Wednesday, 2 April 2025

रिज़र्व बैंक भारत की आर्थिक स्थिरता का आधारस्तंभ; डिजिटल लेन-देन में देश को वैश्विक नेतृत्व दिलाने में आरबीआई की महत्वपूर्ण भूमिका - राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू

 रिज़र्व बैंक भारत की आर्थिक स्थिरता का आधारस्तंभडिजिटल लेन-देन में देश को वैश्विक नेतृत्व दिलाने में आरबीआई की महत्वपूर्ण भूमिका - राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू


 

मुंबई1 अप्रैल: भारत 2047 तक 'विकसित भारत' (Viksit Bharat 2047) बनने की दिशा में आगे बढ़ रहा है। ऐसे में आर्थिक क्षेत्र की नई चुनौतियों का सामना करने के लिए एक नवीन और समावेशी वित्तीय प्रणाली आवश्यक है। रिज़र्व बैंक भारत की आर्थिक स्थिरता का आधारस्तंभ बना रहेगा। भारत को डिजिटल लेन-देन में वैश्विक नेतृत्व दिलाने में भारतीय रिज़र्व बैंक (RBI) का बड़ा योगदान है। मजबूत बैंकिंग प्रणालीवित्तीय नवाचार और उपभोक्ताओं के विश्वास को बनाए रखने की दिशा में इसकी भूमिका अत्यंत महत्वपूर्ण होगी। यह विचार आज राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने व्यक्त किए।

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मुंबई के नरिमन पॉइंट स्थित एनसीपीए में आयोजित भारतीय रिज़र्व बैंक (RBI) के 90वें स्थापना दिवस समारोह में बोल रही थीं। इस अवसर पर महाराष्ट्र के राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजीत पवार और आरबीआई के गवर्नर संजय मल्होत्रा उपस्थित थे।

आरबीआई – भारत के आर्थिक विकास की धुरी

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने कहा कि भारतीय रिज़र्व बैंक के 90वें स्थापना दिवस का यह उत्सव एक महत्वपूर्ण अवसर है। आरबीआई भारत की सबसे महत्वपूर्ण संस्थाओं में से एक है। एक केंद्रीय बैंक के रूप मेंआरबीआई देश की अनोखी विकास यात्रा के केंद्र में रहा है। स्वतंत्रता-पूर्व के कठिन समय से लेकर आज वैश्विक महाशक्ति बनने तक के सफर में आरबीआई एक मजबूत स्तंभ बना हुआ है।

1935 में स्थापित इस संस्था ने हमेशा देश के आर्थिक विकास की दिशा में अग्रणी भूमिका निभाई है। आरबीआई न केवल एक केंद्रीय बैंक हैबल्कि वित्तीय समावेशन और संस्थागत निर्माण में भी इसकी भूमिका अहम रही है। इस दृष्टिकोण सेआरबीआई ने नाबार्डआईडीबीआईसिडबी और नेशनल हाउसिंग बैंक जैसी महत्वपूर्ण वित्तीय संस्थाओं की स्थापना कीजो कृषिलघु व्यवसाय और आवास क्षेत्र के लिए महत्वपूर्ण योगदान दे रही हैं।

अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटी' वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य

 अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटीवाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतीदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यास राज्यशासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल. टॉवर उभारण्यासाठी गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात संपूर्ण सुरक्षा दिली जाईल. या भागात संपर्क यंत्रणा उत्तम प्रकारे निर्माण झाल्यास येथील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे सोयीचे होईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान सांगितले.

 

 गडचिरोलीसह अन्य ठिकाणी दुर्गम भागातही संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. भारत नेट टप्पा दोन अंतर्गत संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये राज्यात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी शासन काम करेल. या टप्प्यातही राज्य देशात सर्वात पुढे राहून काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

बीएसएनएल व एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्तांवर असलेली आरक्षणे आणि उद्देश तपासून घेण्यात येतील. यापैकी नियमानुसार काढणे शक्य असलेली आरक्षणे काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. या मालमत्तांवर नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. याबाबत गठित केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य शासन कार्यवाही करेलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

गडचिरोलीच्या अती दुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण झाल्यास नक्षलवादाचा संपूर्णपणे बीमोड करणे राज्य शासनाला शक्य होणार आहे. शासनाने नक्षलवाद संपवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीत संपर्क यंत्रणा निर्माण झाल्यास अधिक बळ मिळेलअसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

बैठकीत बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्तामोबाईल टॉवर उभारणीप्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत भारत नेटच्या अंतर्गत निर्माण होणारी संपर्क यंत्रणा आदींबाबत सविस्तर चर्चा झाली.

🌾🍞 गव्हाच्या पदार्थांना कायमचे बायबाय करू...👋✋, भाकरी खा भाकरी

 🍪चला #भाकरीकडे वळा. 🍪... सुंदर व महत्वाचा लेख... 👇 


🌾🍞 गव्हाच्या पदार्थांना कायमचे बायबाय करू...👋✋



https://chat.whatsapp.com/Bxl4h9OxH0t2m3mdam2sHl


मी गहू खायचा बंद केला आणि माझं वजन ३० पौंडांनी कमी झालं...


एका प्रसिद्ध कार्डिआॅलजिस्ट तज्ञाने हे समजावून सांगितलं आहे की, आहारातून गहू काढून टाकल्यामुळे तुमचं आरोग्य “सुधारू” शकतं.  


कार्डिआॅलजिस्ट विल्यम डेव्हिस, एमडी, यांनी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीद्वारे बिघडलेली हृदयं दुरुस्त करण्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्याचे हे मनोगत खाली लिहलेले आहे.


“मी त्याचंच प्रशिक्षण घेतलं होतं आणि सुरुवातीला मला तेच करायचं होतं,” 


ते सांगतात. पण हृदयविकारासंबंधी उत्कृष्ट सेवा पुरवूनदेखील जेव्हा त्यांच्या आईचा १९९५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तेव्हा साहजिकच त्यांना स्वतःच्या व्यवसायाबद्दल वारंवार चिंता वाटू लागली.


“मी रुग्णाचं हृदय दुरुस्त करायचो, पण तो रुग्ण पुन्हा त्याच समस्या घेऊन माझ्याकडे परत यायचा. माझे उपचार एखाद्या बँड-एड सारखे होते, त्यात आजाराचं ‘कारण’ शोधून काढण्याचा काही प्रयत्न नसायचा.”


म्हणून मग त्यांनी आपल्या प्रॅक्टिसचा रोख एका खूपच अज्ञात वैद्यकीय प्रांताकडे – प्रतिबंधाकडे – वळवला आणि पुढची १५ वर्ष त्यांच्या रुग्णांच्या हृदयविकाराची कारणं तपासण्यात घालवली.


त्यातून जे काही शोध लागले ते त्यांच्या न्यूयॉर्क टाईम्स बेस्ट-सेलिंग “व्हीट बेली” ह्या पुस्तकात उघड केले आहेत. आपल्या बऱ्याच शारीरिक समस्या, हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा ह्या आपल्या गहू खाण्यामुळे उद्भवतात असं ह्या पुस्तकात म्हटलं आहे.


आहारातून गहू काढून टाकल्यामुळे “आपलं आयुष्य बदलू शकतं.”


“व्हीट बेली” काय आहे?


गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. खरं तर स्निकर्सच्या एका बार मुळे रक्तातली साखर जेवढी वाढेल, त्यापेक्षा जास्त गव्हाच्या ब्रेडच्या दोन स्लाईसेस मुळे वाढते.


“जेव्हा माझ्या रुग्णांनी गहू खाणं बंद केलं, तेव्हा त्यांचं वजन, विशेषतः पोटावरून, खूप मोठ्या प्रमाणात घटलं. गहू सोडल्यानंतर पहिल्या महिन्यात लोकांचा जाडेपणा खूप इंचांनी कमी होऊ शकतो.”


गहू आणि बऱ्याचशा इतर आरोग्यविषयक समस्यांचा संबंध लागू लागतो.


रुग्णांपैकी ऐंशी टक्के रुग्णांना मधुमेह किंवा मधुमेहा पूर्वीची स्थिती होती. मला माहिती होतं की, इतर कशाही पेक्षा गव्हामुळे रक्तातली साखर खूप जास्त वाढते, म्हणून मग मी म्हणालो, “आपण तुमच्या आहारातून गहू काढून टाकूया आणि त्याचा तुमच्या रक्तातल्या साखरेवर काय परिणाम होतो ते पाहूया.”  ३ ते ६ महिन्यांनंतर ते माझ्याकडे परत येत, आणि तेव्हा त्यांच्या रक्तातली साखर खूपच कमी झालेली असे.


पण त्यांच्या ह्या इतर प्रतिक्रिया सुद्धा असत:


“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन ३८ पौंडांनी कमी झालं.” किंवा, “माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स फेकून दिले.”


किंवा “गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.” “माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”


“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” आणि अजून काही, आणि अजून काही”.


जर गहू कशापासून बनलेला आहे हे बघितलं, तर त्यात अॅमलोपेक्टिन ए चा समावेश होतो, जे केमिकल फक्त गव्हातच आढळून येतं, आणि जे रक्तातल्या लहान एलडीएल पार्टिकल्सचं प्रमाण खूप वाढवतं – जे की हृदयविकाराचं सर्वात मुख्य कारण आहे.


जेव्हा आहारातून गहू काढून टाकला जातो, तेव्हा ह्या लहान एलडीएल ची पातळी ८० ते ९० टक्क्यांनी खाली येते.


गव्हामध्ये खूप जास्त प्रमाणात ग्लायडिन असतं, जे एक भूक वाढवणारं प्रथिन आहे. गहू खाल्ल्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीचा कॅलरी इन्टेक दिवसाला ४०० कॅलरीजने वाढतो.


ग्लायडिनचे अफू सारखे गुणधर्म देखील असतात ज्यामुळे त्याचं “व्यसन” लागू शकतं. अन्नविषयक शास्त्रज्ञांना हे जवळजवळ २० वर्षांपासून माहीत आहे.


गहू-मुक्त आहार करणं हे ग्लूटन-मुक्त आहार करण्यासारखंच आहे का..?


"ग्लूटन" हा गव्हाचा फक्त एक घटक आहे.


गव्हातून ग्लूटन काढून टाकलं तरी गहू तितकाच वाईट असेल कारण त्यात अजूनही ग्लायडिन आणि अॅमलोपेक्टिन ए, तसंच इतर अनेक अनुचित घटक असतील.


ग्लूटन-मुक्त उत्पादनं ४ प्राथमिक घटकांपासून बनलेली असतात: कॉर्न स्टार्च, राईस स्टार्च, टॅपिओका स्टार्च किंवा पोटॅटो स्टार्च. आणि हे ४ सुकवलेले, पावडरच्या स्वरूपातले स्टार्च असे पदार्थ आहेत जे रक्तातली साखर अजूनच जास्त वाढवतात.


मी लोकांना अस्सल अन्नाकडे परतण्यास प्रोत्साहित करतो. जसे फळं, भाज्या, कठीण कवचाची फळं आणि बिया, अनपाश्चराईज्ड चीज, अंडी आणि मांस.


हायब्रिडायजेशन सारख्या उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक तंत्रांमुळे ७० आणि ८० च्या दशकात गव्हाचं स्वरूप खरोखर बदललं. गव्हाचा दाणा अधिक छोटा आणि अधिक पुष्ट झाला आणि त्यात ग्लायडिनचे प्रमाण वाढले (जो एक प्रभावी असा भूक वाढवणारा घटक आहे.)


आज आपण जो गहू खातो तो १०० वर्षांपूर्वी खाल्ल्या जाणाऱ्या गव्हासारखा नाहीये.


तुम्ही दररोज ब्रेड/ पास्ता/ चपात्या खायचं बंद केलंत, आणि चिकन आणि भाज्यांसोबत भात खाऊ लागलात, तरीसुद्धा तुमचं वजन कमी होईल कारण तांदूळ रक्तातली साखर गव्हाइतकी वाढवत नाही, आणि त्यात अॅमलोपेक्टिन ए आणि ग्लायडिन सारखे भूक वाढवणारे घटक नसतात. गव्हामुळे जशी कॅलरी इन्टेक मध्ये वाढ होते तशी तांदळामुळे होणार नाही.


काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. प्रत्येकाने गहू खाणं थांबवलं पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे जी, मला पक्कं  आहे की तुमचं आयुष्य बदलून टाकेल.


आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खाता ना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपणास नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शक्‍यतो ज्वारीचा आहारात समावेश करुन घ्याच.


* जेवणात का खावी  भाकरी… ?


ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.


ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.


* ज्वारीचे फायदे –


1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.

2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.

3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.

4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.

7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.

😎 महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.

9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.

10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.


ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.


ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर ( गोड ज्वारीपासून ) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषक मूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.


* तुम्हाला माहित नसलेले भाकरीचे प्रकार जाणून घ्या :-


भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या रोजच्या जीवनशैलीचा भाग आहे. सांज-सकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी सवय झालेली असते, की' हातासरशी त्या भाकऱ्यांबरोबर, इतर दोन-चार प्रकार ही करुन टाकतात. पण तरी ते तंत्र सोपे नाही. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीस, ते जमणे जरा कठिणच आहे. तरी ते काम सोपे पण नाहीच.


आपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, मका, पटणी, नाचणी, तांदूळ अशी धान्ये वापरली जातात. या सर्व धान्यात ग्लुटेन अगदीच कमी असल्याने, या पिठाला चिकटपणा असा नसतोच, त्यामूळे उकड काढली तरच या भाकऱ्या लाटता येतात, नाहीतर त्या थापूनच कराव्या लागतात. त्यापुर्वी पिठ चांगले मळून घ्यावे लागते, तसेच तव्यावरच्या भाकरीवर नेमक्या वेळी आणि नेमकेच पाणी, फिरवावे लागते. त्यात अजिबात चूक होऊन चालत नाही. त्यामानाने खालील प्रकार सोपे आहेत.


भाकरीच्या पिठात थोडे उडीद पिठ किंवा कणीक मिसळून, थोडाफ़ार चिकटपणा आणता येतो, या युक्ती प्रमाणेच आणखी काही उपाय योजले जातात, यातले काही पारंपारीक आहेत. भाकरी करताना नवी व्यक्ती, पुर्ण आकाराची भाकरी करायला जाते. आणि तिथे अनेकदा फसते.  ८/९ इंच व्यासाची भाकरी करण्यापेचा ३/४ इंचाची भाकरी करणे, जास्त सोपे जाते. तवा मोठा

असेल, अशा २/३ भाकऱ्या एकाचवेळी भाजता येतात.


* १) ओतलेली भाकरी :-


हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुन ही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची (सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला. थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला. (कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल) गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता

मंद आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी भाजा. कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी हे तंत्र वापरता येईल.


* २) गाजराची भाकरी :-


गाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्या. त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे कुस्करून घ्या. कुसकरून गुठळ्या मोडल्या नाहीत तर एकदा ब्लेंड करुन घ्या. एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका, त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमी-जास्त लागेल पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. या भाकरीला अप्रतिम रंग येतो, त्यातले चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.


* ३) कांदा भाकरी :-


मोठा कांदा किसून घ्या. त्यात थोडे मीठ मिसळा. थोडी जिरेपूड टाका. आणि मग त्यात पिठ भिजवा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. कवडी दही, मिरची आणि हि भाकरी, फ़क्कड बेत जमतो.


* ४) बटाटा भाकरी :-


बटाटा बारीक किसणीने किसून घ्या. त्यात मीठ मिसळा, म्हणजे काळा पडणार नाही. मग एका बटाट्याला, एक टेबलस्पून घट्ट पण आंबट दही, एक टिस्पून जिरे आणि

आवडीप्रमाणे हिरवी वा लाल मिरची टाका. (मिरचीचे लोणचे वापरल्यास जास्त चांगले.) त्यात तांदळाचे पिठ मिसळून, सैलसर भिजवा. या पिठाची भाकरी तव्यावर डावेने पिठ पसरुन करता येते. (तितपत पिठ पातळ ठेवा)

हि भाकरी कुरकुरीत होते.


* ५) वांग्याची भाकरी :-


भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या. मग ते सोलून त्या गरात हिरवी मिरची, एखादा कांदा घालून, मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. मीठ व तेल घालून

त्यात पिठ ( ज्वारीच्या पिठाने चांगली चव येते, पण बाकीची पिठे चालतात,) मिसळा. हे पिठ मात्र चपातीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हवे. याच्या लाटूनही भाकऱ्या करता येतात. लसणाच्या चटणीसोबत सुंदर लागतात.


* ६) लसणाच्या पातीची भाकरी :-


मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाही तरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात. यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका. झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती (त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून

घ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.


* ७) फ़णसाची भाकरी :-


८/१० फ़णसाच्या गऱ्यातील बिया काढून घ्या. रसाळ (बरका) फ़णस असेल तर गरे मिक्सर मधून काढा, कापा असेल तर गरे वाफ़वून घ्या आणि मग मिक्सरमधून काढा. मग त्यात मिठाचा कण आणि तांदळाचे पिठ मिसळा. यात थोडे नारळाचे दूध घातले तर छान.

मग वरच्या तंत्रानेच भाकऱ्या करा.


* ८) शेपूची भाकरी :-


वरच्या लसणाच्या पातीच्या तंत्राने शेपूच्या भाजीच्या भाकऱ्या चांगल्या होतात. भाजी अगदी बारीक कापायची नाही, म्हणजे भाकरीवर छान नक्षी दिसते. या भाकरीवर कच्चे तेल घालून खाल्ले तर चांगले लागते.


* ९) ऊसाच्या रसातली भाकरी (दशमी) :-


ऊसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात. खालीवर केळीचे पान ठेवून तव्यावर ठेवायची. थोड्या वेळाने परतायची. दशमी तयार झाली, कि पान सुटे होते.

जाड फॉइल वापरुनही करता येते.


* १०) गुळाची भाकरी :-


अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात. या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.


* ११ ) सोया चंक्सची भाकरी :-


एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत, मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून टोमॅटो प्यूरे किंवा २ टिस्पून केचप टाकावा. मग त्यावर मिन्स किंवा चंक्स बारीक करून घालावेत व वाफ़ येऊ द्यावी. आवडीप्रमाणे, तिखट

व गरम मसाला घालावा. मग ते मिश्रण थंड झाले की त्यात कणीक घालून मळावे. याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या कराव्यात. डब्यात न्यायला या सोयीच्या आहेत. मुलांना पण देता येतील.


१२) केळ्याची भाकरी :-


जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरी प्रमाणेच भाकरी करता येते...


*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती  हा ग्रुप जॉईन करा*


*(कॉपी पेस्ट)*


 *आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील 


लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

 लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई


मुंबई, दि. 2 : राज्याच्या सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्याच्या खरेदी विक्रीवर बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून कडक कारवाई करण्यात येते. तसेच या प्रकरणी दंडात्मक कारवाईची तरतुदही करण्यात आली आहे.


            पारंपरिक माच्छिमारांच्या हिताचे संरक्षण आणि शाश्वत मासेमारीसाठी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने 58 प्रजातींच्या किमान कायदेशीर आकारमानाबाबत शिफारस केली आहे. त्याप्रमाणे लहान आकाराचे मासे पकडणे टाळण्यासाठी कोवळ्या माशांची मासेमारी करण्यावर कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या 2 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आदेशाने 54 प्रजातीच्या किमान कायदेशीर आकारमानाचे विनियमन करण्यात आले आहे.


            महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 (सुधारीत – 2021) कलम 17(8)(अ) व (ब) नुसार लहान आकाराच्या माशांची मासेमारी बंदीच्या उल्लंघनासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच याविषयी जनजागृती करण्यासाठी मासळी बाजारांमध्ये फलकही लावण्यात येणार आहेत.

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ यशस्वी करूया

 महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ यशस्वी करूया


- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई


महोत्सवात नेत्रदीपक लेझर शो, टेंट सिंटी, पर्यटकांसाठी साहसी खेळ,


विविध परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा समावेश


 


  मुंबई, दि. २ : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच 'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५' मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत २ मे २०२५ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पावनगड या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.


 


पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, 'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५' या पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रीमंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. सातारा जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात पर्यटन महोत्सव होत आहे. या महोत्सवात पर्यटकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा तलावात महोत्सव कालावधीत नेत्रदीपक लेझर शो होणार आहे. गुजरातमधील कच्छ रणच्या धर्तीवर महाबळेश्वर येथे शंभरहून अधिक टेन्ट्स उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी अत्याधुनिक निवासव्यवस्थेकरिता टेंट सिंटी उभारली जाणार आहे. वेण्णा तलावात पर्यटकांना साहसी खेळ आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल. देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद देखील आयोजित करण्यात येणार आहे.


   


पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पर्यटनदृष्ट्या त्यांचे योगदान यावर विशेष सादरीकरण देखील होणार आहे. ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वरच्या साबळे रोड येथे एक विशेष सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येईल. या महोत्सवात राज्यातील प्रत्येक भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद पर्यटकांना घेता येईल. तसेच ४ मे २०२५ रोजी समारोप सोहळ्यापूर्वी महाराष्ट्रातील विविध पारंपरिक लोककला जसे की लावणी, गोंधळ, जागर, नाशिक ढोल इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. तसेच, भव्य ‘ड्रोन शो’ या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून या महोत्सवात सहभागी झालेल्या उद्योजक, ट्रॅव्हल गाईड्स आणि स्थानिक कलाकारांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करणार आहोत या महोत्सवाला पर्यटनप्रेमींनी जरूर यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

रिज़र्व बैंक भारत की आर्थिक स्थिरता का आधारस्तंभ

 रिज़र्व बैंक भारत की आर्थिक स्थिरता का आधारस्तंभ; डिजिटल लेन-देन में देश को वैश्विक नेतृत्व दिलाने में आरबीआई की महत्वपूर्ण भूमिका - राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू


 


मुंबई, 1 अप्रैल: भारत 2047 तक 'विकसित भारत' (Viksit Bharat 2047) बनने की दिशा में आगे बढ़ रहा है। ऐसे में आर्थिक क्षेत्र की नई चुनौतियों का सामना करने के लिए एक नवीन और समावेशी वित्तीय प्रणाली आवश्यक है। रिज़र्व बैंक भारत की आर्थिक स्थिरता का आधारस्तंभ बना रहेगा। भारत को डिजिटल लेन-देन में वैश्विक नेतृत्व दिलाने में भारतीय रिज़र्व बैंक (RBI) का बड़ा योगदान है। मजबूत बैंकिंग प्रणाली, वित्तीय नवाचार और उपभोक्ताओं के विश्वास को बनाए रखने की दिशा में इसकी भूमिका अत्यंत महत्वपूर्ण होगी। यह विचार आज राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने व्यक्त किए।


राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मुंबई के नरिमन पॉइंट स्थित एनसीपीए में आयोजित भारतीय रिज़र्व बैंक (RBI) के 90वें स्थापना दिवस समारोह में बोल रही थीं। इस अवसर पर महाराष्ट्र के राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार और आरबीआई के गवर्नर संजय मल्होत्रा उपस्थित थे।


आरबीआई – भारत के आर्थिक विकास की धुरी


राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने कहा कि भारतीय रिज़र्व बैंक के 90वें स्थापना दिवस का यह उत्सव एक महत्वपूर्ण अवसर है। आरबीआई भारत की सबसे महत्वपूर्ण संस्थाओं में से एक है। एक केंद्रीय बैंक के रूप में, आरबीआई देश की अनोखी विकास यात्रा के केंद्र में रहा है। स्वतंत्रता-पूर्व के कठिन समय से लेकर आज वैश्विक महाशक्ति बनने तक के सफर में आरबीआई एक मजबूत स्तंभ बना हुआ है।


1935 में स्थापित इस संस्था ने हमेशा देश के आर्थिक विकास की दिशा में अग्रणी भूमिका निभाई है। आरबीआई न केवल एक केंद्रीय बैंक है, बल्कि वित्तीय समावेशन और संस्थागत निर्माण में भी इसकी भूमिका अहम रही है। इस दृष्टिकोण से, आरबीआई ने नाबार्ड, आईडीबीआई, सिडबी और नेशनल हाउसिंग बैंक जैसी महत्वपूर्ण वित्तीय संस्थाओं की स्थापना की, जो कृषि, लघु व्यवसाय और आवास क्षेत्र के लिए महत्वपूर्ण योगदान दे रही हैं।

उद्योग विभागाची १०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल

 उद्योग विभागाची १०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल

- उद्योगमंत्री उदय सामंत

१०० दिवसांच्या कामकाज आराखडासंदर्भात बैठक

 

मुंबईदि. १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आखून दिलेल्या १०० दिवस आराखड्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू आहेअशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

           

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यकतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस उद्योग सचिव डॉ. पी अनबलगनएम.आय.डी.डी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासुविकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाहसह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड तसेच उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

दावोस येथे झालेल्या करारामध्ये उद्योग विभागाने २३५ टक्के उद्दिष्टपूर्ती केली असल्याचे सांगून उद्योग मंत्री सामंत म्हणाले कीपरकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत ४०.८९ टक्के गुंतवणूक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभागमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळउद्योग संचालनालयमैत्रीमहाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळशासकीय मुद्रणालय आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या उद्दिष्टांची ९० ते ९५ टक्के पूर्तता झाली असून संपूर्ण उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी उद्योग मंत्री सामंत यांनी सर्व कार्यालयात स्वच्छता आणि नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या. उद्योग विभाग हा शासन यांनी उद्योजक यांच्यातील महत्वाचा दुवा असल्याने शासन करीत असलेली कामे सामान्यांपर्यंत पोहोचावीउद्योजकांचे प्रश्न मार्गी लागावेतयासाठी उद्योग सचिवमुख्य कार्यकारी अधिकारीविकास आयुक्तवरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेण्याच्या सूचना ही त्यांनी केल्या.

000

Featured post

Lakshvedhi