्यातील ५०टक्के रक्कम केंद्र सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

संचालक पी. एन. जुमले म्हणाले कीपूर्वी केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीच ॲप्रेटीसशिप उपलब्ध होती. मात्रनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सर्व पदवीधर आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांनाही ॲप्रेंटीसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील १० विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांसाठी भव्य मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी यावेळी दिली.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल -

 पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची

उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, दि. २ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आखून दिलेल्या १०० दिवसांसाठीच्या आराखड्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या १०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहेअशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीस प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाजलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनचे संचालक ई. रवींद्रसहसचिव बी.जी. पवारमुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे यांची उपस्थिती होती.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या बहुतेक सर्व योजनांचे उद्दिष्ट ९० ते ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करावे. १०० दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. विभागातील अधिकाऱ्यांनी क्षेत्रभेटींची नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावी तसेच आगामी काळात शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यातअसे निर्देश श्री.पाटील यांनी दिले.

बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल’ योजनेतील नळ जोडणी व नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसह योजना माहिती फलकस्रोतांचे १०० टक्के जिओ-टॅगिंग पूर्ण करण्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच पीएम जनमन योजनाशाळांमध्ये पिण्यासाठी नळजोडणी व अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे. राज्यातील १० प्रयोगशाळा आणि अन्य उपक्रमांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्वच्छ भारत मिशन

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला. गावांना हागणदारीमुक्त करण्याच्या उद्दिष्टासह अधिक गावांना मॉडेल गाव घोषित करण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली. तसेच गोवर्धन प्रकल्पप्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि इतर योजनांच्या प्रगतीचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम आढावा

१०० दिवसांचा आराखडा अंतर्गत कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेच्या अनुषंगाने गतिमान प्रशासनांतर्गत संकेतस्थळांचे सुगमीकरणकार्यालय व स्वच्छतागृहांची स्वच्छतानागरिकांना सेवा सुलभतेने मिळवून देणेविविध तक्रारींचा निपटाराअर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे आदी महत्त्वाच्या विषयांवरही बैठकीत सखोल चर्चा झाली.

शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती सर्व विभागांनी संकेतस्थळांवर उपलब्ध करुन द्यावी

 शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती

सर्व विभागांनी संकेतस्थळांवर उपलब्ध करुन द्यावी

                                 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. २ :- राज्यात शंभर दिवसांसाठीचा कृती आराखडा ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली असून या अंतर्गत विविध विभागांमार्फत आतापर्यंत ४११ कामांसंदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली ३७२ कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ८५ टक्के कामे पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली आहे. सर्व विभागांनी येत्या १ मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत तसेच प्रत्येक विभागाने शंभर दिवस कार्यक्रमाची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन द्यावीअसे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

        सह्याद्री अतिथीगृह येथे शंभर दिवस कृती कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुख्य सचिव सुजाता सौनिकविभागांचे मंत्री संबंधित अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस म्हणाले कीशंभर दिवसांसाठीचा कृती आराखडा कार्यक्रम विभागांनी गांभीर्याने यशस्वी केला आहे. अनेक  विभागांनी यामध्ये उत्तम काम केले आहे. नागरिकांना या माध्यमातून उपयुक्त आणि तत्पर सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शंभर दिवसांसाठी कार्यक्रमाचा कालावधी १५ दिवस वाढविण्यात आला आहे. येत्या 1 मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावर विभागांनी संकल्पित केलेली कामे व पूर्ण झालेली कामे याची माहिती उपलब्ध करुन द्यावी. त्यासोबतच काही कार्यवाही अपूर्ण राहिली असतील तर त्याची कारणे संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही श्री. फडणवीस  यांनी यावेळी दिल्या.

विभागांनी गतीमानतेने लोकोपयोगी कामे गुणवत्तेसह आणि कालमर्यादेत पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी विभागांनी आपल्यास्तरावर यंत्रणा कार्यान्वित करावी. उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी तांत्रिकप्रशासकीय आणि इतर अनुषंगिक बाबींची तातडीने पूर्तता करावी. विभागांनी उपलब्ध निधीचा सुयोग्य वापर करण्यास प्राधान्य द्यावेअसे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

बैठकीत एकूण 26 विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांचे 938 मुद्द्यांपैकी 411 मुद्द्यांवर (44%) पूर्णतः काम झाले आहे. तसेच, 372 मुद्दे (40%) अंतिम टप्प्यात असून ते निश्चित वेळेत पूर्ण होतील. 155 मुद्दे प्रगतीपथावर आहेत. या कामांच्या पूर्ततेबाबत सुरु असलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित विभागांनी दिली. त्यासाठी त्यांना 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ श्री.शिंदे म्हणाले, शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विभागांनी गतीमान काम करुन लोकाभिमुख कार्यपद्धतीचा अनुभव जनतेला दिला आहेत्यातून  शासनाप्रती जनतेमध्ये चांगला दृष्टीकोन तयार होत आहे. शंभर दिवस कार्यक्रम ही संकल्पना अंत्यत उपयुक्त असून जिल्हास्तरावरही चांगला बदल होत आहे. अनेक प्रकल्पमोठी कामे शंभर दिवसाच्या कालावधीत साकारली आहेतत्यासोबत अनेक विभागांच्या सेवा ऑनलाईन झाल्या आहेतत्याचा जनतेला विशेष लाभ होत आहेया सर्व उत्तम कामगिरीसाठी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विभागांचे अभिनंदन केले.

००००

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळेत होणार; नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन रे

 महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळेत होणार;

नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

 मुंबईदि.२ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच गुरुवार दि.३  एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने SLP No. ८५७६/२०२५ या याचिकेमध्ये विद्यमान निर्वाचन अधिकाऱ्यांऐवजी "अवर सचिव स्तराचे नवीन निर्वाचन अधिकारी" तात्काळ नियुक्त केल्यास निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येईल असे निर्देश २ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशान्वये दिले आहेत. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूक घेण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे अवर सचिव सुनीलकुमार धोंडे यांची नियुक्ती निर्वाचन अधिकारी म्हणून करण्यात आली आहेअसेही सचिव धीरज कुमार यांनी कळविले आहे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अवधान लघुपटाचे अनावरण

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या

 हस्ते अवधान लघुपटाचे अनावरण

 

मुंबई, दि. २ : चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनद्वारे अध्ययन अक्षमता या  विषयावर निर्मित "अवधान" या लघुपटाचे अनावरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सिंहगड शासकीय निवासस्थान येथे करण्यात आले.

यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, हशु अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अस्मिता हुद्दार, सहयोगी प्राध्यापक डॉ. गायत्री शिरूर, डॉ.अमित मिसाळसहाय्यक प्राध्यापक निशा कुट्टीपूनम मिश्रा, उत्तमचंद लेहरचंद ट्रस्ट फाउंडेशनचे कबीर भोगीलाल, निखिल पाटील उपस्थित होते.

 "अवधान" या लघुपटाच्या माध्यमातून अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्यात्यांना मिळणारे शिक्षणतसेच समाजाची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये  अध्ययन अक्षमतेची लक्षणे समजून घेवून मुलांच्या विकासावर लक्ष ठेवणे कसे गरजेचे आहे. याबाबतीत जनजागृती करून शिक्षकसमाज व पालक यांना अध्ययन अक्षमतेबाबत शंका कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करणारी हा लघूपट असून  यासाठी जेष्ठ कलावंत नाना पाटेकर यांनी आवाज दिला आहे. याप्रसंगी विद्यापीठामध्ये दिव्यांग केंद्र निर्माण करण्यासंदर्भात  सर्वसमावेशक चर्चा  करण्यात झाली.

०००

Featured post

Lakshvedhi