Monday, 3 March 2025

आवास योजनाएँ

 आवास योजनाएँ

राज्य में 409 शहरी समूहों में "प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)" लागू की गई है। इस योजना के तहत 2 लाख से अधिक घर बनाए जा चुके हैंजबकि 1.85 लाख से अधिक घरों का निर्माण प्रगति पर है।

"प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण" के पहले चरण के तहत राज्य में 12.64 लाख से अधिक घर बनाए गए हैं। "प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (द्वितीय चरण)" के तहत 16.81 लाख से अधिक घरों के निर्माण का निर्णय लिया गया है।

डोंगरी (पहाड़ी) क्षेत्रों की विशेष आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए28 जिलों के 77 पूर्ण समूह डोंगरी तालुका और 101 उप-गट डोंगरी तालुकों में "डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम" लागू किया गया है।

-बस सेवा एवं इलेक्ट्रिक वाहन नीति

 ई-बस सेवा एवं इलेक्ट्रिक वाहन नीति

केंद्र सरकार द्वारा प्रायोजित "पीएम ई-बस सेवा योजना" के पहले चरण के तहत 20 नगर निगमों के लिए 1,290 बसों को मंजूरी दी गई है। इन नगर निगमों में बस डिपो और चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर विकसित करने के लिए वित्तीय सहायता प्रदान की जाएगी।

1 अप्रैल 2025 से अगले तीन वर्षों के लिए "महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन नीति" लागू करने का निर्णय लिया गया है। इस नीति में इलेक्ट्रिक वाहनों को बढ़ावा देने और पुराने वाहनों को कबाड़ में डालने के लिए प्रोत्साहन दिया जाएगा। यह नीति राज्य में कार्बन उत्सर्जन को कम करने और परिवहन को अधिक पर्यावरण-अनुकूल बनाने पर केंद्रित है

बुनियादी सुविधाओं को सशक्त बनाना

 बुनियादी सुविधाओं को सशक्त बनाना

राज्यपाल ने कहा कि नागपुर-गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे के निर्माण का निर्णय लिया गया है। यह एक्सप्रेसवे सभी हितधारकों को विश्वास में लेकर पूरा किया जाएगा। इस परियोजना के माध्यम से मार्ग में स्थित प्रमुख धार्मिक और तीर्थ स्थलों को जोड़ा जाएगा। यह एक्सप्रेसवे न केवल यात्रा के समय को कम करेगा बल्कि इस क्षेत्र के आर्थिक विकास को भी गति देगा। इस परियोजना की अनुमानित लागत 86,300 करोड़ रुपये है।

राज्यभर में सड़कों की मजबूती बढ़ानेसड़क संपर्क में सुधार लाने और सुरक्षित एवं अधिक प्रभावी परिवहन व्यवस्था सुनिश्चित करने के लिए सार्वजनिक निर्माण विभाग की विभिन्न योजनाओं के तहत 7,480 किलोमीटर लंबी सीमेंट-कंक्रीट सड़कों के निर्माण का निर्णय लिया गया है।

टोल नाकों की कार्यक्षमता बढ़ानेवहां की भीड़ कम करने और डिजिटल लेनदेन को बढ़ावा देने के लिए 1 अप्रैल 2025 से राज्यभर के सभी टोल नाकों पर केवल फास्टैग के माध्यम से टोल वसूली करने का निर्णय लिया गया है।

युवाओं के लिए रोजगार और कौशल विकास "

 युवाओं के लिए रोजगार और कौशल विकास

"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" के तहत अब तक 1,32,000 युवाओं को प्रशिक्षित किया गया है। 2024-25 के दौरान 10 लाख युवाओं को प्रशिक्षण देने के लिए 5,500 करोड़ रुपये की व्यवस्था की गई है। "पंडित दीनदयाल रोजगार मेले" के तहत इस वर्ष 19,000 से अधिक उम्मीदवारों को नौकरी प्रदान की गई है।

राज्य प्रशासन में दक्षता और सुशासन लाने के लिए "त्रिसूत्री कार्यक्रम" लागू किया जा रहा हैजिसमें सरकारी प्रक्रियाओं का पुनर्गठनकर्मचारियों की कार्यक्षमता में सुधार और एकीकृत मानव संसाधन प्रणाली का विकास शामिल है।

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)"

 "प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)" राबवित आहे. या योजनेअंतर्गत दोन लाखांपेक्षा अधिक घरे बांधण्यात आली असून१ लाख ८५ हजारांपेक्षा अधिक घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. "प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण" याच्या पहिल्या टप्प्यांतर्गत राज्यामध्ये १२ लाख ६४ हजारांपेक्षा अधिक घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. "प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २" या अंतर्गत१६ लाख ८१ हजारांपेक्षा अधिक घरकुलांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. डोंगरी भागाच्या काही विशिष्ट गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी राज्यातील २८ जिल्ह्यांमधील ७७ पूर्ण गट डोंगरी तालुका आणि १०१ उप-गट डोंगरी तालुक्यांमध्ये "डोंगरी विभाग विकास कार्यक्रम" राबवित आहे.

क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन

  राज्यपाल म्हणाले की, ऑलिम्पिकसह महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंची कामगिरी सुधारण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावर सहा उच्च कामगिरी केंद्रे आणि ३७ विभागीय क्रीडा उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी "मिशन लक्ष्यवेध" ही नवीन व महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. यामध्येमैदानी खेळबॅडमिंटनमुष्टियुद्धभारोत्तोलनहॉकीकुस्तीतिरंदाजीनेमबाजीरोईंगनौकानयनलॉन टेनिस व टेबल टेनिस या १२ ऑलिम्पिक खेळांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. राज्यातील विशेषत: विदर्भातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानेबालेवाडी येथील राज्यस्तरीय क्रीडा संकुलाप्रमाणे नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाचा दर्जा वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे राज्यपालांनी सांगितले.

             भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागरिकांमध्ये भारतीय राज्यघटनेबाबत तसेच त्यांचे घटनात्मक हक्क आणि मुलभूत कर्तव्ये यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी "घर घर संविधान" हा कार्यक्रम सुरु केला आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व केंद्र शासनाचे राज्यपालांनी आभार मानले. अभिजात मराठी भाषा दिनअभिजात मराठी भाषा सप्ताहअभिजात मराठी भाषेतील संशोधन क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सन्मानअभिजात मराठी भाषेचा इतिहास उलगडून दाखविणारा माहितीपटउत्कृष्टता केंद्र व अनुवाद प्रबोधिनीची स्थापना असे कार्यक्रम हाती घेण्याचे ठरविले आहे.

               महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती केली आहे. शासन सीमावर्ती भागामध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेसाठी शैक्षणिकवैद्यकीय व इतर विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            या अधिवेशनामध्येनवीन वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय प्रस्तावविनियोजन विधेयके व इतर विधिविधाने आपल्या विचारार्थ मांडण्यात येतील. महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठीसन्माननीय सदस्यकामकाजात सहभाग घेतील व या प्रस्तावांवर आपली अभ्यासपूर्ण मते मांडतीलअसा विश्वास  राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम संपन्न

 अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम संपन्न

संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         आर्थिक शिस्त पाळतानाच कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही

·         छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांवर कारवाई होणारच

·         राज्यात यंदा सर्वाधिक सोयाबिन खरेदी

·         100 दिवस उपक्रमाचे त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन करणार

·         अधिवेशनात संविधान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यावर विशेष चर्चा होणार

मुंबईदि. 2 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतिशय चांगले व संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाहीयाची काळजी घेत आहोत. हे करत असताना कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाहीअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

            विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटीलजलसंपदा मंत्री गिरीश महाजनपर्यटन मंत्री शंभूराज देसाईमत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकआदिवासी विकास मंत्री अशोक उईके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीनव्या सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असून हे अधिवेशन चार आठवड्याचे असणार आहे. या अधिवेशनात दोन विषयांवर महत्वाच्या चर्चा होणार आहेत. 8 मार्चला महिला दिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी निमित्ताने विशेष चर्चा होणार आहे. तसेच भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवस संविधानावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात पाच विधेयकांवर चर्चा होईल. विधिमंडळात सर्व विषयांवर सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या नवीन सदस्यांना चर्चेत सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आरोग्य विभागाच्या एका फाईलवर स्थिगिती दिल्याच्या बातमीसंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीअशा प्रकारची कोणतीही फाईल माझ्याकडे आली नाही व मी स्थगिती दिलेली नाही. आरोग्य विभागाच्या संबंधित विषयात केंद्र शासनाला सुचविलेल्या कामातील 9 टक्के निधी हा भांडवली खर्चावर खर्च करणार होते. मात्रकेंद्र शासनाने भांडवली खर्चावर 5 टक्के निधी खर्च करण्याची सूचना केली. त्यानुसारप्राधान्यक्रम ठरवून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीसचिवांनी प्राधान्य ठरविण्यासाठी माहिती मागविली आहे. त्यामुळे ही फाईल माझ्याकडे आली नाही. तसेच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भातही इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील दर कमी आहेत. इतर राज्यात या नंबर प्लेटची किंमत ही जीएसटी व ती प्लेट बसविण्याचा खर्च वगळून आहे तर महाराष्ट्रातील दर हे जीएसटी व प्लेट बसविण्याच्या खर्चासह आहे. गेल्या पंधरा वर्षातील सोयाबीनच्या सर्वाधिक खरेदीपेक्षा दहापट खरेदी यंदाच्या वर्षी सोयाबीनची झाली आहे. खरेदी केलेले सोयाबीन ठेवण्यास गोदामातही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे माध्यमांनी एखादी बातमी प्रसिद्ध करताना शासनाचीही बाजू मांडल्यास त्यातून होणारे गैरसमज पसरणार नाहीतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणीही चुकीचे बोलले तर खपवून घेणार नाहीत्यांच्यावर कारवाई होणारच असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असून त्यांच्या बद्दल आम्हाला पूरेपूर माहिती आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आम्ही काम करत आहोतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

100 दिवस उपक्रमाचे मूल्यमापन करणार

राज्य शासनाने राबविलेल्या 100 दिवसांच्या कामास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात मीदोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून आढावा घेतला. अनेक विभागांनी चांगली कामे केली आहेत. अनेक कार्यालये स्वच्छ झाली असून रेकॉर्ड रुम तयार झाले आहेत. दूरदृश्यप्रणालीद्वारे नुकत्याच घेतलेल्या बैठकीस राज्यातील सुमारे 7 हजार अधिकारीकर्मचारी उपस्थित होते. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर या उपक्रमाचे केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यातून उत्तम काम करणाऱ्यांना निवडण्यात येणार आहे. तसेच नेमून दिलेल्या कामांसाठी बेंचमार्क ठरविण्यात येणार असून त्या खाली कामगिरी असणाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत विदर्भच्या संघाने विजय मिळविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ संघाचे अभिनंदन केले.

सर्वसामान्यांसाठी व राज्य पुढे नेण्यासाठी काम करत आहोत - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्य शासन हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करत आहे. विकास कामांबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना चांगले दिवस आणण्यासाठी व राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. राज्याच्या विकासाची वाटचाल दुप्पट तर वेग चौपट होईल. याचे प्रतिबिंब येणाऱ्या अर्थसंकल्पात दिसेल. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी कामकाजात सहभाग घेऊन नागरिकांचीमतदारसंघाची प्रश्ने मांडावीत. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील. 

प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीअर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेतया दृष्टिने कामकाज करण्यात येणार आहे. या अधिवेशनात राज्यपाल महोदयांचे अभिभाषण तसेच पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. तसेच दोन महत्त्वाच्या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी राज्य शासनाची आहे.

चहापान कार्यक्रम संपन्न

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील  मंत्रीराज्यमंत्री तसेच आमदार उपस्थित होते. 

नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नव्या संकुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

 नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नव्या संकुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

 

पु.ल. देशपांडे म्हणजे राज्याचा हॅप्पीनेस इंडेक्स

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

       

मुंबईदि. 2 :  महाराष्ट्राचा हॅप्पीनेस इंडेक्स म्हणून पु. ल. देशपांडे यांचे कार्य असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भर त्यांनी घातली आहे. त्यांच्या विनोदबुद्धी आणि भाषाशैली तसेच  त्यांच्या साहित्यातून मिळणारा आनंद निखळ होता. कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मराठी कलाकारांचे तसेच रसिकाचे योगदान मोठे असून संगीत क्षेत्रात लता मंगेशकरभीमसेन जोशीआशा भोसलेनाटक आणि सिनेमा क्षेत्रात श्रीराम लागूनिळू फुले तर साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकरपु. ल. देशपांडेत्याचबरोबर लोककला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यातून मोठे योगदान दिले आहे. संस्कृती आणि सभ्यता यांचे मूल्यमापन त्याठिकाणी जोपासल्या गेलेल्या साहित्यसंस्कृती आणि भाषेमुळे होतेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेआमदार कालिदास कोळंबकरभाई गिरकरअपर मुख्य सचिव विकास खारगेपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आदी  उपस्थित होते.

मुख्यमंत्री  श्री. फडणवीस म्हणाले,  मराठी माणसाने नाटकाप्रती आपले प्रेम जोपासले आहे. नाटकाचे अनेक प्रयोग होतातदेशात या क्षेत्रात मराठी कलावंतांचे काम महत्त्वाचे आहे.  गायककवीसाहित्यिककवी आदी सगळ्यानी आपली कलासाहित्यसंस्कृती याचे जतन करून आपल्या लोकांचे जीवन समृद्ध केले आहे. पु.ल.अकादमी सारख्या वास्तू भविष्यात राज्यात तयार होतील. कवी, साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाला साजेशे काम इथे झालेले आहे. मात्रहे सातत्य पुढे टिकले पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीराज्य सरकारने अत्यंत कमी वेळात या अकादमी आणि नाट्यगृहाचे नूतनीकरण केले आहे. कवी व साहित्यिक रवींद्रनाथ टागोर आणि ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या नावाला साजेसे काम याठिकाणी होत आहे. सध्या गावोगावी नाट्य मंदिराची अवस्था वाईट आहे. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने निधीची मागणी करावीयासाठी निधीची कमतरता पडणार नाहीअशी ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले, “कला साधक मंडळींच्या साधनेची जागा म्हणजे ही पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिर आहे. त्यामुळे ही एक पवित्र वास्तू असूनसर्वार्थाने पावित्र्य टिकवणारी वास्तू आहे. त्यामुळे सांस्कृतिक उन्नती करणारे कार्यक्रम येथे होतील. 

आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव 21 ते 24 एप्रिल 2025 ला पु. ल. अकादमीत होईलअशी घोषणाही सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.शेलार यांनी यावेळी केली.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालिका श्रीमती जोगळेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

            तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी चित्र प्रदर्शन,  मिनी थियेटरचे क्लिप वाजवून तर पु.ल. कला अकादमीचे घंटानाद करून उदघाटन केले.

 

नूतनीकृत संकुलाची वैशिष्ट्ये

रवींद्र नाट्य मंदिराच्या जुन्या इमारतीत आधुनिक सुविधा देत नवीन अंतर्गत सजावट व तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

अत्याधुनिक सभागृहखुले नाट्यगृहनॅनो सभागृहऑडिओ-विज्युअल स्टुडिओ आणि एडिटिंग सुट्सची नव्याने उभारणी करण्यात आली आहे.

लघु नाट्यगृहात डॉल्बी ॲटमॉस ध्वनी यंत्रणाचित्रपट प्रदर्शन व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.

अकादमीत वादन कक्ष आणि सृजनकक्षही विकसिततसेच पु.ल.देशपांडे यांचे स्मृतिदालन देखील सुरु करण्यात आले आहे.

या ठिकाणी नवोदित कलाकारांसाठी नवीन २० अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.

जहांगीर आर्ट गॅलरीच्या दर्जाची आर्ट गॅलरी याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मराठी चित्रपटांच्या स्क्रिनिंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

एवढ्या दर्जेदार व्यवस्था असलेल्या देशातील नाट्यगृहांपैकी रवींद्र नाट्य मंदिर हे एक नाट्यगृह आहे.

०००


Featured post

Lakshvedhi