Thursday, 3 April 2025

महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग यांच्यात सामंजस्य करार विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध

  

महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग यांच्यात सामंजस्य करार

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबईदि. २ : उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग)शिक्षा मंत्रालयकेंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात  सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धीप्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरेल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सिंहगड शासकीय निवासस्थान येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरबोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत AEDP कोर्सेस समाविष्ट करण्यात आले असूनविद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशिपसाठी अधिक संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला किमान ८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असूनत्यातील ५०टक्के रक्कम केंद्र सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

संचालक पी. एन. जुमले म्हणाले कीपूर्वी केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीच ॲप्रेटीसशिप उपलब्ध होती. मात्रनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सर्व पदवीधर आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांनाही ॲप्रेंटीसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील १० विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांसाठी भव्य मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी यावेळी दिली.

000

सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन परिषदेत शल्यचिकित्साशास्त्र विभागातील अध्यापक व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्य

 सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन

 परिषदेत शल्यचिकित्साशास्त्र विभागातील अध्यापक व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्य

 

प्रोफेसर डॉ. अजय भंडारवार –प्यूट्झ जेघर्स सिंड्रोम (Peutz-Jeghers Syndrome) मध्ये आंत्र संरक्षक शस्त्रक्रियेचा बॉवेल प्रिर्झविंग सर्जरी (Bowel Preserving Surgery) संकल्पना प्रथमच वैद्यकीय साहित्यात मांडली. ही नवी शस्त्रक्रिया तंत्रज्ञान भविष्यकालीन उपचार पद्धतींवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकेल. तसेचआयएसजी (ICG) कांटिफिकेशन तंत्र विकसित केलेजे आंत्र जोडणीतील गळती ॲनास्टोमोटिक बॉवेल लेक (Anastomotic Bowel Leak) आणि गुंतागुंतीचे परिणाम अचूक ओळखण्यास मदत करेल. यामुळे रुग्णांचे मृत्यूदर व गुंतागुंत टाळता येईल आणि उपचाराचे परिणाम सुधारतील.

डॉ. गिरीश बक्षी - संशोधन प्रकल्पाची रूपरेषा तयार केली आणि डॉ. भंडारवार यांना शस्त्रक्रियेत मदत केली. तसेचत्यांनी संशोधन विश्लेषण करून अंतिम अहवाल तयार केला.

डॉ. वरूण दत्तानी - वरील दोन विषयांवर संशोधन सादरीकरण केले आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ॲबस्ट्रॅक्ट हा पुरस्कार जिंकला. त्यांच्या सादरीकरणांनी मध्ये पहिले आणि तिसरे पारितोषिक मिळाले.

डॉ. मनीष हांडे – बॉडी पॅकर सिंड्रोम (Body Packer Syndrome) वरील संशोधन सादर केलेजिथे अतिशय कमी आक्रमक तंत्राचा वापर करून रुग्णाच्या शरीरातून ड्रग पेलेट काढण्यात आला. हा उपचार पहिल्यांदाच वैद्यकीय साहित्यात नोंदवला गेला असूनत्यामुळे रुग्णाचे प्राण वाचले.

पुरस्कार श्रेणीतील सात पोडियम सादरीकरणात दोन सादरीकरणे सर ज.जी. रुग्णालयांमधील होती. ज्यामध्ये रुग्णसेवेसाठी नाविन्यपूर्ण आणि सुधारित शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे.

या परिषदेत प्राप्त यशामागे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मोलाचे योगदान आहे. यासाठी पुरस्कार प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त 

भारतीय शल्यविशारदांना “सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट” पुरस्कार प्राप्त;

 भारतीय शल्यविशारदांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट पुरस्कार प्राप्त;

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शल्यविशारदांचा सत्कार

 

            मुंबईदि. २ : सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES Society of American Gastrointestinal & Endoscopic Surgeons) परिषदेचे १२ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत लॉन्ग बीचलॉस एंजेलिसअमेरिका येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट हा पुरस्कार भारताला मिळाला. हा पुरस्कार मिळणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानिमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शल्यविशारदांचा सत्कार करुन कौतुक केले.

  मंत्रालय येथील वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या दालनात हा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव धीरज कुमारवैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकरवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले आदी उपस्थित होते.

 सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES) ही एक आघाडीची आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सा संघटना असूनमिनीमल अक्सेस (Minimal Access) व लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसंबंधीचे संघटनेकडून प्रस्थापित प्रोटोकॉल संपूर्ण जगभरात प्रमाण मानले जातात. ही संस्था दरवर्षी शैक्षणिक परिषदांचे आयोजन करते तसेच संशोधन व नाविन्यपूर्ण उपचार पद्धतींना प्रोत्साहन देते. या सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES) २०२५ परिषदेसाठी ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज जी समूह रुग्णालयेमुंबई येथील १३ शस्त्रक्रिया व्हिडिओ सादर करण्यात आले होते. ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (ग्रँट मेडिकल कॉलेज) जगातील या प्रमुख परिषदेतील सर्वाधिक व्हिडिओ सादरीकरण आणि स्वीकृती मिळवण्याचा मान मिळवला आहेअशी माहिती पुरस्कार प्राप्त डॉ. गिरीश बक्षी यांनी यावेळी दिली.

 

लातूर जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करावे

 लातूर जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करावे

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबईदि. 2 : लातूर येथे भव्य विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठीची कार्यवाही जलद गतीने करावी. लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडापट्टूंसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून  अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही टप्प्या-टप्प्याने विकास करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

जिल्हा क्रीडा संकुलाचा पुनर्विकास व लातूर येथील विभागीय क्रीडा संकुल उभारणीस गती देणेबाबत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार अमित देशमुख, क्रीडा व युवक कल्याणचे सहसंचालक सुधीर मोरेजिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडेउप जिल्हा क्रीडा अधिकारी संगीता टकले आदिसह अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री भरणे म्हणाले कीजिल्हा क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण व नवीन क्रीडा सुविधा निर्माण  करण्याकरिता प्रत्यक्ष जागेची पाहणी करूनमुलभूत सेवांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच प्रेक्षा गॅलरीची उभारणी आणि जुन्या प्रेक्षा गॅलरीस शेड उभारण्यात यावी. यासाठी अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही त्वरीत करावी.

याचबरोबर नांदेडधाराशिव आणि लातूर जिल्ह्यांसाठी विभागीय क्रीडा संकुल लातूर येथे उभारण्यात येणार आहे. तसेच इतर विभागीय क्रीडा संकुलासाठी उपलब्ध सोयी-सुविधांचा अभ्यास करून त्याच धर्तीवर विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसंदर्भातील कार्यवाही करण्याच्या निर्देशमंत्री भरणे यांनी दिले.

आमदार अमित देशमुख यांनी क्रिकेट प्रबोधिनी उभारणेक्रीडा संकुलाचा रस्ताअल्पसंख्यांक वर्गातील मुलांचे वसतीगृह यासंदर्भात सूचना केल्या. यासंदर्भात क्रीडा मंत्री भरणे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

०००

खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती संकुलास 10 कोटींचा निधी वितरीत

 खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती संकुलास 10 कोटींचा निधी वितरीत

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबईदि. 2 : कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने ऑलिम्पिक पदक प्राप्त करूनजगात देशासह राज्याचे नाव उज्वल केले. त्यांच्या नावाने कुस्ती संकुल उभारणे अत्यंत अभिमानास्पद असूनयासाठी 10 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तातडीने वास्तुविशारदांमार्फत आराखडा तयार करून बांधकाम सुरू करण्याचे निर्देश, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात दिवंगत कुस्तीपट्टू खाशाबा दादासाहेब जाधव आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी तालुका संकुल समितीचे सदस्य रणजित खशाबा जाधवप्रियांका जाधवभारती जाधवक्रीडा विभागाचे उपसचिव सुनिल पांढरेसहसंचालक सुधीर मोरेजिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकरतहसिलदार कल्पना ढवळेउपअधिक्षक भुमी अभिलेख प्रविण पवार उपस्थित होते.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कीकुस्ती संकुल उभारण्यासाठी नजिकच्या गावाची हद्द असलेली जमीन वर्ग करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. तसेच संकुलासाठी निधी वितरीत करण्यात आला असूनतातडीने बांधकामास सुरवात करावी. पुढील निधी टप्प्याटप्प्याने वितरीत करण्यात येणार असूनया कामास गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

0000

बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत वाढ

 बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत वाढ

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

·         महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत निर्णय

 

मुंबई,दि.२ : कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कलानिर्मितीच्या क्षेत्रात पारंगत बनविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे,  कलात्मक विचार आणि सृजनशीलतेला चालना देणे देऊन आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे असते त्यामुळे बालचित्रकला स्पर्धेसाठी दिल्या जाणाऱ्या बक्षीसांमध्ये वाढ करण्यात आली असून  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुधारित बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे अशी माहिती उच्च व इतर तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील  यांनी दिली.

मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची द्वितीय बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

राज्यस्तरीय बक्षीस : अनुक्रमे 10 हजार, 5 हजार 2 हजार ५००१हजार  असे असून  जिल्हास्तरीय बक्षीस: प्रथम  २ हजारद्वितीय १ हजार, तृतीय ५०० तर चौथे २५० रुपये असणार आहेत

शासकीय रेखाकला परीक्षेच्या बक्षीस रकमेतील वाढ

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षांसाठी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना दिली जाणारी बक्षीस रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. नवीन सुधारित बक्षीस रक्कम एकूण ₹४ लाख रुपये२० हजार एवढी असणार आहे.

शासकीय उच्चकला परीक्षेस मान्यता

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनमान्य अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली आहे  तसेच वित्तीय नियमन आणि अर्थसंकल्प मंडळाच्या वित्तीय नियमावलीस तसेच वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे

शैक्षणिक शुल्क निश्चिती

विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमधील अभ्यासक्रमांचे तात्पुरते (Ad-hoc) शुल्क निश्चित करण्याचा अधिकार शुल्क निश्चिती समितीला देण्यात आला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या आधारावर पदविका अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कला पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी आता तीन वर्षांचा करण्यात येणार आहे.तसेच कला शिक्षण संस्थांची संलग्नता सर्व शासनमान्य कला परिसंस्थांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत मंडळाची संलग्नता घेणे बंधनकारक राहणार आहे.

फोटोग्राफी अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

फोटोग्राफी अभ्यासक्रम यापूर्वी सर ज.जी. उपयोजित कला या संस्थेमध्ये सुरू होता. परंतु तो सध्या बंद आहे. अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन फोटोग्राफी अभ्यासक्रम एक महिन्याच्या आत सुरू करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.

स्वच्छ भारत मिशनकार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम आढावा

 स्वच्छ भारत मिशन

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला. गावांना हागणदारीमुक्त करण्याच्या उद्दिष्टासह अधिक गावांना मॉडेल गाव घोषित करण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली. तसेच गोवर्धन प्रकल्पप्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि इतर योजनांच्या प्रगतीचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम आढावा

१०० दिवसांचा आराखडा अंतर्गत कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेच्या अनुषंगाने गतिमान प्रशासनांतर्गत संकेतस्थळांचे सुगमीकरणकार्यालय व स्वच्छतागृहांची स्वच्छतानागरिकांना सेवा सुलभतेने मिळवून देणेविविध तक्रारींचा निपटाराअर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे आदी महत्त्वाच्या विषयांवरही बैठकीत सखोल चर्चा झाली.

Featured post

Lakshvedhi